Maharashtra News Updates 11 February 2023 : हे गद्दारांचे नाही खुद्दराचे सरकार आहे; देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेना ठाकरे गटाला टोला

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 11 Feb 2023 08:36 PM
Pune News : पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा एकदा अपघात; कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने चार वाहनांना धडक, दोन जखमी

Pune : पुणे-बंगलोर महामार्गावर नऱ्हे इथल्या भूमकर पुलाजवळ हा अपघात झालाय. नवले पुलापासून हा पुल काहीच अंतरावर आहे. हा कंटेनर साताराहून पुण्याच्या दिशेने निघाला होता. भुमकर चौकात या कंटेनरने एकूण चार वाहनांना धडक दिल्याने दोन जण जखमी झाले आहेत. कंटेनरचालक पंकज महापात्रे (वय-57, रा. उमरगा, जिल्हा उस्मानाबाद) याला सिंहगड रस्ता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

Devendra Fadanvis : तीन पायाचे सरकार टिकणार नाही याची खात्री होती म्हणून त्यांनी भ्रष्टाचाराची टी-20 केली; फडणवीसांचा मविआवर हल्लाबोल

अडीच वर्षे केबळ खुर्च्या तोडण्याचे काम केले, भ्रष्टाचाराची बजबजपुरी केली. तीन पायाचे सरकार टिकणार नाही याची खात्री होती म्हणून त्यांनी भ्रष्टाचाराची टी-20 केली असल्याचा घणाघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

Nashik News : हे गद्दारांचे नाही खुद्दाराचे सरकार आहे; देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेना ठाकरे गटाला टोला

Nashik News : हे गद्दारांचे नाही खुद्दाराचे सरकार आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी पुढील दीड दोन वर्षे दिलेत तर 'महाविजय अभियान' पूर्ण करू असेही त्यांनी आपल्या भाषणात म्हटले.

भाजपच्या शत प्रतिशत घोषणेवर अनेकांची टीका, पण आज भाजप पहिल्या स्थानी; देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

Nashik : नाशिकमधून भाजपने शत प्रतिशत भाजपचा नारा दिला. त्यावेळी अनेकांनी टीका केली. पण आपण हे दाखवून दिले, महाराष्ट्र चा मोठा पक्ष आपण आहोत असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. भाजपच्या प्रदेश कार्यकारणीच्या समारोपात ते बोलत होते. 

Nashik BJP Meet : नाशिकमध्ये भाजपचा मेगा प्लॅनिंग ठरलं, महाराष्ट्रात 'महाविजय 2024'

Nashik BJP Meet : नाशिकमध्ये भाजप कार्यकारिणीत महत्वाचा निर्णय झाला असून आगामी निवडणुकांसाठी मेगा प्लॅनिंग ठरलं आहे. भाजपने कार्यकारिणीच्या बैठकीत मिशन २०० चा नारा दिला असून शिवाय आगामी निवडणुकीसाठी 'महाविजय २०२४' म्हणून संकल्प' करण्यात आला आहे. नाशिकमध्ये दोन दिवशीय भाजप कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली असून दोन दिवसांच्या विचारमंथनानंतर भाजपकडून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी महत्वाची घोषणा केली आहे. 

मला खोट्या गुन्ह्यात फसवलं; नागपुरात दाखल होताच अनिल देशमुखांचा आरोप 

21 महिन्यानंतर मी माझ्या नागपूर गावात येतोय. याचा मला अतिशय आनंद आहे. मला खोट्या गुन्ह्यात फसवण्यात आलं होतं. स्वागतासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना पाहून मोठा आनंद झालाय. मी काटोल मतदार संघात नव्हतो. परंतु, मुलगा सलील हा कायम नागरिकांच्या संपर्कात होता, असे अनिल देखमुख यांनी म्हटले आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी परभणीतील रस्त्यांच्या डागडुजीला सुरूवात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या परभणी दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याआधी परभणीतील रस्त्यांची डागडुजी करण्यास सुरूवात झाली आहे. परंतु, मुख्यमंत्री येणार असल्याने प्रशासनाला या खड्ड्यांची आठवण झाली का असा प्रश्न परभणीकरांनी उपस्थित केलाय. कारण परभणी शहरातील रस्त्यांची अवस्था मागच्या अनेक वर्षांपासून बिकट झालेली आहे. जवळपास सर्वच रस्त्यांवर खड्डेच खड्डे झाले आहेत. मात्र उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परभणी दौऱ्यावर येत असल्याने परभणी शहरातील अत्यंत महत्त्वाचा रस्ता असलेल्या परभणी वसमत राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांच्या डागडुजीला प्रशासनाने सुरुवात केली आहे. परभणी वसमत राष्ट्रीय महामार्गावरील असोला पाटी ते डेंटल कॉलेज दरम्यान मुख्यमंत्र्यांचे उद्या दोन कार्यक्रम होणार आहेत. याच अनुषंगाने प्रशासनाने या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांना डांबर टाकून डागडुजी करण्याचं काम सुरू केलं आहे. 

माजी गृहमंत्री अनिल देशमुख नागपुरात दाखल, कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत

माजी गृहमंत्री अनिल देशमुख नागपुरात दाखल झाले आहेत. तुरूंगातून बाहेर आल्यानंतर आज प्रथमच ते नागपुरात दाखल झाले आहेत. या निमित्ताने नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून बॅनर उभारण्यात आले आहेत. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी देखील करण्यात आली आहे. 

वारीसे मृत्यू प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

वारीसे प्रकरणी एसआयटीचे आदेश. वारीसे मृत्यू प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचा फडणवीसांचा आदेश. वारिसेंच्या मृत्यू प्रकरणात सखोल चौकशी करू, तसेच प्रकरण फास्टट्रॅकमध्ये कसं नेता येईल हे बघू, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य

शेतीक्षेत्र कमी होत असल्याने उत्पादन वाढीवर भर दिला पाहिजे. केंद्र सरकारचे कृर्षी विभागावर दुर्लक्ष : शरद पवार

भारतातील लोकसंख्या वाढत असून शेती क्षेत्र कमी होत चालले आहे. त्यामुळे आता वाढलेल्या लोकसंख्येला अन्नधान्य पुरविण्यासाठी आणि वैयक्तिक शेतकर्यांची प्रगती होण्यासाठी शेती उत्पादन वाढीवर दिला पाहिजे असे प्रतिपादन शरद पवार यांनी केले आहे. नवी मुंबईतील सानपाडा येथे मुंबई देशस्थ मराठा ज्ञाती संस्थेकडून उभारण्यात आलेल्या देशस्थ मराठा भवनाचे उदघाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. बांग्लादेशाकडून शेती व्यावसाय आणि निर्यातीवर भर दिला आहे. मात्र आपल्या देशात याबाबत उदासिनता दिसत आहे. सध्याचे केंद्र सरकार कृषी विभागाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. जगभरातील द्राक्ष उत्पादन करणाऱ्या तीन देशांनी द्राक्षाच्या नविन जातीचा शोध लावला आहे. या नविन जातीच्या द्राक्षांची लागवड केल्यास पावूस, थंडी, उन याचा विपरीत परिणाम यावर होत नसल्याने याबाबत शेतकरी वर्गाने लक्ष द्यावे अशी सुचना पवार यांनी केली आहे. मुंबई देशस्थ मराठा ज्ञाती संस्थेने जोतीबा फुले यांना पहिल्यांदा महात्मा ही पदवी दिली असल्याची आठवण पवार यांनी सांगितली.

Raj Thackeray: राज ठाकरेंचा औरंगाबाद दौरा रद्द

Raj Thackeray: मनसे प्रमुख राज ठाकरे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर येणार होते. मात्र त्यांचा हा दौरा रद्द झाला आहे. राज ठाकरे हे मनसेचे उपाध्यक्ष गणेश सातपुते यांच्या मुलाच्या विवाहस्थळी उपस्थित राहणार होते. मात्र मुंबईतील महत्वाच्या पक्ष बैठकीमुळे त्यांचा हा नियोजित दौरा रद्द झाला असल्याची माहिती मनसे चे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी दिली आहे. 

शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी कुणबी सेनेच्या नेतृत्वाखाली पालघर-मनोर मार्गावर रास्ता रोको

Palghar Farmers Agritation : शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी कुणबी सेनेच्या नेतृत्वाखाली पालघर-मनोर मार्गावर चहाडे नाका इथे रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या आंदोलनात कुणबी सेनेच्या कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येनं जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. गेल्या तासाभरापासून हे रास्ता रोको आंदोलन सुरु असून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

बारावी बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षांवर कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही; मुंबई बोर्डाकडून स्पष्टीकरण

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रात्यक्षिक परीक्षांवर काही महाविद्यालयात परिणाम जाणवत होता मात्र त्यांना संयोगाने प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यास सूचना दिली असल्याने त्या परीक्षा सुरळीत पार पडत आहेत.


1 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी दरम्यान तर काही महाविद्यालयात 20 फेब्रुवारी पर्यंत सर्व प्रात्यक्षिक परीक्षा वेळेत पूर्ण होतील तर अनेक महाविद्यालयांमध्ये या परीक्षा पूर्ण झाल्या आहेत.


राज्यातील अ कृषी विद्यापीठातील आणि कॉलेजमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मधल्या काळात संप पुकारला होता आणि त्याचा फटका बारावी प्रात्यक्षिक परीक्षांना काही महाविद्यालयांमध्ये बसलेला पाहायला मिळालाय.


बारावी बोर्ड परीक्षेच्या प्रात्यक्षिक परीक्षा 6 फेब्रुवारीपासून अनेक कॉलेजेस मध्ये सुरू झाल्या मात्र शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कनिष्ठ महाविद्यालय सुद्धा परीक्षांवर बहिष्कार टाकल्याने काही महाविद्यालयांना या परीक्षा नियोजित तारखेत बदल करून पुढे ढकलावे लागल्या आहेत.


शिक्षकेतर कर्मचारी हे बारावी बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षांमध्ये परीक्षा आधी सर्व तयारी करत असतात मात्र मधल्या काळात त्यांनी बहिष्कार टाकल्याने प्रात्यक्षिक परीक्षा एक आठवडा पुढे ढकलाव्या लागल्यात.


मात्र या सर्व परीक्षा बोर्डाने दिलेल्या वेळेत लेखी परीक्षांच्या आधी पूर्ण होतील असं बोर्डाकडून त्यासोबतच प्राध्यापकांकडून सांगण्यात आला आहे.

वारसे यांच्या खुनामागचे सुत्रधार जोपर्यंत शोधले जात नाहीत तोपर्यंत आम्ही आवाज उठवत राहणार : संजय राऊत

Sanjay Raut : आंगणेवाडीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सभा घेतल्या होत्या. त्यात त्यांनी रिफायनरीबाबत जाहीर धमक्या दिल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी या तरूण पत्रकाराची हत्या झाल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. जे आपल्या विरोधात बोलतील, जे आपल्या विचारांच्या सोबत नाहीत त्यांची हत्या होऊ लागली आहे. कोकणातील श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, अंकुश नाईक आणि आता वासरे यांची हत्या झाल्याचे राऊत म्हणाले. आरोपींनी आतापर्यंत किती सुपा-या घेतल्या. कुणाच्या हत्या केल्या हेदेखील शोधलं पाहिजे असे राऊत म्हणाले. यासाठी मी राज्याच्या गृहमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. वारसे यांच्या खुनामागचे खरे सुत्रधार जोपर्यंत शोधले जात नाहीत तोपर्यंत आम्ही आवाज उठवत राहणार असल्याचे राऊत म्हणाले. 


 

न्यायालयीन लढाईत उद्धव ठाकरेंचा विजय व्हावा, शिवसैनिकाची केज ते तुळजापूर पायी दिंडी

Beed News : न्यायालयात सुरु असलेल्या शिवसेनेच्या लढाईमध्ये सर्व निकाल हे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागावे त्यासाठी बीडच्या केज येथील शिवसैनिक रत्नाकर शिंदे यांनी केज ते तुळजापूर अशी पायी दिंडी काढली आहे. या दिंडीला प्रारंभ झाला असून उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य मिळावं असे देखील प्रार्थना यावेळी करण्यात येणार आहे. 

'शशिकांत वारीसे मृत्यू प्रकरण गांभीर्याने घ्यावं' ... संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीस यांना पत्र

  • नाणारमध्ये रिफायनरी होणारच, कोण उडवतंय पाहू, असं तुम्ही सभेत ठणकावलं होतं

  • 24 तास उलटत नाहीत तोच दुसऱ्या दिवशी वारीसे हत्या झाली हा योगायोग समजावा?

  • विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ईडी, सीबीआयचा वापर व्हायचा आता हत्याच होऊ लागल्या हे चिंताजनक आहे.

  • वारीसे यांच्या कुटुंबीयांना किमान 50 लाखांचं अर्थसहाय्य सरकारने करावं

Adani Raw: अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवलेल्या भारतीय गुंतवणूकदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण कसे करणार? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

Adani Raw: अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवलेल्या भारतीय गुंतवणूकदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण कसे करणार आहात, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि सेबीला विचारलाय.. गुंतवणूकदारांच्या सुरक्षिततेसाठी शेअर बाजाराचे नियमन करण्यासाठी मजबूत यंत्रणा तयार करण्यास अनुकूलता दर्शवली. यासंबंधी केंद्र सरकार आणि शेअर बाजाराचे नियमन करणाऱ्या सेबीचं मत न्यायालयाने मागवलंय.

LIC on Adani Group: एलआयसीकडून अदानी समूहाला मोठा धक्का; अदानी समूहात आता नवीन गुंतवणूक न करण्याचा निर्णय

LIC on Adani Group: भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीने अदानी समूहाला मोठा धक्का दिलाय. अदानी समूहात आता नवीन गुंतवणूक न करण्याचा निर्णय एलआयसीने घेतलाय. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे एलआयसीने हा निर्णय घेतलाय. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाला मोठे आर्थिक धक्के बसत असून, एलआयसीच्या या निर्णयामुळे अदानी समूहाचे शेअर्स आणखी घसरू शकतात, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय.

Maharashtra Local Body Election: महाराष्ट्रातल्या प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबणीवर?

Maharashtra Local Body Election: महाराष्ट्रातल्या प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता दिसत आहे. सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची सुनावणी न होता, ते सतत महिना-दीड महिन्यांनी लांबणीवर पडतंय. या प्रकरणाच्या सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीसाठी आता 14 मार्च ही पुढची तारीख मिळाली आहे. त्यामुळं महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यानंतरच होण्याबाबत साशंकता वाढली आहे. 

Maharashtra Local Body Election: महाराष्ट्रातल्या प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबणीवर?

Maharashtra Local Body Election: महाराष्ट्रातल्या प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता दिसत आहे. सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची सुनावणी न होता, ते सतत महिना-दीड महिन्यांनी लांबणीवर पडतंय. या प्रकरणाच्या सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीसाठी आता १४ मार्च ही पुढची तारीख मिळाली आहे. त्यामुळं महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यानंतरच होण्याबाबत साशंकता वाढली आहे. 

Hingoli News: आजीत पवार भावी मुख्यमंत्री म्हणून बघायला आवडेल : आ. राजेश नवघरे

Hingoli News: भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार म्हणून बघायला आवडेल, अशी इच्छा राष्ट्रवादीचे वसमतचे आमदार राजेश नवघरे यांनी व्यक्त केली आहे. आज हिंगोली जिल्ह्यातील शिरड शहापूर येथे भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. शिरड शहापूर मध्ये जे विरोधी पक्ष नेते आले ते भविष्यात मुख्यमंत्री झाले, सुधाकरराव नाईक विलासराव देशमुख देवेंद्र फडणवीस ही नेतेमंडळी विरोधी पक्ष नेते असताना शिरड शहापूरमध्ये आले आणि नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आमची इच्छा आहे. अजित पवार मुख्यमंत्री व्हावे कारण काम करणारा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पाहिजे, असे म्हणत आमदार राजेश नवघरे यांनी अजित पवार यांच्याकडे बोट दाखवले आहे. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


पुणे जिल्ह्यातील चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील चित्र आता स्पष्ट झाले असून प्रचाराला आता जोर लागणार आहे. तर, दुसरीकडे  नाशिकमध्ये भाजपची प्रदेश कार्यकारणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत भाजपचे निम्म्याहून अधिक मंत्री या बैठकीत सहभागी असणार आहेत. जाणून घेऊयात, आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी... 


नागपूर 


- माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख कारागृहातून बाहेर आल्यानंतर सव्वा वर्षानंतर पहिल्यांदाच नागपूरात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या जंगी स्वागताची तयारी केली असून नागपूर विमानतळावरून मोठी बाईक रॅली काढण्यात येणार आहे.


नाशिक 


- भाजपच्या प्रदेश कार्यकारणीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री विनोद तावडे, मंत्री गिरीश महाजन यांच्यासह निम्याहून अधिक मंत्रिमंडळाची उपस्थिती असणार आहे.


रत्नागिरी


-  रिफायनरी विरोधकांचा तहसील कार्यालयावरती मोर्चा काढण्यात येणार आहे.  दिवंगत पत्रकार वारिसे यांच्या समर्थनात या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.


पुणे 


-  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यात विविध बैठकांना, कार्यक्रमांना मुख्यमंत्री हजेरी लावणार आहेत. 


- महाविकास आघाडीचे कसबा पेठचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुण्यात असणार आहेत.


- केंद्रीय मंत्री नारायण राणे हे कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासणे यांच्या प्रचारात सहभागी होण्याची शक्यता आहे.


औरंगाबाद 


- विरोधी पक्ष नेते अजित पवार औरंगाबादच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्या दरम्यान, अजित पवार शेतकरी मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत.


कोल्हापूर 


- राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना विद्यापीठांमध्ये विरोध करण्यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून शिवाजी विद्यापीठासमोर जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे.


नवी मुंबई 


- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नवी मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. देवस्थ मराठा भवनाचं उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हेही यावेळी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात भाजपचे आमदार गणेश नाईक आणि  इतर सर्वपक्षीय नेतेदेखील हजर राहणार आहेत. 


सोलापूर 


- उद्योग मंत्री उदय सामंत हे आज सोलापूर दौऱ्यावर असणार आहेत. उद्योग विभागाचा आढावा घेणारी बैठक होणार आहे. त्याशिवाय, औद्योगिक संघटनांसोबत चर्चा करणार आहेत. 


वाशिम 


- आज पोहरादेवी इथे सेवाध्वज कार्यक्रमानिमित्त तीन राज्यातून पोहरादेवी इथं सेवाध्वज दाखल होणार आहेत. यावेळी मंत्री संजय राठोड उपस्थित असणार आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.