मुंबई : दीपक शिरसाट वयं 41 वर्ष नाशिक येथे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये (एचएएल) असिस्टंट सुपरवायजर म्हणून मागील बारा वर्षापासून काम करत आहे. हाच दीपक ठरला आहे नाशिकचा गद्दार कारण दीपकला महाराष्ट्र एटीएसने देशद्रोहच्या आरोपाखाली अटक केली आहे.
दहशतवादी विरोधी पथक नाशिक युनिटला अतिशय गोपनीय माहिती मिळाली की, भारतीय एरोनॉटिकलमध्ये काम करणारा एक व्यक्ती पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयला अतिशय गोपनीय माहिती पुरवत आहे. माहितीचा गांभीर्य लक्षात घेता दहशतवादी विरोधी पथक सक्रिय झालं आणि हा व्यक्ती नेमका कोण आहे याच्या शोधात लागले. हा माहिती पुरवणारा व्यक्ती इंडियन एरोनॉटिकल लिमिटेडचा कर्मचारी दीपक शिरसाट होता.
मिळालेल्या माहितीनुसार दीपक याला हॅनीट्रप मध्ये पाकिस्तानी इंटलीजन्स एजन्सी आयएसआयने अडकवले. आरोपी शिरसाटने भारतीय लढाऊ विमानांविषयी गुप्त माहिती तसेच इतर संवेदनशील माहिती आयएसआयला दिल्याचा आरोप आहे. MiG-21FL, MiG-21M, MiG-21 BIS, MiG-27, Su-30 MKI फायटर जेट, K-13 मिसाइल सारख्या महत्त्वपूर्ण जेट आणि मिसाइलबद्दल पाकिस्तानी एजन्सी आयएसआयला माहिती दिली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपकला या जाळात अडकवण्यासाठी एक सुंदर मुलीचा वापर केला गेला. हसीना नावाच्या मुलीने जानेवारी 2019 मध्ये सोशल मीडीयावर दीपकशी मैत्री केली. काही महिन्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. या हसीनानं दिपकला इमोशनली कनेक्ट केलं. या मुलीने दिपकचा विश्वास जिंकला आणि हळूहळू त्याच्या बद्दल सगळी माहिती घेतली. या मुलीने दिपकच्या मदतीने एचएएलच्या आत काय चालत याची माहिती घेतली पण तिला आतले फोटो, व्हिडियो आणि इतर माहिती हवी होती. त्यामुळे तीने दिपक सोबत ॲानलाइन अश्लील गोष्टी करायला सुरुवात केली. त्या मुलीने दिपकचे फोटो व्हिडीयो काढले आणि नंतर त्याला ब्लॅकमेल केलं.
दीपकने भीतीपोटी 6 महिन्यापर्यंत हसीनाने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी पुरवल्या. नंतरही माहिती पुरवणार होता पण त्याआधी एटीएसला माहिती मिळाली आणि त्याला अटक केली गेली. दिपकने पोलिसांना सांगितले की, त्याने एचएएलबद्दलही सगळी माहिती त्याने तिला पोहचवली आहे.
इंडियन एरोनॉटिक्स लिमिटेड ही भारतातील लढाऊ विमान बनवणारी कंपनी आहे आणि अतिशय गोपनीय पद्धतीने हे काम केले जाते. जेणेकरून इतर देशांना या लढाऊ विमानांची खाजगी माहिती मिळू नये, मात्र दिपकने आत्तापर्यंत किती आणि अजून कुठल्या माहिती पुरवल्या आहेत याचाही तपास दहशतवादविरोधी पथकाकडून केला जात आहे. तसेच अजून कोणी आयएसआयच्या किंवा इतर देशाच्या गुप्तहेर संघटनेच्या संपर्कात आहे काय याचाही तपास घेण्यासाठी आता यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. मात्र दीपककडून अजून कुठले खुलासे होतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.