Maharashtra Breaking News LIVE Updates : कसई दोडामार्ग नगरपंचायतमध्ये शिवसेनेचा धुव्वा, तालुका कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 19 Jan 2022 08:48 PM
कसई दोडामार्ग नगरपंचायतमध्ये शिवसेनेचा धुव्वा, तालुका कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कसई दोडामार्ग नगरपंचायत निवडणूक निकालाचे पडसाद पडले असून दोडामार्ग शिवसेना तालुका कार्यकारिणी पूर्णपणे बरखास्त करण्यात आली आहे. जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी कार्यकारिणी बरखास्त केल्याची माहिती दिलीय. जिल्ह्यातील इतर नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेला चांगले यश मात्र कसई दोडामार्ग नगरपंचायतमध्ये मात्र शिवसेनेचा धुव्वा उडाला आहे. कसई दोडामार्ग नगरपंचायत मधील पराभवाची शिवसेनेकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. शिवसेनेला कसई दोडामार्ग नगरपंचायतमध्ये अवघ्या दोन जागी विजय मिळाला आहे. याचा तालुका कार्यकारिणीवर ठपका ठेवत तालुका प्रमुखांसह पूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. 

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर रेंजमधील चेनाजवळ तीन वर्षीय नर बिबट्या मृतावस्थेत आढळला

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर रेंजमधील चेनाजवळ तीन वर्षीय नर बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. हा सी-40 बिबट्या उंचीवरुन पडल्याने त्याचे यकृत फाटून अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलंय. यासंबंधीचा अधिक तपास सुरु असल्याचं वनविभागाकडून सांगण्यात आलंय


 

राज्यातील 3 जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये 100 कोटींचा भष्ट्राचार, किरीट सोमय्यांचा राज्य सरकारवर आरोप

राज्यातील तीन जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये तब्बल 100 कोटी रुपयांचा भष्ट्राचार झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. उद्धव ठाकरे पीएमआरडीएचे चेअरमन आहेत, त्यांच्यामुळे लाईफ लाईन हॉस्पिटल सर्व्हिसेस मॅनेजमेंटला जम्बो कोविड सेंटरच काम देण्यात आलं. असंही ते म्हणाले.

मुंबई कॉंग्रेसचा उद्या इगतपुरी येथे कार्यकर्ता मेळावा

मुंबई कॉंग्रेसचा उद्या इगतपुरी येथे कार्यकर्ता मेळावा आहे. महाराष्ट्र कॉंग्रेस प्रभारी एच.के पाटील त्याकरता येणार आहेत

आठवडी बाजार बंद केला म्हणून भाजीवाले संतप्त, भाज्या फेकल्या रस्त्यावर

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बीड जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. याच निर्णयाच्या विरोधात आज माजलगावमध्ये संतप्त झालेल्या भाजी विक्रेत्यांनी विक्रीसाठी आणलेल्या भाजा रस्त्यावर फेकून दिल्या.

राज्य सरकारकडून ओबीसी समाजावर अन्याय- चंद्रशेखर बावनकुळे

राज्यातील नगरपंचायतीच्या निवडणूकानंतर भाजप नेते चंद्रशेख बावनकुळे यांनी राज्य सरकारला ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यांवरुन पुन्हा धारेवर धरले. ते म्हणाले 'आज राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात मान्य केले की, इम्पिरिकल डेटा आमच्याकडे आहे आम्ही तो आयोगाला पाठवला आहे. त्यामुळे यापूर्वी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात डेटा आमच्याकडे आहे हे का मान्य का केले नव्हते? याचा अर्थ दोन वर्षे सरकारने ओबीसी समाजाची फसवणूक केली आहे.


 

राज्य सरकारकडून ओबीसी समाजावर अन्याय- चंद्रशेखर बावनकुळे

राज्यातील नगरपंचायतीच्या निवडणूकानंतर भाजप नेते चंद्रशेख बावनकुळे यांनी राज्य सरकारला ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यांवरुन पुन्हा धारेवर धरले. ते म्हणाले 'आज राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात मान्य केले की, इम्पिरिकल डेटा आमच्याकडे आहे आम्ही तो आयोगाला पाठवला आहे. त्यामुळे यापूर्वी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात डेटा आमच्याकडे आहे हे का मान्य का केले नव्हते? याचा अर्थ दोन वर्षे सरकारने ओबीसी समाजाची फसवणूक केली आहे.


 

शाळा सुरु करण्याचा निर्णय आज होण्याची शक्यता

शाळा सुरु करण्याचा निर्णय आज होणार असल्याची शक्यता आहे. शाळा सुरु करण्याच्या संदर्भात शालेय शिक्षण विभागाचा  प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेला आहे. येत्या सोमवार पासुन शाळा सुरु करण्याचा शालेय शिक्षण विभागाने प्रस्ताव दिला आहे. शाळा सुरु करण्याच्या संदर्भात स्थानिक प्रशासनाला अधिकार देणार आहे.

अंबरनाथ बदलापूर पाईप लाईन रोड वर भीषण अपघात

अंबरनाथ बदलापूर पाईप लाईन रोड वर भीषण अपघात झाला आहे. केमिकलने भरकेल्या ट्रकने पेट घेतला आहे. दरम्यान दोघांचा मृत्यू झाला आहे. 

मार्चमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण लागू होणार? राज्य आयोग घेणार निर्णय

ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टात महत्त्वाची घडामोड घडली आहे. मार्चमध्ये होणाऱ्या स्थानिक निवडणुकांसाठी ओबीसी आरक्षण लागू होणार की नाही याचा फैसला आता राज्याने नेमलेल्या आयोग घेणार आहे. महाराष्ट्र सरकारकडे उपलब्ध असलेला डेटा त्यांनी आयोगाला द्यावा, आयोग दोन आठवड्यात त्या डेटा वर आरक्षण तात्पुरता देता येईल की नाही सांगू शकतं. त्यामुळे आगामी स्थानिक निवडणुकांसाठी ओबीसी आरक्षण लागू होणार की नाही हे आयोगाच्या निर्णयावर आणि दोन आठवड्यात ठरणार आहे. 

मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांचं मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या बंगल्यावर आंदोलन

मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांचं मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या बंगल्यावर आंदोलन, राजेंद्र कोंढरे, धनंजय जाधव, अंकुश कदम यांच्याकडून ठिय्या आंदोलनाला सुरवात 

4 ते 6 फेब्रुवारीदरम्यान मध्य रेल्वेवर तब्बल 72 तासांचा मेगाब्लॉक

मध्य रेल्वेवरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी... 4 ते 6 फेब्रुवारीदरम्यान मध्य रेल्वेवर तब्बल 72 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेल, एक्स्प्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्ग उपलब्ध होतानाच लोकलचे वेळापत्रक सुरळीत होण्यासाठी ठाणे ते दिवा या पाचव्या, सहाव्या मार्गाला गती दिली जातेय. पाचवी, सहावी मार्गिकी 6 फेब्रुवारीपासून खुली होणार असल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाने दिलीय. पाचवी आणि सहावी मार्गिका खुली झाल्यानंतर मेल, एक्स्प्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होईल आणि लोकलचे वेळापत्रकही सुधारण्यास मदत होणार आहे.  

विरार फाटा येथे गॅरेजच्या 2 दुकानाला भीषण आग

विरार  : विरार फाटा येथे गॅरेजच्या 2 दुकानाला भीषण आग लागली आहे.   या आगीत एक रिक्षा आणि एक टेम्पो ही जळाला आहे. ही आग कशामुळे लागली याचे कारण स्पष्ट झाले नाही.काल रात्री दहाच्या सुमारास ही आग लागली , यात कोणातीही जीवित हानी झाली नाही मात्र दुकान पूर्णपणे जाळून खाक झाले आहेत.

भीमा कोरेगावमध्ये झालेली लढाई ही लढाई नसून चकमक असल्याचा दावा एका पुस्तकात करण्यात आलाय

भीमा कोरेगावमध्ये झालेली लढाई ही लढाई नसून चकमक असल्याचा दावा एका पुस्तकात केल्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. युवा लेखक रोहन माळवदकर यांनी लिहिलेल्या 1 जानेवारी 1818 कोरेगाव भीमा लढाईचं वास्तव' या पुस्तकाचं हा दावा करण्यात आला आहे.

मुंबईतील नेव्हल डॉकमध्ये INS रणवीर युद्धनौकेवर स्फोट, 3 जवान शहीद तर 11 जण गंभीर जखमी

मुंबईत नौदलाच्या आयएनएस रणवीर युद्धनौकेवर स्फोट झाला असल्याचं वृत्त आहे. या स्फोटात नौदलाचे तीन जवान शहीद झालेत तर 11 जण जखमी असल्याची माहिती मिळतेय. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या स्फोटाचं कारण अजूनही समजू शकलेलं नाही. मुंबईतल्या नेव्हल डॉकयार्डमध्ये ही घटना घडली. आयएनएस रणवीरच्या आतील भागातल्या एका कंपार्टमेंटमध्ये हा स्फोट झाला. आयएनएस रणवीर ही नौका पूर्व नौदल कमांडच्या अखत्यारीत होती. पूर्व आणि पश्चिम नौदल कमांड यांच्यासाठी साहित्याची ने-आण करण्याची जबाबदारी या नौकेवरच्या कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आली होती. 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


INS Ranvir explosion : मुंबईत INS रणवीर युद्धनौकेवर स्फोट, तीन जवान शहीद


मुंबई : मुंबईत INS रणवीर युद्धनौकेवर स्फोट (INS Ranvir explosion)  झाल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत तीन जवान शहीद झाले आहेत.नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे आज INS रणवीरच्या अंतर्गत (इंटर्नल) कंपार्टमेंटमध्ये हा स्फोट झाला आहे. जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ प्रतिसाद देत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. कोणतीही मोठी भौतिक हानी झाल्याचे माहिती नसली तरी तीन नौदल जवान यामध्ये शहीद झाले आहेत.


या घटनेत दहा जवान जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी जवानांवर कोलाबा नेवी नगर येथील INHS अश्विनी येथे दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा तपास करण्यासाठी बोर्ड ऑफ इंक्वायरीचे आदेश दिले आहेत. 


INS रणवीर युद्धनौका नोव्हेंबर 2021 पासून पूर्व नौदल कमांडकडून क्रॉस कोस्ट ऑपरेशनवर तैनातीवर होती आणि लवकरच बेस पोर्टवर परत येणार होती. या युद्धनौकेवर नेमका कोणत्या कारणाने झाला याचा तपास करण्यासाठी चौकशी मंडळाला आदेश देण्यात आला आहे. 


मध्य रेल्वेकडून अनधिकृत घरं खाली करण्याच्या नोटिसा, मंत्री जितेंद्र आव्हाड, खासदार श्रीकांत शिंदे यांचा विरोध


मुंब्रा स्टेशनजवळ मध्य रेल्वेच्या ट्रॅक शेजारी राहणाऱ्या लोकांना नोटीस पाठवून 7 दिवसात घर खाली करण्याचे आदेश मध्य रेल्वेने दिले आहेत. त्याच्याच विरोधात स्थानिक आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज ट्विट केले आहे. या लोकांची पर्यायी व्यवस्था आधी करा मगच घरे खाली करा, अन्यथा आम्ही त्या लोकांसोबत उभे राहू, असा इशाराच आव्हाड यांनी मध्य रेल्वेला दिला आहे. 


दुसरीकडे खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील रावसाहेब दानवे यांना ट्वीट करून कल्याण, डोंबिवली आणि कळवा इथे आलेल्या नोटिशीबद्दल विचारणा केली आहे. यासंदर्भात स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाची एकत्रित बैठक लावावी अशी मागणी त्यांनी केली आहे. 


रेल्वने परवा या भागातील बिल्डिंग आणि चाळीतील घरांना नोटीस दिल्या आहेत. ज्या ठिकाणी ते राहतात ती मध्य रेल्वेची जागा असून, अनधिकृत पणे या लोकांनी वास्तव्य केले आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या ट्रॅकला धोका होऊ शकतोस असे नोटिशीमध्ये म्हटले आहे. 



याबाबत मध्य रेल्वेला विचारले असता, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसारच कारवाई करण्यात येत आहे. फक्त मुंब्राच नाही तर सीएसटी, तुर्भे, कुर्ला भागात देखील नोटीस देण्यात आल्या आहेत, मध्य रेल्वेने सांगितले आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या दाव्या प्रमाणे ही वस्ती गेल्या 70 वर्षांपासून तिथे आहे. मुंबईत देखील लाखो लोक रुळांच्या शेजारी राहतात. पण यांनाच नोटिसा का देण्यात आल्या, असा प्रश्न विचारण्यात आला आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.