धक्कादायक व्हिडिओ! शेजारच्याचा व्यवसाय बंद पडावा म्हणून 'जादूटोणा', घटना सीसीटीव्हीत कैद
Aurangabad : याप्रकरणी औरंगाबाद ग्रामीणच्या बिडकीन पोलिसात जादूटोणा कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Aurangabad Crime News: पुरोगामी महाराष्ट्रात अजूनही जादूटोणा आणि करणी कवटाळीच्या घटना अनकेदा समोर येत असतात. दरम्यान औरंगाबादमध्ये देखील असाच काही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपल्या शेजारी असलेल्या दुकानदारांचा व्यवसाय बंद पडावा म्हणून, एकाने चक्क दुकानाच्या परिसरात नारळ, लिंबू फेकून करणी करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. तर याप्रकरणी औरंगाबाद ग्रामीणच्या बिडकीन पोलिसात जादूटोणा कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी बद्रीनाथ सखाहरी बांडे (वय 62 वर्ष, रा. पाडळी ता. पैठण जि. औरंगाबाद) यांनी बिडकीन पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार पैठण तालुक्यातील बिडकीन येथे निलजगाव रोडवर त्यांची श्रीहरी ट्रेडर्स या नावाचे सिमेट-लोखंड दुकान आहे. दरम्यान रोज सकाळी त्यांची 9 वाजता दुकान उघडली जाते. दुकानावर कधी बद्रीनाथ बांडे व कधी त्यांचा मुलगा कैलास दुकानवर आसतो. दरम्यान गुरुवारी नेहमीप्रमाणे त्यांच्या कामगार दुकान उघडण्यासाठी आला असता, दुकानासमोरील काट्यावर कोणीतरी काळ्या रेषा व फुल्या असलेले नारळ व लिंबु तसेच एक छोटी 'भाकर' ठेवल्याचे त्याला पाहायला मिळाले. त्यामुळे त्यांनी याची माहिती बद्रीनाथ बांडे यांना फोनवरून दिली.
घटना सीसीटीव्हीत कैद
कामगाराने माहिती देताच बांडे यांनी दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे मोबाईल फोनमध्ये चेक केले. तेव्हा सीसीटीव्हीमध्ये बुधवारी रात्री 10 त्यांच्या दुकानाच्या मागे राहणारे आसाराम गंगाराम सर्जे हे दुकानासमोरील वजन काट्यावर लिंबु नारळ व भाकरीचा तुकडा ठेवताना दिसले. त्यानंतर बांडे यांनी याप्रकरणी बिडकीन पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
धक्कादायक व्हिडिओ! शेजारच्याचा व्यवसाय बंद पडावा म्हणून 'जादूटोणा', घटना सीसीटीव्हीत कैद@abpmajhatv pic.twitter.com/k6cS3LFL3K
— Mosin Shaikh (@MosinAbp) November 24, 2022
यापूर्वी देखील घडला असाच प्रकार...
तर याच तक्रारीत बांडे यांनी म्हटले आहे की, मागील दोन महीण्यापुर्वी कोजागिरी पोर्णीमाच्या दिवशी देखील कोणीतरी आमच्या दुकानासमोर काळ्या रेषा मारलेले नारळ लिंबु, एक भाकरीचा तुकडा, असे दुकानासमोर आमच्या धंद्यात नुकसान व्हावे किंवा ईतर कारनाने ठेवलेले होते. त्यानंतर बांडे यांनी दुकानीतील कामगाराच्या मदतीने त्या वस्तू काढण्याचे सांगितले होते. त्यावेळी त्यांच्या दुकानामध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसवलेले नसल्यामुळे लिंबु, नारळ हे कोणी ठेवले याबाबत कळाले नव्हते. मात्र आज पुन्हा असाच प्रकार समोर आल्याने आणि घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याने सर्व प्रकार समोर आला आहे. तर या प्रकरणी आता बिडकीन पोलीस पुढील तपास करत आहेत.
Aurangabad: अन् एका 'सॉरी' ने गेला जीव; औरंगाबादच्या जळीत प्रकरणात नवा खुलासा