Maharashtra News LIVE Updates: शेतकरी, सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! मान्सून अंदमानच्या समुद्रात दोन दिवस आधीच दाखल होणार

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 15 May 2024 03:06 PM
Mumbai : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना 46 तासापासून रेस्क्यू काम सुरू, सध्या युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू

Mumbai : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना अपडेट


घाटकोपर होर्डिंग दुर्घटना 46 तासापासून रेस्क्यू काम सुरू आहे,


जवळपास 50% होर्डिंगच्या ढिगारा पेट्रोल पंप वरून बाहेर काढण्यात आला आहे,


या ढिगाऱ्या काढून अडकलेली 18 बाईक आणि सहा ते सात चार चाकी कार बाहेर काढण्यात आला आहे,


सध्या युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे,


होर्डिंग ढिगाऱ्याखाली 30 ते 40 लोकं अजून अडकलेले असल्याची शक्यता आहे,


हा संपूर्ण ढिगाऱ्या काढून त्या मध्ये अडकलेला लोकांना काढण्यासाठी अजून 24 तास लागण्याची शक्यता आहे,


सध्या NDRF जवानांची एक तुकडी, अग्निशमन दलाच्या जवान आणि मुंबई महानगरपालिकेची टीम बचाव कार्य करत आहे.


आतापर्यंत या ढिगाऱ्याखालून 82 लोकांना रेस्क्यू करण्यात आला ज्या मधून 14 लोकांच्या दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Pune -पिंपरी- चिंचवड चिखली परिसरात एका व्यवसायिकाने दुसऱ्या व्यवसायिकवर गोळ्या झाडल्या, आरोपीला अटक

Pune -पिंपरी- चिंचवड शहरातील चिखली परिसरात व्यवसायिक स्पर्धेतून एका व्यवसायिकाने दुसऱ्या व्यवसायिकवर गोळ्या झाडल्या आहेत.


या घटने प्रकरणी चिखली पोलिसांनी हर्षल सोनवणे याला अटक केली आहे.


अजय सुनील फुले हा जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


जखमी अजय आणि हर्षल यांच्यात गेल्या सहा महिन्यांपासून व्यवसायिक स्पर्धेतून वाद सुरू होते.


अखेर हर्षल सोनवणे याने दोन मित्रांच्या मदतीने कट रचून अजय फुले याच्यावर गोळीबार केला. सुदैवाने यात अजय फुले हा बचावला आहे.

Weather Update : शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! मान्सून अंदमानच्या समुद्रात दोन दिवस आधीच दाखल होणार

Weather Update : शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी


मान्सून अंदमानच्या समुद्रात दोन दिवस आधीच दाखल होणार


नैऋत्य मान्सून १९ मे रोजी दक्षिण अंदमानच्या समुद्रात दाखल होण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज


सोबतच, निकोबारच्या बेटांवर आणि दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरातील काही भागात मान्सून दाखल होण्याचा अंदाज व्यक्त


साधारणपणे २१ मे रोजी मान्सून दक्षिण अंदमानच्या समुद्रात दाखल होत असतो


मागील वर्षी देखील १९ मे रोजीच अंदमानच्या समुद्रात मान्सून दाखल झाला होता


मात्र, केरळ गाठायला त्याला ८ जूनपर्यंत वाट पाहावी लागली होती करते

Weather Update : मुंबईत आज काही भागात उष्णतेच्या लाटेचा अंदाज 

Weather Update : मुंबईत आज काही भागात उष्णतेच्या लाटेचा अंदाज 


सोबतच, दुपारनंतर मुंबईत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज

Nashik : शरद पवार नाशिकमध्ये दाखल, सायंकाळी 6 वाजता दिंडोरी लोकसभा मतदारसंघात वणी गावात होणार सभा

Nashik : शरद पवार नाशिकमध्ये दाखल


महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारासाठी शरद पवार नाशिकमध्ये दाखल


सायंकाळी 6 वाजता दिंडोरी लोकसभा मतदारसंघात वणी गावात होणार शरद पवारांची सभा


शरद पवार दोन दिवस असणार नाशिक मुक्कामी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही आज दिंडोरी लोकसभा मतदार संघातील पिंपळगाव मध्ये महायुतीच्या उमेदवार साठी होणार आहे सभा*



तर मतदार संघाच्या दुसऱ्या भागात शरद पवारांची होणार आहे सभा


मोदींच्या आधी पवार नाशिकमध्ये दाखल


दुपारी 4 वाजता उद्धव ठाकरे ही येणार आहेत नाशिकमध्ये

Chhatrapati Sambhaji Nagar : कर्ज वाढल्याने भावाला व्हॉट्सऍप करत एका मराठा आंदोलकाची आत्महत्या

Chhatrapati Sambhaji Nagar : एकीकडे मराठा आरक्षण मिळत नाही, दुसरीकडे डोक्यावर कर्ज वाढल्याने भावाला व्हॉट्सऍप करत एका मराठा आंदोलकाने आत्महत्या केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आली आहे.


दत्ता कालीदास महिपाल असे आत्महत्या करणाऱ्या 25 वर्षे तरुणाचं नाव आहे.


आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाईड नोट लिहून ती आपल्या भावाला व्हाट्सएपवर पाठवली होती.


मूळचा बीड जिल्ह्यातील दत्ता हा संभाजीनगरच्या वाळूज भागातील वडगाव कोल्हाटी गावात राहत होता.


विशेष म्हणजे बीड जिल्ह्यातील मराठा आंदोलनात तो सक्रिय होता. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हे देखील दाखल असल्याची माहिती मिळत आहे.

Nashik - मालेगावच्या अजंगमध्ये अल्पवयीन मुलीचा मृतदेह विहिरीत आढळला, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको

Nashik - मालेगावच्या अजंगमध्ये अल्पवयीन मुलीचा मृतदेह विहिरीत आढळला.
- दोन दिवसांपासुन मृत मुलगी होती बेपत्ता .
- संतप्त ग्रामस्थानी सुरु केला रास्ता रोको.


नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील अजंग गावातून दोन दिवसांपूर्वी राहत्या घरातून मध्यरात्रीनंतर बेपत्ता झालेल्या रिया आहिरे नावाच्या आठ वर्षीय मुलीचा मृतदेह मोसम नदीच्या काठ विनोद शिरोळे यांच्या विहिरीत आढळून आल्याने  खबबळ उडाली.


यां घटनेनंतर संतप्त झालेल्या  ग्रामस्थ्यांनी नामपुर -  मालेगाव रास्ता रोको आंदोलन सुरु केले.


यां घटनेची सखोल चौकशी करून आरोपीला  अटक करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली

 Dharashiv :लाठीचार्ज करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर रविवारपर्यंत कारवाई न केल्यास मराठा समाजाकडून सोमवार पासून बेमुदत बंदचा इशारा

 Dharashiv :लाठीचार्ज करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर रविवारपर्यंत कारवाई न केल्यास मराठा समाजाकडून सोमवार पासून बेमुदत बंदचा इशारा


फडणवीसांनी,प्रशासनाने संबधितावर लवकरात लवकर कारवाई करण्माची मागणी 



छञपती संभाजी महाराज यांच्या जयंती उत्सवा दरम्यान डिजेच्या रेडीएटर वर मारुन ते फोडल्याचा समाज बांधवांचा आरोप 


जिल्हाधिकारी यांना मराठा समाजाने दिले निवेदन 

 Mumbai : मुंबईच्या अंधेरी पूर्वेत मरोळ पाईपलाईन परिसरात साईबाबा नगरमध्ये पाण्याची मोठी पाईपलाईन फुटली

 Mumbai : मुंबईच्या अंधेरी पूर्वेत मरोळ पाईपलाईन परिसरात साईबाबा नगर मध्ये पाण्याची मोठी पाईपलाईन फुटली आहे.



आज पहाटे चारच्या सुमारास मुंबई महानगरपालिकेचा पाण्याची मोठी पाईप फुटली आहे.



पाण्याची मोठी पाईपलाईन फुटल्यामुळे पहाटेपासून लाखो लिटर पाणी वाया जात आहे.



साईबाबा नगर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी भरला आहे.



मात्र अजूनही मुंबई महानगरपालिकेचा वॉटर डिपार्टमेंट कडून कर्मचारी घटनास्थळावर पाइप दुरुस्तीसाठी दाखल नाही...

Mumbai : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुंबईमध्ये रोडशो 

Mumbai : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुंबईमध्ये रोडशो 


महायुतीचे उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार उज्वल निकम यांच्यासाठी योगी आदित्यनाथ यांचा मुंबईमध्ये रोड शो 


उज्वल निकम यांचा प्रचारार्थ कुर्ला येथे १८ मे रोजी होणार रोड शो


पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर उत्तर भारतीय मतांसाठी योगी आदित्यनाथ मैदानात

Chandrashekhar Bawankule : 17 मे रोजी पंतप्रधान मोदींच्या सभेला राज ठाकरे यांना निमंत्रण देण्यासाठी आलो - चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule : 17 मे रोजी पंतप्रधान मोदींच्या सभेला राज ठाकरे यांना निमंत्रण देण्यासाठी आलो - चंद्रशेखर बावनकुळे


पाचव्या टप्प्याच्या निवडणुकीत राज ठाकरे यांचा महत्वाचा वाटा आहे. - चंद्रशेखर बावनकुळे


मुंबई, नाशिकात त्यांची भूमिका महत्वाची - चंद्रशेखर बावनकुळे


पुण्यातील राज ठाकरेंच्या सभेमुळे आम्हाला फायदा झाला आहे - चंद्रशेखर बावनकुळे


मोदींच्या सभेसाठी निमंत्रण देणे आमचे कर्तव्य - चंद्रशेखर बावनकुळे


राज ठाकरे 17 मेला आपली भूमिका मांडतीलाच पण त्याव्यतिरिक्त ही त्यांनी मुंबईत सभा घेण्यासाठी विनंती केली - चंद्रशेखर बावनकुळे


240 जागा लढणारी काँग्रेस पंतप्रधान कसा काय बसवू शकते, त्यांचा विरोधी पक्ष नेताही बसू शकणार नाही - चंद्रशेखर बावनकुळे

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज मुंबईत होणाऱ्या 'रोड शो' बाबत मुंबई पोलिसांकडून विशेष सूचना जारी

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज मुंबईत होणाऱ्या 'रोड शो' बाबत मुंबई पोलिसांकडून विशेष सूचना जारी


विक्रोळी कांजूरमार्ग, पार्कसाईट, घाटकोपर, पंतनगर, टिळकनगर, चेंबूर, चुन्नाभटी, बीकेसी, खेरवाडी, वाकोला, विलेपार्ले, सहार, विमानतळ वाकोला, वांद्रे,  वरळी दादर आणि शिवाजी पार्क परिसरात ड्रोन, पॅराग्लायडर, सर्व प्रकारचे फुगे, पतंग आणि रिमोर्ट कंट्रोल मायक्रोलाइट एअरक्राफ्ट वर बंदी


हे आदेश आज पासून 17 मे च्या मध्यरात्रीपर्यंत लागू करण्यात आले आहे.


पंतप्रधान मोदींची आज मुंबईत होणारी रॅली तर १७ मे रोजी मुंबईत शिवतीर्थावर होणार्या सभेच्या पार्श्वभूमिवर मुंबई पोलिसांकडून सूचना जारी

 Pune : पुण्याच्या माजी महापौर रजनी त्रिभुवन यांच ॠदयविकाराच्या झटक्याने निधन

 Pune : पुण्याच्या माजी महापौर रजनी त्रिभुवन यांच ॠदयविकाराच्या झटक्याने निधन.


2004 ते 2006 या कालावधीत त्या पुण्याच्या महापौर होत्या.  


त्रिभुवन यांच्या भावाचे आज निधन झाल्याने त्या अंत्यविधिसाठी गेल्ये होत्या.  तिथेच त्यांना ॠदयविकाराचा झटका आला

Mumbai : घाटकोपर दुर्घटनेच्या 45 तासांनंतरही बचावकार्य सुरूच

Mumbai : घाटकोपर दुर्घटनेच्या 45 तासांनंतरही बचावकार्य सुरूच


पोकलेनच्या सहाय्यानं लोखंडी ढिगारा उपसण्याचं काम सुरू


एका गर्डरखाली अडकलेल्या गाडीत एक महिला व पुरूष अडल्याची माहिती, त्यांना काढण्याचं काम सुरू


पोकलेनच्या सहाय्यानं गर्डर उचलण्याचे प्रयत्न सुरू


या परिसरातील अन्य होर्डिंग उतरवण्याचं काम सुरू

Pune : लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच भाजप नंतर आता महाविकास आघाडी कडून विजयी उमेदवार अशी बॅनर बाजी 

Pune : लोकसभा निवडणुकीच्या निकाला आधीच विजयी उमेदवार असे बॅनर बाजी 


 महाविकास आघाडी कडून सुप्रिया सुळे अमोल कोल्हे रवींद्र धंगेकर हे विजय उमेदवार म्हणून बॅनर 


 पुण्यातील सारसबाग परिसरात लावण्यात आले बॅनर 


मात्र मावळच्या उमेदवाराचा फोटो आणि शुभेच्छा नाहीत


भाजप नंतर आता महाविकास आघाडीकडून विजयी उमेदवार बॅनर लावलेले पाहायला मिळत आहेत

Dharashiv : धाराशिवमध्ये मिरवणुकीत पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ मराठा समाज एकवटला

Dharashiv : धाराशिवमध्ये मिरवणुकीच्या दरम्यान पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ


मराठा समाजाच्या वतीने पोलीस अधिक्षक कार्यालय येथे निवेदन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात मराठा समाज एकवटला


रस्त्यावर टायर जाळून मराठा समाजाच्या वतीने प्रचंड घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले....



यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून  पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलिसांचा तगडा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

Akola : अकोल्यातल्या कोठडी बाजारातील अशोकराज आंगडीया कुरियर सर्व्हिसवर आयकर विभागाच्या धाडी

Akola : अकोल्यातल्या कोठडी बाजारातील अशोकराज आंगडीया कुरियर सर्व्हिसवर आयकर विभागाच्या धाडी पडल्यात.


आज सकाळपासून आयकर विभागाच्या पथकाकडून कुरियरच्या कार्यालयात तपासणी केल्या जात आहे.


अशोकराज आंगडीया कुरियरवरील तपासणीचं नांदेडमध्ये झालेल्या आयकर धाडीशी कनेक्शन असल्याचे समजल्या जात आहे.


कुरियरच्या माध्यमातून मोठ्या रकमांचा व्यवहार झाल्याचा आयकर विभागाला संशय आहे,


त्यामुळच् ही तपासणी मोहीम सुरू असल्याचे समजते आहे.


या धाडीबाबत मोठी गोपनियता ठेवलेली असल्याने अधिकृत माहिती देण्यासाठी कुणीच पुढे आलेलं नाहीये.


आणखी काही कुरियर कंपन्यांवर आयकरच्य् धाडीची शक्यता वर्तवल्या जात आहे.

Pune : महादेव बेटिंग अँप प्रकरणी पुणे ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची नारायणगाव येथे छापेमारी

Pune : महादेव बेटिंग अँप प्रकरणी पुणे ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची नारायणगाव येथे छापेमारी


परदेशासह देशातील इतर राज्यातल्या छापेमारी नंतर महादेव ऑनलाइन बेटिंग ॲप ची पायामुळं पुण्याच्या नारायणगाव मध्ये होती सुरु 


नारायणगाव शहरातील एका इमारतीत सुरु होते काम..


संपुर्ण इमारत महादेव अँपसाठी वापरत असल्याची माहिती 


70 ते 80 जणांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती 


नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये तपास सुरु

Mumbai : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी आरोपीच्या मागावर पोलिसांच्या 7 टीम..

Mumbai : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण.


आरोपी भावेश भिंडेच्या मागावर पोलिसांच्या ७ टीम..


आरोपी भावेश भिंडे सध्या फरार आहे मात्र मुंबई पोलिसांच्या ७ टीम वेगवेगळ्या भागात त्याचा शोध घेत आहेत.


आरोपी महाराष्ट्राच्या बाहेर पळाल्याचा संशय आहे

Mumbai : मुंबईत पाचव्या टप्यात होणार मतदान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तीन मंत्र्यावर टाकली विशेष जबाबदारी

Mumbai : मुंबईत पाचव्या टप्यात होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तीन मंत्र्यावर टाकली विशेष जबाबदारी...


मंत्री शंभूराज देेसाई, उदय सामंत आणि दिपक केसरकर या तीन मंत्र्यांवर मुंबईतील लोकसभा मतदार संघाची जबाबदारी सोपवल्याची सूत्रांची माहिती


मुंबईत विविध ठिकाणी  पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील नागरिक रहात असलेल्या ठिकाणी विशेष लक्ष


नुसते मंत्रीच नाही तर ठाण्यातील मुख्यमंत्र्यांच्या जवळचे विश्वासू नगरसेवकांचाही यात समावेश


राज्यातील लोकसभा निवडणूकांचा चौथा टप्पा संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे तातडीने मंत्र्यांना  मुंबईत कामाला लागण्याचे आदेश

Chandrapur : प्रेम विवाहाला नकार दिल्याने वाघाच्या शिकारीचे प्रकरण आले उघडकीस

Chandrapur : प्रेम विवाहाला नकार दिल्याने वाघाच्या शिकारीचे प्रकरण आले उघडकीस



प्रेम विवाहाला नकार दिल्याने चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या शिकारीचे एक प्रकरण उघडकीस आल्याचा अजब आणि तितकाच रंजक प्रकार समोर आलाय.


मूल तालुक्यातील उथळपेठ येथील ही घटना असून गावातील एका मुलाचे आणि मुलीचे प्रेमसंबंध होते.


त्यामुळे मुलाच्या वडिलांनी रितसर मुलीच्या वडिलांकडे जाऊन लग्नाची मागणी घातली.


मात्र मुलीच्या वडिलांनी या लग्नासाठी नकारच दिला नाही तर मुलगा आणि त्याच्या वडिलांविरोधात मुलीला त्रास देत असल्याची पोलिसात तक्रार देखील केली.

Pune :  पुण्याच्या भोर तालुक्यात गेले 3-4 दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस, राहत्या घराची भिंत आणि छप्पर कोसळल्याची घटना

Pune :  पुण्याच्या भोर तालुक्यात गेले 3-4 दिवस वादळी वाऱ्यासह पडत असलेल्या अवकाळी पावसानं, तालुक्यातील दुर्गम डोंगरी भाग असलेल्या निगुडघर गावात शेतकरी दत्तात्रय दगडू परखांदे यांच्या राहत्या घराची भिंत आणि छप्पर कोसळल्याची घटना


- भिंत बाहेरच्या बाजूला पडल्याने सुदैवाने जीवितहानी नाही, घरातील तीघेही जण वेळीच बाहेर पडल्यानं कोणीही जखमी नाही , घराचं मात्र मोठं नुकसान 


- भिंतीबरोबर छप्पर कोसळल्याने कौले फुटून काही प्रमाणात धान्य आणि भांड्यांचेही नुकसान


- पहाटे तीन वाजता घडली घटना

Nagpur : नागपुरात चार वर्षापासून मोठ्या होल्डिंगचा स्ट्रक्चरल ऑडिट नाही... भाजप नेत्याचा गंभीर आरोप

Nagpur : नागपुरात चार वर्षापासून मोठ्या होल्डिंगचा स्ट्रक्चरल ऑडिट नाही... भाजप नेत्याचा गंभीर आरोप...


उपराजधानी नागपुरात शेकडोंच्या संख्येने मोठे होर्डिंग्ज असुरक्षित पद्धतीने उभे करण्यात आल्याचा आरोप भाजप नेते आणि नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष पिंटू झलके यांनी केला आहे...


नागपूर महानगरपालिकेने गेल्या चार वर्षापासून शहरातील होर्डींग्जचा स्ट्रक्चरल ऑडिट केलेला नाही असा गंभीर आरोपही झलके यांनी केला आहे.


नागपुरातील सर्व होर्डिंग्सचा स्ट्रक्चरल ऑडिट करून महापालिकेकडून त्याचा अहवाल तयार करण्यात यावा अशी मागणी ही झलके यांनी केली आहे..


त्यामुळे मुंबईत होर्डिंग कोसळून 14 जणांच्या दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर नागपूर आताही होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे

Tushar Bhosale : उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्राचा ‘उद्धवोद्दिन ओवैसी’ आचार्य तुषार भोसले यांचे वक्तव्य

Tushar Bhosale : उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्राचा ‘उद्धवोद्दिन ओवैसी’ 


भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांचे वक्तव्य


मुसलमानांच्या या ‘लाडक्या’ नेत्यासाठी मशीदीतून फतवे निघत आहेत.‼️


स्व. बाळासाहेब ठाकरेंना खरी श्रद्धांजली !


 

Chandrapur : चंद्रपूरात चिमूर तालुक्यातील खानगाव येथे वाघाच्या हल्ल्यात युवा शेतकऱ्याचा मृत्यू

Chandrapur : चंद्रपूरात चिमूर तालुक्यातील खानगाव येथे वाघाच्या हल्ल्यात युवा शेतकऱ्याचा मृत्यू, स्वतःच्या शेतात पीक आणि जनावर देखभालीसाठी गेला होता 34 वर्षीय श्रावण खोब्रागडे, रात्री उशिरा शौचास गेला असताना नाल्यानजीक वाघाने घातली झडप, सकाळी श्रावण घरी न परतल्याने ग्रामस्थांनी सुरू केला शोध, वाघाच्या दहशतीने त्रस्त नागरिक झाले आहेत संतप्त, वन आणि पोलीस कर्मचारी पोचले घटनास्थळी

Chandrapur : चंद्रपूरात चिमूर तालुक्यातील खानगाव येथे वाघाच्या हल्ल्यात युवा शेतकऱ्याचा मृत्यू

       m: चंद्रपूरात चिमूर तालुक्यातील खानगाव येथे वाघाच्या हल्ल्यात युवा शेतकऱ्याचा मृत्यू, स्वतःच्या शेतात पीक आणि जनावर देखभालीसाठी गेला होता 34 वर्षीय श्रावण खोब्रागडे, रात्री उशिरा शौचास गेला असताना नाल्यानजीक वाघाने घातली झडप, सकाळी श्रावण घरी न परतल्याने ग्रामस्थांनी सुरू केला शोध, वाघाच्या दहशतीने त्रस्त नागरिक झाले आहेत संतप्त, वन आणि पोलीस कर्मचारी पोचले घटनास्थळी

Jalgaon :जळगावमधील यावलमध्ये शिवारात रोटावेटर मध्ये अडकून एका 35 वर्षीय शेतमजुराचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातल्या डांभुर्णी येथील शिवारात रोटावेटर मध्ये अडकून एका 35 वर्षीय शेतमजुराचा मृत्यू


विजय जानकीराम बाविस्कर असे मृत शेतमजुराचे नाव आहे.


ट्रॅक्टर द्वारे शेतात रोटावेटर फिरवत असताना ट्रॅक्टरवरून तोल गेल्याने रोटावेटर खाली येऊन ही दुर्दैवी घटना घडली आहे..


सदर घटनेमुळे डांभुर्णी गावात शोककळा पसरली असून याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे..

Sanjay Raut : जिथे जिथे नरेंद्र मोदी जाणार तिथे शिवसेना महाविकास आघाडी जिंकणार - संजय राऊत

Sanjay Raut : जिथे जिथे नरेंद्र मोदी जाणार तिथे शिवसेना महाविकास आघाडी जिंकणार - संजय राऊत


वादळामुळे होर्डिंग पडली त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे


आता शिवसेनेची सत्ता नाही


भाजपचे सत्ता मुंबई महापालिकेवरती आहे


तुमचा प्रशासन काय करत आहे इकडचा पालकमंत्री काय करत आहे


कोणाबरोबर कोणाचे फोटो आहेत 


मोदी सोबत दहा गुंडांचे फोटो आहेत


छगन भुजबळ यांनी जे सांगितलं ते बरोबर आहे


पैशाने जीव विकत घेता येतो का? आणि मोदी रोड शो करत आहे


शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रस्त्यावरती आणले आहे हरण्याच्या दृष्टिकोनातून भाजप त्यांना रस्त्यावरती फिरवत आहे


तुमच्यावर दारोदारी रस्त्यावर भटकण्याची वेळ का आली हे लोकांना कळून द्या


मणिपूरला कधीच गेले नाही दुसरं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नाही का?


मगरीचे अश्रू आता ते घाटकोपर या ठिकाणी जाऊन ढाळतील


मोदींचा ब्रँड आता खतम झाला आहे चार  जून नंतर त्यांना हिमालयात जायचं आहे व्यवस्था महाराष्ट्राने केली आहे

Wardha : वर्धा जिल्ह्यात तेराशे कोटी पीक कर्ज वितरणाचे लक्ष; नवीन स्केल ऑफ फायनान्सनुसार पीक कर्ज वाटपाच्या सूचना 

Wardha : वर्धा जिल्ह्यात तेराशे कोटी पीक कर्ज वितरणाचे लक्ष; कर्जवीतरणात अडवणूक नकोय


पीक कर्ज वाटपाच्या अनुषंगाने बँक प्रशासनाच नियोजन 


नवीन स्केल ऑफ फायनान्सनुसार पीक कर्ज वाटपाच्या सूचना 


मागील वर्षी तेराशे कोटि रूपये पीक कर्ज वाटपाच टार्गेट होत एक हजार ३३ कोटी वाटप केलं होत 


यावर्षी अकराशे कोटीच उद्दिष्ट पाठवलं असून नूतनीकरण करून तेराशे कोटी रुपयांच टार्गेट मिळण्याची अपेक्षा 


नवीन स्केल ऑफ फायनान्सनुसार पीक कर्ज वाटपाच्या सूचना 


वेळेत पिक कर्जाची परतफेड केल्यास व्याज परतावा योजनेच्या लाभाबाबत माहिती देण्याच्या सूचना 

Nanded : नांदेडमध्ये अवकाळी पावसामुळे पिके आडवी, शेतकरी वर्ग हवालदिलं

Nanded : अवकाळी पावसामुळे पिके आडवी


नांदेडमध्ये अवकाळी पावसाने सलग दुसऱ्या दिवशी हजेरी लावल्याने शेतातील पिके जमीन दोस्त झालीयत.


उन्हाळी ज्वारी आणि भाजीपाला वर्गीय पिकांचे सर्वाधिक नुकसान या अवकाळी पावसाने झालंय.


त्याचबरोबर आंबा संत्रा आणि मोसंबी च्या बागांसह केळी पिकाचे देखील मोठया प्रमाणात नुकसान झालंय,


त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिलं झालाय.

Buldhana : घाटकोपर होर्डिंग घटनेनंतर बुलढाणा शहर प्रशासन एक्शन मोडवर, बेकायदेशीर होर्डिंग्ज ला बजावल्या नोटीस

Buldhana : घाटकोपर होर्डिंग घटनेनंतर बुलढाणा शहर प्रशासन एक्शन मोडवर.


शहरातील सर्व होर्डिंग्जच होणार ऑडिट,


बेकायदेशीर होर्डिंग्ज ला बजावल्या नोटीस


बुलढाणा नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी आदेश दिले आहेत.


बुलढाणा शहरात अनेक ठिकाणी मोठे होर्डिंग्ज लावलेले असून यातील 95 % होर्डिंग्ज हे बिना परवानगी व अवैधरीत्या लावण्यात आलेले आहेत.


या सर्व होर्डिंग्ज वर आता कारवाई होते की काय हे बघणे महत्वाच आहे.    

Chitra Wagh : सुषमा अंधारे सटर फटर तर संजय राऊत यांच्या तोंडातून गटार बाहेर पडते - चित्रा वाघ

Chitra Wagh : सुषमा अंधारे सटर फटर तर संजय राऊत यांच्या तोंडातून गटार बाहेर पडते,


भिवंडीत चौक सभेनंतर चित्र वाघ यांची टीका 


भिवंडी लोकसभेतील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी सध्या भिवंडीच्या चौक सभांचे आयोजन केले जात आहे.


या चौकसभांच्या माध्यमातून कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी वातावरण ढवळून काढलं जात आहे.


मंगळवारी सायंकाळी भाजपाच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी भिवंडीत तब्बल चार चौक सभांना हजेरी लावली.


याप्रसंगी संतोष शेट्टी ,शिवसेना शहरप्रमुख सुभाष माने व महायुतीतील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते धामणकर नाका परिसरातील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

Water Shortage : मराठवाड्यात पाणी संकट अधिकच गडद, 7 जिल्ह्यात तब्बल 1 हजार 706 टॅंकरने पाणीपुरवठा

Water Shortage : मराठवाड्यात पाणी संकट अधिकच गडद होत चालले आहे 


मराठवाड्यातील 7 जिल्ह्यात तब्बल 1 हजार 706 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे.



मराठवाड्यातील टँकर संख्या


छत्रपती संभाजीनगर : 656 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे.


जालना :  488 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे.


बीड :  382 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे.


परभणी :  5 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे.


नांदेड :  16 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे.


धाराशिव : 131 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे.


लातूर :  21 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

Rain Update : बारामती, इंदापूर भागात सोसाट्याचा वादळ वारा आणि अवकाळी पावसाचा धडाका, केळी उत्पादकांना मोठा फटका

Rain Update : बारामती आणि इंदापूर भागात गेल्या दोन-तीन दिवसापासून सोसाट्याचा वादळ वारा आणि अवकाळी पाऊस कोसळतोय.


याचा इंदापूर तालुक्यातील केळी उत्पादकांना मोठा फटका बसलाय.


काल रात्री झालेला वादळ वारा आणि अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या केळी बागांसह लहान बाग देखील जमिनीवर आडव्या झाल्या.


इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी, कंदलगाव, माळवाडी आणि उजनी पट्यात शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे.

Ravi Rana : आमदार रवी राणा यांच्या खार येथील सदनिकेतून नोकराने चोरी केल्याचा प्रकार

Ravi Rana : आमदार रवी राणा यांच्या खार येथील सदनिकेतून नोकराने चोरी केल्याचा प्रकार घडला आहे. 


याप्रकरणी खार पोलिसांनी नोकर अर्जुन मुखिया याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


 तक्रारदार संदीप सुभाष ससे आमदार रवी राणा यांच्याकडे स्वीय साहाय्यक म्हणून काम करतात.


खार येथील लाव्ही अपार्टमेंटच्या आठव्या मजल्यावर राणा यांच्या मालकीचे घर आहे. 


या सदनिकेत अर्जुन मुखिया हा घरगडी म्हणून काम करतो. राणा यांनी ससे यांना फेब्रुवारी महिन्यात दोन लाख रुपये दिले होते. 


ही रक्कम त्यांनी कपाटात ठेवली होती. ससे नुकतेच खार येथील घरी आले असता त्यांना दोन लाख रुपये सापडले नाहीत.

Mumbai : घाटकोपर दुर्घटनेला 40 तास उलटले तरीही बचावकार्य सुरूच, अजूनही काहीजण अडकल्यानं शोधकार्य सुरूच

Mumbai : घाटकोपर दुर्घटनेला 40 तास उलटले तरीही बचावकार्य सुरूच. 


पंपावरच सारं इंधन आणि सीएनजी रिकामी करण्यात आलंय


ढिगा-यातून काढलेलं भंगार गैस कटरनं कापून वेगळं केलं जातंय


अजुनही लोखंडी ढिगा-यात काहीजण अडकल्यानं शोधकार्य सुरूच

Ahmednagar : अहमदनगरमध्ये मध्यरात्रीच्या वादळी पावसाने वीज यंत्रणा कोलमडली, काही भागात भागात वीजखांब, झाडे पडली.

Ahmednagar : अहमदनगर-मध्यरात्रीच्या वादळी पावसाने वीज यंत्रणा कोलमडली, नगरच्या दरेवाडी, बुरुडगाव, सारसनगर, केडगाव भागात वीजखांब, झाडे पडली.


अहमदनगर- श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी, पिसोरेखांड परिसराला गारपीट, वादळी वाऱ्याचा तडाखा, शेतीपिकांचे मोठे नुकसानः पंचनामे करावेत, शेतकऱ्यांची मागणी.


अहमदनगर- जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरात 'खरीप'पूर्व मशागतींना वेग,शेतकऱ्यांकडून सोयाबीन पिकाला पसंती : बळीराजाला यंदा दमदार पावसाची प्रतीक्षा.

उजनीच्या उदरातून निघाला पुरातन हेमाडपंती मंदिराचा ठेवा, जतन करण्याची इतिहासप्रेमींची मागणी...

News : उजनीच्या उदरातून उघडा पडला पूरातन हेमाडपंती मंदिराचा ठेवा ..


या पुरातन दुर्मिळ ठेव्याची जतन करण्याची इतिहासप्रेमींची मागणी...


 सध्या दुष्काळाची स्थिती गंभीर बनत चालली असून उजनी धरणाची पाणीपातळी वजा पन्नास टक्के एवढी खालावल्याने उजनीच्या उदरात जलसमाधी मिळालेल्या अनेक पुरातन वास्तू आणि पुरातन मंदिरे उघडी होऊ लागली आहेत.


या जुन्या पुरातन वास्तू पाहण्यासाठी आता पर्यटकांची पावले उजनी धरणाकडे वाळू लागली आहेत.


उजनी धरणाचे बांधकाम झाल्यावर १९७५ साली परिसरातील अनेक मंदिरे आणि वास्तू उजनीच्या उदरात गडप झाल्या होत्या.


यंदा झपाट्याने उजनीचे पाणी पातळी खालावू लागल्याने या पुरातन वास्तू आणि मंदिरे पूर्णपणे बाहेर आली आहेत . 

Nagpur : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी झालेल्या शिक्षेला स्थगिती द्या, काँग्रेस नेत्याची याचिका

 Nagpur : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कोट्यवधी रुपयांच्या रोखे खरेदी घोटाळाप्रकरणी झालेल्या शिक्षेला स्थगिती देण्यात यावी अशी याचिका (दोषसिद्धी स्थगिती याचिका) काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर केली आहे... न्यायालयाने या प्रकरणी राज्य सरकारला नोटीस बजावून चार आठवड्यात उत्तर सादर करण्यास सांगितले आहे.. 


22 डिसेंबर 2023 रोजी नागपूरच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने केदार यांना नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 150 कोटी रुपयांच्या रोखे खरेदी घोटाळा प्रकरणी पाच वर्षाची शिक्षा सुनावत 12 लाख 50 हजार रुपयांचे दंडही ठोठावले होते... 


या निर्णया विरोधात केदार यांनी आधीच सत्र न्यायालयात अपील दाखल केली आहे...सत्र न्यायालयाची अपील निकाली निघेपर्यंत दोष सिद्धीला स्थगिती देण्यात यावी अशी विनंती करणारी याचिका आता केदार यांनी नागपूर खंडपीठाच्या समोर केली आहे...


रोखे खरेदी घोटाळा प्रकरणी केदार यांना दोन वर्षापेक्षा जास्त कालावधीची शिक्षा झाल्यामुळे त्यांची आमदारकी ही रद्द झाली आहे...

PM Modi : पंतप्रधान मोदी चीन-पाकिस्तानला घाबरत नाही, मग सर्वसामान्य शेतकरीची भीती आहे का? स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सवाल

PM Modi : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन पाकिस्तान ला घाबरत नाही, तर त्यांना सर्वसामान्य शेतकरीची भीती आहे का? स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सवाल


- नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याचा पार्श्वभूमीवर शेतकरी संघटेनच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस देत त्रास दिला जात असल्याचास्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष संदीप जगताप यांचे आरोप

- शेतकऱ्यांना सभेला जाऊ देत नसेल तर मग सभा कशाला?

- शेतकऱ्यांना विनाकारण पोलिसांकडून त्रास दिला जातोय


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नाशिकमध्ये पार पडत।आहे सभा 
-
सभेच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली जातेय नोटीस

Mumbai : मुंबई गुन्हे शाखेचे पोलिस असल्याचे सांगत व्यावसायिकाला 25 लाखांना गंडा, निवडणूकीसाठी काळापैसा घरी ठेवल्याचा केला आरोप

Mumbai : मुंबई गुन्हे शाखेचे पोलिस असल्याचे सांगत व्यावसायिकाला 25 लाखांना गंडा


व्यावसायिक घरी ६ आरोपींनी जाऊन निवडणूकीसाठीचा काळापैसा घरी ठेवल्याचा केला आरोप


व्यावसायिकाला विश्वास पटावा म्हणून ६ ही आरोपींनी बनवली होती स्वत:ची ओळखपत्र


सोमवारी ४ च्या सुमारास हे आरोपी हाॅटेल व्यावसयिकाच्या सायन हाॅस्पिटल जंकशन येथील घरी पोहचले


अवघ्या काही मिनिटात आरोपींनी व्यावसायिकाला धाकात ठेवत, त्याच्या घरातील २५ लाखाची रोकड घेऊन पसार झाले


तसेच याबाब कोणाला काही सांगितल्यास बघून घेण्याची धमकी आरोपींनी दिली


व्यवसायिकाने या घटनेनंतर त्याच्या परिचयाच्या पोलिसांशी चर्चा केल्यानंतर त्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले


या प्रकरणी व्यावसयिकाने दिलेल्या तक्रारीनुसार सायन पोलिस ठाण्यात ६ अनोळखी व्यक्तींवर भादवी कलम १७०, ४२०, ४५२, ५०६, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे


या आरोपींनी अशा प्रकारे अन्य काही जणांना फसवले आहे का ? याचाही पोलिस शोध घेत आहेत

Nashik : उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर, शिंदे गटात दाखल झालेल्या पदाधिकाऱ्यांवर काय टीका करणार?

Nashik : पाचव्या टप्प्यात होणाऱ्या मतदान प्रक्रियेचा प्रचार आता रंगात आला आहे


विविध राजकीय नेत्यांचे दौरे आणि सभा यांनी वातावरण ढवळून निघाले आहे.


उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज नाशिक दौऱ्यावर येणार आहे


नाशिक येथील अनंत कान्हेरे मैदानावर त्यांची जाहीर सभा संध्याकाळी पार पडणार आहे.


काही दिवसांपूर्वी उबाठा सोडून शिंदे गटात दाखल झालेल्या पदाधिकाऱ्यांवर उद्धव ठाकरे काय टीका करणार?


याकडे नाशिक शहरातील मतदारांचे लक्ष लागलय... 

Nashik - पंतप्रधान मोदींच्या सभेआधी पाच शिवसैनिकांना पोलिसांनी  ठेवले नजरकैदेत, प्रतिबंधात्मक कारवाई

Nashik - पंतप्रधान मोदींच्या सभेआधी पाच शिवसैनिकांना पोलिसांनी  ठेवले नजरकैदेत...


मोदींनी दिलेल्या आश्वासनांचा विचारणार होते जाब..


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात शेतकरीविरोधी धोरणे राबवून शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला आहे


असा आरोप करीत महायुतीच्या प्रचारार्थं नाशिकच्या पिंपळगाव येथे होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवेळी मोदी यांनी विविध भाषणात दिलेल्या आश्वासना बाबत जाब विचारण्याचा ईशारा देणाऱ्या पाच शिवसैनिकांना ( उध्दव ठाकरे गट ) निफाड पोलिसांनी राहत्या घरातून ताब्यात घेत अज्ञात स्थळी नजरकैदेत ठेवले..


पोलीस वरिष्ठांच्या आदेशान्वये या पाच जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.


दरम्यान, विविध कांदा उत्पादक संघटना यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून लक्ष ठेवले जात असून मोदी यांच्या सभेवेळी काही गोंधळ व्हायला नको म्हणून पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे...

Mumbai : मुंबईत नरेंद्र मोदी यांच्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात, मैदानावर सुमारे 50 हजार ते 75 हजार नागरिकांची बसण्याची सुविधा

Mumbai : मुंबईत नरेंद्र मोदी यांच्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात


कल्याण भिवंडी ठाणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांसाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कल्याण मधील व्हरटेक्स ग्राउंड वर सभा होणार आहे .


या सभेसाठी मैदानावर जोरदार तयारी करण्यात आली आहे.


भव्य मंडप उभारण्यात आलाय. सुमारे 50 हजार ते 75 हजार नागरिकांची बसण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.


त्याचप्रमाणे या मैदानात मोठ मोठ्या एलईडी स्क्रीन देखील लावण्यात आल्यात.


या सभेच्या अनुषंगाने कल्याण शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.


सभास्थळी व सभेच्या परिसरात सुमारे दीड ते दोन हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत.


विविध सुरक्षा यंत्रणा या परिसराची तपासणी करत आहेत. एकंदरीतच सभेची तयारी अंतिम टप्प्यात आहे.


भिवंडी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी देखील या सभास्थळी येऊन आढावा घेतला

Nashik : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगावला सभा, कांदा उत्पादक शेतकरी केंद्र सरकारवर काहीसे नाराज

Nashik : नाशिक-दिंडोरी या दोन लोकसभा मतदारसंघासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पिंपळगाव येथे सभा घेत आहे.


हा संपूर्ण परिसर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आहे.  


कांदा उत्पादक शेतकरी कांद्याचा भाव व निर्यात धोरणाला घेऊन केंद्र सरकारवर काहीसे नाराज दिसत आहे .,

PM Modi : पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, नाशिक आणि मुंबईमध्ये उमेदवाराचा जोरदार प्रचार करणार

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. 


मोदी नाशिक आणि मुंबई दौरा करणार आहे. 


नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींची भव्य सभा पार पडणार आहे.
 
तर मुंबईच्या घाटकोपरमध्ये त्यांचा भव्य शो पार पडणार आहे. 


दिग्गज नेते प्रचारात उतरल्याने लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


पंतप्रधान मोदी नाशिक आणि घाटकोपरमध्ये उमेदवाराचा जोरदार प्रचार करणार आहेत. 


पंतप्रधान मोदी सकाळी नाशिक दौऱ्यावर आहेत, त्यानंतर संध्याकाळी मुंबईत पोहोचतील.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.