Maharashtra Breaking News LIVE Updates: नक्षलवाद्यांना पोलिसांचा दणका; नक्षली कमांडर मिलिंद तेलतुंबडे चकमकीत ठार

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

abp majha web team Last Updated: 13 Nov 2021 08:49 PM
नक्षलवाद्यांना पोलिसांचा दणका; नक्षली कमांडर मिलिंद तेलतुंबडे चकमकीत ठार झाल्याचे वृत्त

गडचिरोलीत झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांना पोलिसांनी मोठा धक्का दिला आहे. देशातील प्रमुख नक्षली कमांडर असलेला मिलिंद तेलतुंबडे चकमकीत ठार झाल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी अद्याप याला अधिकृत दुजोरा दिला नाही. 

वाढत्या प्रदूषणामुळे दिल्लीत एक आठवडा शाळा बंद, कंपन्यांसाठी वर्क फ्रॉम होम

वाढत्या प्रदूषणामुळे दिल्लीत तातडीच्या उपाय योजना जाहीर


दिल्लीत शाळा सोमवारपासून एक आठवड्यासाठी बंद राहणार..


दिल्ली सरकारची सर्व कार्यालयं एक आठवड्यांसाठी पूर्णपणे वर्क फ्रॉम होम


खाजगी कार्यालयांसाठी ही आवाहन करणारी नियमावली जाहीर


14 ते 17 चार दिवस दिल्लीतली बांधकामाची कामेही बंद

गडचिरोलीत सहा नक्षलवाद्यांना कंठस्नान; तीन पोलीस जखमी

गडचिरोली: आज सकाळी पोलीस नक्षल्यात मोठी चकमक झाली. या भीषण चकमकीत पोलिसांनी 6 नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळाले आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा आकडा वाढण्याची शक्यता आहे तर चकमकी  दरम्यान गडचिरोली पोलिसांचे तीन जवान देखील जखमी झालेत. 

सचिन वाझेच्या पोलिस कोठडीत वाढ

वसूलीप्रकरणी अटकेत असणार्या सचिन वाझे याच्या पोलिस कोठडीमध्ये 15 नोव्हेंबरपर्यंत वाढ करम्यात आली आहे. 





संतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता म्हणून डॉ सुरेंद्र गवार्ले यांची नियुक्ती

वतमाळ : वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता म्हणून डॉ सुरेंद्र गवार्ले यांची नियुक्ती. ते यवतमाळ मेडिकल कॉलेज मध्ये ENT विभाग प्रमुख आहेत. येथील MBBS ला शिकणारे डॉ अशोक पाल यांच्या हत्या नंतर आंदोलन कर्त्या विद्यार्थ्यांनी तत्कालीन अधिष्ठाता डॉ मिलिंद कांबळे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती.  त्यानंतर डॉ मिलिंद कांबळे यांनी अधिष्ठाता पदाचा राजीनामा दिला होता. आता त्यांच्या जागेवर अधिष्ठाता म्हणून डॉ सुरेंद्र गवार्ले यांची नियुक्ती

चकमकीत 4 नक्षली ठार

गडचिरोली : पोलीस नक्षल्यात चकमक, पोलीस नक्षलवादी यांच्यात भीषण चकमक 3 किंव्हा 4 नक्षली ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मृताचा आकडा वाढण्याची शक्यता.. धानोरा तालुक्यातील मरदिनटोलाच्या जंगलात सकाळी सुरु झालेली चकमक अजुनही सुरु आल्याची माहिती.. 

एसटी संपाचा आज सातवा दिवस, राजकीय घडामोडींना वेग

एसटी संपाचा आज सातवा दिवस आहे. या संपावर तोडगा काढण्यासाठी राजकीय घडामोडींना वेग आलाय. काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यात भेटीत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर सव्वा तास चर्चा झाली. दुसरीकडे शरद पवार आज मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांशी चर्चा करुन एसटी संपावर आज तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जातेय. 

नागपुरातील निवासी डॉक्टरांनी आजपासून संपावर जाण्याचा निर्णय

नागपुरातील निवासी डॉक्टरांनी आजपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यवतमाळ वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या अशोक पाल याची दोन दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली. या हत्येच्या निषेधार्थ नागपुरातील निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. निवासी डॉक्टरांसह एमबीबीएसचे विद्यार्थी देखील या संपात सहभागी होणार आहेत. अशोक पाल यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची भरपाई देण्यात यावी, मारेकऱ्यांना बारा तासाच अटक करावी आणि आरोग्यसेवकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षकाची नियुक्ती करावी अशी नागपुरातल्या निवासी डॉक्टरांची मागणी आहे.

मुंबई लसीकरणात आज महत्त्वाचा टप्पा गाठणार, पहिल्या डोसचं 100 टक्के लसीकरण पूर्णत्वास

मुंबई लसीकरणात आज महत्त्वाचा टप्पा गाठणार आहे. मुंबईत आज पहिल्या डोसचं 100 टक्के लसीकरण पूर्णत्वास जाणार आहे. कालपर्यंत मुंबईत 99.99 टक्के लसीकरण पूर्ण झालं होतं. 100 टक्के लसीकरणासाठी केवळ 860 जणांचं लसीकरण बाकी आहे. त्यामुळे आज सकाळी काही तासांतच मुंबईत पहिल्या डोसचं 100 टक्के लसीकरण होईल. मुंबईच्या आजूबाजूच्या शहरांतील नागरिकांनीही मुंबईत डोस घेतला असल्यानं मुंबईतील काही नागरिक अजूनही पहिल्या डोसपासून वंचित आहेत.  असं असलं तरी दिल्ली, बंगळुरू, चेन्नई या महानगरांच्या तुलनेत मुंबईनं लसीकरणात आघाडी घेतली आहे. तर मुंबईत 65 टक्के नागरिकांनी लशीचे दोन्ही डोस घेतलेत.

पार्श्वभूमी

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चा परिवहन मंत्री अनिल परबांच्या घरावर धडकणार


ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सातवा दिवस आहे. विलीनीकरणाच्या मागणीसाठी ठाम असणाऱ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन आणखी तीव्र होणार आहे. आंदोलक कर्मचारी आज परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर धडकरणार आहेत. ((संपकरी परिवहन मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढून संताप व्यक्त करणार आहेत.)) काल रात्री विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आझाद मैदानात उपस्थित राहून आंदोलकांना पाठिंबा दर्शवला. दुसरीकडे वारंवार आवाहन करुनही कर्मचारी कामावर येत नाहीय. त्यामुळं आता हा संप मोडीत काढण्याची तयारी राज्य सरकारनं सुरु केली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आगारातून खासगी बस, शालेय बस आणि वडाप सोडल्या जात आहेत. ((विविध डेपोतून शिवशाही बस मार्गस्थ झाल्यात. या बसेसना पोलीस संरक्षणही देण्यात आलं. तसंच खासगी बसचालकांची मदत घेऊनही एसटी सुरु करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ))दरम्यान, अनेक कर्मचारी कामावर रुजू होण्यास तयार असल्याचा दावा एसटी महामंडळाने केला आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना संरक्षण दिले जाईल, असे आश्वासनही परिवहन मंत्र्यांनी दिलंय.  


मुंबईतील 'या' प्रभागांत पाणीकपात; दुरुस्तीच्या कामामुळे महापालिकेचा निर्णय


Water cut in Mumbai : मुंबईतील काही भागांमध्ये पाणीकपात करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. आज, १२ नोव्हेंबर २०२१ रोजी पवई येथे वैतरणा (२४०० मिली मीटर) आणि उर्ध्व वैतरणा (२७५० मिली मीटर) यामधील ९०० मिली मीटर व्यासाच्या छेद जलजोडणीवर अकस्मात गळती उद्भवली आहे. महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे गळती दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आलेले आहे. या दुरुस्तीच्या कामामुळे मलबार हिल, वरळी आणि पाली येथील जलाशयाद्वारे व माहिम येथून होणाऱ्या थेट पाणीपुरवठ्यावर  १२ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११ ते दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक १३ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११ या दरम्यान परिणाम होणार आहे. या कालावधी दरम्यान नागरिकांनी पाण्याचा वापर जपून व काळजीपूर्वक करावा, असे आवाहनही मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे करण्यात आले आहे. 


प्रवाशांना मोठा दिलासा; रेल्वे पुन्हा सामान्य वेळापत्रकानुसार धावणार, दरही पूर्ववत होणार


नवी दिल्ली:  रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांना मोठा दिलासा देणारी बातमी दिली आहे. कोरोना महासाथीच्या काळात नेहमीच्या एक्स्प्रेस/मेल ट्रेन स्पेशल ट्रेनच्या दरात (Covid special train) चालवण्यात येत होत्या. आता मात्र, रेल्वे वाहतूक पूर्वीप्रमाणे सामान्य वेळापत्रकानुसार (normal fare for trains) चालवण्यात येणार आहे. तिकिट दरही पूर्ववत करण्यात आले आहे. तब्बल २० महिन्यानंतर रेल्वे पूर्वीप्रमाणे धावणार असल्याने लाखो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. रेल्वेचा हा निर्णय देशातून कोविडचे संकट कमी होत असल्याचं लक्षण असल्याचे म्हटले जात आहे. 


रेल्वे मंत्रालयाच्यावतीने एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या परिपत्रकानुसार, येत्या काही दिवसांमध्ये हा निर्णय लागू करण्यात येणार आहे. आगामी काही दिवसांमध्ये 1700 हून ट्रेन पूर्वीप्रमाणे धावणार आहेत. मात्र, रेल्वे प्रवास करताना कोविड-19 चे निर्बंध आणि प्रतिबंधात्मक उपाय योजना लागू असणार आहेत. तिकिट दर कमी झाल्यामुळे आणि रेल्वेसेवा पूर्ववत झाल्यामुळे प्रवाशी संख्या वाढण्याची शक्यता आहे. 


उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंडमध्ये कोणाची येणार सत्ता?


ABP C-Voter Survey : वर्ष 2022 च्या सुरुवातीला उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पाडणार आहेत. या पाच राज्यातील निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. भाजपपासून काँग्रेस, आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, एमआयएम आदींनी या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्याशिवाय प्रादेशिक पक्षांनीदेखील निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. एबीपी न्यूजने सी-वोटरसह या पाच राज्यातील जनतेच्या कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 


कोणत्या राज्यांमध्ये सत्ता कायम राहणार, कोणत्या राज्यात सत्तांतर होणा, आदी प्रश्नांबाबत जनतेच्या मनात काय आहे, हे या सर्वेक्षणाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.