Maharashtra Mumbai Rains LIVE :   रायगड जिल्ह्यातील पोलादपूर , महाड , माणगाव, पनवेल , पेण , मुरूड  तालुक्यातील रहिवाशांचे स्थलांतरण

Maharashtra Rain : सध्या राज्याच्या काही भागातच पाऊस पडत आहे. मुंबई परिसरासह कोकणात चांगला पाऊस पडत आहे. इतर ठिकाणी मात्र, पावसाची प्रतिक्षा कायम आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 Jul 2022 08:12 PM
  रायगड जिल्ह्यातील पोलादपूर , महाड , माणगाव, पनवेल , पेण , मुरूड  तालुक्यातील रहिवाशांचे स्थलांतरण

Raigad :  रायगड जिल्ह्यातील पोलादपूर , महाड , माणगाव, पनवेल , पेण , मुरूड  तालुक्यातील रहिवाशांचे स्थलांतरण केले आहे.  रायगड जिल्ह्यातील 26 गावातील रहिवाशांचे स्थलांतरण केले आहे. रायगड जिल्ह्यातील 1716 रहिवाशांचे स्थलांतरण केले आहे. 

Mumbai Rains : सर्व मार्गावर ट्रेन्स सुरु, मेन लाईन, हार्बर मार्गावर काही गाड्या 10-15 मी. विलंबानं



कल्याण-डोंबिवलीत जोरदार पावसाची हजेरी, सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात

आज दुपार पासून कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या तीन तासापासून कोसळणाऱ्या पावसामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. डोंबिवली, नांदीवली, कल्याण पूर्वेकडील मलंग रोड, आडीवली, ढोकली परिसर यंदा ही जलमय झाला आहे. 

Kolhapur Rain : पंचगंगा नदी पाणी पातळीत झपाट्याने वाढ

 Kolhapur Rain : पंचगंगा नदी पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. राजाराम बंधारा पाण्याखाली गेला आहे. राजाराम बंधाराचे पाणी पातळी 16.8 फुटावर गेले आहे. राजाराम बंधारा वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे. सुरक्षा रक्षक तैनात करण्याची परिसरातील स्थानिकांकडून मागणी करण्यात आली आहे. 


महाड येथील रेवतळे गावाजवळील पूलावर पाणी आल्याने वाहतूक वळविण्यात आली

महाड येथील रेवतळे गावाजवळील पूलावर पाणी आल्याने वाहतूक वळविण्यात आली आहे. दापोली - मंडणगडकडे जाणारी वाहतूक वळविण्यात आली. वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात विन्हेरे बाजूकडून वळविण्यात आली. 

परशुराम घाटातील डोंगराच्या वरील बाजूने भेगा

मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात काही वेळापूर्वी दरड कोसळली होती आता घाटातील डोंगराला वरच्या बाजूने भेगा पडलेल्या आहेत. डोंगराच्या वरच्या बाजूला गाव आणि दुसऱ्या बाजूला वाहणारी वाशिष्टी नदी  यांच्यामधून हा महामार्ग गेला आहे.  वाशिष्टीच्या बाजूला वस्ती आहे आणि त्यावरून जाणारा महामार्गाचा घाट आहे. सध्या या घाटावर असणाऱ्या वस्तीला धोका निर्माण झाला आहे.. 

Ratangiri : परशुराम घाटातील वाहतूक ठप्प

मुसळधार पावसामुळे रत्नागिरीतील परशुराम घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे. पावसामुळे येथे ट्रकच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र आहे.  

पावसामुळे डोंबिवलीच्या नांदीवली भागात पाणी साचायला सुरू सुरूवात

गेल्या दोन दिवसांपासून कल्याण डोंबिवली मध्ये पावसाची ये जा सुरू होती. आज दुपारनंतर कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात  जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. दुपारनंतर काही दोन तास पावसाने चांगलाच जोर धरला होता .जोरदार पावसामुळे डोंबिवली पूर्व नांदिवली परिसर पुन्हा एकदा जलमय झाल्याचे पाहायला मिळालं. दरवर्षी या भागात पाणी साचत असल्याने यंदा केडीएमसीकडून या ठिकाणी पाणी उपसा करण्यासाठी पंप लावण्यात आले आहेत मात्र जोरदार पावसामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा पाणी साचण्या, सुरूवात झाली आहे

Palghar Rain : पालघर जिल्ह्यात विविध भागात मुसळधार पावसाला सुरूवात

पालघर जिल्ह्यातील विविध भागात मुसळधार पाऊस सुरूवात . पालघर बोईसर डहाणू कासा चारोटी विक्रमगड वाडा तलासरी भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. 

Kolhapur Rain : कोल्हापूर जिह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला, रुई आणि इचलकरंजी बंधारा पाण्याखाली

Kolhapur Rain : कोल्हापूर जिह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे, भोगावती नदी दुथडी भरून वाहू लागली राधानगरी, भुदरगड, करवीर, शाहूवाडी, गगनबावडा तालुक्यात दमदार पाऊस झाला आहे. रुई आणि इचलकरंजी बंधारा पाण्याखाली गेला

Raigad Rain : रायगडमधील चोळई येथे दरड कोसळली, प्रशासनाकडून 75 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले

आज सकाळपासूनच सुरू असणाऱ्या धुवांधार पावसामुळे कशेडी घाटातील चोळई येथे दरड कोसळली. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत येथील 20 कुटुंबे, यातील सुमारे 75 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी विद्यामंदिर पोलादपुर येथे हलविले आहे. सदर ठिकाणी चौपदरीकरण कामामुळे डोंगराचा कापण्यात आलेला भाग, पावसामुळे दरडीचे ढिगारेच्या ढिगारे खाली कोसळत असल्याने या गावाला धोका निर्माण झाल्याचे लक्षात आले असल्याने तालुका प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.

Mumbai Rain : मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल वाहतूक सुरळीत 

मुंबईतील कुर्ला-ठाणे आणि सीएसएमटी विभागात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसात देखील मेन, हार्बर, ट्रान्स हार्बर आणि बेलापूर/नेरुळ-खारकोपर कॉरिडॉरवर लोकल वाहतूक सुरळीत आहे, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. 


 





वाशिम जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला

वाशिम जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या चार तासापासून जिल्ह्यात पाऊस बरसत आहे. पावसानं जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली आहे. त्यामुळं सर्वसामान्य जनतेमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळं  काही प्रमाणात पाणी टंचाई कमी होणार आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra Mumbai Rains LIVE : सध्या राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्यापही पाऊस पडताना दिसत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. शेतकरी संध्या पावसाची वाट बघत आहे. सध्या मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात चांगला पाऊस पडताना दिसत आहे. तसेच कोकणात देखील चांगला पाऊस पडत असल्याचे चित्र दिसत आहे. त्याचबरोबर पालघर जिल्ह्यातही पावसानं चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळं तेथील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. जूनमध्ये उघडीप दिलेल्या पावसाचा जुलैमध्ये काही भागात जोर वाढल्याचे चित्र दिसत आहे.


हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातही काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, साताऱ्यातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 


विदर्भात काय स्थिती


दरम्यान, नेहमीप्रमाणे यंदाही भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या पावसाचा अंदाजापेक्षा एकदम उटल परिस्थिती निर्माण झाली. जून महिन्यात विदर्भातील अकराही जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून लवकर दमदार पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येणार असल्याची स्थिती आहे.


शेतकऱ्यांच्या सर्व आशा आता जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांवर आहेत. या महिन्यांत समाधानकारक पाऊस पडला तरच चांगले पीक होणार आहे. 16 जूनला मॉन्सून दाखल झाल्यापासून नागपुरात केवळ एकच दिवस (23 जूनला)  60 मिलिमीटर पाऊस बरसला. त्यानंतर वरुणराजाने केवळ नावापुरतीच अधूनमधून हजेरी लावली. उशिरा आलेल्या व पुरेशा पावसाअभावी सध्या पेरण्या खोळंबल्या असून, अनेक जिल्ह्यांत दुबार पेरणीची स्थिती निर्माण झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे, भारतीय हवामान विभागाने यंदा 103 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे. तो अंदाज आतापर्यंत तरी खोटा ठरला आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.