Aurangabad: शिवसेनेचे नाराज आमदार आमच्या संपर्कात; भाजपच्या माजी मंत्र्याचा गौप्यस्फोट
Aurangabad: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमदारांचे कामे करत नसल्याने मोठी नाराजी.
Aurangabad News: राज्यातील राजकीय घडामोडींना मोठं वेग आला असून, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे 30 पेक्षा अधिक आमदारांना घेऊन गुजरातच्या एका हॉटेलमध्ये थांबले असल्याचे समोर आले आहे. त्यांनतर यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत असताना, या सर्व प्रकरणावर आज सोक्षमोक्ष लागेल. तसेच नाराज आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचं गौप्यस्फोट भाजपचे नेते तथा माजी मंत्री अतुल सावे यांनी केलं आहे. विशेष म्हणजे सावे हे फडणवीस यांच्या जवळच्या नेत्यांपैकी एक आहे.
काय म्हणाले सावे...
औरंगाबादमध्ये माध्यमांशी बोलताना सावे म्हणाले की, आज मुख्यमंत्री आमदारांना भेटत नाही,त्यांचे कामे करत नाही,त्यामुळे जनतेची नाराजी आहे. तर जे काही घडत आहे त्याचे आज दिवसभरातून सोक्षमोक्ष लागेल असे सावे म्हणाले. तसेच नाराज आमदार हे भाजपच्या संपर्कात असल्याचे मोठ विधान सावे यांनी केले आहे.
भाजपचा जल्लोष
राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे विधानपरिषदेच्या निवडणुकीत सुद्धा भाजपचे संपूर्ण 5 उमेदवार निवडून आल्याने भाजपकडून आज औरंगाबाद शहरात जल्लोष साजरा करण्यात आला. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गुलमंडीवर भाजपकडून गुलाल उधळण करून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी आमदार अतुल सावे,शहरअध्यक्ष संजय केनेकर यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळाली.