Maharashtra Breaking News LIVE Updates: आरोग्य भरती आणि टीईटी पेपर फोडणारे शिक्षक निलंबित, आरोपी सध्या सायबर पोलिसांच्या ताब्यात

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 10 Jan 2022 06:51 PM
परभणीत 68 नवे कोरोनाबाधित

परभणी जिल्ह्यात 24 तासांत 68 नवे कोरोनाबाधित आढळले असून 6 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 272 रुग्णांवर उपचार सुरू आहे.

आरोग्य भरती आणि टीईटी पेपर फोडणारे शिक्षक निलंबित

आरोग्य भरती आणि टीईटी पेपर फोडण्यात थेट सहभाग असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांकडून अटकेची कारवाई झालेल्या प्रल्हाद नागरगोजे आणि विजय नागरगोजे या दोन्ही शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे.

अंबाजोगाईच्या कार्यकारी अभियंत्यांच्या तक्रारीची धनंजय मुंडे यांनी घेतली दखल

अंबाजोगाई सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कोकणे यांनी आपल्यावर बिलांवर सह्या करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याबाबत केलेल्या तक्रारीची जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दखल घेतली असून या प्रकरणी श्री कोकणे यांना पोलिसात तक्रार देण्याची सूचना केली आहे. 

700 मेट्रिक टन ऑक्सिजन गरज लागल्यास राज्यात लॉकडाऊन लागणार- मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे 

राज्यात सध्या 508 ऑक्सिजन लागत आहे. मात्र, ज्या दिवशी 700 मेट्रिक टन ऑक्सिजन लागेल, तेव्हा राज्यात लॉकडाऊन लावला जाईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी दिली. तसेच नागरिकांना तातडीनं लसीकरण करून घ्यावं, असंही त्यांनी आवाहन केलंय. 

औरंगाबादेत कोरोनामुळे 1980 लोकांचा मृत्यू, आर्थिक मदतीसाठी 5,340 अर्ज

औरंगाबाद मनपा अंतर्गत राहणाऱ्या लोकांचा कोरोनामुळे 1980लोकांचा मृत्यू  झाला आहे तर शासनाने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत जाहीर केल्यानंतर औरंगाबादमध्ये 5 हजार 340 नातेवाईकांनी मदतीसाठी अर्ज केले आहेत.  3660 लोकांनी औरंगाबादमध्ये मृत्यू झालेल्या लोकांपेक्षा अधिक अर्ज केले आहेत.

एसटी संपामुळं जनतेचंही नुकसान, प्रश्नांवर चर्चा होईलच पण एसटी सुरु झाली पाहिजे यावर बैठकीत एकमत - शरद पवार

#Breaking : एसटी संपामुळं जनतेचंही नुकसान, प्रश्नांवर चर्चा होईलच पण एसटी सुरु झाली पाहिजे यावर बैठकीत एकमत - शरद पवार 



ज्या कर्मचाऱ्यांवर आजवर कोणतीही कारवाई नाही, ते रुजू झाल्यास कारवाई होणार नाही- अनिल परब

#Breaking : ज्या कर्मचाऱ्यांवर आजवर कोणतीही कारवाई नाही, ते रुजू झाल्यास कारवाई होणार नाही- अनिल परब https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA

एसटी संप मागे घेण्याचं सर्व संघटनांच्या कृती समितीचं आवाहन

#BREAKING : शरद पवारांची शिष्टाई यशस्वी; एसटी संप मागे घेण्याचं सर्व संघटनांच्या कृती समितीचं आवाहन  

मुंबई एअरपोर्टवर मोठी दुर्घटना टळली

#BREAKING : मुंबई एअरपोर्टवर मोठी दुर्घटना टळली; एअर इंडियाच्या विमानाला पुशबॅक देणाऱ्या वाहनाने विमानाजवळच पेट घेतला, विमानामध्ये प्रवाशी असल्याची माहिती

अंबाबाई मंदिरात आता तासाला केवळ 400 भाविकांना दर्शन

अंबाबाई मंदिरात आता तासाला केवळ 400 भाविकांना दर्शन


कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने देवस्थान समितीचा निर्णय


याआधी मंदिरात तासाला 1200 भाविकांना प्रवेश दिला जात होता

महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेस पक्षाची स्वबळावर तयारी सुरु

महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेस पक्षाची स्वबळावर तयारी सुरु


अगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार?


प्रत्येक जिल्हा कमिटांना पत्र पाठवून इच्छुक उमेदवारांची यादी मागितली


तर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थित अनेक ठिकाणच्या आढावा बैठकांना सुरुवात


काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यानंतर अनेक दिवसांचा मित्रपक्ष असलेला राष्ट्रवादी पक्ष शिवसेना सोबत जाणार का?

कॅंटोनमेंट बोर्ड असलेल्या सर्व ठिकाणची टोलवसुली बंद, संरक्षण मंत्रालयाचा सर्वसामान्य वाहनधारकांना दिलासा देणारा निर्णय

#BREAKING : कॅंटोनमेंट बोर्ड असलेल्या सर्व ठिकाणची टोलवसुली बंद, संरक्षण मंत्रालयाचा सर्वसामान्य वाहनधारकांना दिलासा देणारा निर्णय 

अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभियेंसह शासकीय रूग्णालयाचे 30 कर्मचारी कोरोनाबाधित

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभियेंसह शासकीय रूग्णालयाचे 30 कर्मचारी कोरोनाबाधित.

शरद पवारांच्या उपस्थितीत एसटीच्या कृती समिती, संपकरी कर्मचारी व एसटी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत दुपारी साडे 12 वाजता सहयाद्रीवर बैठक

शरद पवारांच्या उपस्थितीत एसटीच्या कृती समिती, संपकरी कर्मचारी व एसटी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत दुपारी साडे 12 वाजता सहयाद्रीवर बैठक


बैठकीत पुन्हा एकदा एसटी महामंडळ विलीनिकरणाची मागणी समोर ठेवून त्याबाबत चर्चा होणार 


शरद पवारांसोबत परिवहन मंत्री अनिल परब सुद्धा या बैठकीस उपस्थित राहणार आहेत


मागील दोन महिन्यांपासून पगार वाढ देऊन सुद्धा कर्मचारी संपातून माघार घेण्यास तयार नसल्याने या बैठकीत नेमका यावर काय विचार , तोडगा काढला जातो या कडे लक्ष 


महत्वाचे म्हणजे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर ज्या कारवाई करण्यात आल्या त्या कारवाया मागे घेण्याबाबत कर्मचारी संघटनांकडून मागणी केली जाणार आहे

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीनंतर जल्लोष करणाऱ्या नेते आणि कार्यकर्त्यांच्या विरोधात अखेर गुन्हे दाखल

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीनंतर जल्लोष करणाऱ्या नेते आणि कार्यकर्त्यांच्या विरोधात अखेर गुन्हे दाखल


जयसिंगपूरमध्ये मिरवणूक काढल्याबद्दल आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह 400 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. 


शाहूवाडीमध्ये मिरवणूक काढून जेसीबीने गुलालाची उधळण केल्या प्रकरणी माजी खासदार उदयसिंहराव गायकवाड याचे नातू रणवीर गायकवाड यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल


जिल्ह्यात अन्य तालुक्यातील नेते आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल, पोलीस प्रशासन अखेर अलर्ट मोडवर.

कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यात घराच्या पाठीमागे गांजा पिकवला

कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यात घराच्या पाठीमागे गांजा पिकवला


दरेवाडीतील एकावर गुन्हा दाखल, एक लाखाचा गांजा जप्त


स्वतःसाठी आणि जनावरांच्या औषधासाठी वापरला गांजा


बंडा जाधव याला अटक, गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई

भायखळातील मुस्तफा बाग परिसरात आग, एल-2 लेव्हलची आग

मुंबईच्या भायखळा परिसरातील मुस्तफा बाजार परिसरात लाकडाच्या गोदामांना आग

मुंबईच्या भायखळा परिसरातील मुस्तफा बाजार परिसरात लाकडाच्या गोदामांना आग लागल्याने १७ ते १८ दुकाने खाक झाली आहेत. सकाळी ५:३० च्या सुमारास आग लागल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाच्या ८ ते १० गाड्या रवाना झाल्या होत्या. अग्निशमन दलाकडून लेव्हल-२ चा काॅल देण्यात आला होता. सध्याला आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असून कुलिंगचं काम सुरु आहे.

राज्यात 207 ओमायक्रॉनबाधितांची नोंद

 


राज्यात  रविवारी 207 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे.   आतापर्यंत 1216 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 454 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. 



 

राज्यात रविवारी तब्बल  44 हजार 388 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

 मुंबई : संपूर्ण जगासह देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं धाकधुक वाढवली आहे. सध्या राज्यातही कोरोनाच्या दैनंदिन आकड्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात रविवारी तब्बल  44 हजार 388 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 15 हजार 351 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागील  काही दिवसांपासून कोरोनाची संख्या ही हजाराच्या पुढेच येत आहे. रुगणसंख्येने 40 हजाराचा आकडा देखील ओलंडला आहे.  तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत.  

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


Booster Dose : आजपासून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर, गंभीर आजार असणाऱ्या वृद्धांना 'बूस्टर'


Maharashtra Vaccination : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काही दिवसांपूर्वी लसीकरण आणि बूस्टर डोस (Booster Dose) संबंधी महत्त्वाची घोषणा केली होती. त्यानुसार देशात 18 वर्षांखालील मुलांच्या लसीकरणाला (Vaccination) सुरुवात झाली आहे. तसेच आजपासून आरोग्य कर्मचारी तसेच फ्रंट लाइन वर्कर्स यांना बूस्टर डोस देण्यास देखील सुरुवात होत आहे. देशभरात सध्या लसीकरण वेगानं सुरु आहे. सर्वांना लसीचे दोन डोस दिले जात आहेत. मा त्या पार्श्वभूमीवर अनेक देशात बूस्टर डोस देण्यात येत आहे. आता भारतातही बूस्टर डोस देण्यात येणार आहे. आज, 10 जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर तसंच 60 वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस देण्यात येणार आहे. 


Maharashtra Corona Update : राज्यात कोरोना संसर्गवाढीचा आलेख वाढताच; रविवारी  44 हजार 388 रुग्णांची नोंद


 मुंबई : संपूर्ण जगासह देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं धाकधुक वाढवली आहे. सध्या राज्यातही कोरोनाच्या दैनंदिन आकड्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात आज तब्बल  44 हजार 388 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 15 हजार 351 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागील  काही दिवसांपासून कोरोनाची संख्या ही हजाराच्या पुढेच येत आहे. आज रुगणसंख्येने 40 हजाराचा आकडा देखील ओलंडला आहे.  तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत.  


Mumbai Police : मुंबई पोलिस दलामध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव; अनेक बड्या अधिकाऱ्यांसह कर्मचारी बाधित


Mumbai Police Corona Update : राज्यातील अनेक नेतेमंडळींना कोरोनानं गाठल्यानंतर मंत्रालयातील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची बाधा झाली. मुंबईकरांसाठी ऑन ड्यूटी 24 तास असलेल्या पोलिसांनाही आता मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली आहे.  मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असल्याचं समोर आलं आहे. मुंबई पोलीस दलातील एकूण 18 बड्या अधिकाऱ्यांना  कोरोनाची लागण झाली आहे. मुंबई पोलीस दलातील सह पोलीस आयुक्तांसोबत चार अप्पर पोलीस आयुक्त आणि तेरा पोलीस उपायुक्तांना कोरोनाची लागण झाली आहे. सोबतच मुंबई पोलिस दलातील कर्मचाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.