वसई : चोरांनी अनोखी शक्कल लढवत, बँकेतून निघालेल्या व्यक्तीला दीड लाख रुपयांना लुटलं आहे. चोरट्यांनी बॅंकेतून पैसे घेऊन निघालेल्या व्यक्तीच्या मागे शंभर रुपयाच्या चार नोटा फेकून तुमचे पैसे पडले आहेत अशी दिशाभूल करत व्यक्तीची लाखो रुपयांची पिशवी लांबवली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करुन, अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. यावेळी काही काळ बॅंकेत दरोडा पडल्याच्या अफवेने पोलिसांची चांगलीच भांबेरी उडवली होती. 


अवघ्या चारशे रुपयांच्या नादात एका व्यक्तीचे दीड लाख रुपये काही सेंकदात गायब झाले आहेत. अंकुश सुतार असं या व्यक्तीचं नाव असून अंकुशच्या याच्या मालकाने त्याला वसई पूर्वेच्या एव्हरशाईन सिग्नल येथील कोटक महिंद्रा बँकेच्या शाखेतून शनिवारी दुपारी चेक देऊन, दिड लाखाची कॅश परत घेऊन येत होता. बॅंकेतून अंकुशने कॅश काढली आणि पावणे तीनच्या सुमारास त्याच बँकेतून निघालेल्या दोघा चोरट्यांनी अंकुशच्या पाठीमागे 100 रुपयांच्या चार नोटा फेकून तुमचे पैसे पडले आहेत, असं सांगत दिशाभूल केली. जसा अकुंश पैसे उचलण्यासाठी खाली वाकला. तेवढ्यात चोरटयांनी गाडीला अडकवलेली पैशांची पिशनी पळवली.


बँकेत दरोडा पडल्याची अफवा


चोरांनी रोख रक्कम पळवल्यामुळे कोटक बॅंकेत भर दुपारी दरोडा पडल्याची अफवा यावेळी वाऱ्यासारखी पसरली होती. त्यामुळे पोलिसांच पथक काही मिनिटात त्याठिकाणी पोहचलं. माञ तसं काही नसल्याने पोलिसांनी अकुंशच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे आता चोरटयांचा शोध पोलीस घेत आहेत.         


हे ही वाचा : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha