Maharashtra School Reopen LIVE Updates : कोरोनानंतरची चिमुकल्यांची शाळा; राज्यभरातील शाळांसंदर्भातील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर...

Maharashtra School Reopen LIVE Updates : कोरोनानंतरची चिमुकल्यांची शाळा; राज्यभरातील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर...

abp majha web team Last Updated: 16 Dec 2021 08:57 AM
उत्तर भारतातील शीत लहरीचा महाराष्ट्रावरही परिणाम 




उत्तर भारतातील शीत लहरीचा महाराष्ट्रावरही परिणाम 

 

विदर्भ, मराठवाड्यातील अनेक ठिकाणांवरील तापमान १२-१४ अंश सेल्सिअसवर 

 

पूर्व विदर्भातील किमान सरासरी तापमान पुढील ७२ तासात आणखी खाली येणार

 

२० ते २३ डिसेंबरदरम्यान विदर्भातील अनेक भागातील तापमान १० अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याचा अंदाज 

 

नागपुरात आज किमान तापमान १२.४ अंश सेल्सिअसवर, गोंदिया १२.५ तर वर्धा १२.९ अंश सेल्सिअस 

 

मराठवाड्यातही तापमान खालवलं, औरंगाबाद १३.८ अंश सेल्सिअस, परभणी १३.९, नांदेड १४.२ 

 

मुंबईतील सांताक्रुज वेधशाळेत किमान सरासरी तापमानाची १९ अंश सेल्सिअसची नोंद तर कुलाब्यातील तापमान २०.६ अंशावर

 

 



 


विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी तयारी

पुण्यात आजपासून पहिली ते सातवीपर्यतचे वर्ग सुरु होत आहेत. पुण्यातील सिंहगड रोड वरील ज्ञानगंगा शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी तयारी करण्यात आलीय, शाळेच्या प्रवेशद्वारावर रंगीबेरंगी फुगे लावण्यात आलेले आहे, कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात येत आहे, प्रत्येक विद्यार्थ्यांचे तापमान मोजून, मास्क ची खात्री करुन विद्यार्थ्यांना वर्गात सोडले जात आहे, 

मुंबईत मागील 24 तासांत 238 नवे रुग्ण, रुग्ण वाढीचा दर 0.03%

मागील 24 तासात मुंबईत 238 नवे रुग्ण आढळले असून 210 रुग्ण कोरोनावर मात करण्यात यशस्वी झाले आहेत. ज्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 7 लाख 45 हजार 200 झाली असून सध्या सक्रीय रुग्ण 1 हजार 797 इतके आहेत. सध्या कोरोना वाढीचा दर 0.03 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा दर 2 हजार 514 दिवसांवर गेला आहे.

मुंबईत मागील 24 तासांत 238 नवे रुग्ण, रुग्ण वाढीचा दर 0.03%

मागील 24 तासात मुंबईत 238 नवे रुग्ण आढळले असून 210 रुग्ण कोरोनावर मात करण्यात यशस्वी झाले आहेत. ज्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 7 लाख 45 हजार 200 झाली असून सध्या सक्रीय रुग्ण 1 हजार 797 इतके आहेत. सध्या कोरोना वाढीचा दर 0.03 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा दर 2 हजार 514 दिवसांवर गेला आहे.

वसई, विरारकरांसाठी आनंदाची बातमी, नालासोपा-यात सापडलेल्या ओमायक्रॉन रुग्णाचा रिपोर्ट  निगेटिव्ह

वसई, विरार, नालासोपाराकरांसाठी आनंदाची बातमी आहे. नालासोपा-यात सापडलेल्या ओमायक्रॉन रुग्णाचा रिपोर्ट  निगेटिव्ह आला आहे.  वसई विरार महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ भक्ती चौधरी यांनी माहिती दिली.

बुलढाणा जिल्ह्यातही ओमायक्रॉनचा शिरकाव

बुलढाणा जिल्ह्यातही ओमायक्रॉनचा रुग्ण आढळला आहे. सबंधित रुग्ण हा दुबईतून 1 डिसेंबर रोजी आला होता. दुबई येथे त्याची कोविड टेस्ट निगेटिव्ह आली होती. ज्यानंतर 6 डिसेंम्बर रोजीच्या त्याच्या RT PCR टेस्टचा रिपोर्ट पॉजिटिव्ह आल्यानंतर त्याचे सॅम्पल जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पुण्याला पाठवण्यात आले. ज्यानंतर त्याला ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. सध्यातरी त्याला कोणतीही गंभीर लक्षणं नाहीत.

34 टक्के पालकांकडून संमती पत्रक मिळाले 2 लाख  639 विद्यार्थ्यांचा आज शाळेत पहीला दिवस

मुंबई महापालिकेच्या पहीली ते सातवी  2034 शाळा आहेत. 1902 शाळा सुरू होणार 5 लाख 91 हजार  882 विद्यार्थी संख्या आहे. 34 टक्के पालकांकडून संमती पत्रक मिळाले 2 लाख  639 विद्यार्थ्यांचा आज शाळेत पहीला दिवस.


शाळेतील नियम-


तीन तास शाळा भरेल 
मधली सुट्टी नसेल 
एका बेंचवर एक विद्यार्थी बसेल


शिक्षण अधिकारी राजु तडवी यांची माहिती

ठाण्यातील आनंद विश्व गुरुकुलमधील विद्यार्थ्यांचे ढोल ताश्याच्या गजरात स्वागत

आज 15 डिसेंबर पासून संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. कोविड आणि विशेषतः ओमायक्रोनचा धोका लक्षात घेऊन जास्तीत जास्त काळजी घेऊन या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. ठाणे जिल्ह्यातील शहरे आणि ग्रामीण भागातील शाळा देखील सुरू करण्यात आल्या आहेत. इतक्या मोठ्या अंतरानंतर शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्साह यावा यासाठी काही शाळांनी खास तयारी केली होती. ठाण्यातील आनंद विश्व गुरुकुलमधील विद्यार्थ्यांचे ढोल ताश्याच्या गजरात स्वागत करण्यात आले आहे. तसेच रांगोळी काढून फुलांची सजावट ही करण्यात आली होती. नाताळ सण जवळ येत असल्याने दोन सांताक्लोजनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले आणि येणाऱ्या मुलांचे तापमान देखील तपासले. आज आलेल्या विद्यार्थ्यांचे सॅनिटायझेशन करण्यात आले आहे, तसेच सोशल डिस्टन्स ठेऊन विद्यार्थ्यांना वर्गात बसविण्यात आले आहे असे शाळेच्या विश्वस्त डॉ. हर्षदा लिखाते आणि मुख्याध्यापिका डॉ. वैदेही कोळंबकर यांनी सांगितले.

पार्श्वभूमी

Maharashtra School Reopen LIVE Updates : Mumbai School Reopen :


Maharashtra School Reopen Update : पुणे शहरातील शाळा आजपासून (Pune Pimpri Chinchwad School Open Updates) सुरू होणार आहेत. त्यामुळे तब्बल दीड वर्षांनी पहिली ते सातवीच्या शाळांची घंटा वाजणार आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियन्टमुळं शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. आता मात्र शाळा खुल्या करण्यात येत आहेत. त्यामुळे शाळा प्रशासनाकडून यासाठी खास तयारी केली जात आहे. सोशल डिस्टन्सिंगसह सर्व प्रकारच्या खबरदाऱ्या बाळगून शाळा सुरु होणार आहे.  विद्यार्थ्यांसाठी तशी बसण्याची व्यवस्था केलेली आहे. सगळे वर्ग स्वच्छ केले आहेत. सॅनिटायझरची फवारणी सुद्धा केली गेली आहे.


 


पिंपरी चिंचवड शहरातील शाळाही सुरु होणार
पिंपरी चिंचवड शहरातील शाळा आजपासून सुरू होणार. त्यामुळे तब्बल दीड वर्षांनी पहिली ते सातवीच्या शाळांची घंटा वाजणार आहे. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी तसं परिपत्रक काढलेलं आहे. कोरोनाच्या ओमयक्रोन व्हेरियंन्टमुळं शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. आता मात्र शाळा खुल्या करण्यात येत आहेत. पण विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांचे संमतीपत्र घेण्याच्या सूचना ही शाळेला देण्यात आल्या आहेत.


 


काय आहेत शिक्षण विभागाच्या शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचना? 



  • दोन विद्यार्थ्यांमध्ये शक्यतोवर किमान सहा फूट अंतर ठेवावे

  • शाळेमध्ये प्रत्येकाने मास्क घालणे बंधनकारक आहे

  • वारंवार हात धुवावे व शाळेत स्वच्छता ठेवावी

  • शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे

  • शाळांमध्ये बायोमेट्रिक उपस्थितिची पद्धतीचा अवलंब करू नये

  • शाळेत गर्दी होणार नाही असे उपक्रम , खेळ किंवा सामूहिक प्रार्थना टाळाव्यात

  • ज्यांना कोणतीही लक्षणे नाहीत अशाच व्यक्तींना शाळेच्या आवारात किंवा वर्गात येण्यास अनुमती नसावी

  • मुले किंवा शिक्षक आजारी असेल तर त्यांनी शाळेत येऊ नये ,आवश्यक नियमांचे पालन करावे

  • क्वारंटाईन विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची सोय उपलब्ध असावी

  • शाळेतील एकाच वर्गातील पाचपेक्षा अधिक मुले दोन आठवड्याच्या कालावधीत कोरोनाबाधित आढळल्यास शाळेतील कोव्हीड प्रतिबंधक कृती योजनेचा सखोल आढावा घ्यावा

  • शाळांची वेळोवेळी निर्जंतुकीकरण करावे 

  • शाळेत येताना किंवा शाळा सुटल्यावर अथवा मोकळ्या वेळेत मुलांनी एकत्र येऊन नियमांचा भंग करू नये

  • यामध्ये ज्या शाळेत विद्यार्थी संख्या जास्त असेल त्यामुळे जास्तीत जास्त पंधरा ते वीस विद्यार्थी एका वर्गात बसतील.

  • एका बेंचवर एक विद्यार्थी बसेल अशाप्रकारे नियोजन करावे सोबतच विद्यार्थी संख्या जास्त असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये शाळा भरवण्यात यावी

  • शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांना  टप्प्याटप्प्याने शाळेत बोलवावे

  • शहरी भागात महापालिका आयुक्त व इतर ठिकाणी जिल्हाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद मुख्याधिकारी ,नगर परिषद यांनी शिक्षणाधिकारी ,आरोग्य अधिकारी यांच्यासमवेत सातत्याने आढावा घेऊन आवश्यक संबंधित सूचना कराव्यात

  • या आधीच्या टप्प्यांमध्ये ज्याप्रकारे ग्रामीण भागात शाळा सुरू करण्यासाठी सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली तर महापालिका क्षेत्राकरिता आयुक्त व नगरपालिका, नगरपंचायती ,ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यासाठी  जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आले आहेत.  त्या समितीने शाळा सुरू करण्यापूर्वी चर्चा करावी

  • पालकांच्या संमती शाळेत येण्यासाठी आवश्यक असणार आहे, पालकांचे संमतीनेच विद्यार्थी शाळेत येऊ शकेल

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.