Maharashtra Breaking News LIVE Updates : शुक्रवारी मुख्यमंत्री ठाकरेंवर मान आणि पाठीच्या कण्याची शस्त्रक्रिया, आज रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

abp majha web team Last Updated: 10 Nov 2021 05:34 PM
एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच, आतापर्यंत 918 जणांवर निलंबनाची कारवाई

एसटी महामंडळाकडून काल 376 आज 542 अशी आतापर्यंत  918 जणावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

शुक्रवारी मुख्यमंत्री ठाकरेंवर मान आणि पाठीच्या कण्याची शस्त्रक्रिया, आज रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शुक्रवारी मान आणि पाठीच्या कण्याची शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्यांना आजच रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे. 


 


 

नवाब मलिकांच्या विरोधात भाजप युवा मोर्चाचे मंत्रालयाबाहेर आंदोलन सुरु

गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिकांनी भाजप नेते आणि एनसीबीविरोधात आरोप करायला सुरुवात केली आहे. त्याच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाच्या वतीनं मंत्रालयाबाहेर आंदोलन सुरु केलं आहे. 

Maharashtra ST Workers Strike : सर्व आंदोलक आझाद मैदानात तासाभरात पोहचतील

सर्व आंदोलक आझाद मैदानात तासाभरात पोहचतील . किरीट सोमय्या आणि गोपीचंद पडळकर मंत्रालयात निघत आहेत

फडणवीस सरकारच्या काळातील ऊर्जा विभागातील 6500 कोटींच्या कामांची चौकशी करण्याचे उर्जामंत्री नितीन राऊतांचे आदेश

फडणवीस सरकारच्या काळातील ऊर्जा विभागातील ६५०० कोटींच्या कामांची चौकशी करण्याचे उर्जामंत्री नितीन राऊतांचे आदेश


२०१४ ते २०१९ या काळात पायाभूत सुविधांकरता करता ६५०० कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली होती...


मात्र, पुन्हा २०२० मध्ये विवीध ठिकाणच्या आमदारांकडून आलेल्या मागणीनुसार पुन्हा २३०० कोटींची कामे करावी लागत आहेत...


२०१४ ते २०१९ या काळात झालेल्या पायाभूत सुविधा विकासांच्या कामांची तपासणी करण्यासाठी चौकशी समिती नेमण्याचा निर्णय ऊर्जा विभागाने घेतला आहे.


 आधीच ६५००   कोटी रुपयांची कामे झालेली असताना पुन्हा त्याच पद्धतीची कामे का येत आहेत, याची चाचपणी करण्याचा आदेश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी अधिकाऱ्यांना दिला...


जलयुक्त शिवार योजनेची चौकशी सुरू असताना फडणवीस सरकारच्या काळातील विद्युत यंत्रणेच्या ६५०० कोटी रुपयांच्या कामांची चौकशी आता लागल्याने सरकार आणि भाजप यांच्यातील संघर्ष पेटणार आहे...

पहिल्या टप्प्यातील 2 हजार 88 प्राध्यापक आणि प्राचार्यांच्या भरतीला हिरवा कंदील

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली प्राध्यापकांच्या पहिल्या टप्यातील भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. पहिल्या टप्यात 2088 प्राध्यापक भरतीला आणि सर्व प्राचार्य पद भरण्यास  मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील  महाविद्यालयातील रिक्त पदे भरण्यात यावे यासाठी मागील काही वर्षांपासून प्राध्यापक संघटना मागणी करत होत्या. अनेकदा प्राध्यापक भरती व्हावी यासाठी संघटनांकडून आंदोलने देखील करण्यात आली. त्यानंतर आता टप्याटप्याने ही रिक्त पदे भरली जाणार आहेत. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटरवरून प्राध्यापक भरती बाबत माहिती दिली आहे.


राज्यातील विद्यापीठे आणि अनेक महाविद्यालयांमध्ये मोठ्या संख्येने विविध विषयाची सहायक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगानेही (UGC)वेळोवेळी सूचना याबाबत केल्या होत्या. मात्र कोरोना आणि त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पदभरतीची प्रक्रियाही लांबणीवर पडली होती. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी मान्यता मिळत आहे. सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा, 376 कर्मचारी निलंबित, दुपारी परिवहन मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक

जिथे रस्ता तिथे एसटी अशी ओळख असणाऱ्या लालपरीला मागील काही दिवसांपासून ब्रेक लागलाय. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या सेवेत सामावून घ्यावं या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी हे काम बंद आंदोलन सुरु केलं आहे. कर्मचारी संपावर ठाम असल्यानं आज तिसऱ्या  दिवशीही एसटी (ST Workers Strike) रस्त्यावर येण्याची शक्यता नाही. याऊलट संप अधिक चिघळणार असल्याचं दिसतयं. राज्य सरकारने आता थेट एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्यभरात आत्तापर्यंत 376 एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. लातूर, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, नंदुरबार जिल्ह्यात निलंबनाच्या कारवाया करण्यात आल्या आहेत.

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी एबीपी माझा लाईव्हवर...

एबीपी माझा लाईव्ह पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा : .


 


पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News, Breaking News LIVE Updates, November 10 2021 : काल देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी आरोप केल्यानंतर नवाब मलिकांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला होता. यावर आज सकाळी 10 वाजता नवाब मलिक (Nawab Malik) पत्रकार परिषद घेऊन उत्तर देणार आहेत. काल फडणवीस यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर मलिक यांनी म्हटलं होतं की, उद्या सकाळी फडणवीसांचं अंडरवर्ल्डशी असलेलं नातं उघड करणार आहे. तसेच, फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना अंडरवर्ल्डच्या साथीनं राज्य वेठीस धरलं होतं. असंही नवाब मलिकांनी म्हटलं आहे. फडणवीस माझं नाव खराब करण्याचं काम करत आहेत. मागेही पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी माझ्या जावयाच्या घरात गांजा सापडला होता. याप्रकरणी माझी मुलगी तुम्हाला नोटीस पाठवत आहे, असंही मलिकांनी सांगितलं होता. त्यामुळं नवाब मलिक आज नेमका काय गौप्यस्फोट करणार याकडे लक्ष लागून आहे. 


अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक बोलताना काल म्हणाले की, "देवेंद्रजी तुम्ही थेट बॉम्ब ब्लास्ट, दाऊद, अंडरवर्ल्डशी जोडून माझी प्रतिमा मलीन करण्याचं नाव करत आहात. काही दिवसांपूर्वी तुम्ही पत्रकार परिषदेत बोलताना नवाब मलिकांच्या जावयाच्या घरी गांजा सापडला असं म्हणाला होतात. याप्रकरणी माझी मुलगी उद्या तुम्हाला नोटीस पाठवणार आहे. आरोप लावून तुम्ही माफी मागणार नसाल तर आम्ही आशा करतो की, या लढाईत तुम्ही माफी मागणार नाही, लढाई सुरुच ठेवू." तसेच पुढे बोलताना नवाब मलिक म्हणाले की, "ही फाईल एनआयएकडे द्या किंवा सीबीआयकडे द्या, मी कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यासाठी तयार आहे. जे आज मी बोलतोय, तो सगळा घटनाक्रम जसंच्या तसं घडला आहे. एनआयए असो किंवा सीबीआय चौकशी करो. त्यांना वाटेल नवाब मलिक घाबरणार. पण नवाब मलिक घाबरणार नाही."


उद्या सकाळी दहापर्यंत थांबा, फडणवीसांच्या अंडरवर्ल्ड संबंधाचा पर्दाफाश करणार : नवाब मलिक 


देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचे अंडरवर्ल्डसोबत कनेक्शन होते. याचा खुलासा उद्या सकाळी मी करणार असल्याचं अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली होती की दिवाळीनंतर फटाके फोडू, पण मला वाटतं फटाके भिजले आणि वाया गेले. नवाब मलिकांनी बॉम्बस्फोटातील आरोपींकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप फडणवीसांनी केला होता. मात्र देवेंद्रजी 1999 ला तुम्ही या शहरात पहिल्यांदा आमदार म्हणून आलात. यापूर्वी मुंडे साहेबांनी अनेकांचे तार दाऊदशी जोडले. मात्र 62 वर्षांच्या कार्यकाळात किंवा 26 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत असे आरोप कोणी सिद्ध करु शकले नाहीत. मी कवडीमोल दराने जमीन माफियाकडून घेतल्याचा आरोप फडणवीसांनी केला. मात्र फडणवीसांना चुकीची माहिती कोणीतरी देतोय.. तुम्ही सांगितलं असतं तर मीच तुम्हाला कागदपत्र दिले असते. अंडरवर्ल्डचा खेळ जो सुरु केला आहे, आज मी बोलणार नाही, मात्र उद्या सकाळी 10 वाजता देवेंद्र फडणवीसांचा अंडरवर्ल्डशी काय संबंध आणि मुख्यमंत्री असताना सर्व शहराला ओलीस ठेवलं होतं त्याचाा पर्दाफाश करणार, असं मलिक म्हणाले.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.