Aurangabad News: काम न करणाऱ्या आणि नागरिकांच्या तक्रारी असलेल्या बँक अधिकाऱ्यांची कानउघडणी करणारा केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड  (Bhagwat Karad) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात काम न करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांना थेट कारवाईचा इशारा देताना कराड पाहायला मिळत आहे. तसेच बँक अधिकाऱ्याचे कामकाज महिन्याभरात सुधारला नाही, तर तो बिहारचा असो की साउथचा त्याची बदली थेट विरुद्ध दिशेने करण्यात येईल असेही भागवत कराड म्हणाले.


याबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबादच्या वैजापूर येथे रॉयल असोसिएट्स या संस्थेचा स्थलांतर व भव्य शुभारंभ सोहळा भागवत कराड यांच्या हस्ते झाला. दरम्यान याच कार्यक्रमासाठी आलेल्या भागवत कराड यांच्याकडे स्थानिक नागरिकांनी बँक अधिकारी कामे करत नसल्याच्या तक्रारी केल्या. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत, कराड यांनी काम न करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांना थेट बदलीचा इशारा दिला. त्यांचा हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


काय म्हणाले भागवत कराड...


यावेळी बोलताना कराड म्हणाले की, मला मिळालेल्या तक्रारीनुसार वैजापूर शहरातील बँकांचा कारभार सुरळीत चालत नाही. त्यामुळे या शहरातील ज्या काही चार-पाच बँका असतील, त्यांच्या मॅनेजरला बोलावून घेणार आहे. तसेच पुढील एक महिन्यात वैजापूर शहरातील कारभार सुधारला पाहिजे अशा त्यांना सूचना देणार आहे. मात्र तरीही एक महिन्यात कारभार सुधारला नाही, तर कोण मॅनेजर आहे मला माहित नाही. कुठला बिहारचा असेल किंवा साउथचा असेल, पण त्याची विरुद्ध दिशेने बदली करू असे कराड म्हणाले. त्यांच्या हाच व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होता आहे. 






भागवत कराडांकडून लोकसभेची तयारी...


आतापर्यंत भाजप-शिवसेना युतीत नेहमी शिवसेनेच्या वाट्याला आलेला औरंगाबाद लोकसभा मतदारसंघावर यावेळी भाजपने देखील दावा केला आहे. दरम्यान यासाठी भाजपकडून वर्षभरापासून तयारी करण्यात येत आहे. तर आगामी लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद मतदारसंघात भाजपकडून भागवत कराड रिंगणात असणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे त्यासाठी कराड यांच्याकडून तयारी सुरु झाली असल्याचे देखील बोलले जात आहे. अशात कराड यांनी औरंगाबाद जिल्ह्यात आपले दौरे वाढवले आहे. सोबतच ग्रामीण भागातील पक्षातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीवर देखील ते भर देताना पाहायला मिळत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या:  


Aurangabad News: काय सांगता! सत्तेत सोबत, तरीही भाजपकडून शिंदे गटाच्या विरोधात आंदोलन; राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय