एक्स्प्लोर

वाढदिवस साजरा करणार नाही, अजितदादांनंतर फडणवीसांचा निर्णय

इर्शाळवाडीच्या घटनेनंतर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याबाबत सांगितले. दोन्ही नेत्यांचा वाढदिवस 22 जुलैलाच असतो.

मुंबई:  रायगड जिल्ह्यातील इर्शाळगडाच्या (Irshalwadi Landslide पायथ्याशी असलेल्या वाडीवर बुधवारी रात्री काळाने घाला घातला अन् काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. रात्रीतून दरड कोसळली आणि 16 जणांनी जीव गमावला. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी 22 जुलै असणारा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढदिवसाबद्दल कोणीही होर्डिंग (hoarding), बॅनर (banner) लावू नये तसेच जाहिरातीदेखील देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.  तर काल उपमुख्यमंत्री अजित पवार (Devendra Fadnavis and Ajit Pawar Birthday)  यांनीही त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला.  परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता त्यांनीही आपला वाढदिवस साजरा न करण्याबाबत सांगितले. दोन्ही नेत्यांचा वाढदिवस 22 जुलैलाच असतो.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा उद्या  (22 जुलै) वाढदिवस आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते व हितचिंतकांनीही गर्दी जमवणारे कोणतेही कार्यक्रम आयोजित न करता त्यासाठी खर्च होणारा निधी इर्शाळवाडीसाठी वापरण्यात यावा, असे आवाहनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस हा भाजपकडून सेवा दिन साजरा करण्यात येणार आहे. फडणवीस यांच्या वाढदिवशी भाजपचे नेते कार्यकर्ते लोकांना  सेवा देणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली आहे. तसेच इर्शाळवाडी घटनेनेमुळे कुणीही वाढदिवस साजरा करू नये, मोठे होर्डिंग लावू नयेत असे आदेश भाजप कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत. 

अजित पवारांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय 

'निधी इर्शाळवाडी गावाच्या पुनर्उभारणी आणि ग्रामस्थांच्या मदतीसाठी उपयोगात आणा'
या घरांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. सोबतच यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस असून राज्यभरातील त्यांचे चाहते, कार्यकर्ते, हितचिंतक दरवर्षी मोठ्या प्रमाणावर हा वाढदिवस साजरा करतात. परंतु इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कुणीही आपला वाढदिवस साजरा करु नये. पुष्पगुच्छ, होर्डिंग, जाहिरातींवर खर्च न करता तो निधी इर्शाळवाडी गावाच्या पुनर्उभारणी आणि ग्रामस्थांच्या मदतीसाठी उपयोगात आणावा, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.

अवघ्या काही क्षणांत होत्याचं नव्हतं झालं

बुधवारी रात्री शांत निजलेल्या इर्शाळवाडीत अवघ्या काही क्षणांत होत्याचं नव्हतं झालं आणि सारा महाराष्ट्र हादरुन गेला. रायगड जिल्ह्यातल्या मुसळधार पावसात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत इर्शाळवाडीतली 48 पैकी 17 घरं गाडली गेली. या दुर्घटनेत जवळपास 20 घरांचं गंभीर नुकसान झालं असून, उरलेली दहा घरं वाचली आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव पथकं तासाभरात घटनास्थळी दाखल झाली. पण पाऊस आणि अंधारामुळे बचावकार्य सकाळीच सुरु करावं लागलं. गुरुवारी दिवसभरातही पाऊस आणि जोरदार वाऱ्यानं बचाव पथकाची परीक्षा घेतली. या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला असून 98 जणांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आलं आहे.

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Ratnagiri News: नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेवर मगरीचा हल्ला, अवघ्या 10 वर्षांच्या चिमुकलीने आईला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं; नेमकं काय घडलं?
नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेवर मगरीचा हल्ला, अवघ्या 10 वर्षांच्या चिमुकलीने आईला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं; नेमकं काय घडलं?
Vishakha Raut : रश्मी ठाकरेंच्या अत्यंत जवळच्या नगरसेविकेच्या पदावर टांगती तलवार; पक्षाकडून कायदेशीर लढाईबाबत हालचाली सुरु, नेमकं प्रकरण काय?
रश्मी ठाकरेंच्या अत्यंत जवळच्या नगरसेविकेच्या पदावर टांगती तलवार; पक्षाकडून कायदेशीर लढाईबाबत हालचाली सुरु, नेमकं प्रकरण काय?
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Embed widget