Maharashtra Mumbai Rain LIVE Updates : मराठवाड्यात पावसाचा हाहाकार, अनेक गावांचा संपर्क तुटला
राज्यातील मुंबईसह, ठणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापुरात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
हिंगोली जिल्ह्यातील आसना नदीला पूर आल्याने कुरुंदा किनोळा माळवठा आसेगाव या गावांना या पुराचा फटका बसला आहे. गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. या पुरामध्ये अडकलेल्या सात नागरिकांना एनडीआरएफच्या पथकाने बाहेर काढले आहे.
जिल्ह्यातील पूर हळूहळू ओसरत आहे. परंतु, या पुरात किती नुकसान झाले आहे याची माहिती समोर येत आहे. या भागातील जवळपास 90 टक्के शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतीचे पूर्णपणे नुकसान झाले असून शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या, गाई, म्हशी पुरामध्ये वाहून गेले आहे. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
लातूर आणि परिसरात काल सकाळपासून पावसाने जोरदार बॅटिंग केलीय. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतिक्षेत असलेला बळीराजा सुखावला आहे.
लातूर जिल्ह्यातील अनेक भागात पेरणीसाठी पोषक असलेला पाऊस झाला नव्हता. काल सकाळपासून जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण होते . सकाळपासून अनेक भागांमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. काल संध्याकाळ नंतर मात्र पावसाने चांगलाच जोर धरला. रात्री आठ ते दहा या वेळेमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. मध्यरात्री नंतर सुद्धा पावसाचा जोर सुरू होता.
हिंगोली जिल्ह्यातील आसना नदीला पूर आल्याने कुरुंदा, किनोळा, माळवठा, आसेगाव या गावांना या पुराचा फटका बसला आहे. गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. सध्या पाऊस कमी झाला आहे. दरम्यान, या पुरामध्ये अडकलेल्या एकूण सात नागरिकांना एनडीआरएफच्या पथकाने बाहेर काढले आहे. हळूहळू पूर ओसरत आहे. या पुरात किती नुकसान झाले आहे याची माहिती समोर येत आहे. या भागातील जवळपास 90 टक्के शेतजमीन ही पाण्याखाली आली आहे. 90 टक्के शेत जमिनीवरील पूर्णपणे नुकसान झाले आहे.
Satara Rain : सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. या पावसामुळं वेण्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. या नदीचं पाणी रस्त्यावर आल्यानं महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावरील वाहतूक थांबवली आहे. पर्यटक रस्त्यात अडकले आहेत. पावसाचा जोर वाढल्याने वेण्णा नदीतल्या सांडव्यातील पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आलं आहे.
Navi Mumbai News : सिडकोचा महत्वकांशी प्रकल्प असलेल्या रोरो सेवेच्या कामाबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. कारण आहे नेरूळ खाडीवर उभारलेल्या जेट्टीस पडलेले तडे. नवी मुंबंई ते मुंबंई, भाऊचा धक्का, अलिबाग, मांडवा या ठिकाणी जाण्यासाठी रोरो सेवा सुरू करण्यात येणार आहे. या रोरो सेवेतून प्रवाशांबरोबर टू व्हीलर आणि फोर व्हीलर गाड्यासुध्दा बोटीतून घेऊन जाता येणार आहे. यासाठी सिडकोकडून 110 कोटी रूपये खर्च करत नेरूळ खाडीवर जेट्टी उभारण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच उभारलेल्या या जेट्टीला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. जेट्टीवर जाण्यासाठी 600 मीटरचा उड्डाणपूल तयार करण्यात आला आहे. उड्डाण पुलावरील दोन्ही बाजूच्या संरक्षित भिंतीला, डांबरीकरण केलेल्या रस्त्याला भेगा पडल्याचे फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान याबाबत सिडको अधिकार्यांशी बोललो असता त्यांनी कॅमेरा समोर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. सदरच्या कामात पडलेल्या भेगा या जिथे एक्सपान्शन जॅाईंट आहेत. तिथल्या असल्याचं स्पष्टीकरण सिडकोकडून देण्यात आलं आहे.
हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. रात्रीपासूनच जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कुरुंदा किन्होळा आसेगाव गावांच्या शिवारात जोरदार पाऊस सुरु झाला आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं अनेक गावांमध्ये पाणी शिरलं आहे. हे पाणी संपूर्ण गावातील घरात शिरल्यानं नागरिक भयभीत झाले आहेत. दरम्यान, या पुराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांना फोन करुन परिस्थितीची माहिती घेतली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Marathwada Rain : सध्या राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, काही ठिकाणी या पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाली आहे. नांदेड जिल्ह्यातही कालपासून जोरदार पाऊस सुरु आहे. तर काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळं हजारो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेली आहेत. तर दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील काही गावांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे. तसेतच परभणीतही मोठा पाऊस झाला आहे.
Hingoli rain : रात्रीपासून हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. वसमत तालुक्यातील कुरुंदा, किन्होळा, आसेगाव गावांच्या शिवारात जोरदार पाऊस झाला आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं गावांमध्ये पाणी शिरलं आहे. हे पाणी संपूर्ण गावातील घरात शिरल्यानं नागरिक भयभीत झाले आहेत. जीव वाचवण्यासाठी नागरिक घरातील छतावर जाऊन बसले आहेत. ज्या गावात पाणी ओसरत आहे. तिथे प्रशासन मदत करत आहे. ज्या ठिकाणी पाणी वाढत आहे त्या गावातील परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. आसेगावतील पाणी वाढत असल्याने परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. आसेगावमार्गे नांदेडकडे जाणारा रस्ता पूर्ण पने बंद झाला असून, वाहतूक विस्कळीत झाली आहे.
अहमदनगर जिल्ह्याच्या पूर्व भागातील अनेक तालुक्यांमध्ये संततधार पाऊस झाला. सुमारे चार तास संततधार पावसाने हजेरी लावल्यानं काही भागातील दुबार पेरणीचं संकट टळलंय. गेल्या एक आठवड्यापासून राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु असला तरी अहमदनगरच्या दक्षिणमध्ये म्हणावा असा पाऊस झालेला नव्हता. जिल्ह्यात अनेक ठिकाणी कमी पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झालं होतं. मात्र, काल रात्री पावसानं हजेरी लावली. नगर जिल्ह्याच्या पूर्व भागातील जवळपास सर्वच तालुक्यात चांगला पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचा संकट टळलं आहे. मात्र, पारनेर तालुक्यात अजूनही जोरदार पाऊसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.
Gadchiroli Rain : गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागात काल रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आलापल्ली-भामरागड मार्ग बंद झाला आहे. या महामार्गवरील तुमर्गुंडा नाल्यावर नवीन पूल बांधकाम सुरु असल्याने तात्पुरत्या स्वरुपात बनवण्यात आलेल्या पर्यायी मार्ग (रपटा) वाहून गेल्याने आलापल्ली ते भामरागड दरम्यान वाहतूक बंद पडली आहे.
Wardha Rain : राज्याच्या विविध भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. काही भागात तर पूरस्थिती निर्माण झाली आहे. वर्धा जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील वाघोली इथे नाल्याच्या पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीला सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे. मुसळधार पावसामुळं वाघोली जवळील मोठ्या नाल्याला पूर आला होता. देवराव पर्बत असे सुखरुप बाहेर काढण्यात आलेल्या व्यक्तिचे नाव आहे. पाणी प्रवाही असताना पाण्यात कोणीही उतरु नये असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
सातारा जिल्ह्यात देखील चांगला पाऊस सुरु आहे. जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. तर पाचगणीला पाणी पुरवठा करणारे वेण्णालेक भरले असून सांडव्यावरुन पाणी वाहू लागले आहे. त्यामुळं महाबळेश्वर आणि पाचगणीकरांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
नांदेड जिल्ह्यात प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर दमदार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या तीन दिवसा पासून नांदेड, अर्धापुर, हदगाव, बिलोली, धर्माबाद, उमरी, किनवट, मुखेड, मुदखेड,नायगाव या नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात सर्वदूर पावसानं हजेरी लावली आहे. तर काल रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं अर्धापुरमधील नदी, नाल्यांना पूर येऊन नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. तर नांदेड शहरातील कौठा, सिडको, श्रावस्ती नगर, जुना कौठा, तरोडा नाका परिसरातील घरामध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. त्याचप्रमाणं अर्धापुर तालुक्यातील छोट्या मोठ्या नदी नाल्यांना पूर येऊन सेलगाव, देगाव, गणपूर, कोंढा, मेंढला या बऱ्याच गावांचा संपर्क तुटला आहे.
वाशिम जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सध्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून, काही ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra Mumbai Rain Live : सध्या राज्याच्या विविध भागात पाऊस कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राज्यातील मुंबईसह, ठणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापुरात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यातही चांगला पाऊस सुरु असल्याचं दिसत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात 8 जुलै ते 12 जुलै या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभगानं वर्तवली आहे. त्यामुळं नागरिकांवी नागरिकांनी सावधानता बाळगावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे. तसेच रायगडमध्येही चांगला पाऊस सुरु आहे. या पावसामुळं वाहतुकीवर काही ठिकाणी परिणाम झाला आहे. तसेच सिंधुदुर्गमध्ये देखील चांगला पाऊस सुरु आहे.
हिंगोलीत पावसाचा हाहाकार
हिंगोली जिल्ह्यातील कृष्णा भागामध्ये पावसानं हाहाकार घातला आहे. तिथे ढगफुटीसदृश्य पाऊस पडला आहे. रात्री रात्रभर झालेल्या पावसानं कुरुंदा गावाजवळ असलेल्या आसना नदीला पूर आला आहे. पाणी नदी पत्रातून थेट कुरुंदा गावात शिरलं आहे. गावात सर्वच्या घरात पाणी शिरलं होतं. यामुळं घरातील संस्कार उपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालं आहे. जोरदार झालेल्या पावसाने गावातील मोबाईल नेटवर्क त्याचबरोबर विद्युत पुरवठा सुद्धा खंडित झाला आहे.
लातूर आणि परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग
मागील अनेक दिवसांपासून लातूर जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली होती. लातूर जिल्ह्यातील अनेक भागात पेरणीलायक पाऊस झाला नव्हता. सकाळपासून अनेक भागांमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. संध्याकाळनंतर मात्र पावसानं चांगलाच जोर धरला आहे. सततच्या पावसामुळे वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला आहे.
संततधार पावसानं हिवरा येथील पुल गेला वाहून
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील शुक्रवारी सकाळपासून सुरु झालेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पावसामुळं हिवरा (जगताप) येथील अजनसरा लगत असलेला हिवरा येथील पूल वाहून गेला आहे. अचानक पुल वाहुन गेल्याने नागरिकांना आपला जीव मुठीत धरुन घर जवळ करावं लागत आहे.
कोकणासह, पश्चिम महाराष्ट्रारातील काही भागात रेड अलर्ट
राज्यात पुढचे चार ते पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापूरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. विदर्भातही चांगला पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -