Maharashtra News Updates 10th May 2023 : वाशिमच्या कारंजा शहरात आठ दिवसात चार महिला बेपत्ता, पोलिसांकडून शोध सुरू

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 10 May 2023 09:05 PM
Washim News: वाशिमच्या कारंजा शहरात आठ दिवसात चार महिला बेपत्ता, पोलिसांकडून शोध सुरू

Washim News:  वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड  शहरात गेल्या आठ दिवसात चार महिला व मुली बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. यात दोन विवाहित महिलांसह दोन युवतींचा समावेश आहे. यातील एका युवतीने परस्पर लग्न उरकल्याची माहीती पोलिसांनी दिली आहे. तर, उर्वरीत महिला व मुलींचा शोध कारंजा पोलीस घेत आहे. 

हा देश विधानसभा आणि संसद या संविधानानुसार चालला की नाही, न्यायव्यवस्था कुणाच्या दबावाखाली काम करतंय का याचाही फैसला उद्या होईल: संजय राऊत

Maharashtra Politics:  या देशात लोकशाही आहे की नाही,  हा देश विधानसभा आणि संसद या संविधानानुसार चालला की नाही, न्यायव्यवस्था कुणाच्या दबावाखाली काम करतंय का याचाही फैसला उद्या होईल अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले. 

Maharashtra Political Crisis : शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे वकिलांसोबत तातडीने दिल्लीला रवाना 

Maharashtra Political Crisis : शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे वकिलांसोबत तातडीने दिल्लीला रवाना 


शेवाळे थोड्याच वेळात दिल्लीत होणार दाखल 


सत्तासंघर्षाच्या सुनावणीची उत्सुकता वाढली

राज्यपालांची भेट घेण्यासाठी आदित्य ठाकरे राजभवनवर दाखल, ठाकरे गटाचे इतर नेतेही आदित्य यांच्यासोबत

Aaditya Thackeray At Raj Bhavan : आदित्य ठाकरे यांच्यासोबत आमदार अनिल परब, अजय चौधरी, सुनील शिंदे, विलास पोतनीस, खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत, प्रियंका चतुर्वेदी राजभवनावर दाखल. राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेणार

Patra Chawl Scam: पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील सुनावणी 20 जूनपर्यंत तहकूब 

Patra Chawl Scam: पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील सुनावणी 20 जूनपर्यंत तहकूब 


आरोपी संजय राऊत आणि प्रवीण राऊतांची कोर्टात हजेरी


आरोपी क्रमांक 1,2 सारंग आणि राकेश वाधवान आजही कोर्टात गैरहजर


गुरूआशिष कंपनी ही दिवाळखोर घोषित झाल्यानं प्रकरण एनसीएलटी प्रलंबित असल्याचं आज कोर्टात स्पष्ट करण्यात आलं


त्यामुळे गुरूआशिषला आरोपी बनवण्यात आल्यानं त्यांची कोण जबाबदारी घेणार?, हे अद्याप अनुत्तरीत


सारंग आणि राकेश वाधवान यांना कोर्टात हजर करण्यासाठी ईडीनं जेल प्रशासनाला विनंती केल्याची ईडीच्या वकिलांची कोर्टात माहिती


पुढील सुनावणीत सर्व आरोपींना कोर्टापुढे हजर करण्याचे तपासयंत्रणेला निर्देश


दरम्यान संजय राऊतांनी आपला राजस्व पासपोर्ट नूतनीकरणासाठी परत करण्याची मागणी करत कोर्टाकडे  अर्ज सादर केला आहे


ईडीचा राऊतांच्या अर्जाला विरोध नाही


मुंबई सत्र न्यायालय राऊतांच्या अर्जावर उद्या, गुरूवारी देणार निर्णय

कोविड ड्युटीच्या नावाखाली विविध खटल्यांचा सामना करणारे 116 अधिकारी पुन्हा सेवेत, आरटीआयमधून बाब समोर

Mumbai News : मुंबई महापालिकेने कोविड ड्युटीच्या नावाखाली विविध खटल्यांचा सामना करणाऱ्या 116 अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत घेतले आहे, आरटीआयमधून ही बाब उघड झाली आहे.


बृहन्मुंबई महानगरपालिकेने गंभीर गुन्ह्यांसाठी निलंबित असतानाही, कोविड 'ड्युटी'च्या नावा खाली विविध खटल्यांचा सामना करणार्‍या 116 अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत घेतले आहे. 


यातील बहुतांश अधिकारी प्रामुख्याने लाच घेताना सापळ्यात रंगेहाथ पकडले गेले. आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी या संदर्भात आयटीआय दाखल केला होता त्यानंतर ही माहिती समोर आली आहे


यामध्ये बीएमसीने घनकचरा व्यवस्थापन विभागातील 53, शहर अभियंता विभागातील 23, पाणी, सुरक्षा आणि अग्निशमन विभागातील प्रत्येकी 6, आरोग्य विभागातील 17 आणि तीन रुग्णालयातील 6 अधिकाऱ्यांना त्यांचे अधिकार बहाल केले आहेत.


कोविड महामारी आणि संबंधित कर्तव्ये संपली असतानाही हे अधिकारी कोविड ड्युटीच्या नावाखाली काम करत आहेत. बीएमसी अधिकार्‍यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना, बीएमसी त्यांना संरक्षण देण्याचा आणि मागच्या दाराने प्रवेश देण्याचा प्रयत्न करत असल्याचा, द यंग व्हिसलब्लोअर्स फाऊंडेशनचे कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांचं म्हणणं आहे

किमान वेतन 21 हजार रुपये करावे या मागणीसाठी राज्यातील जिल्हा परिषदेच्या महिला परिचारिकांचं मंत्रालयाबाहेर आंदोलन

राज्यातील जिल्हा परिषदेच्या महिला परिचारिकांचं मंत्रालयाबाहेर आंदोलन 


किमान वेतन 21 हजार रुपये करावे या मागणीसाठी आंदोलन


मागील दहा दिवसांपासून राज्यभरातील परिचारिकांचे आझाद मैदानावर आंदोलन


मात्र आंदोलनाला कोणीही भेट न दिल्याने आणि दखल न घेतल्या परिचारिका संतप्त


अखेर थेट मंत्रालय गाठून परिचारिकांचं मंत्रालयासमोर आंदोलन
पोलिसांनी आंदोलक परिचारिकांना ताब्यात घेऊन पुन्हा आझाद मैदानात सोडले


सध्या तीन हजार मासिक वेतनावर परिचारिकांना काम करावे लागत आहे


 

Devendra Fadnvis on Kerala Story: हा चित्रपट कथा सांगण्यासाठी नाही तर जनजागृतीसाठी : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnvis on Kerala Story: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री द केरला स्टोरी हा चित्रपट पाहिला.. हा चित्रपट कथा सांगण्यासाठी नाही तर जनजागृतीसाठी आहे, असं फडणवीस म्हणाले.. चित्रपटाच्या निर्मात्याला फाशी दिली पाहिजे, असं म्हणणाऱ्या जितेंद्र आव्हाडांनाही त्यांनी सडेतोड उत्तर दिलं. 

Sanjay Raut : कर्नाटक निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव होणार, संजय राऊतांचं भाकीत

Sanjay Raut : कर्नाटक निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव होणार आहे, असं भाकित संजय राऊत यांनी वर्तवलं आहेे. मणिपूर राज्य जळत असताना मोदी बंगळुरूत रोड शो करत होते, अशी टीकाही राऊतांनी केली. 

Pune News: पुणे DRDO मधील शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅपमध्ये सापडल्याचं स्पष्ट

Pune News: पुणे DRDO मधील शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅपमध्ये सापडल्याचं स्पष्ट झालंय... गंभीर बाब म्हणजे कुरुलकरने ब्रह्मोस, अग्नी आणि उपग्रहरोधी क्षेपणास्रांची माहिती पाकिस्ताना ला पुरवल्याची बाब समोर येतेय. या तपासातील माहिती पंतप्रधान तसेच संबंधित विभागाला देण्यात आलीय. दरम्यान, गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्याकडूनही अशीच माहिती मिळवण्याचा प्रयत्न याच पाकिस्तानी महिला एजंटने केला होता, अशीही माहिती समोर आलीय. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र एटीएसने कुरुलकरला पाकिस्तानी महिला एजंटला गोपनीय माहिती देण्याच्या आरोपाखाली अटक केली होती. त्यानंतर कुरुलकरकडून अनेक धक्कादायक माहिती पुढे येत आहे. कुरुलकरच्या फोन कॉल यादीत या अधिकाऱ्याचं नाव पुढे आलंय... त्यानंतर एटीएसने त्या अधिकाऱ्याचा मोबाईल जप्त केला आहे प्रत्यक्षात या अधिकाऱ्याने गोपनीय कागदपत्रे दिली का, याची माहिती महाराष्ट्र एटीएस घेत आहे. पाकिस्तानी महिलेचे नग्न व्हिडीओ पाहता यावेत म्हणून कुरुलकर यांने भारताच्या क्षेपणास्त्रांची गुप्त माहिती पाकिस्तानला पुरवल्याचं समोर येतेय.

बुलढाण्या नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक रुजू होताच पोलिसांची अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम, एकाच दिवसात 79 जुगार तर 96 दारु अड्ड्यांवर कारवाई

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यात अवैध व्यवसाय जोमात सुरु असल्याने काल जिल्हा पोलीस दलाकडून जिल्ह्यात धाड सत्र राबवण्यात आलं. जिल्ह्यातील पाच उपविभागात एकूण 79 ठिकाणी जुगार अड्ड्यावर धाडी टाकून पोलिसांनी हजारो रुपयांचा ऐवज आणि साहित्य जप्त करुन 79 गुन्हे दाखल केले तर 84 जणांना अटक केली आहे. तसंच जिल्ह्यात अवैधपणे दारु विक्री करणाऱ्या 96 ठिकाणी एकाच दिवशी कारवाई करण्यात आली. यात 96 आरोपींवर कारवाई करण्यात आली. जिल्ह्यात अजूनही मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु असून नवनियुक्त पोलीस अधीक्षक सुनील कडासणे यांनी जिल्ह्याची सूत्र हाती घेताच अशा प्रकारे मोठी कारवाई करण्यात आली. यावरुन जिल्ह्यात किती मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु असल्याचं समोर आलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात ठाण्यातील वर्तकनगरमध्ये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद, द केरला स्टोरीबाबत द्वेषयुक्त वक्तव्य केल्याचा आरोप

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात ठाण्यातील वर्तक नगर पोलीस ठाण्यात तक्रार


'द केरला स्टोरी' सिनेमाबाबत आव्हाडांनी द्वेषपूर्ण वक्तव्ये केल्याबद्दल तक्रार


ठाणे पोलिसांनी सीआरपीसी कलम 155 नुसार नोंदवला अदखलपात्र गुन्हा

Gadchiroli News : गडचिरोलीच्या मेडिगट्टा महाबंधारा बाधितांनी सिरोंचा येथे तहसील कार्यालयासमोर सुरू केले आहे धरणे आंदोलन
Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्यातील मेडीगट्टा महाबंधाऱ्याने बाधित शेतकरी सध्या आंदोलन करत आहेत. या आंदोलन मंडपाला गडचिरोलीचे खासदार अशोक नेते यांनी भेट देत परिस्थिती समजून घेतली. सिरोंचा येथे तहसील कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्र -तेलंगणा सीमेवर हा महाबंधारा बांधण्यात आलाय. शेकडो हेक्टर जमिनीपैकी सुमारे 128 हेक्टर जमीन अधिग्रहण झालेल्या शेतकऱ्यांना तेलंगणा सरकारने अद्याप नुकसान भरपाई दिलेली नाही. पावसाळ्यात सातत्याने बॅक वॉटरमुळे जमीन बाधित होत असल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होते. याशिवाय सतत जमीन महापुराने खचत चालल्याने इथला शेतकरी हवालदिल झालाय. मात्र तेलंगणा व महाराष्ट्र सरकार या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याने बाधितांनी आंदोलन सुरू केले आहे. खासदार अशोक नेते यांनी आंदोलकांशी चर्चा करत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. 
Mumbai Crime News: चित्रीकरणासाठी मुंबईत आलेल्या 19 वर्षीय तरूणीवर लैंगिक अत्याचार

Mumbai Crime News: चित्रीकरणासाठी मुंबईत आलेल्या 19 वर्षीय तरूणीवर लैंगिक अत्याचार


 

या प्रकरणी 38 वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

 

 नरीमन पॉईंट येथील नामांकीत हॉटेलमध्ये घडले हे प्रकार 

 

पोलिसांनी दिलेल्या माहिती प्रमाणे आरोपीने पीडित तरूणीला मारहाण करून चाकूने तिच्या तोंडात, पोटावर व मांडीवर जखमा केल्या आहेत. 

 

चाकूच्या साह्याने आरोपीने तिच्या गुप्तांगावर जखमा केल्या असल्याची पिडीतांनी पोलिसात तक्रार दिली. 

 

याप्रकरणी तरूणीच्या तक्रारीवरून मरिन ड्राईव्ह पोलिसांनी बलात्कार, मारहाण आणि धमकावल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

 

तक्रारदार मूळची हरियाणा येथील रहिवासी आहे व आरोपीही हरियाणा येथील असून पीडित तरूणीशी त्याचे प्रेमसंबंध होते.
Ahmednagar News: 58 वर्षीय नराधमाकडून 10 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न
Ahmednagar News: अहमदनगर शहरातील बागडपट्टी परिसरात राहणाऱ्या 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या घराजवळ राहणाऱ्या नराधामाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडलीये. मुलीचे आई-वडील घरी नसल्याचे पाहून घराजवळच राहणाऱ्या शकील शेख या 58 वर्षाच्या नराधमाने 10 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला...दरम्यान ही घटना समजताच आजूबाजूच्या लोकांनी या नराधमाला पकडून चांगलाच चोप दिला आणि अत्याचार करणाऱ्या नराधमाला तोफखाना पोलीसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे...केवळ परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनुचित प्रकार टळला. पुढील तपास तोफखाना पोलिस करत आहेत.
Pune Crime News: जयंत पाटलांचा भावी मुख्यमंत्री उल्लेख करणारे अमोल कोल्हे आता अजित पवारांबाबत म्हणतात...
Pune Crime News: भावी मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा उल्लेख करणारे खासदार अमोल कोल्हे यांनी स्वतःला सावरून घेतलं आहे. मी केवळ आणि केवळ अजित पवारांमुळं खासदार झाल्याचं दावा केलाय. अजित पवार की जयंत पाटील याला अनुसरून ते वक्तव्य नव्हतं, माझ्या त्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. असं कोल्हे यांनी भावी मुख्यमंत्री जयंत पाटील या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं. पिंपरी चिंचवडमध्ये शिवपुत्र संभाजी महानाट्यानिमित्त आयोजित मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी कोल्हे यांनी या महानाट्याच्या तिकिटांची विक्री स्वतः केली. मुलाखती दरम्यान भाजपमध्ये प्रवेश करणार का? असं विचारलं असता थेट उपस्थितांना हा प्रश्न विचारला. तेंव्हा संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. यावर कोल्हे यांनी स्पष्ट बोलणं टाळलं. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


10th May In History: पानिपतचे पहिले युद्ध जिंकून बाबर आग्र्यामध्ये आला, 1857 च्या उठावाला मेरठमधून सुरुवात; आज इतिहासात


On This Day In History: आजचा दिवस भारताच्या आणि जगाच्या इतिहासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्याच दिवशी म्हणजे 10 मे 1526 रोजी पानिपतची लढाई जिंकल्यानंतर बाबरने देशाची तत्कालीन राजधानी आग्रा येथे पाऊल ठेवले आणि मुघल राजवट स्थापन करून आपल्या देशाचा इतिहास आणि भूगोल बदलून टाकला. जगात दररोज काही ना काही विक्रम केले जातात आणि मोडले जातात, परंतु प्रथम यश मिळवणाऱ्याचे नाव नेहमीच लक्षात राहते. हरियाणाच्या संतोष यादवने 10 मे 1993 रोजी सलग दुसऱ्यांदा जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर केले आणि असे करणारी ती जगातील पहिली महिला गिर्यारोहक ठरली.


देशाच्या आणि जगाच्या इतिहासात 10 मे या तारखेला नोंदवलेल्या इतर काही महत्त्वाच्या घटनांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.


1526 - पानिपतचे युद्ध जिंकून बाबर आग्र्याला आला


पानिपतच्या पहिल्या लढाईत (First Battle of Panipat) बाबरने (Babur) इब्राहिम लोधीचा पराभव केला आणि 10 मे 1526 रोजी त्यावेळची राजधानी आग्र्यामध्ये प्रवेश केला. पानिपत हे भारतीय इतिहासातील तीन मोठ्या युद्धांचे साक्षीदार आहे. पानिपतची पहिली लढाई 21 एप्रिल 1526 रोजी दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोधी आणि बाबर यांच्यात झाली. बाबरच्या सैन्याने इब्राहिम लोधीच्या एक लाखाहून अधिक सैनिकांचा पराभव केला. अशा प्रकारे पानिपतच्या पहिल्या लढाईने बहलूल लोदीने भारतात स्थापन केलेल्या लोदी घराण्याचा अंत झाला आणि दिल्लीमध्ये मुघल राजवटीची (Mughal Empire) स्थापना झाली. पुढे मुघल राजवटीने देशावर 250 वर्षे राज्य केलं. 


Mumbai Local Train:  लोकलवर दगडफेक करण्याआधी दहावेळा विचार करा! हायकोर्टाने आरोपीला सुनावली कठोर शिक्षा


Mumbai Local Train:  मुंबईतील लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दगडफेक आणि लोखंडी सळई फेकून हल्ला करणाऱ्या एका 40 वर्षीय आरोपीला मुंबई सत्र न्यायालयानं दोषी ठरवत एकाच प्रकारच्या चार गुन्ह्यामध्ये प्रत्येकी 10 वर्षांच्या सश्रम कारावसाची शिक्षा सुनावली आहे. आपल्या या कृतीमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येईल, याची आरोपीला पूर्ण कल्पना होती. मात्र तरीही त्यानं लोकलवर दगडफेक आणि लोखंडी सळई फेकून मारण्यासारखं कृत्य केलंय. अशा समाजकंटकांना शिक्षा ठोठावून समाजात योग्य तो संदेश पोहोचवणं गरजेचं आहे, असं निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अभय जोगळेकर यांनी आपल्या निकालात नोंदवत हत्येच्या आरोपाखाली आरोपीला ही शिक्षा ठोठावली आहे.


काय आहे प्रकरण? 


कुर्ला आणि विद्यविहार स्थानकांदरम्यान धावणाऱ्या लोकलवर 40 वर्षीय राकेश रॉडनं 16 जुलै 2019 रोजी एकच दिवशी तीनदा दगडफेक केली होती. त्यामध्ये कुर्ला ते विद्याविहार दरम्यान दुपारी प्रवास करणारे रतनदीप चंदनशिवे प्रथम लक्ष्य झाले. ज्यात त्यांच्या डाव्या कोपराला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर टिटवाळास्थित अजय कहार (23) हा तरूण गोवंडीहून कुर्लामार्गे घरी परतत असताना राकेशनं केलेल्या दगडफेकीमुळे त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती. तर 32 वर्षीय तौसिफ खान हा सायंकाळी पनवेलच्या दिशेनं प्रवास करत असताना राकेशनं अचानक फेकलेल्या सळईचा मार थेट त्याच्या पोटात बसला होता. या घटनेत जखमी झालेल्या दोघांच्या डोक्याला टाके घालावे लागले होते. याशिवाय एका विद्यार्थ्यानं या हल्ल्यात स्मरणशक्ती गमावल्याचीही माहिती आहे. या हल्ल्यांनतर राकेश रॉडला लगेचच अटक करण्यात आली, तेव्हापासून तो कारागृहातच आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.