Maharashtra News Updates 13 February 2023 : पालघलध्ये बसचा अपघात, 20 विद्यार्थी जखमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 13 Feb 2023 08:01 PM
पालघलध्ये बसचा अपघात, 20 विद्यार्थी जखमी

पालघरमध्ये कमारे जवळ भरधाव एसटी बस गतिरोधकावर आदळल्याने अपघात झालाय. या अपघातात वीस विद्यार्थ्यांसह पाच प्रवासी जखमी झाले आहेत. सर्व विद्यार्थिनी पालघर मधील आर्यन शाळेतील असून अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत.  जखमींना पालघर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.  

शिवरायांचा पुतळा बसवण्यावरून सिल्लोडच्या घाटनांदरा गावात तणावाचे वातावरण

Aurangabad: सिल्लोड तालुक्यातील घाटनांदरा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा विनापरवानगी पुतळा बसविल्याने तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. रात्रीच्या सुमारास अज्ञात लोकांनी शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा बसवला होता. त्यामुळे घटनास्थळी महसूल व पोलीस प्राशासन सकाळपासून गावात दाखल झाले आहेत. दरम्यान गावकरी पुतळा न काढण्याच्या भुमिकेवर ठाम असून, प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून गावकऱ्यांची समजूत घालण्यात येत आहे. मात्र मोठा जमाव जमला असल्याने सद्या या गावात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. 

Aurangabad: अपमान सहन न झाल्याने तरुणाची आत्महत्या

Aurangabad Crime News: आपल्याला करण्यात आलेल्या मारहाणीमुळे अपमान सहन न झाल्याने एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील होणोबाचीवाडी येथे समोर आली आहे. गौरव विजयदास वैष्णव (वय 20 वर्ष रा.होणोबाचीवाडी) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तर त्याच्या आत्महत्येस कारणीभूत आसलेल्या पुन्नम किसन मेहेर, उद्यल किसन महेर, किसन काळु महेर, वंदना पुन्नम महेर या चौघ्यांच्या विरोधात पाचोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारावाई, 26 लाख रूपयांच्या चरस तस्करी प्रकरणी चार जणांना अटक

मुंबई गुन्हे शाखा युनिट चारने चरस तस्करीप्रकरणी चार जणांना अटक केली आहे. या आरोपींकडून 1 किलो 300 ग्रॅम चरस जप्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या चरसची किंमत सुमारे 26 लाख रूपये इतकी आहे. पोलिसांनी आरोपींकडून पाच मोबाईल जप्त केले आहेत. माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. या प्रकरणी काळाचौकी पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा चरस कोठून आणला आणि कोणाला पुरवायचा होता याचा तपास पोलिस करत आहेत.

अनुसूचित जाती जमातीच्या मुलींच्या शिक्षणासाठी आलेला अडीच कोटी रुपयांचा निधी परत गेला, बीडमध्ये भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने सायकल चालवून आंदोलन

Beed News : बीडमध्ये अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थिनींना सायकल खरेदीसाठी आलेला निधी खर्च न केल्याने भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने सायकल चालवून आंदोलन करण्यात आलं. बीड जिल्ह्यामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थिनींना सायकल खरेदी करण्यासाठी आणि शाळेमध्ये सौर पॅनल बसवण्यासाठी आलेला अडीच कोटी रुपयांचा निधी खर्च न केल्याने जिल्हा परिषद प्रशासनाच्या विरोधामध्ये भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने सायकल चालून अनोखं आंदोलन करण्यात आलं. सामाजिक न्याय होऊन परिसरात हे आंदोलन सुरु असताना सुरक्षारक्षकाने आंदोलकांमध्ये वाद झाल्याने या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं.

इलेक्ट्रिक डबल डेकर बस आज मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार

Mumbai Electric Double Decker Bus : मुंबईकर नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण करणारी इलेक्ट्रिक डबल डेकर बस लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. बेस्टच्या कुलाबा आगारात पहिल्या ईव्ही डबल डेकरचं पूजन करण्यात आलं. या बसेस टप्प्याटप्प्याने बेस्टच्या सेवेत दाखल होणार आहेत. पहिली नवीन डबल डेकर बस या आठवड्यापासून वांद्रे कुर्ला संकुल ते वांद्रे स्टेशनपर्यंत धावणार आहे. त्यानंतर ही बस दक्षिण मुंबईतील काही मार्गांवरून धावणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नरिमन पॉईंट, कुलाबा ते वरळी आणि कुर्ला ते सांताक्रूझ या मार्गांवर या बसेस धावताना दिसेल. या बसचं किमान अंतरासाठीचं भाडं सहा रुपये असणार आहे. संपूर्णपणे वातानुकूलित, ऐसपैस आसनव्यस्था, सीसीटीव्ही, तीन तासांच्या सिंगल चार्जमध्ये 120 किमी. प्रवासाची क्षमता ही या डबलडेकरची खास वैशिष्ट्ये आहेत.

Malad Fire: मालाडमधील झोपडपट्टीला आग

Malad Fire:  मुंबईतील मालाड पूर्व भागतील आंबेडकरनगर परिसरात भीषण आग लागली आहे.  जवळपास या भागात 300 घरे आहेत.  आगीवर नियंत्रण
मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचं कारण अस्पष्ट


 





Chandrapur News: एसटी महामंडळाच्या बसने दिलेल्या धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू

Chandrapur News: एसटी महामंडळाच्या बसने दिलेल्या धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे.    मूल तालुक्यातील चांदली नदीवरील पुलाजवळ ही घटना घडली आहे.  संदीप कोकोडे (28) आणि प्रफुल्ल गुरनुले (24) अशी मृतांची नावे आहेत. अपघातानंतर बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाली आहेत. 

मुंबईतील असल्फामधील ठाकरे गटाचे नगरसेवक पोलिसांच्या ताब्यात, शिवसैनिकांचा घाटकोपर अंधेरी लिंक रोडवर रस्ता रोको

Mumbai News : असल्फा येथील शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक किरण लांडगे यांना व्हीबी नगर पोलिसांनी ताब्यात घेतल्याने शिवसैनिकांनी घाटकोपर अंधेरी लिंक रोड वर ठिय्या आंदोलन केले आहे. प्रभाग क्रमांक 160 चे माजी नगरसेवक किरण लांडगे यांनी काही महिन्यांपूर्वी विभागात पाणी येत नसल्याने आंदोलन केले होते. या आंदोलनात त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप करत व्हीबी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आज व्हीबी नगर पोलिसांनी किरण लांडगे यांना घरातूनन ताब्यात घेतले. याची माहिती मिळताच शिवसैनिक हे त्यांच्या घाटकोपर अंधेरी लिंक रोड असल्फा येथील कार्यालयात जमले आणि त्यांनी रस्ता रोको केला आहे. यामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. तर किरण लांडगे यांना घेऊन पोलीस कोणत्याही क्षणी व्हीबी नगर पोलीस ठाण्यात दाखल होतील. शिंदे गटाने दबाव आणून ही अटक केल्याचा आरोप शिवसैनिक करत आहेत. तर पोलीस ठाणे इथेही आंदोलन होण्याची शक्यता आहे.

मुंबईतील असल्फामधील ठाकरे गटाचे नगरसेवक पोलिसांच्या ताब्यात, शिवसैनिकांचा घाटकोपर अंधेरी लिंक रोडवर रस्ता रोको

Mumbai News : असल्फा येथील शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक किरण लांडगे यांना व्हीबी नगर पोलिसांनी ताब्यात घेतल्याने शिवसैनिकांनी घाटकोपर अंधेरी लिंक रोड वर ठिय्या आंदोलन केले आहे. प्रभाग क्रमांक 160 चे माजी नगरसेवक किरण लांडगे यांनी काही महिन्यांपूर्वी विभागात पाणी येत नसल्याने आंदोलन केले होते. या आंदोलनात त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप करत व्हीबी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आज व्हीबी नगर पोलिसांनी किरण लांडगे यांना घरातूनन ताब्यात घेतले. याची माहिती मिळताच शिवसैनिक हे त्यांच्या घाटकोपर अंधेरी लिंक रोड असल्फा येथील कार्यालयात जमले आणि त्यांनी रस्ता रोको केला आहे. यामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. तर किरण लांडगे यांना घेऊन पोलीस कोणत्याही क्षणी व्हीबी नगर पोलीस ठाण्यात दाखल होतील. शिंदे गटाने दबाव आणून ही अटक केल्याचा आरोप शिवसैनिक करत आहेत. तर पोलीस ठाणे इथेही आंदोलन होण्याची शक्यता आहे.

Mumbai News: दक्षिण मुंबईतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अचानक मोठे बदल

Mumbai News:  दक्षिण मुंबईतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अचानक मोठे बदल करण्यात आले आहेत. दक्षिण मुंबईचे विभाग प्रमुख म्हणून गेली दोन दशके विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असणारे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू साथीदार पांडुरंग सकपाळ यांची तडकाफडकी बदली करून त्यांच्या जागी संतोष शिंदे यांची नियुक्ती करण्यात आलीय तशी माहिती आजच्या सामाना मध्ये प्रसिद्ध करण्यात आलीय. शिवसेनेच्या पडत्या काळात ज्यांनी छातीची ढाल करून शिवसेनेचा भगवा दक्षिण मुंबईत फडकत ठेवला, अशा जुण्या जाणत्या शिवसैनिकांना बदलून नव्या लोकांना पदावर बसवण्यामागे स्थानिक खासदार अरविंद सावंत यांचे दबावाचे राजकारण असल्याचं शिवेसनेत अंतर्गत बोललं जातंय. त्यामुळे गेल्या वर्षभरात शिवसेनेत आलेल्या राजकिय आपत्ती नंतरही शिवसेनेत पक्षांतर्गत गटबाजीचे राजकारण सुरूच असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलंय.

Bhandara News  :भंडाऱ्यात अल्पवयीन मुलीची वाट अडवून विनयभंग, 22 वर्षीय आरोपीला अटक

Bhandara News  : गावातील रस्त्यानं जाणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाची वाट अडवून तिचा विनयभंग केल्या प्रकरणी 22 वर्षीय आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली. ही घटना भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील ओपरा या गावात घडली. या प्रकरणी लाखांदूर पोलिसांनी चंद्रशेखर कशिराम ठाकरे याच्या विरुद्ध पोक्सो कलमासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. घटनेचा अधिक उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पाटील करत आहेत.

Nashik News:  लासलगाव  येथे भीषण अपघात, तिघांचा मृत्यू एक जण गंभीर जखमी

Nashik News:  लासलगाव  येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा  मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला आहे..  


 


 

आजारपणानंतर बाळासाहेब थोरात पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघात, संगमनेरमध्ये थोरात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

Sangamner News : शिर्डी-नागपूर अधिवेशनादरम्यान झालेल्या आजारपणानंतर माजी मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात पहिल्यांदाच आपला मतदारसंघ संगमनेरमध्ये येत आहेत. आज दुपारी एक वाजल्यानंतर बाळासाहेब थोरात मतदारसंघात येतील. नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीनंतर मेव्हणे सुधीर तांबे आणि भाचा सत्यजित तांबेला पक्षातून निलंबित करण्यात आले. त्यानंतर आमच्या कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला गेल्याचं त्यांनी म्हटल होतं. थोरात यांनी काँग्रेस हायकामंडला पत्र लिहित विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामाही दिला होता आणि त्याच पार्श्वभूमिवर काल थोरात यांची काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांनी भेटही घेतली होती. दरम्यान थोरात आज अनेक दिवसानंतर मतदारसंघात येत असल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत केलं जाईलं. यानंतर थोरात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून ते नेमकी काय भूमिका मांडतात याकडे राज्याचे लक्ष लागलं आहे.

शिर्डीत साई परिक्रमेला भक्तिमय वातावरणात सुरुवात, ग्रामस्थांसह साईभक्त मोठ्या संख्येने सहभागी, साईनामाच्या जयघोषाने शिर्डीनगरी दुमदुमली

Shirdi News : शिर्डी ग्रामस्थांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या साई परिक्रमा उत्सवाचं यंदा चौथं वर्ष आहे. आज पहाटे खंडोबा मंदिरापासून या परिक्रमेला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. शिर्डीच्या सीमेवरुन 13 किलोमीटर संपन्न होणाऱ्या या परिक्रमेत शिर्डी ग्रामस्थांसह साईभक्तही मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. साई नामाच्या जयघोषाने शिर्डी नगरी दुमदुमून गेल्याचं चित्र आहे.

चंद्रपुरात भाजप कार्यकर्त्याच्या बहिणीच्या लग्नात धाडसी चोरी, 33 तोळे सोनं असलेली बॅग चोरी, अंदाजे 20 लाखांचा मुद्देमाल लंपास

Chandrapur News : चंद्रपूर शहरातील शकुंतला लॉन येथे धाडसी चोरी घडली. भर लग्नातून 33 तोळे सोने असलेली बॅग चोरीला गेली. यासोबतच 10 ग्रॅम चांदी, 5 हजार रुपये कॅश आणि मोबाईल फोनचीही चोरी झाली. या घटनेत अंदाजे 20 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरु आहे. विशेष म्हणजे हे लग्न भाजपच्या एका कार्यकर्त्याच्या बहिणीचे होते, या लग्नाला सत्ताधारी भाजपच्या अनेक नेत्यांची हजेरी होती.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


शेगावात गजानन महाराजांचा प्रकटदिन सोहळा


शेगावमध्ये संत गजानान महाराज यांचा 145 वा प्रकटदिन सोहळा होणार आहे. यासाठी राज्यासह, गुजरात, मध्य प्रदेशमधून लाखो भाविक शेगावमध्ये दाखल झाले आहेत. कोरोनानंतर पहिल्यांदाच निर्बंधमुक्त सोहळा होत असल्यानं भाविकांमध्ये उत्साहाच वातावरण आहे.


मुंबईत आजपासून धावणार डबलडेकर एसी बस


भारतातील पहिली इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बस मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणार आहे. 85 वर्षाचा इतिहास असलेली आणि मुंबईची वेगळी ओळख असलेली डबल डेकर बस आता नव्या रुपात मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बस आज बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आहे. 


कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या उमेदवारांसाठी आज महाविकास आघाडीचा प्रचार


कसबा पेठचे कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे, नाना पटोले आणि जयंत पाटील एकत्र असणार आहेत. चिंचवड : महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना कृष्णाजी काटे यांच्या प्रचाराकरिता विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदित्य उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मेळाव्याचं आयोजन करण्यात आले आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज नाशिक दौरा


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत उद्योग मंत्री उदय सामंत, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटीलदेखील असणार आहेत. मालेगाव आणि नांदगावमध्ये विविध कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रम होणार असून मनमाडकरसाठी पाणी पुरवठा योजना, शिवसृष्टीचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.


Bigg Boss 16: एमसी स्टॅन ठरला बिग बॉस-16 चा विजेता


बिग बॉस-16 (Bigg Boss-16)  च्या विजेत्याची घोषणा झालेली आहे. एमसी स्टॅन (MC Stan) हा बिग बॉसच्या 16 व्या सिझनचा विजेता ठरला आहे. शालीन भनोट, अर्चना गौतम, शिव ठाकरे, एमसी स्टॅन आणि प्रियांका चहर चौधरी हे बिग बॉस-16  (Bigg Boss 16) चे टॉप-5 स्पर्धक होते. यामधील एमसी स्टॅन हा विजेता ठरला आहे. एमसी स्टॅनच्या बिग बॉस-16 च्या घरातील डायलॉग्सला तसेच त्याच्या हटके स्टाईलला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. एमसी स्टॅन हा पुण्याचा आहे. त्याचं खरं नाव अल्ताफ शेख असं आहे. वाटा या गाण्यामुळे स्टॅनला विशेष लोकप्रियता मिळाली.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.