Viral Video : सध्या सोशल मीडियावर पाळीव प्राण्यांची क्रेझ पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर पाळीव प्राण्यांचे मजेदार व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. नेटकरी त्यांचा बहुतेक वेळ पाळीव प्राण्यांचे मनोरंजक व्हिडीओ पाहण्यात घालवतात. पाळीव प्राण्यांमध्ये कुत्र्याच्या मजेदार व्हिडीओंना सर्वाधिक पसंती मिळते.


अलीकडेच एका कुत्र्याच्या गोंडस व्हिडीओने सोशल मीडियावर सर्वांनाच वेड लावले आहे. व्हिडीओमध्ये एक कुत्रा खाऊ मिळण्यासाठी क्यूट डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कुणालाही आनंद होईल. कुत्र्याला बिस्किट या डान्सचे बक्षीसही म्हणून मिळते. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये कुत्रा मालकाऐवजी शेजाऱ्यांकडे खाऊ मागताना दिसत आहे.






 


सोशल मीडियावर समोर आलेला हा व्हिडीओ एका इंस्टाग्राम पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये, मॅक्सिमस नावाचा कुत्रा शेजारच्या घरासमोर पोहोचून जोरात भुंकताना, घरातील मालकीणीला हाक मारताना आणि तिला प्रभावित करण्यासाठी एक क्यूट डान्स करताना दिसत आहे.


व्हिडीओच्या शेवटी शेजारील घरातील मालक बाहेर येतो आणि दार उघडून मॅक्सिमसला घरात घेताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नेटकरी या व्हिडीओवर सुंदर प्रतिक्रिया देत आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha