Maharashtra News Updates 13th May 2023 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 13 May 2023 11:11 PM
Nashik News : नाशिक: हृदयविकाराच्या झटका आलेल्या पोलिसाचे नागरिकाने वाचविले प्राण, मनमाडमधील घटना

Nashik News:  पोलीस म्हणून आपले कर्तव्य बजावण्यासाठी दुचाकीवर निघालेल्या रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याला छातीत दुखू लागल्याने तो जमिनीवर कोसळला..मात्र प्रसंगावधान राखत एका जागरूक नागरिकाने त्याचे प्राण वाचविल्याची घटना नाशिकच्या मनमाड येथे घडली..नागेश दांडे हे रेल्वे पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य बजावण्यासाठी दुचाकीवर जातं असतांना त्यांना अचानक छातीत दुखू लागले..त्यानंतर ते जमिनीवर कोसळले, काय झाले हे कोणालाच समजत नव्हतं, बघ्यांची गर्दीही जमली होती..या गर्दीतून एक भागवत झाल्टे नावाचा देवदूत समोर आला.व त्याने परिस्थिती बघून पोलीस कर्मचाऱ्याच्या छातीवर दाब देवून प्रेशर दिले..तसेच तोंडाने श्वासोच्छ्वास देवून पोलीस कर्मचाऱ्याचा जीव वाचवला.. पोलीस कर्मचारी शुद्धीवर आल्यानंतर तातडीने त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Yavatmal News: यवतमाळ: हॉस्पिटलमध्ये लाडू वाटून कर्नाटक विजयाचा साजरा केला आनंद

हॉस्पिटलमध्ये लाडू वाटून कर्नाटक विजयाचा साजरा केला आनंद


महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी वाटले लाडू


संध्या सव्वालाखे प्रकृती बरी नसल्याने आहे संजीवन हॉस्पिटलमध्ये भरती


कर्नाटक प्रचार यंत्रणेत झाल्या होत्या त्या सहभागी


विजयाचा आंनद हॉस्पिटलमध्ये सर्व स्थापला  लाडू वाटून केला साजरा

Chandrapur News: चंद्रपूर: संतोष रावत हल्ल्यामागे असलेल्या मास्टर माइंडला शोधून काढा अन्यथा काँग्रेस जिल्हाभर आंदोलन करेल : विजय वडेट्टीवार यांचा इशारा

Chandrapur News: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांची आज माजी मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भेट घेतली. रावत यांच्यावर मूल शहरात गोळीबार झाला होता. या हल्ल्यातील आरोपी अद्याप फरार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात हा बिहार सारखा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला. या हल्ल्यामागे असलेल्या मास्टर माइंडला शोधून काढा अन्यथा काँग्रेस जिल्हाभर आंदोलन करेल असाही इशारा त्यांनी दिला.

Thane News: भाईंदर: बागेश्वर धाम सरकारच्या कार्यक्रमात चोरी गेलेले सोने पोलिसांनी केले परत

Thane News: मिरा रोड येथे बागेश्वरधाम सरकार उर्फ धीरेंद्र शास्ञी यांच्या 18 आणि 19 मार्च च्या प्रवचन कार्यक्रमात चोरी झालेले दागिने काशिमीरा येथील गुन्हे शाखा कक्ष 1 आणि मिरारोड पोलीस ठाणे यांनी सयुंक्त तपास करून गुन्ह्यात चोरी केलेले 50 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. यात आठ आरोपींना अटक ही करण्यात आली आहे. त्याच बरोबर चोरीला गेलेले दागिने नागरिकांना पोलीस आयुक्तांनी परत ही केले आहेत.

Karnataka: बेळगावमध्ये नगरसेवक सुधा भातखाडे यांच्या घरावर फटाके टाकून जाळपोळ करण्याचा प्रयत्न

कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर बेळगावात राजकीय राडा पाहायला मिळाला. बेळगावात पुन्हा मराठी भाषिक टार्गेट होत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. मराठी नगरसेवक सुधा भातखाडे यांच्या घरावर फटाके टाकून जाळपोळ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यानंतर बेळगावच्या शहापूर पोलीस स्थानकात रमाकांत कोंडुसकर यांच्यासह मराठी भाषिकांनी आंदोलन छेडलं आहे.

Palghar News:  पालघर: जव्हारच्या नंदनमाळ भागात भीषण पाणी टंचाई, विहिरींनी तळ गाठला

Palghar News:  पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा आणि विक्रमगड तालुक्याला पावसाळ्यानंतर पाणीटंचाई ही पाचवीलाच पुजलेलीच जव्हार मधील नंदन माळ  गावाला सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. एक हजार च्या जवळपास लोकसंख्या असलेल्या या गावात सध्या विहिरींनी तळ गाठला आहे . त्यामुळे येथे टँकरने पाणीपुरवठा होतो मात्र एक दिवसाआड टँकर येत असल्याने तेही पाणी अपूर्ण पडते

नांदेडमध्ये उष्माघाताचा पहिला बळी, शेतात काम करुन परतलेल्या 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू
Nanded News : हिमायतनगर येथील 28 वर्षीय युवकाचा उष्माघाताने मृत्यू झाला. विशाल मादासवार हा युवक काल शेतात कामासाठी गेला होता. दिवसभर उन्हात काम करुन तो सायंकाळी घरी परतला. घरी आल्यावर त्याला मळमळ सुरु होऊन अस्वस्थ वाटू लागले. विशाल ला तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज सकाळी त्याला उलटी झाली. उपचारादरम्यान विशालचा मृत्यू झाला. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पंधरा दिवस तापमान खालावल्यानंतर दोन दिवसापासून प्रचंड ऊन आहे. तापमान 43 अंश सेल्सिअसपर्यंत वाढल्याने उष्माघाताची भीती वाढली आहे. दरम्यान 28 वर्षीय युवकाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याने हिमायतनगरमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
नांदेडमध्ये उष्माघाताचा पहिला बळी, शेतात काम करुन परतलेल्या 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू
Nanded News : हिमायतनगर येथील 28 वर्षीय युवकाचा उष्माघाताने मृत्यू झाला. विशाल मादासवार हा युवक काल शेतात कामासाठी गेला होता. दिवसभर उन्हात काम करुन तो सायंकाळी घरी परतला. घरी आल्यावर त्याला मळमळ सुरु होऊन अस्वस्थ वाटू लागले. विशाल ला तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज सकाळी त्याला उलटी झाली. उपचारादरम्यान विशालचा मृत्यू झाला. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पंधरा दिवस तापमान खालावल्यानंतर दोन दिवसापासून प्रचंड ऊन आहे. तापमान 43 अंश सेल्सिअसपर्यंत वाढल्याने उष्माघाताची भीती वाढली आहे. दरम्यान 28 वर्षीय युवकाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याने हिमायतनगरमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
किरकोळ कारणावरुन मारहाणीमध्ये एकाचा मृत्यू, आरोपीने चार महिन्यांनी स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन दिली खुनाची कबुली
Beed News : अनावधानाने झालेल्या मारहाणीत एका तरुणाचा खून झाल्याची कबुली चार महिन्यानंतर आरोपीने शिरसाळा पोलीस ठाण्यात येऊन दिली आहे. चार महिन्यांपूर्वी परळी तालुक्यातल्या शिरसाळा येथे एका पान टपरीवर भुजंग वाघमारे यांना एका अज्ञात व्यक्तीचा धक्का लागला आणि यामध्ये वाघमारे यांनी या व्यक्तीला मारहाण केली. त्यानंतर बेशुद्धावस्थेत त्याला महावितरणच्या बंद असलेल्या कार्यालयात नेऊन ठेवलं होत. यानंतर या व्यक्तीचा मृत्यू झाला. मात्र या घटनेची कोणालाच माहिती नव्हती. शेवटी भुजंग वाघमारे हे चार महिन्यानंतर या इमारतीत गेले असता या व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आणि त्यानंतर त्यांनी स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली आहे

 
महाडमधील मोहोत इथे क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादातून गोळीबार, दोन जण जखमी

Raigad News : महाड तालुक्यातील मोहोत येथे काल रात्री क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादातून एकाने गोळीबार केल्याची घटना घडली. यामध्ये सोहम आत्माराम हिरडेकर (वय 23 वर्ष राहणार भीवघर) आणि संकेश शशिकांत कदम (वय 28 वर्ष राहणार भीवघर) अशी जखमी झालेले दोघांची नावे आहे. त्यांना महाड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी पाठवण्यात आले आले. परंतु एकाच्या पायाला गंभीर जखम झाल्यामुळे त्याला पुढील उपचारांसाठी मुंबईत पाठवण्यात आले. रोशन राम मोरे (रा.मोहोत पाटीलवाडी) असे गोळीबार करणाऱ्या आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून पोलिसांनी बंदूक देखील हस्तगत केली आहे. महाड तालुक्यातील मोहोत येथे मंदिराचा जिर्णोद्धार कार्यक्रम असताना मागील भांडणाचा राग मनात धरुन हा गोळीबार झाल्याचे समजते. या संपूर्ण घटनेचा अधिक तपास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे हे करत आहेत.

मातोश्रीवर ठाकरे गटाच्या विधानसभा, विधानपरिषद आमदारांची बैठक, सत्ता संघर्षाच्या निकालानंतर पुढील रणनीती ठरवणार
Thackeray Group MLA Meeting : सर्वोच्च न्यायालयाने सत्ता संघर्ष प्रकरणी दिलेल्या निकालानंतर ठाकरे गटाच्या विधानसभा आणि विधानपरिषद आमदारांची बैठक आज मातोश्री येथे बोलवण्यात आली आहे. दुपारी बारा वाजता ही बैठक सुरु होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ठाकरे गटाची पुढची रणनीती काय असणार यावर या बैठकीत चर्चा केली जाणार असून उद्धव ठाकरे हे आपल्या आमदारांना नेत्यांना मार्गदर्शन करतील. 
Nashik News: सुरगाणा येथे 161 जोडप्यांचा सामुदायिक विवाह

Nashik News: लाखो रुपये खर्च करून शाही विवाह सोहळे एकीकडे पार पडत असतांना नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील सांबरखल येथे कमी खर्चात 161 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. ए.टी.पवार इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फाउंडेशन, जनलक्ष्मी आदिवासी शिक्षण संस्था आणि आदिवासी विकास प्रकल्प, कळवण यांच्या संयुक्त विद्यमाने हा 161आदिवासी जोडप्याचा सामुदायिक विवाह सोहळा पार पडला..एका लग्नासाठी लाखो रुपयांचा खर्च कमी करण्यासाठी आदिवासी समाजात सामुदायिक विवाह सोहळ्याशिवाय पर्याय नसल्याचे प्रतिपादन या सोहळ्या प्रसंगी कळवणचे आमदार नितीन पवार यांनी केले.. सांबरखल येथे संपन्न झालेल्या या विवाह सोहळ्यासाठी विविध स्तरातील प्रतिष्ठित व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Maharashtra News: मातोश्रीवर ठाकरे गटाच्या विधानसभा, विधान परिषद आमदारांची बैठक
Maharashtra News: सर्वोच्च न्यायालयाने सत्ता संघर्ष प्रकरणी दिलेल्या निकालानंतर ठाकरे गटाच्या विधानसभा आणि विधानपरिषद आमदारांची बैठक आज मातोश्री येथे बोलवण्यात आली आहे

 

दुपारी बारा वाजता ही बैठक सुरू होणार आहे

 

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ठाकरे गटाची पुढची रणनीती काय असणार यावर या बैठकीत चर्चा केली जाणार असून उद्धव ठाकरे हे आपल्या आमदारांना नेत्यांना मार्गदर्शन करतील
Maharashtra News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर 

Maharashtra News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर 


पाटण तालुक्यात ‘शासन आपल्या दारी’ या योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार


योजनेंतर्गत लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात लाभवस्तू आणि प्रमाणपत्रांचे वाटप होणार


राज्यातील दिव्यांग सर्वेक्षण कार्यक्रमाचे उद्धघाटनही यावेळी करण्यात येणार 


राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघातून या राज्यस्तरीय उपक्रमांचा आज शुभारंभ

समीर वानखेडे यांच्या घरावर सीबीआयचा छापा, तब्बल 13 तास झाडाझडती

Sameer Wankhede Raid : आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्या गोरेगाव इथल्या इम्पिरियल हाईट्स इमारतीत असलेल्या घरावर सीबीआयने छापा टाकला. तब्बल 13 तास सीबीआयची छापा सुरु होता. काल दुपारी साडे चार वाजता वानखेडे यांच्या घरी दाखल झालेले अधिकारी पहाटे साडेपाच वाजता बाहेर पडले. त्यांनी वानखेडे यांच्या घरातील प्रिंटरसह काही इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट्स आणि काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.

नवरदेवाच्या मिरवणुकीवर तुफान दगडफेक, वाहनांची तोडफोड, बुलढाण्यातील माटरगाव येथे डिजेवर गाणे वाजवण्याच्या वादातून दोन गटात राडा
Buldhana News : काल रात्री शेगाव तालुक्यातील माटरगाव येथील एका युवकाची लग्नाची वरात डीजेच्या तालावर गावातून निघाली असता, डीजेच्या आवाजावरुन विशिष्ट समाजाच्या तरुणांनी मज्जाव केला. यातून वऱ्हाडी आणि तरुणांमध्ये वाद होऊन याचं रुपांतर तुफान दगडफेकीत झालं. यावेळी लग्नातील वऱ्हाडी महिलांना मारहाण केल्याचा आरोप होत आहे. काही वाहनांची तोडफोडही करण्यात आली. जवळपास दोन तास हा गोंधळ सुरु होता. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी गावात पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी पोलिसांनी दोन गटांच्या परस्पर तक्रारीवरुन 53 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या गावात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून गावात तणावपूर्ण शांतता आहे. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


Karnataka Elections: आज दुपारपर्यंत कर्नाटकचा कौल स्पष्ट होणार, बेळगावातील 18 मतदारसंघांकडे विशेष लक्ष 


Karnataka Assembly Elections 2023 : कर्नाटकात काँग्रेस बाजी मारणार की भाजप सत्तेत कायम राहणार याचा फैसला अवघ्या काही तासांवर आला आहे. आज दुपारपर्यंत हा निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे. तर बेळगावातील 18 मतदारसंघातील निकाल हे दुपारी दोन वाजेपर्यंत जाहीर होतील. 


कर्नाटकातील 224 जागांसाठी 10 मे रोजी निवडणूक झाली. कर्नाटकातील निवडणुकीसाठी 72.67 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी सुमारे महिनाभर प्रचार केल्यानंतर आता राज्यातील जनता सत्तेच्या चाव्या कुणाकडे देणार आज ठरणार आहे. भाजप सत्ता कायम ठेवणार की काँग्रेस सत्तेत येणार हे अवघ्या काही तासांमध्ये ठरणार आहे. 


Latur News:  चित्रपट पाहण्यासाठी बुरखा घातला; त्यावरून दोन गटात वाद; उदगीर शहरातील प्रकार


Latur News:  हल्ली कोणत्या कारणांवरून तणाव निर्माण होईल, कोणाच्या भावना दुखावतील याचा नेम नाही. असाच एक प्रकार लातूर जिल्ह्यात घडला आहे. दोन गटातील तणावासाठी निमित्त ठरलंय बुरख्याचं. त्यावरून समाजातील दोन गटात वाद निर्माण झाला आहे. ही घटना आहे लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात घडली आहे. 


प्रकरण नेमकं काय?


उदगीरमधील एक अल्पवयीन जोडपं बुरखा घालून काही मित्रांसोबत चित्रपट पाहायला गेले होतं. बुरखा घातलेल्या मुलीसोबत काही मुलं चित्रपट पाहात असल्याची माहिती काही तरुणांना कळली. त्यानंतर या तरुणांनी त्या मुलांना मारहाण केलीच, शिवाय रिक्षामधून अंड्याच्या दुकानात नेऊन पुन्हा मारलं. मारहाणीचे व्हिडीओदेखील काढले. या घटनेनंतर घाबरलेल्या मुलांनी त्यांच्या पालकांना झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर पालकांनी उदगीर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी लगेचच चार आरोपींना अटक केली. दरम्यान, या प्रकरणी खोटे गुन्हे दाखल झाल्याचा आरोप करत दोन दिवसांपासून समाजातील काही लोक उदगीर शहर पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करत आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.