Maharashtra Monsoon Session LIVE : पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस, प्रत्येक अपडेट एका क्लिकवर

Maharashtra Monsoon Session LIVE : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला (Maharashtra Monsoon Session) 17 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. आज तिसऱ्या दिवशी अधिवेशनातील महत्वाच्या अपडेट्स

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 22 Aug 2022 04:35 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Monsoon Assembly Session : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला (Maharashtra Monsoon Session) 17 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे.  17 आणि 18 ऑगस्ट रोजी दोन दिवस कामकाज चालल्यानंतर सलग तीन दिवसांच्या सुट्ट्या...More

Maharashtra Monsoon Session : नवं सरकार बेकायदेशीर, स्वत:च्या स्वार्थासाठी निर्णय घेणारं; आदित्य ठाकरे यांचा आरोप

वॉर्ड रचना असेल किंवा आरेचा निर्णय असो, या सरकारने स्वत:च्या स्वार्थासाठी हे निर्णय घेतला आहे. हे सरकार तात्पुरतं असून बेकायदेशीर आहे असं शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. 50 थर लावून हे सरकार आल्याचं सांगितलं जातंय, पण यामध्ये खालच्या थराचा बळी घेऊन हे थर लावण्यात आले आहेत असंही ते म्हणाले.