Wardha News : वर्ध्यातील मगन संग्रहालाय समिती ही महात्मा गांधींद्वारा 1938 मध्ये स्थापन करण्यात आलेली ग्रामीण उद्योगांचे राष्ट्रीय आणि प्रसिद्ध असे संग्रहालय आहे..आणि महारोगी सेवा समिती हे शहरानजीकच्या दत्तपुर येथे कुष्ठरोगींवर उपचार करण्यासाठी आणि त्यांचे आश्रम असलेली एक 80 वर्षांपूर्वीची संस्था आहे, जिथे जवळजवळ 70 ते 80 कुष्ठरोगी उपचार घेत आहेत. याच दोन संस्थांमध्ये घुसखोरी झाली का? आणि मगन संग्रहालयाच्या अध्यक्ष नेमकं कोण? असाच प्रश्न वर्ध्यातील नागरिकांना पडलाय. कारण डॉ विभा गुप्ता आणि  डॉ रामजी शुक्ला यांच्यात अध्यक्षपदावरून आणि संस्थेत घुसखोरी केल्यावरून गंभीर आरोप प्रत्यारोप करून वादंग निर्माण झालंय.


गंभीर आरोप प्रत्यारोप
पत्रकार परिषदेत डॉ. विभा गुप्ता म्हणाल्या की जाणूनबुजून महात्मा गांधींशी निगडित संस्थाना नुकसान पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला गेला आहे.पाहिले दत्तपुरच्या महरोगी सेवा समितीला हडपन्याचा प्रयत्न केला आणि आता मगन संग्रहालय समिति वर अवैध कब्जा करण्याचा प्रयत्न केला जातोय.
बघुयात मगन संग्रहालयाच्या अध्यक्षा डॉ विभा गुप्ता काय म्हणत आहेत. डॉ विभा गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत केलेले आरोप डॉ रामजी शुक्ला यांनी थेट फेटाळलेत..याउलट डॉ विभा गुप्ता महारोगी सेवा समितीच्या सदस्य नव्हत्या आणि नाहीत असा उलट आरोप शुक्ला यांनी डॉ गुप्ता यांच्यावर केलाय..


गांधी संस्थांचा वाद न्यायालयापर्यंत?


विभा गुप्तांनी माझ्यावर लावलेले महारोगी सेवा समितीत चोरीचे,दहशत निर्माण केल्याचे, किंवा तोडफोड केल्याची बाब चक्क खोटी असून मी असं काहीही केलं नाही असं शुक्ला म्हणालेत.. कारण या सगळ्याचा एखादी व्हीडिओ असता तर मी स्वतः मान्य केला असता, असंही शुक्ला म्हनालेत..डॉ विभा गुप्ता आणि समितीचे काही सदस्य महारोगी समितीत गेल्या असता ग्राम सेवा मंडळाच्या करूणादीदी यांना मारहाण केल्याचेही पत्रकार परिषदेत सांगितले, त्यावर "मी मारले नाही,आम्ही गांधींचे अनुयायी आहोत मारहाणीवर विश्वासच ठेवत नाही,आम्ही शांतीचे पुजारी आहोत, मलाही नाही वाटत की गांधी संस्थांचा वाद न्यायालयापर्यंत जावा" अशा प्रतिक्रिया डॉ शुक्ला यांनी दिल्या,


वादामुळे महात्मा गांधींच्या विचारांचा अनादर?
महात्मा गांधी यांनी शांततेचा संदेश दिला.अहिंसेने प्रश्न सोडविण्याचे त्यांचे विचार आहेत. ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्न केले. त्यावर मगन संग्रहालयाच्या  माध्यमातून रचनात्मक आणि उत्कृष्ट असे काम सुरू असतानाच अध्यक्षपद,जमिनीचे विवाद,घुसखोरी,यावरून आरोप करत वादंग निर्माण होणे हे गांधीवाद्यांना अशोभनीय आहे.
 वर्ध्यात महात्मा गांधींच्या काळात स्थापन झालेल्या या नामवंत संस्थांमध्येच सुरू असलेल्या या वादामुळे महात्मा गांधींच्या विचारांचा अनादरच होतोय असं म्हणावं लागेल.


महात्मा गांधींच्या विचारांचा वारसा जपला गेला पाहिजे


वर्धा जिल्ह्याला महात्मा गांधी,सेवाग्राम आश्रम, मगन संग्रहालयाच्या नावानेच जगभरात ओळख आहे. त्यामुळे जिल्ह्यात महात्मा गांधींच्या विचारांचा वारसा जपला गेला पाहिजे असेच डॉ गुप्ता आणि डॉ शुक्ला यांना वाटतंय मात्र अशाप्रकारे चाललेला वाद लवकरात लवकर सुटावा अशीच अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.. अध्यक्षपदी नेमकं कोण हा प्रश्न शांततेने बसून सोडवा यावर डॉ रामजी शुक्ला ठाम आहेत त्यामुळे पुढे महारोगी सेवा समितीतीत घुसखोरी आणि मगन संग्रहालयाच्या अध्यक्षपदावरून उदभवलेला वाद सुटेल का  
आणि अध्यक्षपदी नेमकं कोण याचं उत्तर मिळेल का असाच प्रश्न आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :