Praveen Darekar : भाजप नेते प्रवीण दरेकरांना (Pravin Darekar) मुंबई सत्र न्यायालयानं मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबै बँक बोगस मजूर प्रकरणात सोमवारपर्यंत अटक न करण्याचे मुंबई पोलिसांना निर्देश देण्यात आले आहेत.  सरकारी वकीलांनी अटकपूर्व जामीन अर्जावर उत्तर देण्यासाठी वेळ मागितलाय. प्रवीण दरेकरांविरोधात खोटी माहिती दिल्याबद्दल एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे आणि याच प्रकरणात दरेकरांना दिलासा मिळाला आहे.


मुंबै बँक प्रकरणी गुन्हा दाखल असलेले प्रवीण दरेकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणावर तातडीनं सुनावणी व्हावी यासाठी दरेकरांच्या वकिलांचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबै बँकेत संचालक पदाच्या निवडणुकीत स्वतःला मजूर म्हणून दाखवणं हे प्रवीण दरेकरांना चांगलंच महागात पडलेलं आहे या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानं दरेकरांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयानं याचिका फेटाळून लावत त्यांना मुंंबई सत्र न्यायालयात अर्ज करण्यास सांगितलं होतं. त्यानुसार दरेकरांनी सत्र न्यायालयात धाव घेतली. 


प्रवीण दरेकारंच्यावतीनं जेष्ठ वकील आभात पोंडा यांनी युक्तिवाद केला. ज्यात सुरूवातीलाच त्यांनी स्पष्ट केलं की, 'आज दैवकृपेनं आणि जनतेच्या आशिर्वादानं पुढारी आहे, मात्र 'त्या' काळात सहकारी संस्थेत मी मूजरच होतो'. प्रतिज्ञा या मजूर सहकारी संस्थेत साल 1997 मध्ये होतो सभासद होतो. मात्र 25 वर्षांपूर्वीच्या याप्रकरणात पोलिसांनी नोंदवलेली ही तिसरी एफआयआर आहे अशी माहिकी दरेकरांच्यावतीनं देण्यात आली. याशिवाय मुंबई बँकेतील अध्यक्षपदाचा गैरवापर करत आर्थिक अफरातफर केल्याचा आरोपही बिनबुडाचा असल्याचा दावा दरेकरांच्यावतीनं करण्यात आला होता.


संबंधित बातम्या :


महाविकास आघाडीच्या निशाण्यावर कोण कोण? प्रविण दरेकरांवर गुन्हा दाखल ..!!!



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha