बीड : बीडमधील मुंडे भावा-बहिणीचा राजकीय वैर आजपर्यंत सर्वांनी पाहिलं आहे. गेल्याच आठवड्यात पंकजा मुंडे  यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला होता. पंकजा मुंडे  आणि  धनंजय मुंडे  यांच्यात कायमच शाब्दिक युद्ध सुरू असते. मात्र एका विवाह सोहळ्यात दोघे एकत्र पाहायला मिळाले. खरतर अनेक वेळा हे बहिण भाऊ एका व्यासपीठावर पाहायला मिळाले.  मात्र, या लग्न सोहळ्यामध्ये जवळपास दोन तास पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे एकत्रित बसले होते.


राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे तसेच माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांची भाची तेजश्री वामनराव केंद्रे आणि शरद सोनहीवरे यांचा विवाहसोहळा लातूर येथे पार पडला.  या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्रित दिसून आले.  लातूर शहराजवळ असलेल्या हॉटेल कार्निवल या ठिकाणी हा विवाह सोहळा पार पडला. धनंजय मुंडे यांच्या भाचीचा विवाह असल्यामुळे धनंजय मुंडे हे सकाळपासूनच उपस्थित होते. दुपारनंतर या विवाह सोहळ्याला पंकजा मुंडे यांनी त्यांच्या आई प्रज्ञाताई सोबत हजेरी लावली.


यापूर्वी अनेक वेळा धनंजय मुंडे पंकजा मुंडे हे व्यासपीठावर काही वेळा एकत्रित आले असले तरी आज मात्र त्यांच्यामध्ये होणारा संवाद हा सगळ्यांसाठीच नवीन होता.  कारण मागच्या अनेक दिवसांपासून राजकीय संघर्ष असलेल्या बहीण भावामध्ये अपवादानेच इतका वेळ संवाद पाहायला मिळाला होता.


लग्न समारंभानंतर परिवारासोबत जेवण्यासाठी पंकजा मुंडे आणि प्रज्ञाताई पोहोचल्या त्यावेळी स्वतः पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना सुद्धा जेवणासाठी आग्रह केला.  धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी एकत्र बसून जेवण केले. मागच्या अनेक दिवसापासून परिवारातील सदस्यासोबत मनमोकळ्या गप्पा यापूर्वी झाल्याचे पाहायला मिळाले नव्हते. या लग्न सोहळ्यात मात्र परिवारातील सगळे सदस्य एकत्रितपणे पाहायला मिळाले. 


हे ही वाचा :