Maharashtra Mumbai Rain LIVE Updates : सर्वदूर पाऊस! उत्तर महाराष्ट्र वगळता सर्वत्र पावसाची नॉन-स्टॉप बॅटिंग, प्रत्येक अपडेट्स...
Maharashtra Mumbai Rain LIVE Updates : उत्तर महाराष्ट्र वगळता सर्वत्र पावसाची नॉन-स्टॉप बॅटिंग, कोकणाला पुढील चार दिवसांसाठी रेड अलर्ट, तर मुंबईतही पुढील पाच दिवस अतीवृष्टीचा इशारा
वसई - वसई विरारमध्ये सलग तीन दिवस पावसाचा जोर कायम असल्याने शहरातील सखल भागातील रस्त्यावर पाणी साचलेलं आहे. वसईतील गास सनसिटी रस्ता हा बुधवारपासून पाण्याखाली गेला आहे. आज या रस्त्यावर तीन ते साढे तीन फुट पाणी होतं. रस्ताच पाण्याने गायब झाला होता. आज दुपारी वसई विरार महानगरपालिकेची कचरा उचळणारा डंपर या पाण्यातून गेला. ड्रायव्हरला रस्त्याचा अंदाज न तो रस्त्याच्या बाजूलाच पलटी झाली आहे. सुदैवाने यात कुणालाही इजा झाली नाही. माञ बाजूला सनसिटी चौकी आहे. आणि रस्त्यावर पाणी भरले असताना वाहतुक सुरु असल्याने राञीत मोठी दुर्घटना होवू शकते. असा सामान्य नागरीकांनी तक्रारी केल्यानंतर, माणिकपूर पोलिसांनी आज गुरुवारी सायंकाळनंतर बॅरेकेट लावून सदरचा गास सनसिटी रस्ता बंद केला आहे. वसईच्या शहरी आणि ग्रामीण भागाला जोडणारा हा शॉर्टकट रस्ता आहे. सध्या शाळांना सुट्टी असल्याने नागरीकांनी येथे सायंकाळी फिरण्यासाठी गर्दी केली होती.
एका महिन्यात राज्यात तब्बल 66 जणांचा मृत्यू, पाऊस आणि काही नैसर्गिक कारणास्तव मृत्यू झाल्याची नोंद, १ जुन ते ६ जुलै या कालावधीत तब्बल ६६ जणांचा मृत्यू, नाशिक जिल्हात तब्बल १२ तर नागपुर जिल्ह्यात ८ जणांचा सर्वाधिक मृत्यू झाल्याची नोंद
Aurangabad: औरंगाबादमध्ये आज दुसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. बिडकीन, गंगापूरमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. तर गंगापूर शहरात तासाभरापासून मुसळधार पाऊस पडत आहे. तर पैठण,चित्तेगाव, सावखेडा, सावरगाव, पाचोडला मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.
रायगड : पनवेल तालुक्यातील आपटा खारपाडा मार्गावरील रस्त्यावर पाणी साचले, काल रात्री झालेल्या पावसामुळे पाताळगंगा नदीचे पाणी रस्त्यावर आले. आपटा खारपाडा मार्गावर सुमारे अडीच ते तीन फूट पाणी साचले.. सुमारे १५० मीटर मार्गावर पाणी साचल्याने वाहतूक बंद..
Satara Rain Update : प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या पार गावात पाणी शिरु लागलं आहे. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या सरींमुळे प्रतापगडाच्या पंचक्रोशीत गावागावात पाणी घुसू लागल्याचं दिसू लागलं आहे. महाबळेश्वर तालुक्यातील पार या गावातील ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागल्यामुळे आता या ओढ्या नाल्यांचं पाणी गावात घुसू लागलं आहे. गेल्या वर्षी जो काही पाऊस झाला त्या वेळेला हेच पार गाव जगापासून तब्बल पंधरा दिवस संपर्कहीन होतं. भूस्खलन झाल्यानंतर या गावात पहिल्यांदा एबीपी माझाची टिम पोचली होती. या गावांवर पुन्हा संकटात येऊ शकतं की, काय? असं ग्रामस्थांना वाटू लागलं आहे.
मुंबईत पुढील ५ दिवस ऑरेंज अलर्ट कायम मुंबईत आज देखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, मात्र कालपेक्षा पावसाचा जोर कमी असणार
Palghar Rain Updates : पालघरमध्ये कालपासूनच पावसाची संततधार पाहायला मिळत आहे.
- वसई : 127 मीमी
- जव्हार : 62.66 मीमी
- विक्रमगड : 113.5 मीमी
- मोखाडा : 60.4 मीमी
- वाडा : 135.75 मीमी
- डहाणू : 94.02 मीमी
- पालघर : 79.07 मीमी
- तलासरी : 41.75 मीमी
- एकूण पाऊस : 714.15 मीमी
- एकूण सरासरी : 89.27 मीमी
Kalyan Rain Update : गेल्या वर्षी कल्याणमध्ये पावसाळ्यात काही ठिकाणी पूर परीस्थिती निर्माण झाली होती. यावेळी नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाची मदत घेण्यात आली होती. यंदा पावसाळ्यात आपात्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी पावसाच्या पार्शवभूमीवर कल्याणमध्ये एनडीआरएफ 25 जणांचे पथक दाखल झालं आहे. हे पथक कल्याणमध्येच तैनात राहणार आहे. आपात्कालीन परस्थितीचा सामना करत अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी लागणारे साधन सामुग्रीसह हे पथक सज्ज आहे.
गेल्या वर्षी कल्याणमध्ये पावसाळ्यात काही ठिकाणी पूर परीस्थिती निर्माण झाली होती. यावेळी नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी एन डी आर एफ च्या पथकाची मदत घेण्यात आली होती . यंदा पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंदा पावसाच्या पार्शवभूमीवर कल्याणमध्ये एनडीआरएफचे 25 जणांचे पथक दाखल झाले आहे .हे पथक कल्याणमध्येच तैनात राहणार आहे . आपत्कालीन परस्थितीच सामना करत अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी लागणारे साधन सामुग्रीसह हे पथक सज्ज आहे
Navi Mumbai : नवी मुंबई आणि पनवेलमध्ये असलेल्या पर्यटनस्थळांवर पावसाळ्यात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. पावसाळ्यात दुर्घटना होऊन अनेक लोकांचे जीव गेल्या काही वर्षात गेले असल्याने ही बंदी घालण्यात आली आहे. खारघर येथील पांडवगडा, पनवेल मधील देहरंग धरण, नदी किनारे आदि ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. धबधब्यावर जावून भिजण्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न पर्यटक करत असले तरी गेल्या काही वर्षात पाण्यात वाहून जाण्याच्या घटना घडल्या असल्याने नवी मुंबंई पोलीसांकडून बंदी घालण्यात आली आहे. परिसरातील जवळपास 20 ते 25 ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
"भारतीय हवामान खात्याने दिलेला अतिवृष्टीचा इशारा आणि राज्यात सर्वदूर होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर समुद्र, नदी किनारपट्टीवरील नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. जिल्हा, राज्य प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षितस्थळी आश्रय घ्यावा. जीवित, वित्तहानी होणार नाही यासाठी सर्वांनी सतर्क राहून काळजी घ्यावी. राज्य सरकारनेही एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलिस, महसूल आदी बचाव, मदत यंत्रणांना सतर्क ठेवून आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तात्काळ मदत मिळेल याची निश्चिती करावी. अतिवृष्टी, पूरस्थिती, दरड कोसळण्याच्या दुर्घटनेत बचाव, मदत कार्यात विरोधी पक्षाचे स्थानिक लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला संपूर्ण सहकार्य, मदत करावी. राज्यातील नागरिकांची जीवित, वित्तहानी टाळण्यासाठी विरोधी पक्ष कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून मदतकार्यात सहभागी व्हावे," असे आवाहन राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे.
दोन दिवसापासून उघडीप दिलेल्या पावसाने काल भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार हजेरी लावली असून घाटघर, रतनवाडी, पांजरे, वाकी सह भंडारदरा परिसरात गेल्या 24 तासात 100 मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली. या पावसामुळे परिसरातील अनेक छोटे मोठे धबधबे प्रवाहित झाले आहेत. तर भात लावणीच्या कामांना ही आता सुरवात झाली असून पर्यटकांचे आकर्षण असलेल्या पर्यटन पंढरीकडे आता पर्यटकांची पावले वळू लागली आहेत.
Raigad Rain Update : रायगडमध्ये गेल्या 24 तासात रायगड जिल्ह्यात 125.45 मिमी पावसाची नोंद. रोहा येथे सर्वाधिक 197 मिमी, पोलादपूर 183 , माथेरान 175 , कर्जत 163.20 मिमी पावसाची नोंद... खालापूर १५२, पनवेल १४९, माणगाव १३४, तळा १३३, सुधागड १२२ मिमी पावसाची नोंद...
Raigad Rain Update - कुंडलिका आणि पाताळ गंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना..
Maharashtra Rain Updates : गेल्या दोन दिवसांपासून मुंबई कोकणात धुमाकूळ घालणाऱ्या पावसानं आता मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडही आपल्या कवेत घेतलाय. राज्यातल्या 7 जिल्ह्यांमध्ये आजपासून पुढील तीन दिवस रेड अलर्ट देण्यात आलाय. कोकणासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. मुसळधार ते अती मुसळधार पाऊस बरसणार असल्यानं प्रशासन सतर्क झालंय. नदीकाठच्या नागरिकांनाही सावधगिरीचा इशारा देण्यात आलाय.
Satara Koyna Rain Update : कोयना महाबळेश्वर परिसरातील पावसाचा जोर ओसरला, गेल्या 24 तासात महाबळेश्वरात 147 मिलिमीटर पाऊस तर नवजा 162 मिलिमिटर, कोयना 103 मिलिमीटर पावसाची नोंद, कोयना धरणात येणारी पाण्याची आवक मात्र वाढली, कोयना धरणात तब्बल प्रतिसेकंद 33 हजार क्युसेक्सने पाण्याची आवक सुरू, कोयना धरणात 20.71टीएमसी पाणी साठा
Kolhapur Rain Updates : कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील कांडवण धरण पूर्ण भरलं आहे. 5.11 द.ल.घ.मी क्षमतेचे हे धरण असून शाहूवाडी तालुक्यात चार दिवसांपासून जोरदार पाऊस सूरु आहे. कणसा खोऱ्यातील गावांसाठी हे धरण वरदान ठरतं. मात्र आता या धरणाच्या सांडव्यातून पूर्ण क्षमतेने पाणी नदी पात्रात येत आहे.
Buldhana Rain Updates : बुलढाणा जिल्ह्यात अनेक भागांत रात्रभर पावसाची संततधार सुरू होती. सकाळी मात्र पावसाने विश्रांती घेतली आहे. जिल्ह्यात खरिपाच्या 86 टक्के पेरण्या झाल्या असल्यानं हा पाऊस शेतीसाठी पूरक असल्यानं शेतकरी आनंदात आहे. जिल्ह्यातील पूर्णा नदीला मोठा पूर आला असून सातत्याने नदीतील पाण्याची पातळी वाढत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने एक जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन पथक तयार ठेवले आहे.
Ratnagiri Rain Updates : रत्नागिरी-कोकणातील तिन्ही जिल्हात रात्रभर पावसाच्या जोरदार सरी. सिंधुदुर्ग जिल्हात NDRF टीम तैनात. कोकणातील तीन जिल्हात 9 तारीखपर्यंत रेड अलर्ट. परशुराम घाट अद्याप बंद
Bhiwandi Rain Updates : भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात रात्रीपासून होत असलेल्या सततधार पावसामुळे भिवंडी शहरातील कामवारी नदीची पातळी वाढली आहे. त्यामुळे भिवंडी शहरात पुन्हा एकदा पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्यानं भिवंडीकरांची डोकेदुखी वाढली आहे. शहरातील तीन बत्ती, भाजी मार्केट, मंडई या परिसरात पुन्हा पाणी साचल्यानं रस्त्यांना तलावाचं स्वरूप आलं आहे.
Palghar Rain Updates : पालघरमध्ये आज सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. येत्या दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
Akola News : अकोला जिल्ह्यातील पेरणी आता जवळपास उत्तरार्धात आहे. अनेक ठिकाणी पिकं आता टरारून वर आलेली असतांना शेतकरी मात्र एका वेगळ्या चिंतेत आहे. ही चिंता आहे रोही अन् हरणांच्या टोळ्यांनी त्यांच्या सुगीच्या स्वप्नावर वरवंटा फिरविण्याची. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतातील पिकं हरिण, रोही अन् निलगाईच्या टोळ्यांनी अक्षरश: नेस्तनाबूत करायला सुरुवात केलीये. या जंगली प्राण्यांच्या टोळ्यांचा शेतकऱ्यांना किती त्रास आहे, हे दाखविणारं ही प्रातिनिधीक उदाहरण आहेय. हे हरिण अन् रोहींच्या कळपाचं चित्रं आहेय अकोट तालूक्यातील लामकाणी गावातील शेतशिवारातलं. तब्बल दोनशेच्यावर रोही आणि हरणं या कळपात दिसतायेत. हे कळप कोंब आलेलं पिक फस्त करतायेत.
Mumbai Rain Updates : मुंबईत गेले 2 दिवस पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात पाणीसाठा चांगलाच वाढलाय. सध्या मुंबईच्या सात तलावात मिळून अडीच लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा झालाय. पवई तलाव ओव्हरफ्लो झाला असून मुंबईमध्ये पुढील 3 दिवस ऑरेंज अलर्ट जारी करणअयात आलंय.
Mumbai Rain Updates : मुंबईत एकीकडे पाऊस सुरु आहे. या पावसात आज पहाटे मुलुंडमध्ये भरधाव टेम्पो उलटला आणि त्यात ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला. मुंबईत पूर्व द्रुतगती मार्गावर हा अपघात झाला. भरधाव टेम्पोच्या ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं आणि तो डिव्हायडरला धडकला. त्यानंतर टेम्पो उलटला.
Mumbai Rain Updates : मुंबई- ठाण्यात रात्रीपासून पावसाची रिपरिप होतीच मात्र पहाटेपासून पावसानं जोर धरायला सुरुवात केलये. मुंबईच्या अंधेरी सबवेमध्ये जोरदार पावसामुळे पाणी साचायला सुरुवात झालेय.. सध्या अंधेरी सबवेमध्ये अडीच तीन फूट पाणी साठलेलं आहे.. त्यामुळे सबवे नागरिकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलाय. तिकडे ठाण्यातही पहाटेपासून पाऊस कोसळतोय.. त्यामुळे कोपरी, वंदना या भागात पाणी साचायला सुरुवात झालेय.
Mumbai Rain Updates : सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का? शाळेभोवती तळं साचून सुट्टी मिळेल का ? हे गाणं आपण सर्वांनीच लहानपणी वाचलंय... गायलंय.. आणि भोलानाथनं वसई-विरारच्या मुलांचं गाऱ्हाणं ऐकलेलं दिसतंय. कारण वसई-विरार महापालिका क्षेत्रातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलीय.. रात्रभस कोसळणाऱ्या पावसामुळं अनेक ठिकाणी पाणी साचलंय. त्यामुळं महापालिका प्रशासनानं शाळांना सुट्टी जाहीर केलीय.
Maharashtra Konkan Rain Updates : मुंबई-गोवा महामार्गानं कोकणात जाणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. चिपळूणमधील परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. परशुराम घाट कालपासून बंद करण्यात आला असून तो 9 जुलैपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. घाटात धोकादायक दरडी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
Maharashtra Rain Updates : गेल्या दोन दिवसांपासून मुंबई कोकणात धुमाकूळ घालणाऱ्या पावसानं आता मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडही आपल्या कवेत घेतलाय. राज्यातल्या 7 जिल्ह्यांमध्ये आजपासून पुढील तीन दिवस रेड अलर्ट देण्यात आलाय. कोकणासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. मुसळधार ते अती मुसळधार पाऊस बरसणार असल्यानं प्रशासन सतर्क झालंय. नदीकाठच्या नागरिकांनाही सावधगिरीचा इशारा देण्यात आलाय.
पार्श्वभूमी
Maharashtra Mumbai Rain LIVE Updates : मुंबईत पावसाची (Mumbai Rain) नॉन स्टॉप बॅटिंग सुरुच आहे. मुंबईला पुढील 5 दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत आज काही ठिकाणी 200 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तसेच, मुंबईत 7 आणि 8 जुलै रोजी अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, रात्रभर कोसळत असलेल्या पावसामुळं अनेक सखच भागांत पाणी साचलं आहे.
पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये दोन ते तीन फूट पाणी भरलं होतं. त्यामुळे अंधेरी सबवे वाहनांसाठी आणि इतर नागरिकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. याशिवाय सायन, माटुंग्यातही काही प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या हिंदमातामध्ये मात्र अजिबात पाणी साचचेलं नाही.
सध्या मुंबई लोकल ट्रेन सुरळीत असून पश्चिम रेल्वे त्याचबरोबर मध्य रेल्वेची वाहतूकही सुरळीत आहे. हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूकही सुरुळीत सुरु आहे. आज दिवसभर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईत पुढील 5 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच आज आणि उद्या मुंबईत हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
मंगळवार, बुधवार असे दोन दिवस पावसानं मुंबईत जोरदार बॅटिंग केली. दिवसभर मुसळधार पाऊस मुंबईत कोसळल्यानंतर अनेक ठिकाणी पाणी साठल्याचं पाहायला मिळालं होतं, याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेनं प्रत्येक वॉर्डमध्ये विशेष खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांमध्ये ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड या ठिकाणी देखील पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळत होता. हवामान विभागाकडून कोकण, पश्चिम महाराष्ट्रासाठी पुढील चार दिवसांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापुरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, नाशिक, पुण्यातही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आज दिवसभरातली परिस्थिती पाहता नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आव्हान हवामान खात्याच्या वतीनं करण्यात आलं आहे.
काल (बुधवारी) झालेल्या मुसळधार पावसामुळं शहरातील काही भागांत पाणी साचल्यानं (Water Lodging) नागरिकांची मोठी गैरसोय झाली. काल दिवसभर कोसळणाऱ्या पावसामुळं सायनच्या रस्त्यांवर पाणीच पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. अंधेरी, घाटकोपर, चेंबूर, धारावी, दादर, वडाळा, पनवेलमध्येही लोक साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत घर गाठताना दिसले. पण संध्याकाळी पावसाचा जोर काहीसा कमी झाल्यामुळं साचलेलं पाणी ओसरलं. पण रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळ पुन्हा सखल भागांत पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -