Sanjay Pandey Released From Tihar Jail : नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) कर्मचाऱ्यांच्या कथित बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी दिल्ली कोर्टाने (Delhi Court) जामीन दिल्यानंतर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांची बुधवारी रात्री तिहार तुरुंगातून (Tihar Jail) सुटका करण्यात आली. पांडे यांना जुलैमध्ये अटक झाल्यानंतर त्यांनी जवळपास पाच महिने तुरुंगात काढले. दिल्ली उच्च न्यायालयाने 8 डिसेंबर रोजी पांडेंना जामीन मंजूर केला होता. संजय पांडे 30 जून 2022 रोजी मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन निवृत्त झाले होते. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांच्या आत त्यांना ईडीने नोटीस पाठवली होती. निवृत्तीनंतर अटक होणारे संजय पांडे हे तिसरे मुंबई पोलीस आयुक्त आहेत. 



सीबीआय आणि ईडीचा आरोप


अंमलबजावणी संचालनालय (ED) ने सप्टेंबरमध्ये दिल्ली कोर्टात NSE कर्मचाऱ्यांच्या  फोन टॅपिंग प्रकरणाशी निगडीत मनी लॉड्रिंग प्रकरणात आरोपपत्र दाखल केले होते. जुलैमध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक केली होती. 2009 ते 2017 या काळात पांडेंनी बेकायदेशीर पद्धतीने फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे. ईडीने 5 जुलै रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणात संजय पांडेंना चौकशीसाठी सर्वप्रथम बोलावलं होतं. 1986 च्या बॅचच्या निवृत्त भारतीय पोलिस सेवेतील (IPS) अधिकारी संजय पांडेंची या प्रकरणी सात तासांहून अधिक चौकशी झाल्यानंतर केंद्रीय तपास संस्थेने अटक केली. पांडेंच्या अटकेपूर्वी ईडीने याप्रकरणी एनएसईला विचारणा केली. त्यानंतर माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) चित्रा रामकृष्ण यांना अटक करण्यात आली. पांडे हे 30 जून रोजी सेवेतून निवृत्त झाले. संजय पांडे यांच्या कंपनीने जवळपास आठ वर्षे नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (NSE) कर्मचार्‍यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याची माहिती सीबीआयला (CBI) मिळाली होती. संजय पांडे यांच्या iSEC सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने रेड सर्व्हर नावाच्या उपकरणांचा वापर करून हे फोन टॅप केल्याचा आरोप सीबीआय आणि ईडीने केला होता. विशेष न्यायालयाने पांडेंना 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सोडण्याचे आदेश दिले. तसेच पांडेंना त्यांचा पासपोर्ट सरंडर करण्याचे, त्यांचा मोबाईल नंबर तपास अधिकाऱ्यांना देण्याचे तसेच जामीन कालावधीत भारत सोडू नये असे निर्देश देण्यात आले होते.


 


ही कंपनी पांडे यांनी मार्च 2001 मध्ये सुरू केली होती


सीबीआयच्या म्हणण्यानुसार, एनएसईचे सिक्युरिटी ऑडिट करणार्‍या कंपन्यांपैकी एक असलेल्या इसेक सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेडने 2009-17 दरम्यान एनएसई कर्मचाऱ्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप होता. ही कंपनी पांडे यांनी मार्च 2001 मध्ये सुरू केली आणि मे 2006 मध्ये त्यांनी संचालकपद सोडले. एनएसई कर्मचाऱ्यांशी संबंधित फोन टॅपिंग प्रकरणाशी निगडीत मनी लॉड्रिंग प्रकरणात ईडी आणि सीबीआय यांनी पांडेंवर गुन्हा दाखल केला होता. सीबीआय आणि आता ईडीने पांडे आणि त्यांची दिल्लीस्थित कंपनी आयसेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, एनएसईचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण आणि रामकृष्ण, कार्यकारी उपाध्यक्ष रवी वाराणसी आणि प्रमुख महेश हल्दीपूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला


 


इतर बातम्या


Vel Amavasya : हिरवाईचा अपूर्व सोहळा म्हणजे वेळ अमावस्या, वाचा काय आहे परंपरा?