Maharashtra Breaking News LIVE Updates : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
पुणे : घरकाम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर मालकिणीने चप्पल आणि पर्स चोरल्याचा आरोप केल्याने दुखावलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मोहम्मदवाडी येथील कृष्णानगरमध्ये हा प्रकार घडला. कोंढवा पोलिस ठाण्यात या प्रकरणी घरमालक महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पायल बाबू चव्हाण (वय 17) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी पल्लवी रितेश अग्रवाल (वय 40) या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या आईने याप्रकरणी तक्रार दिली आहे.
भाजप नेत्या पंकजा मुडेंना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे.
15 ते 18 वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी केडीएमसी सज्ज
सोमवारपासून ऑनलाईन आणि ऑफलाईन सुविधा उपलब्ध
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीती 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण 3 जानेवारीपासून केले जाणार आहे. लसीकरणाच्या ऑनलाईन नोंदणीची सुविधा आजपासून सुरु करण्यात आल्याची माहीती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.. लाभार्थ्यांनी कोविन सिस्टीमवर स्वत:चा मोबील नंबर द्वारे अथवा त्यांच्या पालकांच्या मोबाईल नंबरवरुन लसीकरणाची नोंदणी करावी. ऑनलाईन सुविधा आजपासून सुरु केली आहे .लसीकरणासाठी ऑफलाईन सुविधाही उपलब्ध आहे. त्यासाठी लसीकरण केंद्रावर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे. लसीकरणासाठी येताना लाभार्थ्यांनी त्यांच्या स्वत:चा किंवा पालकांचा मोबाईल जवळ बाळगणे आवश्यक आहे.
महापालिकच्या रक्मीणीबाई, शास्त्रीनगर, सावळाराम क्रिडा संकुल, शिवशक्तीधाम,, आर्ट गॅलरी, मोहने लसीकरण केंद याठिकाणी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत लसीकरणाची सुविधा आहे. त्याठिकाणी कोव्हॅक्सीन दिली जाणार आहे. लसीकरणाला येताना जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड जवळ बाळगणे आवश्यक आहे. महापालिकेच्या लसीकरण केंद्रा व्यक्तीरीक्त विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळा, कॉलेज या ठिकाणाही कोविड लसीकरणाची सुविधा 3 जानेवारी रोजीपासून उपलब्ध होणार आहे. त्याठिकाणीही कोव्हॅक्सीनची लस दिली जाणार आहे. महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या पथकामार्फत शाळांमध्ये जाऊन लसीकरण करण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून कळविण्यात आले आहे.
सोलापूरच्या रेल्वे स्थानकाला अण्णाभाऊ साठेंचे नाव द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी रेल्वे स्तानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले. डेमोक्रॅटीक पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी स्टेशनच्या परिसरात हे आंदोलन केले. यावेळी आंदोलकांच्या हातात 'साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे रेल्वे स्थानक' आशयाचे बॅनर देखील होते. कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीनंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
तृतीयपंथीयांच्या वर्षातील मोठ्या यात्रेपैकी एक मानल्या जाणाऱ्या कासेगाव येथील यल्लम्मा यात्रेच्या दुसऱ्या दिवशी आज केवळ मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी सोहळा संपन्न झाला . वास्तविक आजचा दिवस हा यात्रेतील सर्वात महत्वाचा दिवस म्हणून मनाला जातो . देशभरातून आलेले हजारो जोग जोगतिणी आपल्या डोक्यावर देवीला घेऊन वाजत गाजत नगर प्रदक्षिणा करीत असतात . मात्र यंदा कोरोना संकटामुळे सलग तिसऱ्या वर्षी कासेगावची यात्रा रद्द केल्याने केवळ वर्षानुवर्षे चालत आलेल्या धार्मिक परंपरा प्रशासनाच्या नियमानुसार पाळण्यात येत आहेत , आज सकाळी केवळ मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत वाजत गाजत देवीची पालखी निघाली मात्र यावेळी कोणी येऊ नये अथवा दर्शन घेऊ नये यासाठी पोलिसांनी या मिरवणुकी भोवती दोरीचे कडे करून हा पालखी सोहळ्याची परिक्रमा पूर्ण केली .
अमरावती जिल्ह्यात आज 16 कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून रुग्णसंख्येत वाढ होऊ लागलीय. जिल्ह्यातील रुग्णांची एकूण संख्या 96 हजार 262 झालीय.
परदेशातून येणाऱ्या निधीवर केंद्र सरकारकडून चाप, अॉक्सफाम, जामियासह 12 हजार एनजीओंना झटका, एफसीआरए लायसन्सचं नूतनीकरण न केल्यानं केंद्रीय गृहमंत्रालयाचा निर्णय
परदेशातून येणाऱ्या निधीवर केंद्र सरकारकडून चाप, अॉक्सफाम, जामियासह 12 हजार एनजीओंना झटका, एफसीआरए लायसन्सचं नूतनीकरण न केल्यानं केंद्रीय गृहमंत्रालयाचा निर्णय
मुंबईकरांसाठी मोठी बातमी, 500 स्क्वे. फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या नगरविकास खात्याच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
नवीन वर्षाचे स्वागत सर्वच ठिकाणी जल्लोषात होत आहे. अशातच रक्तदानाचे महत्व समजावं यासाठी ठाण्यात रक्तानंद ग्रुपच्या वतीने दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी सुरु केलेल्या या चळवळीचे यंदाचे २३ वे वर्ष आहे. नवीन वर्षाचे स्वागत करत असतानाच 250 हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून आजचा दिवस सार्थकी लावला. या उपक्रमाला ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शुभेच्छा दिल्या.
पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील बैलगाडा शर्यत ही रद्द करण्यात आलीये. शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे संचालक रामकृष्ण टाकळकर यांनी तशी माहिती दिली.
पार्श्वभूमी
Corona Vaccination For Children : मुलांच्या लसीकरणासाठी आजपासून कोविन अॅपवर नोंदणी; 3 जानेवारीपासून लसीकरण
देशातील 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचं 3 जानेवारीपासून कोरोनाची लस दिली जाणार आहे. यासाठी आजपासून कोविन अॅपवर नोंदणी करता येणार आहे. नोंदणीसाठी इयत्ता दहावीचं ओळखपत्र देखील ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे. येत्या 3 जानेवारीपासून लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं गाईडलाईन्स जारी केली आहे. लहान मुलांना लस देण्यासाठीची सीरींज, नीडल कदाचित वेगळी असणार आहे. आज 1 जानेवारीपासून रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु होणार आहे. CoWIN पोर्टलवर आणखी एक स्लॉट जोडण्यात येणार आहे. तिथून मुलांना लसीकरणासाठी स्लॉट बुक करता येणार आहे. CoWIN पोर्टलवर आपला COVID-19 वॅक्सिन स्लॉट बुक करण्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या आयकार्डचा वापर करावा लागणार आहे. ज्या मुलांकडे आधार कार्ड नसेल त्यांच्या लसीकरणात अडथळा येऊ नये म्हणून आयकार्डचा वापर करण्याचा पर्याय केंद्राकडून अंमलात आणण्यात आला आहे. भारत सरकारनं 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी दोन लसींना मंजुरी दिली आहे. भारत बायोटेकची कोवॅक्सिन लसीचे दोन डोस आणि Zydus Cadila's ZyCoV-D चे तीन डोस या लसींमधून पर्याय निवडावा लागणार आहे.
मुलांच्या लसीकरणासाठी स्लॉट कसा बुक कराल? (How To Book COVID-19 Vaccine Slot For Children)
दौंड मधील व्यापाऱ्याला दोघा जणांनी संमोहित करून 1 लाख 16 हजार रुपये लुटले आहे. दौंड शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या विलास क्लॉथ स्टोअर मध्ये सॉक्स घेण्याच्या बहाण्याने दुकानात प्रवेश करत तिथे असलेल्या मॅनेजरला स्वतःच्या नोटा दाखवत संमोहित केले आणि त्यानंतर स्वतः गल्ल्यात हात घालून 1 लाख 16 हजार रुपये विलास क्लॉथ स्टोअरच्या मॅनेजर समोर काढून घेतले. हा सगळा धक्कादायक प्रकार दिवसाढवळ्या आणि CCTV कैद झाल्याने खळबळ उडाली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -