![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
मंत्री विजय वडेट्टीवारांचा पासपोर्ट जप्त, गुन्हे लपवल्याचा आरोप
मंत्री विजय वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. वडेट्टीवार यांच्यावर गुन्हे लपवल्याचा आरोप आहे. भाजपचे माजी आमदार मितेश भांगडिया यांनी तक्रार केली होती.
![मंत्री विजय वडेट्टीवारांचा पासपोर्ट जप्त, गुन्हे लपवल्याचा आरोप Maharashtra Minister Vijay Wadettiwar passport confiscated allegations of concealment of crimes मंत्री विजय वडेट्टीवारांचा पासपोर्ट जप्त, गुन्हे लपवल्याचा आरोप](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/06000057/Vijay-Wadettiwar.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूर : राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. वडेट्टीवार यांच्यावर गुन्हे लपवल्याचा आरोप आहे. भाजपचे माजी आमदार मितेश भांगडिया यांनी तक्रार केली होती. त्यात त्यांनी विजय वडेट्टीवार यांनी आपल्यावर असणाऱ्या क्रिमिनल केसेस लपवल्या असल्याचा आरोप केला होता. भांगडिया यांनी अनेक वेळा मुख्यमंत्र्यांपासून ते पासपोर्ट ऑफिसपर्यंत तक्रार केली होती. नंतर कारवाई झाली नाही तेव्हा ते हायकोर्टात गेले.
माहितीनुसार विजय वडेट्टीवार यांनी पासपोर्टसाठी मनोरा हा पर्मनंट अॅड्रेस दिला होता. तिथल्या पोलीस स्टेशनमधून एनओसी घेतली होती. त्यात त्यांच्यावर कुठेही केसेस सुरू नाहीत. त्यामुळं भांगडिया कोर्टात गेले. त्यावेळी कोर्टाने पासपोर्ट ऑफिसला नोटीस काढल्या. त्यानंतर पासपोर्ट कार्यालयाने विजय वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त केला असल्याची माहिती आहे.
हे माझ्या विरोधातील राजकीय षडयंत्र - वडेट्टीवार
याबाबत बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, माझ्यावर कुठल्या ही केसेस नाही. त्यावेळी माझ्यावर 4 किरकोळ राजकीय केसेस होत्या. स्पेशल ब्राँचकडून माझ्यावर कुठल्याही केसस नाही हे पत्र आहे. तेव्हा केसेस होत्या, पोलिसांनी व्हेरीफाय करायला पाहिजे होते. मी आता ओबीसींसाठी इतके करतो आहे. हे माझ्या विरोधातील राजकीय षडयंत्र आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)