Maharashtra News Updates 06 February 2023 : मुंबईतील कोस्टल रोडला लता मंगेशकर यांचं नाव द्या; मंगेशकर कुटुंबीयांची सरकारकडे मागणी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 06 Feb 2023 07:45 PM
बीड जिल्हा रुग्णालयात उशिरा येणाऱ्या 145 कर्मचाऱ्यांना अर्धा दिवसाच वेतन
बीडच्या जिल्हा रुग्णालयात उशिरा येणाऱ्या 145 कर्मचाऱ्यांचं अर्धा दिवसाचं वेतन कमी करण्याचे आदेश जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांनी दिले आहेत.. आज डॉक्टर साबळे यांनी स्वतः जिल्हा रुग्णालयाच्या गेटवर बसून उशिरा येणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली.
चिंचवड विधानसभा इच्छुकांची बैठक; अजित पवार उपस्थित

विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या उपस्थितीत चिंचवड विधानसभा इच्छुकांची बैठक होत आहे. पिंपरी चिंचवडच्या किवळे येथील हॉटेलमध्ये थोड्याच वेळात बैठक सुरू होत आहे. आज उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी घरी जाऊन घेतली शैलेश टिळकांची भेट

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शैलेश टिळकांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. टिळकांना उमेदवारी न दिल्याने टिळक कुटुंबीय नाराज असल्याच्या चर्चा आहे. ती नाराजी दूर करण्यासाठी बावनकुळे टिळकांच्या घरी गेले असल्याचं बोललं जात आहे.

नाना पटोलेंनी घेतली गिरीष बापटांची भेट

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आज पुण्यात कसबा पोटनिवडणुकीसाठी माहाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा फॉर्म भरण्यासाठी आले होते. त्यांनी आज दुपारी त्यांनी खासदार गिरीश बापट यांची रुग्णालयात भेट घेतली. 

नाना पटोलेंनी घेतली गिरीष बापटांची भेट

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आज पुण्यात कसबा पोटनिवडणुकीसाठी माहाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा फॉर्म भरण्यासाठी आले होते. त्यांनी आज दुपारी त्यांनी खासदार गिरीश बापट यांची रुग्णालयात भेट घेतली. 

मुंबईतील कोस्टल रोडला लता मंगेशकर यांचं नाव द्या, मंगेशकर कुटुंबीयांची सरकारकडे मागणी

आज लता मंगेशकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईतील हाजी अली चौकात लतादीदींच्या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. या भूमिपूजनाला उषा मंगेशकरही उपस्थित होत्या.


स्मारकाच्या भूमिपूजन प्रसंगी उषा मंगेशकर म्हणाल्या की, "त्यांच्या स्मारकाचे भूमिपूजन एका वर्षात झाले याचा त्यांना खूप आनंद आहे, दरम्यानच्या काळात आम्ही राज्य सरकारला कोस्टल रोडला लता दीदींचे नाव देण्याची विनंती केली आहे."

Navi Mumbai News: केंद्र सरकार विरोधात काँग्रेसचे एलआयसी कार्यालयाबाहेर आंदोलन

Navi Mumbai News: नवी मुंबई जिल्हा काँग्रेसने आज केंद्रातील मोदी सरकार विरोधात जोरदार आंदोलन केले. वाशी येथील एलआयसी कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्रित येत मोदी सरकारचा निषेध व्यक्त केला. मोदी सरकारने एलआयसी ला अडानी कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले असल्याचा आरोप करत यावेळी मोदी सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सरकार अडानी आणि अंबानी साठी काम करत असल्याचा आरोप करत मोदी सरकार हटाव चा नारा देण्यात आला.

Maharashtra Political News: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आव्हाड यांनी चुकीचे वक्तव्य केले असून शिवसेनेचा त्याला विरोध राहील : वैभव नाईक

Maharashtra Political News: राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांनी जर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असं चुकीचं वक्तव्य केलं असेल तर आम्ही त्याचा निषेध करतो, अशी सणसणीत प्रतिक्रिया उद्धव ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे. कणकवली येथे आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेनंतर आमदार नाईक वृत्तवाहिन्यांशी बोलताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आदराचे स्थान आहे. त्यांच्या विचारांवरच आम्ही काम करत आहोत. त्यामुळे छत्रपतींबाबत आव्हाड यांनी चुकीचे वक्तव्य केले असेल तर शिवसेनेचा त्याला विरोध असेल.


भाजपने आंगणेवाडीत घेतेलेल्या आनंद मेळावा भाविकांना मनस्ताप देण्यासाठी होता की नारायण राणेंना राजकीयदृष्ट्या निरोप देण्यासाठी होता अशी टीका भाजपवर वैभव नाईक यांनी केला आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनेवर टीका करण्याचे काम केलं गेलं. कुठल्याही प्रकल्पाची घोषणा केली नाही, उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका करण्याचे काम केलं.

 

ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना जिवे मारण्याची धमकीवर आमदार वैभव नाईक यांनी अशा धमक्या देणारे खूप जण आले, मात्र त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची हिंमत नाही. नितीन देशमुखांना हे माहिती नाही. त्यांच्या धमकीचं गांभीर्याने घेण्याची गरज नाही.

 
Maharashtra Hingoli Cirme News: बंदूक दाखवत अंगठ्यांची चोरी; विमानाने चोरट्यांची गुवाहाटी वारी

Hingoli Cirme News: राज्याच्या सत्ता संघर्षामध्ये गुवाहाटी शहराचे महाराष्ट्राला ओळख झाली कारण शिवसेनेसोबत बंडखोरी करून चाळीस आमदार घेऊन एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले होते आणि हेच गुहाटी शहर आता चोरट्यांनासुद्धा सुरक्षित वाटू लागले आहे. कारण हिंगोलीत दरोडा टाकून चोरट्यांनी गुवाहाटीला पलायन केल आहे. 


25 जानेवारीला हिंगोली शहरालगत असलेल्या  खटकाळी मंदिरातील पुजाऱ्यावर पाच चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवत दरोडा टाकून पुजाऱ्याकडील कपाटातील  चार अंगठ्या  घेऊन चोरटे पसार झाले या घटनेने शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते या प्रकरणात पुजाऱ्याच्या तक्रारीवरून हिंगोली  पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता  घटनेचे गांभीर्य लक्षात घेताच या प्रकरणाचा तपास हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. 

Dhule News: अदानींच्या विरोधात काँग्रेस आक्रमक, धुळ्यात आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

Dhule News: एलआयसी आणि स्टेट बॅंक ऑफ इंडिया या सार्वजनिक वित्तीय संस्थांना अदानी उद्योग समुहात गुंतवणूक करण्यास भाग पाडून सर्वसामान्यांचे आर्थिक नुकसान करणार्‍या केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात काॅंग्रेसने सोमवावारी राज्यव्यापी आंदोलन केले.


धुळे शहरात देखील एलआयसी आणि एसबीआय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील, जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांच्या नेतृत्वाखाली काॅंग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी अदानी आणि मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

 

अदानी उद्योग समुहामध्ये एलआयसी, स्टेट बँक ऑफ इंडिया व सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्थांना कोट्यवधी रूपये गुंतवण्यात मोदी सरकारने भाग पाडले. एलआयसीचे 29 कोटी गुंतवणूकदार व स्टेट बँकेच्या 49 कोटी खातेदारांचा कष्टाचा पैसा परत मिळेल का ? अशी भिती निर्माण झाली आहे.

 

एल. आय. सी आणि स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या देशाचे गौरव आहेत. या वित्तीय संस्थामध्ये सर्वसामान्य, मध्यमवर्ग, नोकरदार, छोटे व्यापारी यांनी आपल्या मेहनतीचा पैसा गुंतवला आहे. परंतू मोदी सरकारने अदानीच्या कंपन्यांमध्ये हा पैसा बळजबरीने गुंतवला आहे. 

 

म्हणून अदानी उद्योग समुहातील गैरकाराभाची चौकशी व्हावी यासाठी कॉंग्रेस पक्ष्याच्या वतीने रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यात आले.
Maharashtra Politics: भारतीय जनता युवा मोर्चाकडून आव्हाडांविरोधात मोर्चा

Maharashtra Politics: भारतीय जनता युवा मोर्चाकडून आव्हाडांविरोधात मोर्चा. कुलाबा येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर भाजयुमोचा मोर्चा. राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही आक्रमक. पोलिसांनी भाजयुमो कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

Maharashtra Congress: राज्यभरात आज काँग्रेसचं आंदोलन

Maharashtra Congress: अदानीच्या मुद्द्यावरून राज्यासह देशभरात काँग्रेसचं आंदोलन, मुंबईच्या वडाळा येथे भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन. राज्यातील सर्व SBI आणि LIC  कार्यालयासमोर काढण्यात आला मोर्चा 

Rohit Pawar on Pune Bypoll Election: भाजपला कसबा आणि चिंचवडमध्ये पराभव दिसू लागल्यावर बिनविरोधची आठवण,राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांचे खडेबोल

Rohit Pawar on Pune Bypoll Election: भाजपला कसबा आणि चिंचवडमध्ये पराभव दिसू लागल्यावर बिनविरोधची आठवण,राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांचे खडेबोल, पंढरपूर, नांदेड आणि कोल्हापूरमध्ये भाजपला बिनविरोधची आठवण का झाली नाही? पवारांचा सवाल. 

Pune Bypoll Election: पुण्याच्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत संभाजी ब्रिगेडचीही उडी

Pune Bypoll Election: पुण्याच्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत संभाजी ब्रिगेडचीही उडी. अविनाश मोहिते आज निवडणूक अर्ज दाखल करणार

Pune Bypoll Election: कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवार हेमंत रासने यांचं शक्तिप्रदर्शन

Pune Bypoll Election: कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवार हेमंत रासने यांचं शक्तिप्रदर्शन. कसबा गणपती ते दगडूशेठ गणपती मंदिर रॅलीनंतर भरला उमेदवारी अर्ज. 

Maharashtra Political News: काँग्रेस प्रवक्त्या हेमलता पाटील यांचं सूचक ट्वीट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra Political News: काँग्रेस प्रवक्त्या हेमलता पाटील यांचं सूचक ट्वीट. 'बाळासाहेबांची काँग्रेस' आणि 'नानांची काँग्रेस' ट्वीटमध्ये उल्लेख. ट्वीटनंतर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीबद्दल चर्चा सुरू

Maharashtra Political News: थोरातांनी असं कुठलंही पत्र लिहीलं असेल असं मला वाटत नाही : नाना पटोले

Maharashtra Political News: थोरातांनी असं कुठलंही पत्र लिहीलं असेल असं मला वाटत नाही. या सर्व प्रकरणावर चर्चा करण्यासाठी कार्यकारिणीची 13 फेब्रुवारीला बैठक. थोरातांच्या पत्रावर नाना पटोले यांची प्रतिक्रिया

Maharashtra Political News: कांग्रेसचे नेते आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच पक्षश्रेष्ठींनी पत्र, नाना पटोलेंबाबत व्यक्त केली नाराजी

Maharashtra Political News: काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचं पक्षश्रेष्ठींना पत्र. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंबाबत व्यक्त केली पत्रात नाराजी. सत्यजीत तांबे प्रकरणात मला बदनाम करण्याचा प्रयत्न. थोरातांचा पत्रात नेत्यांवर आरोप.

Pune Bypoll Election: 'कुलकर्णींचा मतदारसंघ गेला आता टिळकांचा गेला, समाज कुठवर हे सहन करणार?' कसबा पेठेतील फ्लेक्स चर्चेत

Pune Bypoll Election: पुण्यात शनिवार वाड्यालगत 'कुलकर्णींचा मतदारसंघ गेला आता टिळकांचा गेला, समाज कुठवर हे सहन करणार?' कसबा पेठेतील फ्लेक्स चर्चेत आहेत. 


पुण्यातील शनिवार वाड्यालगत हे असे फ्लेक्स लावण्यात आलेत. कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, आता टिळकांचा गेला, समाज कुठवर हे सहन करणार, असं या फ्लेक्सवर छापण्यात आलंय.  भाजपकडून कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांना डावलून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आलीय.  त्या पार्श्वभूमीवर हे फ्लेक्स लागल्याच बोलल जातंय.

Sillod News: सिल्लोड नगरपरिषदेविरुद्ध भाजप कार्यकर्त्यांचं आंदोलन

Sillod News: राज्यात भाजप आणि शिंदे गटाची सत्ता आहे. मात्र सिल्लोडमधलं एक आंदोलन चर्चेचा विषय बनलंय. सिल्लोड नगरपरिषदेवर शिंदे गटाचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची सत्ता आहे. मात्र याच नगरपरिषदेविरोधात खुद्द भाजपनेच आंदोलन पुकारलंय. सिल्लोड नगरपरिषदेने शहरात मालमत्ता कर वाढवण्याचा निर्णय घेतलाय. त्याविरोधात भाजपने डफडे बजाव आंदोलन पुकारलंय.

Aaditya Thackeray on CM Eknath Shinde: एका आमदाराने वरळीतून आव्हान दिल्यावर सर्वजण हडबडले : आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray on CM Eknath Shinde: शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आणि शिंदे गटामध्ये वरळी मतदारसंघावरून कलगीतुरा रंगलाय. 'एका आमदाराने वरळीतून आव्हान दिल्यावर सर्वजण हडबडले असा पलटवार आदित्य ठाकरेंनी केलाय. हिंमत असेल तर राजीनामा देऊन वरळीमधून निवडणूक लढवून दाखवा असं थेट आव्हान आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलं होतं.

Mumbai Worli News: आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार

Mumbai Worli News: वरळी कोळीवाड्यातल्या कोळी बांधवांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात येणार आहे. वरळी कोळीवाडा येथील क्लीव्हलँड बंदर भागात मच्छीमार बांधवांच्या बोटींच्या वाहतुकीसाठी 120 मीटरचा कायमस्वरूपी नेव्हिगेशन स्पॅन मिळवून दिल्याबद्दल या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्या संध्याकाळी 6 वाजता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची सभाही आयोजित करण्यात आलीय. त्यानिमित्तानं शिंदे गट आणि भाजपकडून वरळीत मोठं शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. दरम्यान, दोन दिवसांआधी आदित्य ठाकरे यांनी आपण राजीनामा देतो, एकनाथ शिंदेंनी वरळीतून लढून दाखवावं असं आव्हान दिलं होतं. त्या पार्श्वभूमीवर या सभेकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत.

Shiv Samvad Yatra: युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा आजपासून सुरू

Shiv Samvad Yatra: युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा आजपासून सुरू झालाय. 4 दिवसांची ही शिवसंवाद यात्रा असणार आहे. नाशिक, औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्हयातून ही शिवसंवाद यात्रा जाणार आहे. याआधीही आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा काढत राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन पक्षबांधणीसाठी प्रयत्न केले होते. तर आता याच यात्रेचा हा सातवा टप्पा सुरू होतोय. 

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. 

Beed News : वयाच्या विसाव्या वर्षी दाखल झाला दरोड्याचा गुन्हा आणि 33 व्या वर्षी झाली अटक

Beed News : दरोडाच्या गुन्ह्यातून तेरा वर्षांपासून फरार असलेल्या एक आरोपीला बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विडा गावातून अटक केली आहे. प्रमोद युवराज पटाईत असाही आरोपीचे नाव असून 2009 साली नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी पकडलं होतं आणि याच टोळीतून प्रमोद पटाईत हा फरार झाला होता. प्रमोद पटाईत यांच्यावरती ज्यावेळी दरोड्याचा गुन्हा दाखल झाला त्यावेळेस त्यांचं वय 20 वर्ष होतं आणि आता वयाच्या 33 व्या वर्षी त्यांना अटक झाली आहे. गेल्या 13 वर्षापासून पोलीस त्याचा शोध घेत होते अशातच तो आपल्या विडा गावात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली आहे.

शेअर मार्केटमध्ये पडझड, सेन्सेक्समध्ये 190 अंकांची घसरला तर निफ्टीतही 72 अंकांची घसरण 

सेन्सेक्समध्ये 190 अंकांची घसरला तर निफ्टीतही 72 अंकांची घसरण 


अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागात घसरणीचा सिलसिला सुरुच 


अदानी समूहातील सातही कंपन्यांचे शेअर्स गडगडलेत 


अदानी एन्टरप्रायझेजमध्ये 3 टक्क्यांहून अधिकची घसरण 


डाॅलरच्या तुलनेत रुपया 82 पार, 58 पैशांनी रुपयात घसरण, डाॅलरच्या तुलनेत रुपया 82.41 डाॅलरवर 


निफ्टी बॅंक निर्देशांकात मात्र तेजी, अदानी समूह कर्जाचा परतफेड करत असल्याचा विश्वास तयार झाल्याने बॅंकांच्या समभागात तेजी 


जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव 80 डाॅलर प्रति बॅरलवर 


आजपासून आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक, 8 फेब्रुवारी रोजी धोरण जाहीर होणार, व्याजदरवाढीची पुन्हा शक्यता

Beed News: बदलीसाठी अपंगाचे प्रमाणपत्र काढणाऱ्या 23 शिक्षकांच्या प्रमाणपत्राचा अहवाल आज सादर होणार

Beed News: बीड जिल्हा अंतर्गत बदलीसाठी 23 शिक्षकांनी मेंदू विकाराने त्रस्त असल्याचे प्रमाणपत्र सादर केलं होतं हे प्रमाणपत्र बनावट असल्याचे उघड झाल्यानंतर याच प्रमाणपत्राची तपासणी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात करण्यात आली असून आज त्याचा अहवाल जिल्हा परिषदेकडे सोपवण्यात येणार आहे. याच बनावट प्रमाणपत्रा प्रकरणी यापूर्वी 52 शिक्षकांना निलंबित करण्यात आला आहे आणि आता या सर्व शिक्षकांवर देखील कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.


जिल्हा अंतर्गत बदलीसाठी सोयीचे ठिकाण मिळाव म्हणून बीड जिल्ह्यातील 336 शिक्षकांनी दिव्यांग व गंभीर आजारी असल्याचे प्रमाणपत्र मिळवून त्याचा फायदा घेतला होता. त्यानंतर याच प्रमाणपत्राची तपासणी केली असता 52 शिक्षकांचं प्रमाणपत्र बनावट असल्याने त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आलं होतं. आणि त्यानंतर आता उर्वरित 26 शिक्षकांच्या प्रमाणपत्राची तपासणी रुग्णालयाकडून करण्यात आली असून त्याचा अहवाला जिल्हा परिषदेकडे सादर करण्यात येणार आहे आणि त्यानंतर या शिक्षकांवर कारवाई देखील करण्यात येणार आहे. 

Ratnagiri News: उत्पादन शुल्क कडून वर्षभरात दीड हजार जणांवर गुन्हे

Ratnagiri News: रत्नागिरी उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गेल्या वर्षभरात भरीव कामगिरी करत 1 हजार 448 जणांवर गुन्हे दाखल केले.यामध्ये 932 जणांना अटक करून 14 वाहने जप्त करण्यात आली.तर एकूण 2 कोटी 31 लाख 71 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले. उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सागर धूमकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. 

Turkey Earthquake: 7.9 रिश्टर स्केलच्या भूकंपानं तुर्की हादरलं

Nashik Crime News: सावकाराच्या जाचाला कंटाळून नाशिकमधील एकलहरे गावातल्या दोन भावांची आत्महत्या

Nashik Crime News: नाशिक जिल्ह्यात सावकारीचं मोठं जाळं पसरलं आहे. सावकारांच्या जाचाला कंटाळून काही दिवसांपूर्वीच एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केली होती. यातच आता सावकाराच्या जाचाला कंटाळून नाशिकमधील एकलहरे गावातल्या दोन भावांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये रविंद्रनाथ कांबळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तर जगन्नाथ कांबळे यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, कांबळे कुटुंबीयांनी मृतदेह घेण्यास नकार दिला आहे. काल काही वेळ नाशिक-पुणे महामार्गावर रास्तारोकोही करण्यात आला होता. जोपर्यंत आरोपींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. 


 

Solapur News: सावता महाराज यांच्या अरण गावात वारकरी संप्रदायाच्या सर्वात मोठ्या ध्वजाचा लोकार्पण सोहळा संपन्न

Solapur News: सोलापूर जिल्ह्यातील अरण हे  संत सावता महाराज यांची कर्मभूमी म्हणून ओळखली जाते. याच कर्मभुमीत सोलापूर पुणे महामार्गावरील अरण गावात 100 फुटाच्या वारकरी ध्वजांचे लोकार्पण कर्जत जामखेड चे आमदार रोहीत पवार,माढ्याचे आमदार बबनराव शिंदेच्या हस्ते पार पडले. यावेळी सावता महाराजांचे वंशज रमेश महाराज , सावता परिषदेचे अध्यक्ष कल्याण आखाडे यांचेसह  हजारो वारकरी भक्तांची उपस्थिती होती. यावेळी आमदार रोहित पवारांचा सावता महारांजाची पगडी घालुन कांदा- मुळा -भाजी-विळा देऊन विशेष  सन्मान करण्यात आला.

Belgaum News: बेळगावच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक सोमवारी

Belgaum News: भाजपमधून महापौर पदासाठी वाणी जोशी, सारिका पाटील,दिपाली टोपगी आणि शोभा सोमणाचे इच्छुक आहेत.महापौर पद सामान्य महिलांसाठी आरक्षित असून उप महापौर पद मागास ब महिलांसाठी राखीव आहे. भाजपकडे उप महापौर पदासाठी उमेदवार नसल्याने अपक्ष उमेदवार भाजपच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे उप महापौर पदासाठी अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ आहे. त्यानंतर अर्जांची छाननी होऊन दुपारी तीन वाजता निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे.प्रादेशिक आयुक्त एम जी हिरेमठ हे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्या समोर ठेऊन भाजप महापौर पदासाठी मराठी भाषिक महिलेला उमेदवारी देण्याची शक्यता आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोट निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार आज उमेदवारी अर्ज भरणार  आहेत. याबरोबरच राज्यासह देशभर एसबीआय आणि एलआयसीच्या कार्यालयासमोर कॉंग्रेस आंदोलन करणार आहे.  याबरोबरच शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा आजपासून सुरू होणार आहे. 


पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोट निवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरणार  


भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोट निवडणूक होणार आहे.  या पोट निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारी हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. आज  भाजपकडून चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी जगताप तर कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. याबरोबरच कॉग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांचं अधिकृत नाव जाहीर करण्यात आलं नसलं तरी कॉंग्रेसचा उमेदवार आज अर्ज भरणार आहे. राष्ट्रवादीने अद्याप चिंचवडसाठी उमेदवार जाहीर केलेला नाही. मात्र राष्ट्रवादीकडून राहुल कलाटेचं नाव आघाडीवर आहे. 


राज्यासह देशभर एसबीआय आणि एलआयसीच्या कार्यालयासमोर कॉंग्रेसचं आंदोलन 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशिर्वादानेच एलआयसी आणि एसबीआयमधील जनतेचा पैसा बुडण्याची भीती कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्ती केली आहे. याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेस आज राज्यातील एसबीआय आणि एलआयसी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे. अदानी समूहातील कारभाराची केंद्र सरकारने तातडीने चौकशी अशी मागणी करणार आहेत.


 आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा आजपासून
 
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा आजपासून सुरू होणार आहे.  नाशिक, जालना, संभाजीनगर असा शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा असणार आहे.  आज नाशिकपासून सुरूवात होणार आहे.  


भाजप करणार शिंदे गटा विरोधात आंदोलन 


शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांच्या ताब्यात असलेल्या सिल्लोड नगर परिषेदेच्या कारभारा विरोधात भाजपतर्फे डफडे वाजवा आंदोलन करण्यात येणार आहे. सिल्लोड नगर परिषदेने भरमसाठ, जुलमी करवाढी विरोधात हे आंदोलन असणार आहे. सिल्लोड नगरपरिषदेच्या कार्यालया समोर करवाढ नोटीशीची होळी करून डफडे वाजवा आंदोलन करणार.  
 
 तुमकुरू येथे एचएएल हेलीकॉप्टर फॅक्ट्रीचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण 
 
संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या दिशेने आज मोठं पाऊल पडणार आहे. कर्नाटकातील तुमकुरू येथे एचएएल हेलीकॉप्टर फॅक्ट्रीचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण केलं जाणार आहे.  


 सुप्रिम कोर्टाचे  पाच नवे न्यायमुर्ती पदाची शपथ घेणार
 
 सुप्रिम कोर्टाचे  पाच नवे न्यायमुर्ती आज पदाची शपथ घेणार आहेत.  न्यायमुर्ती पंकज मिथल, न्यायमुर्ती संजय करोल, न्यायमुर्ती पी वी संजय कुमार, न्यायमुर्ती अहसानुद्दीन अमानुल्लाह आणि न्यायमुर्ती मनोज मिश्रा शपथ घेणार आहेत. 
 
रोहित पवार सोलापूर दौऱ्यावर 
 
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आज सोलापुरात असणार आहेत. सकाळी 8 वाजता इंदिरा गांधी पार्क स्टेडियमची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी 11 वाजता संगमेश्वर महाविद्यालय आणि दुपारी 4 वाजता वालचंद महाविद्यालय येथे युवकांशी संवाद साधणार आहेत.


राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनजागर यात्रेचा पूर्व विदर्भातील टप्पा आजपासून
 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनजागर यात्रेचा पूर्व विदर्भातील टप्पा आजपासून सुरूवात होणार आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वात सकाळी 10 वाजता दीक्षाभूमीला वंदन करून यात्रेचा पूर्व विदर्भातील टप्पा सुरू होईल. या यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून काही पथनाट्य तयार करण्यात आले असून ते ठिकठिकाणी सादर केले जाणार आहेत. तसेच काही कॉर्नर सभा ही घेतल्या जात आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.