Maharashtra Rain Update : राज्यात आजही पावसाचा (Rain Update) जोर कायम राहणार असून रायगड (Raigad), रत्नागिरी (Rantnagiri), पालघर (Palghar), पुणे (Pune), कोल्हापूर (Kolhapur), नाशिक (Nashik) आणि गडचिरोलीला (Gadchiroli) आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, मुंबई, सातारा, मराठवाड्याचा काही भाग आणि चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये आजही मुसळधार पावसाची शक्यता आहे.


पुणे- पुण्यात गेल्या 6 दिवसांपासून सतत पाऊस पडतोय. पुण्यात सतत पडणाऱ्या पावसाने खडकवासला धरण 75 टक्के भरलं आहे. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडतोय. धरणातून 1 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग होणार आहे. 


नाशिक- जिल्ह्याच्या ग्रामीण आणि शहरातील पहिली ते बारावीच्या सगळ्या शाळा आज बंद राहणार आहे. नाशिक जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर केल्यानं प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. पावसाचा जोर कायम असून धरणांमधून विसर्ग सुरू झालाय. गोदावरी नदीला मोसमातील पहिला पूर आल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. प्रशासनाने खबरदारीचे आदेश दिलेत.


धुळे-  जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अक्कलपाडा धरणातून दोन हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून पांझरा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.


पालघर- जव्हार, मोखाडा तालुक्यात मुसळधार पाऊस पडतोय. जव्हार तालुक्यातील वावर वांगणी येथील नदीला मोठा पूर आलाय. आठ गावांचा संपर्क तुटला आहे.


नंदुरबार - हवामान खात्याने दिलेल्या इशारा नंतर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. तर नवापूर तालुक्यातील शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तालुक्यातील नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. तसेच जिल्ह्यातील अनेक लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. गोमाई, शिवण, नागन,नदी काठावरील. गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नवापूर शहरातील रंगावली काठावरील 100 घरातील 400 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे


गडचिरोलीत पुढचे दोन दिवस रेड अलर्ट
मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीची पाहणी करण्यात आली असून गडचिरोली जिल्ह्यात 12 आणि 13 तारखेला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. पुढील 48 तासात गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. रात्री मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी परिस्थितीची पाहणी करुन बैठक घेतली. काल पावसाचा जोर कमी झाला आहे. 


संबंधित बातम्या


Maharashtra Weekly Weather Forecast : राज्यात या आठवड्यातही अतिवृष्टीचा इशारा कायम; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील हवामान