Maharashtra Mumbai Rains LIVE : राज्यात पावसाचा जोर कमी, पुराचं पाणी ओसरु लागल्यानं नागरिकांना दिलासा

राज्यात काही प्रमाणात पावसाचा जोर कमी झाला आहे. हळूहळू पूरस्थिती नियंत्रणात येत आहे. त्यामुळं नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 17 Jul 2022 03:17 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Rain Updates LIVE : आठवडाभरात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते. तर अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्यानं...More

Aurangabad: दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर औरंगाबादमध्ये पाऊसाची पुन्हा जोरदार बॅटिंग

Aurangabad Rain: गेल्या आठवड्यात जोरदार हजेरी लावणाऱ्या पावसाने गेली दोन दिवस विश्रांती घेतली होती. त्यांनतर मात्र आज पुन्हा पाऊसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली आहे. गंगापूरमध्ये दुपारी तीन वाजता जोरदार पावसाला सुरवात झाली आहे. गंगापूर शहरातील चौकात अचानक आलेल्या पावसामुळे काही वेळेसाठी लोकांची धावपळ उडाल्याची पाहायला मिळाली.