शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
काँग्रेस नेत्या आणि पोटनिवणुकीत वायनाड येथून विजयी झालेल्या उमेदवार प्रियंका गांधी यांनी आज खासदारकीची शपथ घेतली, पद व गोपनियतेची शपथ घेतली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंसदेत शपथ घेतेवेळी प्रियंका गांधींनी पांढऱ्यां रंगाची सोनेरी किनार असलेली साडी परिधान केली होती.
प्रियंका यांच्यासमवेत त्यांचे भाऊ आणि संसदेतील लोकसभा विरोधीपक्षनेते राहुल गांधी हेही उपस्थित होते, आपल्या बहिणीसोबत ते संसदेतील आवारात जाताना दिसून आले
प्रियंका गांधींनी हाती लाल रंगातील संविधान घेऊन पद व गोपनियतेची शपथ घेतली
काँग्रेस पक्ष, राहुल गांधी आणि संविधानाचे जे मूल्य आहे, त्याला मजुबती देण्याचं काम होईल, अशी पहिली प्रतिक्रिया प्रियंका गांधी यांनी शपथ घेतल्यानंतर दिली आहे.
राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी व आई सोनिया गांधी यांच्यासमवेतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. आता देशाच्या संसदेत आईसह त्यांची दोन्ही मुले सत्ताधाऱ्यांविरुद्ध एकत्र येतील
दरम्यान, शिवसेना युबीटी खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन शेरणी संसद मे आ गयी... असे म्हणत प्रियंका गांधींचं स्वागत केलं आहे.