Rain Update: मराठवाड्यात 15 जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम असणार असून, आज औरंगाबादसह जालना जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दोन दिवसात झालेल्या पावसामुळे हिंगोली जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत दोन हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. तर औरंगाबाद आणि जालना या दोन्ही जिल्ह्यात जोरदार पावसाच्या अनुषंगाने प्रशासनाकडून खबरदारी घेत उपाययोजना केल्या जात आहे.

  


प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्यात सोमवारी 7.3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ज्यात औरंगाबाद 15.7 ,जालना 15.3, बीड 2.3, लातूर 6.8, उस्मानाबाद 1.5, नांदेड 7.4, परभणी 4.0, हिंगोली 0.8 मिलिमीटर एवढा पाऊस पडला आहे. तर आज औरंगाबाद,जालना आणि नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


सावधानीचा इशारा...


औरंगाबाद जिल्ह्यात आज अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत अंतर्गत संबधित ग्रामसेवक, कृषीसहायक, ग्रामविकास अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील, आणि कोतवाल यांनी मुख्यालयास हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच पावसाचा अंदाज पाहता पूर प्रवणग्रस्त नदीपात्रातील क्षेत्रात कोणेही उतरू नयेत अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आला आहे.


जायकवाडी धरणाची आवक वाढली...


नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. त्यामुळे जायकवाडी धरणाची पाणी पातळीत सुद्धा वाढ होतांना पाहायला मिळत आहे. जायकवाडी धरणात 17 हजार 150 क्युसेकने पाण्याची आवक सुरु आहे. तर धरणाची पाणीपातळी 37 टक्क्यांवर पोहचली आहे. तर पाण्याची आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या काठच्या गावातील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 


महत्वाच्या बातम्या 


Maharashtra Rain Update : आजही राज्यात पावसाचा जोर कायम राहणार, 'या' जिल्ह्यात रेड अलर्ट जारी!


Maharashtra Mumbai Rain : मराठवाड्यासह विदर्भात काही ठिकाणी पूरस्थिती, नागरिकांना सतर्कतेचा इशारा