शिर्डी : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीला (Mahayuti) मोठं यश मिळालं तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसला. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला. सायंकाळी साडेपाच वाजेनंतर जे मतदान झालं आहे, त्याचे फोटो दाखवा. हे मतदान कुठल्या सेंटरवर झालं? साडेसात टक्क्यांनी मतदान कसं वाढलं? या सर्वाचं उत्तर निवडणूक आयोगाने (Election Commission) दिलं पाहिजे. जनतेची मतं चोरण्याचं आणि डाका टाकण्याचं काम निवडणूक आयोग करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. आता यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी नाना पटोले यांना प्रत्युत्तर दिले आहे.
शिर्डी येथे माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, तुम्ही जेव्हा लोकसभेत जिंकता तेव्हा तुम्हाला जनतेने जिंकवलं. जेव्हा तुम्ही विधानसभेत हरता तेव्हा तुमची हार ही ईव्हीएममुळे झाली, अशा पद्धतीचा सुरू असलेला भाबडेपणा महाराष्ट्रातील जनतेला कळून चुकलाय. ईव्हीएमबाबत मतदान कसं झालं? उशिरा का झालं? याबाबत बोलण्यात काहीही अर्थ नाही. पराभव मोठ्या मनाने मान्य करावा लागतो. जसा आम्ही लोकसभेच्या निवडणुकीनंतर मान्य केला. मी तेव्हा ईव्हीएम वगैरे बोललो नाही. त्या पराभवानंतर पुन्हा जनसेवा केली आणि जनसेवेनंतर विधानसभेला जनतेने अभूतपूर्व यश महायुतीला दिलंय. जनतेने आम्हाला दिलेला यश हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोठ्या मनाने कबूल करावं, असा टोला त्यांनी नाना पटोले यांना लगावला.
धनंजय मुंडेंचं काँग्रेस नेत्यांना खुलं आव्हान
2029 मध्ये शिंदे पवार राजकारणातून हद्दपार होतील, असे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केले. यावर धनंजय मुंडे म्हणाले की, काँग्रेसचे नेते जे म्हणताय किंवा आरोप करताय, त्यांची काय अवस्था झाली हे त्यांनी एकदा बघावं. ते कुठून कुठपर्यंत आले आहेत. त्यांनी जी काही आहे तेवढी पण ठेवली नाही, जेवढी लाज राहिली आहे तेवढी तरी त्यांनी राखावी. ते 2029 च सांगताय, आज तुम्हाला महाराष्ट्रातील मायबाप जनतेने जो धडा शिकवला, त्याबाबतीत बोला ना, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी काँग्रेस नेत्यांना खुलं आव्हान दिले.
इतर महत्त्वाच्या बातम्या