Maharashtra News Updates: जितेंद्र आव्हाड यांना अटक पूर्व जामीन मंजूर

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 17 Feb 2023 06:54 PM
वीट वाहतूक करणाऱ्या वाहनांना औरंगाबाद शहरात 'बंदी'

Aurangabad News: औरंगाबाद शहरातील सार्वजनीक वाहतूकीचे विनियम व नियमन करण्यासाठी औरंगाबाद शहरात जड व मध्यम माल वाहतुक करणारे वाहनांना उपरोक्त संदर्भान्वये प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे. औरंगाबाद शहरात वाढती लोकसंख्या व वाढती वाहनांची संख्या, अरुंद रस्ते, व अपघाताचे प्रमाण, शहरात व शहरालगत वाढती वसाहत व त्यांची बांधकामे या करीता लागणारे वीट वाहतूक करणारे वाहनांचे प्रमाण वाढल्यामुळे होणारी वाहतूक 'कोंडी व त्यामुळे होणारे छोटे-मोठे अपघात बघता, नागरीकांच्या सुरक्षितेस, जिवितास धोका, अडथळा किंवा गैरसोय होऊ नये, म्हणून औरंगाबाद शहरात वीट वाहतूक करणाऱ्या वाहनांचे वाहतूकीचे विनियम व नियमन करणे आवश्यक असल्याचे सांगत शहर पोलिसांनी निवीन आदेश काढला आहे. वीट 'वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना औरंगाबाद शहरात दररोज पहाटे 4 ते सकाळी 7.30 वाजेपर्यंतच प्रवेश करण्यास परवानगी देण्यात येत आहे. इतर वेळेत सदर वाहनांनी औरंगाबाद शहरात व रहदारी रोडवर प्रवेश बंदी करण्यात आली आहे. सदर वाहनांनी निर्गमित केलेल्या वेळेतच वीट मालाची वाहतूक करावी. इतर वेळेस प्रवेश करु नये, अन्यथा फौजदारी कायद्यान्वये शिक्षेस पात्र राहतील.

शिवजयंतीनिमित्त परभणी जिल्ह्यात मद्यविक्री बंद

Parbhani News: जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी शिवजयंतीनिमित्त रविवारी ( 19 फेब्रुवारी) रोजी मद्यविक्रीची सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी आज दिले आहेत.  जिल्ह्यात रविवारी 19 फेब्रुवारीला शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार असून, त्यानुषंगाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडू नये यासाठी महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 कलम  142 (1) अन्वये सर्व मद्यविक्रीच्या अनुज्ञप्ती 19  फेब्रुवारी रोजी मद्य विक्रीसाठी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी गोयल यांनी दिले आहेत. 


 

गिरीश बापट यांना ऑक्सिजन लावून प्रचारात उतरवणं योग्य आहे का? : अजित पवार

भाजप नेते गिरीश बापट हे सध्या आजारी आहेत. तरी देखील ऑक्सिजन लावून त्यांना प्रचारात तरवलं जात आहे. आजारी माणसाला अशा पद्धतीने प्रचारात उतरवणं योग्य आहे का? असा प्रश्न विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केलाय. 

जितेंद्र आव्हाड यांना अटक पूर्व जामीन मंजूर

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक पूर्व जामीन मंजूर झाला आहे. ठाणे महानगरपालिकेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहार केल्या प्रकरणी आव्हाड यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज सकाळी आव्हाड यांच्या वकिलांनी अटक पूर्व जमीनसाठी अर्ज केला होता. त्यानंतर आता आव्हाड यांना अटक पूर्व जामीन मंजूर करण्यात आला. 

Mansukh Hiren: माजी पोलीस अधिकारी सुनील माने यांचा माफीचा साक्षीदार होण्याच्या  तयारीत

Mansukh Hiren: अँटिलिया स्फोटकं आणि मनसूख हिरेन हत्याकांड प्रकरणात नाट्यमय घडामोड पाहायला मिळाली आहे. माजी पोलीस अधिकारी सुनील माने यांचा माफीचा साक्षीदार होण्याच्या  तयारीत आहे. कारागृहातून  मुंबई सत्र न्यायालयाताल विशेष एनआयए कोर्टात अर्ज केला आहे. सुनील मानेच्या अर्जावर 8 मार्चपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे एनआयएला निर्देश देण्यात आले आहे. 


Air India : एअर इंडिया 840 विमानं खरेदी करणार, विमान कंपन्यांच्या इतिहासातील सर्वात मोठा करार

Air India Boeing Deal : एअर इंडिया (Air India) 840 विमानं (Airplane) खरेदी करणार आहे. ही एअर इंडियाच्या इतिहासातील सर्वात मोठा करार असणार आहे. टाटाच्या (TATA) मालिकी एअर इंडिया अमेरिकेकडून 470 बोईंग विमानं (Boeing Airplane) खरेदी करणार अशी माहिती, याआधी समोर आली होती. मात्र आता एअर इंडियाच्या  (Air India) अधिकाऱ्यांनी बोईंग विमानासंदर्भातील कराराबाबत मोठी अपडेट दिली आहे. यानुसार, एअर इंडिय एकूण 840 एअरबस (Airbus) आणि बोईंग विमानं (Boeing Airplane) खरेदी करणार आहे. अमेरिका आणि एअर इंडिया यांच्यातील हा करार विमान कंपन्यांच्या इतिहासातील मोठा करार ठरणार आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाबाबत मोठी अपडेट... पुढील सुनावणी 21 आणि 22 फेब्रुवारीला

सत्तासंघर्षाबाबत मोठी अपडेट... पुढील सुनावणी 21 फेब्रुवारीला 10.30 वाजता..





Buldana : मध्य प्रदेशात बेपत्ता झालेल्या बुलढाणा जिल्ह्यातील तीन महिलांचा संपर्क, महिला परतीच्या मार्गावर

Buldana : बुलढाणा जिल्ह्यातून मध्यप्रदेश येथील सीहोर येथे गेलेल्या तीन महिला बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. आता त्या महिलांचा त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क झाला असून त्या सुखरूप आहेत. त्या तीनही महिला परतीच्या मार्गावर असल्याची माहिती खुद त्या महिलांनी दिली आहे. आशा देशमुख, सरिता देशमुख व सविता धिंगे अश्या बेपत्ता झालेल्या महिलांची नावे होती. आता या तिन्ही महिला खामगावकडे रवाना झाल्या आहेत. सायंकाळपर्यंत या महिला खामगाव येथे पोहोचण्याची शक्यता आहे.

Ulhasnagar News: उल्हासनगर महापालिकेत कर्मचाऱ्यांचं आसूड आंदोलन

Ulhasnagar News:  सातव्या वेतन आयोगासाठी उल्हासनगर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलंय. यावेळी कर्मचाऱ्यांनी पोतराजाच्या वेशात अंगावर सोटे मारून घेतले. एकीकडे जवळच्या कल्याण डोंबिवली महापालिकेत कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. मात्र उल्हासनगर महापालिकेत अजूनही सातवा वेतन आयोग लागू झालेला नाही. याविरोधात कर्मचाऱ्यांमध्ये रोष आहे. उल्हासनगर महापालिकेच्या बाहेर आज सकाळी झालेल्या या आंदोलनाला शेकडो कर्मचारी आणि कर्मचारी संघटनांचे सदस्य उपस्थित होते. 

MPSC Student: पुण्यातील अलका चौकातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलीसांनी नाकारली परवानगी

MPSC Student: एमपीएससीची परीक्षा जुन्या अभ्यासक्रमानुसार व्हावी आणि नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू व्हावा या मागणीसाठी आज पुण्यातील अलका चौकात आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. मागच्या महिन्यात एमपीएससीचा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र तसा निर्णय अद्याप झालेला नाहीय, असा आरोप विद्यार्थांनी केलाय. दरम्यान, आचारसंहितेचं कारण देत विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारलीय. 

Nashik News : नाशिककरांचं निओ मेट्रोचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार

Nashik News : नाशिककरांचं निओ मेट्रोचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुतोवाच केल्यानंतर अवघ्या चार दिवसात नाशिक महापालिका आणि राज्य सरकारने केंद्र सरकारकडे याबाबतच सादरीकरण केलंय. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकल्प रखडला होता. मात्र आता लवकरच या मेट्रो प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला जाणार आहे.  शहरातील दोन प्रमुख मार्गावर एकूण 32 किलोमीटरवर ही मेट्रो धावणार आहे. 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राजभवनावर दाखल

CM Eknath Shinde : मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजभवनावर दाखल झाले आहेत.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


: सत्ता संघर्षावर आज सकाळी 10.30 वाजता सुप्रीम कोर्टाचा निकाल येणार आहे. नबाम रेबिया निकाल पुनर्विचारासाठी सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे  पाठवले जाईल का, यावर घटनापीठ आज निकाल देणार आहे. पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे  प्रकरण सुरू ठेवावे, अशी शिंदे गटाची विनंती आहे. तर, सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे प्रकरण पाठवावे, अशी ठाकरे गटाची विनंती आहे. त्याबाबत आज निकाल जाहीर होणार आहे. त्याशिवाय जाणून घ्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी...


ठाणे 
- जितेंद्र आव्हाड आणि महेश आहेर यांच्या वादाच्या प्रकरणात चार जणांना अटक झाली आहे. अटकेत असलेल्यांना पुन्हा एकदा आज कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे. 


मुंबई 
- नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस आज मुंबईत दाखल होणार आहेत. तर मावळते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उत्तराखंडसाठी निघणार आहेत. 


- खासदार  नवनीत राणा यांच्या वडिलांना दिलासा मिळणार की फरार घोषित करण्यात येणार? मुंबई सत्र न्यायालय आज निकाल देणार आहे.



रत्नागिरी 
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी दौऱ्यावर असणार आहेत.


- शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते आंबादास दानवे आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. दिवंगत पत्रकार शशिकांत वारिसे कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत.


 सिंधुदुर्ग 
- खासदार संजय राऊत आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर असणार आहेत. कणकवली येथील जाहीर सभेला ते संबोधित करणार आहेत.


 पुणे 
- महाविकास आघाडीचे कसब्याचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी रोहित पवार, धीरज देशमुख, इम्रान प्रतापगढी इत्यादींच्या उपस्थित कसबा गणपतीपासून बाईक रॅली निघणार आहे. 


- एमपीएससीची परिक्षा जुन्या अभ्यासक्रमानुसार व्हावी, नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू व्हावा या मागणीसाठी विद्यार्थ्यांकडून अलका चौकात आंदोलन करण्यात येणार


नागपूर
- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून तीन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. शाह रात्री नागपूरला पोहचणार आहेत. 
- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांची काटोल मतदारसंघात सभा. या सभेत अनिल देशमुख यांच्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी उपस्थित राहणार आहेत.
- युथ एम्पॉवरमेंट समिट मध्ये उद्घाटन सोहळ्यात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि मंगलप्रभात लोढा उपस्थित राहणार आहे
- भाजपच्या नागपूर महानगर कार्यकारिणीची आज बैठक होणार आहे

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.