Fire in Mumbai : मुंबईतील पूर्व द्रुतगती मार्गावरील असलेल्या कांजुरमार्ग येथील प्रस्तावित मेट्रो कारशेडच्या जागेत गवताला आग लागलीय. काही वेळा पूर्वी या परिसरात असलेल्या गवत आणि झाडा झुडपांना ही आग लागली होती. या आगीच्या धुराचे लोट पुर्व द्रुतगती मार्गावर पसरले असून याचा फटका वाहन चालकांना बसत आहे. यामुळे काही काळ या मार्गावर वाहतूक कोंडी देखील झाली होती. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 3 गाड्या दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. याचं ठिकाणी या अगोदर काही महिन्यांपूर्वी आग लागली होती. आता पुन्हा याच ठिकाणी आग लागली आहे.
व्हिडीओमध्ये आगीची भीषणता दिसत आहे. आग इतकी भीषण होती की, दूरपर्यंत धूराचे लोट दिसत होते. संपूर्ण परिसरात धूर दिसत होता. धूरामुळे वाहनचालकांना गाडी चालवण्यास त्रास झाला. रिपोर्टनुसार ही आग सुकलेल्या गवताला लागली. त्यामुळे आग वेगाने पसरली.
आग वेगाने पसरल्याने नागरिकांना श्वास घेण्यास त्रास देखील झाला. कांजुरमार्ग परिसरात मेट्रो शेड बनवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या भागात मेट्रो कामाचे बांधकाम साहित्य आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Kalyan: इमारत पुनर्विकासप्रकरणी बांधकाम परवानगीमधील अनियमितता, केडीएमसीच्या पाच माजी आयुक्तांसह 18 जणांविरुद्ध गुन्हा
- डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांसाठी उद्योजकांना भरावा लागणार कर? MIDCकडून प्रस्ताव
- कल्याण शहरातील आदिवासी पाडे असुविधेच्या गर्तेत, स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही स्वच्छता गृहाची प्रतीक्षा
- कधीतरी तयार झालेला रस्तासुद्धा दाखवा; शिवसेनेच्या बॅनरवर मनसेची; पोस्टकार्ड'ने टीका
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha