Nashik Ojhar HAL : नाशिक (Nashik) शहराजवळील ओझर (Ojhar) येथील हिंदुस्तान एरॉनेटिक्स लिमिटेड ( HAL) - एचएएल कंपनीत HTT-4O जातीचे विशेष ट्रेनर विमाने तयार करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी वायूदलात भरती (Airforce) होणाऱ्या वैमानिकांना अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी महत्वाचे ठरणार आहे. या प्रकल्पासाठी 6 हजार 800 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली असून यामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. 


नाशिक (Nashik) शहराजवळील ओझर (Ojhar) येथील एचएएल कंपनीत (HAL Company) यापूर्वी अनेक प्रकाराची विमानांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिकची एचएएल ही विमान बनविणारी कंपनी नेहमीच नव्या प्रयोगशील विमान निर्मितीसाठी सज्ज असते. गेल्या काही वर्षांपासून हा प्रकल्प प्रलंबित होता. अखेर खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. खासदार गोडसे ( Hemant Godse) यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे HTT-40 जातीचे सत्तर विमाने तयार करण्याचे काम ओझर येथील एचएएल कंपनीला मिळाले असून यासाठी सहा हजार आठशे कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. 
      
दरम्यान ओझर एचएएलमध्ये आजपर्यंत विविध प्रकारच्या विमानांची निर्मिती झाली आहे. येथील कारखान्यात सुमारे तीन हजार अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. विविध प्रकारची यशस्वी विमाने तयार करण्यात एचएएल प्रशासनाचा मोठा हातखंडा आहे. परंतु गेल्या काही वर्षापासून एचएएलकडे कामाचा ओघ काहीसा कमी झाला होता. यातूनच विमाने तयार करण्याचे वाढीव काम एचएएल कंपनीला मिळावे, यासाठी गेल्या काही वर्षांपासून खासदार गोडसे प्रयत्नशील होते. काही महिन्यांपूर्वी नाशिकच्या पथकाने दिल्ली येथे संरक्षण विभागाचे सेक्रेटरी अजय कुमार यांची भेट घेतली होती. ओझर एचएएलला विमान निर्मितीची ऑर्डर देण्याचे साकडे घातले होते. 


60 विमानांची निर्मिती 


सततच्या पाठपुरावामुळे वायूदलात भरती होणाऱ्या वैमानिकांना अत्याधुनिक प्रशिक्षण देण्याचे क्षमता असलेले HTT-4O जातीचे ट्रेनर विशेष विमाने तयार करण्याचे काम एचएएलला देण्याचे निर्णय सरंक्षण विभागाने घेतला आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे तीन हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांना काम मिळणार आहे. खासदार गोडसे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे काम मिळाल्याने एचएएल कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. यातील 60 विमाने ओझर येथील एचएएल प्रकल्पात तयार होणार असून त्यासाठी 6 हजार 800 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे 3 हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांना काम मिळणार आहे, तर स्थानिक व्हेंडर्ससह इतर उद्याेगांना व्यवसाय मिळणार असून राेजगार निर्मितीही वाढणार आहे.  



विमान एकाच वेळेस तीन तास हवेत 


दहा विमानांची निर्मिती बंगलोर येथील एचएएलमध्ये तर उर्वरित साठ विमानांची निर्मिती ओझर एलएएलमध्ये करण्यात येणार आहे. यासाठी सहा हजार आठशे कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. वायूदलात नव्याने दाखल झालेल्या वैमानिकांना HTT-4O जातीचे ट्रेनर विमानाव्दारे अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या विमानाचे ताशी स्पीड चारशे किलोमीटर असणार असून विमान एकाच वेळेस तीन तास हवेत राहू शकणार आहे. सदर विमान पुर्णतः भारतीय बनावटीचे असणार आहे. HTT-4O जातीचे विमाने तयार करण्याच्या कामाला येत्या काही दिवसात प्रत्यक्ष प्रारंभ होणार असल्याची माहिती खासदार गोडसे यांनी दिली आहे.