Maharashtra Breaking News LIVE Updates : निर्माता आणि दिग्दर्शक मधुर भंडारकरला कोरोनाची लागण, सोशल मीडियावरुन दिली माहिती

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 08 Jan 2022 02:49 PM
सांगलीत शॉर्ट सर्किटमुळे जवळपास 40 एकरावरचा ऊस जळून खाक

सांगलीच्या इनाम धामणी रोडवर शॉर्ट सर्किटमुळे तब्बल 35 ते 40 एकर ऊस जळून खाक झाला आहे.... घटनास्थळी अग्निशमन विभाग आग दाखल झाले असून गेल्या तीन तासापासून आग विझवण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरु आहे.. अद्यापही ही आग विजली नसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.. या आगीत ऊस शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेय.

धारावीत आज आढळले 147 नवे कोरोनाबाधित रुग्ण

आज धारावीत 147 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर दादरमध्ये आज 213 कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. माहिममध्ये 274 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. धारावीत सध्या 729 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा सुप्रीम कोर्टात 

मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा सुप्रीम कोर्टात 


विनोद पाटील यांच्याकडून सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल


याचिकेवर 12 जानेवारीला सुनावणी ची शक्यता


मराठा आरक्षण नाकारताना नवे प्रवर्ग निर्माण करण्याचा अधिकार राज्यांना नाही असंही सुप्रीम कोर्टाने निकालात म्हटलं होतं


पण लोकसभेत जो नवा कायदा झाला आहे त्या अनुषंगाने आता राज्यांनाही अधिकार दिले गेले


त्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या मराठा आरक्षण कायद्याचा पुन्हा विचार करण्याची मागणी आहे

सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर गाडगीळ कोरोना पॉझिटिव्ह

सांगली-:सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर गाडगीळ कोरोना पॉझिटिव्ह


आज सकाळी कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला


सध्या होम आयसोलेशनमध्ये उपचार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्री उशिरापर्यंत घेतला राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्री उशिरापर्यंत घेतला राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा


मुख्य सचिव यांच्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी बोलावली होती आढावा बैठक


या बैठकीला मुख्यमंत्री, मुख्य सचिव, मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार सिताराम कुंटे, टास्क फोर्स चे सदस्य आणि आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी उपस्थित होते


सध्या रुग्ण वाढत आहेत मात्र त्याचा ताण रुग्णालयावर पडत नसल्याने लगेच मोठा निर्णय घेण्याची गरज नसल्याची बैठकीत चर्चा


मात्र गर्दी टाळण्यासाठी काही निर्णय घेण्यावर एकमत


ही बैठक उशिरापर्यंत सुरू असल्याने नवीन नियमावली रात्री जाहीर झाली नाही


या चर्चेनंतर आज नवीन नियमावली जाहीर होणार

गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसंदर्भात आज दुपारी 3.30 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

#BREAKING : गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसंदर्भात आज दुपारी 3.30 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

मुंबईत 20 हजार बाधितांपैकी 17 हजार जणांमध्ये लक्षणे नाहीत; महापौर किशोरी पेडणेकर यांची माहिती

मुंबईत 20 हजार बाधितांपैकी 17 हजार जणांमध्ये लक्षणे नाहीत. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

मुंबई काँग्रेस प्रदेश कमिटीचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हांडोरे यांची जीवे मारण्याची सुपारी

मुंबई काँग्रेस प्रदेश कमिटीचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांची जीवे मारण्याची सुपारी. आगामी पालिका निवडणुकीत नगरसेवक पदाचे तिकिट मिळणार नाही या रागातून  दिली  सुपारी.


हांडोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार निलेश श्याम नानचे याच्यावर गुन्हा दाखल.


नानचेने  हांडोरी यांच्या हत्येचा कट रचून  त्यांना मारण्यासाठी सुपारी दिल्याचे चंद्रकांत हांडोरे यांनी तक्रारीत म्हटले आहे. ही सुपारी नानचे याने संदीप गोरे  नावाच्या व्यक्तीला दिल्याचे आरोप तक्रारीत केले आहेत


या प्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात चंद्रकांत हांडोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कलम ११५,१२०( ब), ५०६ (२) भा द वि अंतर्गत  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपचे नेते आणि आमदार गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण

भाजपचे नेते आणि आमदार गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण,  महाजन यांचा rt-pcr रिपोर्ट पॉझिटिव्ह, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जामनेर येथील घरी गिरीश महाजन होम क्वारंटाईन

कणकवलीहून कळसुलीकडे जाणाऱ्या एसटी बसवर कळसुली डोंगरी येथे अज्ञाताकडून दगडफेक

सिंधुदुर्ग : कणकवलीहून कळसुलीकडे जाणाऱ्या एसटी बसवर कळसुली डोंगरी येथे अज्ञाताने दगडफेक केली.


चालकाच्या हाताला किरकोळ दुखापत 


यावेळी बसमध्ये ३० विद्यार्थी होते,  सुदैवाने कोणत्याही प्रवाशांना दुखापत झालेली नाही. 


दगड बस चालकाच्या हाताला लागल्याने त्यांना किरकोळ दुखापत

राष्ट्रीय जल पुरस्कारांची घोषणा,  दापोली नगर पंचायत, बार्शीतल्या सुर्डी ग्रामपंचायतीचा सन्मान

केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी तिसऱ्या ‘राष्ट्रीय जल पुरस्कार-2020’ची घोषणा केली. या पुरस्कारांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगर पंचायतीने देशात दुसरा क्रमांक पटकाविला असून महाराष्ट्राला विविध श्रेणीत एकूण चार पुरस्कार जाहीर झाले आहेत.


जलसंपदा व्यवस्थापन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या प्रयत्नांची दखल घेण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी  केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने  विविध राज्ये, संस्था आणि व्यक्तींना  11  श्रेणींमध्ये एकूण 57 पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात महाराष्ट्राला चार पुरस्कार जाहीर झाले . यावेळी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाच्या सचिव विनी महाजन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 2018 पासून राष्ट्रीय जल पुरस्काराची सुरुवात झाली आहे.


दापोली नगर पंचायत आणि सुर्डी ग्रामपंचायत पुरस्कारांच्या मानकरी
सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक संस्थेच्या श्रेणीमध्ये देशातील सर्वोत्कृष्ट तीन संस्थांची निवड करण्यात आली असून यात रत्नागिरी जिल्हयातील दापोली नगर पंचायतीला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीच्या श्रेणीमध्ये पश्चिम विभागातून निवड करण्यात आलेल्या तीन ग्रामपंचायतींमध्ये सोलापूर जिल्हयाच्या बार्शी तालुक्यातील सुर्डी  ग्रामपंचयातीने तिसरा क्रमांक पटकाविला आहे. जलव्यवस्थापनात उत्कृष्ट कार्यासाठी  देशातून तीन गैर शासकीय संस्थांची निवड करण्यात आली असून या श्रेणीत औरंगाबाद येथील ग्रामविकास संस्थेला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे कोरोना पॉझिटिव्ह 

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे  यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलाय. कोरोनाची लक्षण जाणवत असल्याने त्यांनी टेस्ट केली असता ती टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती त्यांनी फेसबुकवर पोस्ट केलीय, दरम्यान डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण आयसोलेशनमध्ये असून संपर्कातील सर्वांनी कोरोना टेस्ट करण्याचे आवाहन त्यांनी केलंय.

नो हेल्मेट नो एन्ट्री मोहिमेअंतर्गत थेट प्राचार्यांवर गुन्हा दाखल, नाशिकमधील घटना

नो हेल्मेट नो एन्ट्री मोहिमेअंतर्गत थेट प्राचार्यांवर गुन्हा दाखल


महाविद्यालय आवारात दुचाकीस्वराने विना हेल्मेट प्रवेश केल्यानं प्राचार्यांवर गुन्हा दाखल


- शाळा कॉलेज,कार्यालयात हेल्मेट नाही तर कोणालाच प्रवेश देऊ नका।असे आदेश पोलीस आयुक्तांनी दिलेत


- ज्या मालमत्ताच्या आवारात विना हेल्मेट दुचाकी स्वार प्रवेश करेल त्या मालमत्ता अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला होता


- त्या अंतर्गत एका महाविद्यालयाचे प्राचार्यांसह वेगवेगळ्या 4 मालमत्ता अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

1. राज्यात काल ४० हजाराहून अधिक रुग्ण, मुंबईतील रुग्णवाढीचा वेग मंदावल्याचं चित्र, पण उपचाराधीन रुग्ण  आणि ऑक्सिजनची मागणी वाढली. 


2. मध्य रेल्वेवर आज दुपारी २ वाजल्यापासून ३६ तासांचा जम्बो मेगाब्लॉक, ठाणे ते दिवादरम्यान धीम्या मार्गावरील लोकल बंद, पाचव्या-सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी ब्लॉक


3. मुंबई, ठाण्यात हलक्या पावसाच्या सरी,  पुढील ३ दिवस राज्यावर पावसाचे ढग, विदर्भात उद्या गारपिटीची शक्यता


Maharashtra Unseasonal Rain : हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात काही ठिकाणी पहाटेपासूनच हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या आहेत. मुंबईसह ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी पहाटे रिमझिम पाऊस झाला आहे. राज्यात पुढील चार ते पाच दिवस अवकाळी पावसासोबतच गारपिटीची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. 7 ते 10 जानेवारीदरम्यान राज्यातील विविध भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर, 9 जानेवारीला विदर्भातील काही ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


विदर्भासह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पूर्व विदर्भातील काही भागात गारपिटीचा इशारा देखील नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आला आहे.  तसेच पश्चिम विदर्भातील अमरावतीत देखील एक-दोन ठिकाणी गारपिटीचा अंदाज आहे. अवकाळी पावसामुळं बळीराज्याच्या चिंतेत भर पडली असून यापूर्वी झालेल्या अवकाळीनं रबी पिकांना मोठा फटका बसला होता. अशातच आता पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बळीराजावर आस्मानी संकट कोसळणार आहे.


4. पंतप्रधान मोदींच्या सुरक्षा त्रुटींसंदर्भात पंजाब सरकारकडून कारवाई सुरु, फिरोजपूरमध्ये दीडशे जणांविरोधात गुन्हा दाखल, मोदींच्या ताफ्याजवळील लोक भाजपचे असल्याचा काँग्रेसचा दावा


5. भाजपचे कार्यकर्ते पंतप्रधान मोदींच्या ताफ्याजवळ कसे पोहोचले? पंजाबमधील व्हिडिओमुळे नवा वाद रंगणार


6. ISIS मध्ये भरती होण्यासाठी तरुणांना फितवणाऱ्या मुंबईतील दोघांना आठ वर्षाची सक्तमजुरी; विशेष NIA कोर्टाचा निर्णय


7. एक हजार द्या, लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र मिळवा! लसीकरण झाल्याचे बनावट प्रमाणपत्र देणाऱ्याला मुंबई पोलिसांकडून अटक


8. महाराष्ट्र सरकार राज्यातील सोने आणि चांदीच्या आयातीवरील मुद्रांक शुल्क माफ करण्याच्या विचारात, सोन्याचे दर कमी होणार


9. मुंबई क्रिकेट असोसिएशनने थकवले मुंबई पोलिसांचे कोट्यवधी रुपये, माहिती अधिकारातून माहिती उघड


10. IPL 2022 वर कोरोनाचं संकट, मेगा ऑक्शन पुढे ढकलण्याची शक्यता

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.