Viral News : मानव 150 वर्षांहून अधिक काळापासून एलियन्सशी संपर्क प्रयत्न करत आहे. खूपच कमी लोकांना याबाबत माहिती असेल. आता, एलियन्स सोबत संपर्क साधण्यासाठी शास्त्रज्ञांकडून नवीन प्रयत्न सुरु आहे. यासाठी शास्त्रज्ञांची एक नवी कल्पना आहे. शास्त्रज्ञ नग्न मानवांच्या छायाचित्रांच्या आधारे एलियन्सशी संपर्क करण्याच्या विचारात आहेत. सायंटिफिक अमेरिकनच्या एका अहवालानुसार, नासाच्या शास्त्रज्ञांच्या गटाने एक नवीन संदेश विकसित केला आहे जो आकाशगंगेमध्ये अस्तित्वात असलेल्या बुद्धिमान एलियनपर्यंत पोहोचू शकतो. या संदेशामध्ये दोन मानवी छायाचित्रे आहेत. एलियन्सना आकर्षित करण्याची शास्त्रज्ञांची ही नवी कल्पना आहे.


बीकन इन द गॅलेक्सी (BITG) नावाची नवीन स्पेस-बाउंड नोट NASA च्या जेट प्रोपल्शन प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञ जोनाथन जियांग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तयार केली होती, ज्यांनी प्रीप्रिंट साइटवरील अभ्यासात त्यांची प्रेरणा आणि कार्यपद्धती प्रकाशित केली होती. संभाव्य एलियन्सना आकर्षित करण्यासाठी आणि संवादाला प्रोत्साहन देण्यासाठी पृथ्वीच्या वातावरणातून दोन नग्न मानवाचे कार्टून पाठवून विश्वातील इतर जीवसृष्टीशी संपर्क साधण्याची आशा शास्त्रज्ञांना आहे.






 


प्रोजेक्टमध्ये गुरुत्वाकर्षण आणि डीएनएचे वर्णन देखील समाविष्ट आहे. तसेच नग्न मानव नर आणि मादीच्या पिक्सिलेटेड कार्टून आहे. शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी या प्रतिमा निवडल्याचे कारण म्हणजे परदेशी प्रजातींशी संवाद साधण्यासाठी भाषा मूळ आव्हान ठरु शकते. कारण त्यांची भाषा मानवांच्या भाषेपेक्षा पूर्णपणे वेगळी असू शकते.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha