एक्स्प्लोर

Maharashtra News Updates : उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर दाखल

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra News Updates : उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर दाखल

Background

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

आजच्या दिवसात अनेक महत्त्वाच्या घडामोडी होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज गारपीट पाहणी दौरा करणार आहेत.  आजही राज्यभरात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यंदाचा मान्सून कसा राहणार यासंदर्भात भारतीय हवामान विभागाची पत्रकार परिषद होणार आहे. मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. आयपीएलमध्ये मुंबई आणि दिल्ली यांच्यात लढत होणार आहे. तसेच इतर अनेक महत्वाच्या घटना घडणार आहेत. जाणून घ्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी..

मुख्यमंत्री गारपीट पाहणी दौरा -

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अहमदनगरच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी 10 वाजता पारनेर तालुक्यातील वनकुटे गावात पाहणी करतील.    मुख्यमंत्री दुपारी 2 वाजता धारूर आणि दुपारी 3 वाजता वाडीबामणी या गावात नुकसानाची पाहणी करतील. दोन्ही जिल्हे मिळून सुनिल भोंगळ सकाळी 7.30 वाजता चालवण्यासाठी डफेर्ड लाईव्ह देईल. सकाळी 9 वाजेपर्यंत संभाजीनगरचं लाईव्हयु सुनिल भोंगळपर्यंत जाईल.

अवकाळी पावसाचा अंदाज -
राज्यात पुन्हा पुढील 5 दिवस अवकाळी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.    मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील 5 दिवस अवकाळीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पुन्हा गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आला आहे.  13 आणि 15 एप्रिल दरम्यान काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज, कुठेही गारपिटीची शक्यता नाही.

नंदुरबार – बाजार समितीच्या आवारात मोठ्या प्रमाणात गहूचे आवक होत असल्याचे चित्र आहे हवामान खात्याने काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त केल्यानंतर शेतकरी मोठ्या प्रमाणात गहू बाजार समितीत विक्रीसाठी आणत असल्याचे दिसून येत आहे. नंदुरबार बाजार समितीमध्ये आता दररोज 2500 ते 2700 गव्हाचे आवक होत आहे. अगोदर 1000 ते तेराशे क्विंटल गव्हाची आवक होती ढगाळ वातावरण आणि पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने आवक वाढल्याचा अंदाज आहे गव्हाला 2300 ते 2800 पर्यंत दर मिळत आहे.  
 
हवामान विभागाची पत्रकार परिषद -

दिल्ली – यंदाचा मान्सून कसा राहणार यासंदर्भात भारतीय हवामान विभागाची पत्रकार परिषद होणार आहे, दुपारी 12.30 वाजता. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन आणि आयएमडीचे महासंचालक डॉ. महापात्रा संबोधित करतील. स्कायमेटकडून मान्सूनचा अंदाज जाहीर केल्यानंतर भारतीय हवामान विभागाकडून देखील जून ते सप्टेंबर दरम्यानचा सरासरी पाऊसमान जारी केलं जाणार आहे.

मराठा आरक्षण सुनावणी -

मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. विनोद पाटील यांनी सुप्रिम कोर्टात मराठा आरक्षणासंदर्भात दाखल रिव्हीव्यु पीटीशनवर आज सुप्रिम कोर्टात सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केल्यानंतर सरकारने कोणतीही पावलं उचली नसल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप.

 मुंबई गोवा महामार्गावर आजपासून टोलवसूली  -
मुंबई गोवा महामार्गावर आजपासून टोलवसूली  केली जाणार आहे.  मुंबई गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातील हातिवले येथील टोल नाका आजपासून सुरू होणार आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम अपूर्ण असल्याने सर्वपक्षीयांनी टोल सुरू करण्यास विरोध केलाय. जर टोल वसुली सुरू झाली तर मोठा विरोध होण्याची शक्यता आहे. 

रूग्णालयात आजपासून मास्क सक्ती
महापालिका रूग्णालयात आजपासून मास्क सक्ती करण्यात येणार आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. 
महानगरपालिका रुग्णालयांमधील सर्व कर्मचारी, रूग्णांना मास्क लावणे सक्तीचे करण्यात आले आहे.     तसेच सर्व महानगरपालिका कर्मचाऱ्यांना देखील खबरदारीचा उपाय म्हणून मास्क लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  लवकरच महापालिका गृह विलगीकरणाबाबतची मार्गदर्शक तत्त्वे पुन्हा जारी करण्यात येणार आहे. 

पुणे – महात्मा फुले जयंतीनिमित्त शेफ विष्णु मनोहर हे पाच हजार किलोची मिसळ तयार करणार आहेत. एक लाख लोकांना ही मिसळ वाटण्यात येणार. सकाळी 7 वाजल्यापासून मिसळ तयार करण्यास सुरुवात होणार आहे. 
 
नागपूर – महाविकास आघाडीच्या 16 एप्रिल रोजी नागपुरात होऊ घातलेल्या वज्रमुठ सभेसाठी जरी महाविकास आघाडीने दर्शन कॉलनी सद्भावना नगर येथील मैदानाची निवड केली असली तरी स्थानिक नागरिकांनी मैदानावरील क्रीडासोयी राजकीय सभेमुळे खराब होतील, मैदानावर राजकीय सभा झाल्यास खेळाडूंना अनेक दिवस खेळता येणार नाही, असे मुद्दे समोर करत मैदान राजकीय सभेसाठी देण्यास विरोध सुरू केला आहे. आज सकाळपासून दर्शन कॉलनीचे नागरिक मैदानाच्या बाजूला आंदोलनावर बसणार आहे. विशेष म्हणजे भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा नागरिकांच्या या आंदोलनाला पाठिंबा असून भाजपचे स्थानिक आमदार कृष्णा खोपडे यांनी सुद्धा मैदानाची मालकी असलेल्या नागपूर सुधार प्रन्यासला हे मैदान महाविकास आघाडीच्या सभेसाठी देण्यात येऊ नये असे पत्र पाठवले होते. 

भंडारा – जिल्ह्यातील बहुचर्चित सोनी हत्याकांडाचा निकाल दिला जाणार आहे. या हत्याकांडातील सात आरोपींवर आरोप सिद्ध झाले असून आज शिक्षेची सुनावणी होणार आहे. सकाळी 11.30 नंतर निकाल देतील. त्यापुर्वी उज्ज्वल निकम आणि सोनी कुटुंबातील मुलगी आणि अन्य नातेवाईकांचे बाईट मिळतील. 

-   बेस्ट बेकरी केस प्रकरणावर आज मुंबई सत्र न्यायालयाचा निकाल अपेक्षित आहे.. साल 2002 मध्ये गुजरातमधील वडोदरा इथं गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेल्या हिसांचारातील एक गाजलेलं प्रकरण म्हणजे बेस्ट बेकरी हत्याकांड. या घटनेत जमावानं 14 जणांना अतिशय निर्घृणपणे मारलं होतं. या प्रकरणातील दोन फरार आरोपिंविरोधात मुंबई सत्र न्यायालयाताल विशेष कोर्टात नुकताच खटला पूर्ण झाला आहे. त्यावर कोर्टानं आपला निकाल राखून ठेवला आहे.

-  हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालय निकाल देणार आहे. पीएमएलए कोर्टाचे न्यायधीश एम जी देशपांडे देणार निकाल. मुश्रीफांना अटकेपासून कोर्टानं दिलेलं संरक्षण निकालापर्यंतच कायम आहे. मुश्रीफ यांच्यावर सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात आर्थिक अफरातफर केल्याचा आरोप आहे. कथित भागधारक शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचाही ईडीकडून ठपका. 

अकोला – आमदार नितीन देशमुखांची अकोला ते नागपूर पदयात्रा अंबिकापूरवरून अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरकडे रवाना होणार आहे. आज या पदयात्रेत ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत पायी चालणार आहेत, सकाळी 8.30 वाजता. 

मुंबई – रोशनी शिंदे मारहाण प्रकरणांमध्ये महिला आयोगाने पोलिसांवर ताशेरे ओढल्यानंतर पुन्हा एकदा अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. त्यानुसार आज ठाण्याचे जॉइंट सीपी वांद्रे येथील महिला आयोगाच्या कार्यालयात दुपारी 12 वाजता. रिपोर्टर -

जयपूर – काँग्रेस नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट आज जयपुरच्या शहिद स्मारक या ठिकाणी सकाळी 11 वाजता उपोषणाला बसणार आहेत. काँग्रेसच सरकार आल्यानंतरही अनेक भ्रष्टाचारांच्या आरोपाची चौकशी सरकारनं केली नसल्याचा आरोप सचिन पायलट यांनी केलाय.

 मुंबई – देशातील वाढती महागाई,  बेरोजगारी, आर्थिक घोटाळे, सामाजिक अशातंता, महिला असुरक्षा, देशातील हुकुमशाही,  भष्ट्राचारी केंद्र आणि राज्य सरकार म्हणत मुंबई कॉग्रेस आज मशाल यात्रा काढणार आहे, संध्याकाळी 7 वाजता, मृदुंगाचार्य नारायणराव कोळी मैदान, माहिम कोळीवाडयासमोर, माहीम कॉज वे, कॅडल रोड, हिंदुजा हॉस्पिटल, शिवाजी पार्क, चैत्यभूमी, दादर पश्चिम येथे मशाल यात्रा संपेल. रिपोर्टर . 

मुंबई – महात्मा फुले यांच्या जयंती दिनी मराठ्यांना 50% च्या आत ओबीसी मधूनच आरक्षण या संदर्भात मराठा क्रांती मोर्चाची पत्रकार परिषद. येत्या काही दिवसांत पुन्हा लाखोंच्या संख्येने मुंबईवर मराठे धडकणार आहेत. समाजाची तयारी पूर्ण झाली असून पुन्हा एकदा महाराष्ट्र मराठ्यांची धग अनुभवेल ते आंदोलन नेमके कसे असणार? याची माहिती दिली जाणार आहे. 

-        महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त पुण्यातील फुले वाड्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील अभिवादन करणार आहेत. 
 
-   बहुजन मेडिकोज असोसिएशनच्या वतीने आजपासून चार दिवसीय बहुजन समता पर्वाचे आयोजन करण्यात येणार आहे. नागपूर रोड वरील न्यू इंग्लिश हायस्कूलच्या मैदानावर आज नितीन राऊत यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन. संध्याकाळी काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांचं "महात्मा फुले हा गुलामगिरी ग्रंथ और आज का भारत" या विषयावर व्याख्यान होईल.

भंडारा – ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी यासाठी भंडारा इथं ओबीसी बांधवांचा मोर्चा, दुपारी 12 वाजता. भंडारा शहरातील दसरा मैदान इथून निघणारा हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील त्रिमूर्ती चौकापर्यंत काढण्यात येत आहे.

 बुलढाणा – राज्यातील पहिला विधवा विधुर आणि विधवा महिलांची लग्न करणाऱ्या सदस्यांचा परिचय मेळावा आयोजित करण्यात आलाय. समाजसेवक डी एस लहाने यांच्या संकल्पनेतून अशा प्रकारचा राज्यातील हा पहिलाच मेळावा होणार आहे.

मुंबई – यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने डॉ. जब्बार पटेल यांच्या सन्मानार्थ 'सिंहासन' चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलय. यावेळी शरद पवार स्क्रीनिंग साठी उपस्थितीत रहाणार आहेत, संध्याकाळी 5 वाजता, मुख्य सभागृह, यशवंतराव चव्हाण सेंटर.

-  नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आजपासून हायकोर्टात सुनावणीला सुरूवात. मलिक गेले काही महिने मिळतेय केवळ तारीख पे तारीख.

-  शीना बोरा हत्याकांड प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी. पीटर मुखर्जीशी संबंधित साक्षीदाराची होणार उलटतपासणी. इंद्राणी मुखर्जीचे वकील घेणार ही उलटतपासणी.

-   टिव्ही कलाकार तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी शिझान खानची हायकोर्टात याचिका. याप्रकरणी शिझानवर तुनिषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल दाखल आहे गुन्हा.

वायनाड – खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी पहिल्यांदा आपला मतदारसंघ वायनाडमध्ये येत आहेत. राहुल गांधी यांच्यासोबत प्रियंका गांधीही असतील. लोकांशी संवाद साधत राहुल सभेलाही मार्गदर्शन करणार, दुपारी 2.30 नंतर राहुल गांधी वायनाडमध्ये पोहचतील.

दिल्ली – वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभुमिवर देशव्यापी मॉकड्रिल सुरू आहे त्याचा आज दुसरा दिवस. सकाळी 10 वाजता दिल्लीचे आरोग्यमंत्री सौरभ भारद्वाज राजीव गांधी रुग्णालयात मॉकड्रिलचं निरीक्षण करतील.

दिल्ली – राजद्रोहाच्या कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुप्रिम कोर्टात सुनावणी... मागच्या वर्षी मेमध्ये सुनावणी झाली होती तेंव्हा कोर्टानं केंद्र सरकारला समिक्षा करायला वेळ दिला होता.

दिल्ली – राजकिय पक्षांना आरटीआय मध्ये आणण्याच्या मागणीवरील याचीकेवर सुप्रिम कोर्टात सुनावणी. याप्रकरणी केंद्र आणि निवडणूक आयोगाला उत्तर द्यायच आहे.

 दिल्ली – राजकिय पक्षांना मिळणाऱ्या निधीबाबत इलेक्ट्रॉनिक बॉंडची व्यवस्था करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुप्रिम कोर्टात सुनावणी. या याचिकेत इलेक्टोरल बॉंडने भ्रष्टाचाराची शंका उपस्थित केली गेलीय. हे प्रकरण मोठ्या बेंचकडे पाठवयाच की नाही हे कोर्टाला ठरवायच आहे.

मुंबई आणि दिल्ली यांच्यामध्ये आज लढत होणार आहे. दोन्ही संघ पहिल्या विजयासाठी मैदानात उतरणार आहेत.

23:14 PM (IST)  •  11 Apr 2023

Latur News: लातूर: पेठच्या तावरजा नदीच्या पुलावर विचित्र अपघात; एक कार पुलावरून कोरड्या नदीत कोसळली

Latur News:  लातूर ते औसा रोडवरील पेठ गावाच्याजवळ असलेल्या तावरजा नदीच्या पुलावर आज रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास विचित्र अपघात झाला असून भरधाव वेगात असलेली एमएच २४ एयू ७३०४ या क्रमांकाची स्विफ्ट डिझायर कार आणि एमएच २४ एस १७५२ क्रमांकाची मोटारसायकलची आणि दुसर्‍या एका कारची धडक झाली. पहिली कार आणि मोटारसायकल ही दोन्ही वाहने पुलावरून थेट कोरड्या नदीत कोसळली.

20:30 PM (IST)  •  11 Apr 2023

Palghar News: पालघर: मोखाडा तालुक्यात आलेल्या वादळी वाऱ्याने सातूर्ली गावातील तीन घरांचे मोठे नुकसान, दोन जखमी

Palghar News:  मोखाडा तालुक्यात संध्याकाळी आलेल्या वादळी वाऱ्याने सातूर्ली गावातील तीन घरांचे मोठे नुकसान झाले आहे. सातूर्ली मधील वामन पाटील यांच्या घराचे पूर्ण छप्पर उडाले असून इतर दोन घरांचं मोठं नुकसान झालं आहे. यामध्ये शकुंतलाबाई पाटील आणि वामन पाटील या दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे.

20:21 PM (IST)  •  11 Apr 2023

Dhule News: धुळे: विद्याभवन महिला वसतिगृहात विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या; देवपूर भागातील घटनेने खळबळ

Dhule News: धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या विद्या भवन लेडीज हॉस्टेल येथे राहणाऱ्या तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज येथील एलएलबी च्या पहिल्या वर्षाला शिकत असलेल्या साक्री तालुक्यातील दातर्ती गावातील एका विद्यार्थिनीने आज दुपारच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

19:55 PM (IST)  •  11 Apr 2023

Maharashtra Politics: शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर दाखल

Maharashtra Politics: शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर दाखल

18:54 PM (IST)  •  11 Apr 2023

Weather Forecast : पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने पावसाबद्दल स्कायमेटचा दावा फेटाळला

Weather Forecast :  स्कायमेट वेदर या खासगी हवामान संस्थेचा दावा भारत सरकारने फेटाळला आहे. काल स्कायमेट हवामानाने असा दावा केला होता की , भारतात या मान्सूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, जो आज पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने पूर्णपणे नाकारला आहे. यंदा देशात मान्सून कसा असणार आहे...? याबाबत भारतीय हवामान विभागाचा पहिला अंदाज आला आहे. हा अंदाज स्कायमेट या संस्थेच्या अंदाजाच्या विरुद्ध आहे.

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम रविचंद्रन म्हणाले की, नैऋत्य मान्सून दरम्यान भारतात सामान्य पाऊस पडेल. मंत्रालयाचे म्हणणे आहे की ,यावर्षी दक्षिण भारत, पूर्व मध्य भारत, पूर्व भारत, ईशान्य भारत आणि उत्तर-पश्चिम भागात सामान्य पाऊस पडेल. तथापि, मंत्रालयाचे म्हणणे आहे की ईशान्य भारत आणि उत्तर-पश्चिम भारतातील काही भागात पाऊस सामान्यपेक्षा कमी असेल. यासह पश्चिम मध्य भारतातील काही भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस अपेक्षित आहे.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget