Maharashtra Breaking News LIVE Updates : नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना कोरोनाची लागण

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 05 Jan 2022 08:44 PM
नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना कोरोनाची लागण

नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना कोरोनाची लागण


काल खोकला जाणवत असल्याने केली होती चाचणी आज रिपोर्ट पॉझिटीव्ह आला

रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माधमिक शाळा उद्यापासून बंद

रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माधमिक शाळा उद्यापासून बंद राहणार आहेत. पण ऑनलाईन वर्ग मात्र सुरू राहणार आहेत. पुढील आदेश येईपर्यंत शाळा बंद राहणार आहेत. 

रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माधमिक शाळा उद्यापासून बंद

रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माधमिक शाळा उद्यापासून बंद राहणार आहेत. पण ऑनलाईन वर्ग मात्र सुरू राहणार आहेत. पुढील आदेश येईपर्यंत शाळा बंद राहणार आहेत. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली ते आठवीचे वर्ग उद्यापासून बंद
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या सर्व शाळा उद्यापासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर अधिकचे निर्बंध लावले जाणार आहेत. 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू असल्याने लसीकरण पूर्ण झाल्यावर माध्यमिक शाळा बंद करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. तसेच कोव्हिडं सेंटर सुरू करण्याच्या सूचनाही तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.

 

राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. त्यामुळे मुंबई, पुणेसह अनेक जिल्ह्यात शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही गेल्या चारपाच दिवसांत कोरोना रुग्ण संख्येत वाढ होऊन कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर एक बैठक घेण्यात आली. या बैठकीस शिक्षणाधिकारी मूस्ताक शेख, उपशिक्षणाधिकारी आंगणे व इतर अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत 6 जानेवारी पासून म्हणजे उद्यापासून पहिली ते आठवीच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिपत्रकाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली ते आठवीचे वर्ग उद्यापासून बंद

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या सर्व शाळा उद्यापासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर अधिकचे निर्बंध लावले जाणार आहेत. 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू असल्याने लसीकरण पूर्ण झाल्यावर माध्यमिक शाळा बंद करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

रायगड जिल्ह्यात बुधवारी 910 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

रायगड जिल्ह्यात आज 910 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. पनवेल महानगर पालिका क्षेत्रात 11 तर ग्रामीण भागात  एक असे 12 ओमायक्रॉनचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात आढळले ओमायक्रॉनचे सहा रुग्ण

पिंपरी चिंचवड शहरात आणखी सहा ओमयक्रोनचे रुग्ण आढळले आहेत. यात 2 यूएई तर जपान, सिंगापूर, केनिया आणि यूएसएचा प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. पिंपरी चिंचवड शहरात आत्तापर्यंत एकूण 40 ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 9 हे रुटीन चेकअप मधील ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आहेत तर 25 रुग्णांनी ओमयक्रोन वर मात केलेली आहे.

नाशिक-आग्रा महामार्गावर भीषण अपघात 

- नाशिक-आग्रा महामार्गावर भीषण अपघात 


- नाशिकहून मुंबईकडे भरधाव वेगात जाणारा कंटेनर मुंबई कडून नाशिककडे येणाऱ्या अल्टो कारवर झाला पलटी 


- कारमधील दोघांचा मृत्यू तर अन्य तिन गंभीर जखमी, सर्व जण जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक


 

नागपूर शहरात कोविडच्या रुग्णांमध्ये वाढ

नागपूर शहरात कोविडच्या रुग्णांमध्ये वाढ. तीन दिवसात तिप्पटहुन जास्त कोविड रुग्ण!  2 जानेवारीला होते 90 पॉझिटिव्ह रुग्ण, आज आहेत 329 नवे रुग्ण आढळले आहेत.  

नागपूरात 1 ते 8 व्या वर्गा पर्यंतच्या शाळा 31 जानेवारी पर्यंत बंद

नागपूरात 1 ते 8 व्या वर्गा पर्यंतच्या शाळा 31 जानेवारी पर्यंत बंद

पुण्यात गेल्या 24 तासात 1805 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 131 रुग्णांनी केली कोरोनावर मात

पुण्यात गेल्या 24 तासात 1805 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 131 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात आतापर्यंत 514494 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात एकाही कोरनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला नाही. सध्या पुण्यात 5464 सक्रिय रुग्ण आहेत. आज पुण्यात 13443 नागरिकांची स्वॅब तपासणी झाली आहे.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी चुरशीने 97 टक्के मतदान 

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठीचे मतदान संपलं असून दिवसभरात 7 हजार 400  मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा बँकेसाठी चुरशीने 97 टक्के मतदान झालं असून पंधरा जागांसाठी 33 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे. आता शुक्रवारच्या निकालाची प्रतीक्षा आहे.

देशाच्या इतिहासात आतापर्यंत अशी घटना घडली नाही - स्मृती इराणी

पंजाब पोलिसांनी मोदींचा ताफा रस्ते मार्गे जाण्याची परवानगी कशी दिली? स्मृती इराणी यांचा सवाल

7 जानेवारीपासून सुरू होणारी युपीएससीची मुख्य परीक्षा वेळापत्रकानुसारच पार पडणार

7 जानेवारीपासून सुरू होणारी युपीएससीची मुख्य परीक्षा वेळापत्रकानुसारच पार पडणार


केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून स्पष्टीकरण


कोरोनाची संख्या वाढत चालल्याने ही परीक्षा रद्द करण्याची मागणी विद्यार्थी आणि काही राजकीय नेत्यांकडून होत होती

कालीचरण महाराजाला एक दिवसाची पोलीस कोठडी

कालीचरण महाराजाला अटक केल्यानंतर आज पुणे पोलीसांनी त्याला आज पुणे सत्र न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. कालीचरण महाराजासोबत धार्मिक भावना भडकावल्याबद्दल पुण्यातील खडकमाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय.  या प्रकरणातील मिलिंद एकबोटे,  रमाकांत एकबोटे,  दिपक नागपुरे,  मोहन शेटे आणि कॅप्टन दिगेंद्र कुमार हे आरोपी फरार असून त्यांचा  शोध घेण्यासाठी कालीचरणची कोठडी आवश्यक असल्याच पोलीसांनी न्यायालयात सांगितलं.  त्याचबरोबर कालीचरण महाराजाचे व्हॉईस सॅम्पल घ्यायचे आहेत आणि इतर आरोपींसोबत मिळून कालीचरणचा दंगल भडकावण्याचा प्रयत्न होता का याचीही चौकशी करायची असल्याच पोलीसांनी न्यायालयात सांगितलय.  
19 डिसेंबरला पुण्यातील नातूबागेत झालेल्या कार्यक्रमात कालीचरण आणि आणि इतर आरोपींनी भडकाऊ भाषण केल्याचा गुन्हा पोलीसांनी नोंद केलाय.  या गुन्ह्य़ात कालीचरणला छत्तीसगड मधुन आज पुण्यात आनण्यात आलं आणि न्यायालयात हजर करण्यात आलं.

वीस हजार टनांनी मच्छीमारी घटल्याने मच्छीमार संकटांत
पालघर मधील समुद्रातील माशांचा उत्पादन प्रचंड घटले असून याचा मोठा फटका स्थानिक मच्छीमार तसंच मासेमारीवर अवलंबून असलेल्या व्यवसायांना बसलेला पहायला मिळतोय तौक्ते वादळ , निसर्ग वादळ तसेच पर्ससीन नेट ने होणारी मच्छीमारी सतत होणाऱ तेल सर्वेक्षण आणि इतर हवामानाच्या बदलामुळे येथील माशांचे प्रमाण घटले असून जवळपास ही घट 20000 टनाच्या आसपास असल्याची माहिती स्थानिक मच्छीमारांकडून देण्यात येते. 

 
रायगड जिल्ह्यात ओमायक्रॉन आणि डेल्टाचा शिरकाव

राजगड जिल्ह्यात आज 910 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. पनवेल महानगर पालिका क्षेत्रात 11 तर ग्रामीण मध्ये एक असे 12 ओमायक्रॉनचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. रायगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात कॉल सेंटरदेखील उघडण्यात आले आहेत. 

गेल्यावर्षी सीईटी परीक्षेसाठी भरलेले शुल्क बोर्डाकडून परत दिले जाणार

मागील शैक्षणिक वर्षात 11 वी प्रवेशासाठी नियोजित सीईटी परीक्षा रद्द झाल्यामुळे या सीईटी परीक्षेसाठी भरलेले शुल्क बोर्डाकडून परत दिले जाणार आहे. राज्य मंडळ व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी या सीईटी परीक्षेसाठी अर्ज आणि शुल्क भरले होते. 178 रुपये शुल्क प्रत्येकी विद्यार्थ्यांनी  भरले होते त्याला हा शुल्काचा परतावा 143 रुपये दिला जाणार आहे.

ओमायक्रॉनमुळे भारतात पहिला मृत्यू - रिपोर्ट

देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दक्षिण आफ्रिकामध्ये उदयास आलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटने चिंता वाढली आहे. ओमायक्रॉन व्हेरियंट अधिक धोकादायक नाही, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. मात्र, भारतात ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे पहिला मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार राज्यस्थानमध्ये ओमायक्रॉनमुळे पहिला मृत्यू झाला आहे. भारतामध्ये ओमायक्रॉन रुग्णाची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. बुधवारी देशातील ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 2135 वर गेली आहे. यामध्ये महाराष्ट्र, दिल्ली आणि केरळ या राज्यात सर्वाधिक रुग्ण आहेत. 

औरंगाबादमध्ये समृद्धी महामार्गाचे कामाचे महागडे लोखंडी साहित्य चोरणाऱ्या टोळीला अटक

औरंगाबाद शहर गुन्हे शाखेने समृद्धी महामार्गाचे कामाचे महागडे लोखंडी साहित्य चोरणाऱ्या टोळीला अटक केली आहे.  त्यांच्याकडून जवळपास साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे .पोलिसांनी तीन इसमांना ही अटक केली आहे. 3 जानेवारीच्या मला मध्यरात्री  पोलीस ठाणे हर्सूल औरंगाबाद हद्दीत समृद्धी महामार्गाचे कामाचे लोखंडी चायनल लोखंडी साहित्य चोरी गेले होते. या प्रकरणी तपास केला असता सलाउद्दीन शहा शाहिद शाह,  शेख अरबाज शेख नूर आणि  एक विधीसंघर्ष बालक याना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता नमूद तिन्ही इसमांनी गुन्हा केल्याचे कबुल केले आहे तसेच नमूद गुन्ह्यात चोरी केलेला सर्व मुद्देमाल नमूद इसमाचे ताब्यातून  जप्त करण्यात आलेला आहे.


 

सध्या तरी लाॅकडाउन नाही मात्र कडक निर्बंध आज लावले जाणार, आज रात्रीपर्यंत कडक निर्बंधाची नियमावली जाहीर होणार

सध्या तरी लाॅकडाउन नाही मात्र कडक निर्बंध आज लावले जाणार, आज रात्रीपर्यंत कडक निर्बंधाची नियमावली जाहीर होणार, जी चर्चा झाली त्याची माहिती मुख्यमंत्री यांना दिल्यानंतर ते आज निर्णय जाहीर करणार, टास्क फोर्स सोबत राज्यातील कोरेनाचा आढावा घेतला

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाची कार्यकारिणी बैठक आज

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाची कार्यकारिणी बैठक आज दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात होणार आहे.


या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील येणार आहेत.


राज्य सरकारने राज्यपालांचे अधिकार कमी करत विद्यापीठ कायद्यात बदल केला त्याविरोधात कसा लढा द्यायचा? याची रणनीती आजच्या कार्यकारिणीच्या बैठकीत होईल.


याशिवाय राज्यात परीक्षांचे विविध घोटाळे सुरू आहेत त्याबद्दलचा ठरावही कार्यकारिणीच्या बैठकीत मांडला जाणार आहे.



विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सकाळी ११.३० च्या सुमारास कार्यकारणीमध्ये उद्घाटनपर भाषण करतील

ठाणे आणि मुंबईला जोडणाऱ्या कोपरी पुलाच्या जुन्या मार्गिका अखेर बंद

ठाणे आणि मुंबईला जोडणाऱ्या कोपरी पूलाच्या जुन्या मार्गिका अखेर बंद करण्यात आले आहेत. या मार्गीका पूर्णतः तोडून त्या जागी नवीन मार्गिका उभारण्यात येणार आहेत. कोपरी पुलामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळेच या पुलाच्या रुंदीकरणाचे काम 2018साली हाती घेण्यात आले. हे काम दोन टप्प्यात करण्यात येत आहे. त्यातील पहिल्या टप्प्याचे म्हणजेच जुन्या पुलाच्या बाजूला नवीन दोन मार्गिका उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्या मार्गीका सुरू झाल्यामुळे आता जुन्या मार्गिका बंद करून त्या तोडण्यात येत आहेत. या कामामुळे सकाळी आणि संध्याकाळी ठाणे आणि मुंबईच्या वेशीवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. मात्र आज पहिल्या दिवशी वाहतूक विभागाने केलेल्या व्यवस्थापनामुळे वाहतूक कोंडी झाली नसल्याचे चित्र बघायला मिळाले. 

जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर प्रचंड फौजफाटा, 100 पोलीस सध्या बंदोबस्तात

जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर प्रचंड फौजफाटा, 
ओबीसींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मोर्चा येणार असल्याचे केले होते ट्विट 
मागील वेळेस झालेला राडा पाहून पोलीस आधीपासून सतर्क, 
एक क्यू आर टी टीम आणि सिटी पोलीस तैनात, 
100 पोलीस सध्या बंदोबस्तात,

वाय बी चव्हाण येथे थोड्याच वेळात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक, बैठकीमध्ये शरद पवार मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेणार

वाय बी चव्हाण येथे थोडयाच वेळात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक


बैठकीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार वाय बी चव्हाण सेंटर येथे पोहचले


बैठकीमध्ये मंत्र्यांच्या कामाचा आढावा शरद पवार घेणार

अनाथांची माय... सिंधुताई सपकाळ काळाच्या पडद्याआड, आज दुपारी अंत्यसंस्कार

अनाथांची माय अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं काल रात्री पुण्यातल्या गॅलक्सी रूग्णालयात निधन झालं. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील गॅलक्सी रूग्णालयात सिंधुताईंवर उपचार सुरू होते. सिंधूताईंच्या आयुष्याची कहाणी संघर्षमय असली, तरी प्रेरणादायी आहे. कोवळ्या वयात त्यांचा विवाह झाला. नवऱ्याने नाकारून घराबाहेर काढल्यानंतर गाईच्या गोठ्यात त्यांनी मुलीला जन्म दिला. दगडाने तोडलेली नाळ आणि मुलीने फोडलेला टाहो हे दोन्ही प्रसंग त्या शेवटपर्यंत विसरू शकल्या नाहीत. 

आजचे इंधनाचे दर जारी; 'या' शहरात सर्वात स्वस्त पेट्रोल

Petrol-Diesel Price Today 05 January 2022 : भारतीय तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. तेल वितरण कंपन्यांनी आज (बुधवारी) म्हणजेच, 5 जानेवारी 2022 रोजी पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) च्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. राष्ट्रीय स्तरावर गेल्या दोन महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. भारतीय पेट्रोलियम वितरण कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) ने आजचे नवे दर जारी केले आहेत. एकीकडे कच्च्या तेलाच्या बाजारात तेजीची नोंद झाली आहे. रात्रीच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात, जागतिक मानक ब्रेंट क्रूड फ्युचर्सची किंमत 0.39 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल $ 79.29 वर पोहोचली होती.


देशातील महानगरांतील आजचे दर :




































देशातील प्रमुख शहरं पेट्रोलची किंमत प्रति लिटरडिझेलची किंमत प्रति लिटर 
मुंबई109.98 94.14
दिल्ली95.41 86.67
चेन्नई101.4091.43
कोलकाता104.6789.79
पाटणा105.9291.09

सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 


दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा


पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


अनाथांची माय हरपली! पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचं हृदय विकाराच्या झटक्यानं निधन, आज दुपारी अंत्यसंस्कार


Sindhutai Sapkal : अनाथांची माय अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं काल रात्री पुण्यातल्या गॅलक्सी रूग्णालयात निधन झालं. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील गॅलक्सी रूग्णालयात सिंधुताईंवर उपचार सुरू होते. सामाजिक अत्याचारांना बळी पडलेल्या सिंधुताईंनी महाराष्ट्रात अनाथाश्रम स्थापन केलेत. त्यांना अन्न, शिक्षण आणि निवारा उपलब्ध करुन दिला. 'अनाथांची माय' असलेल्या सिंधुताई यांच्या जाण्यानं त्यांची लेकरं पोरकी झाली असून संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहेत. सिंधुताई सपकाळ यांच्यावर आज दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. 


सामाजिक कार्यकर्त्या आणि अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ  (Sindhutai Sakpal Passes Away) यांचं निधन झाले आहे.  वयाच्या 75 व्या वर्षी  पुण्यात अखेरचा श्वास घेतला आहे. आपल्या कार्याचा ठसा जनमानसात उमटवणाऱ्या व्यक्तींमध्ये सिंधुताई सपकाळ यांचे नाव आदराने घेतले जाते.


सिंधुताई सपकाळ यांच्यावर पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वीच सिंधुताई यांच्यावर गॅलेक्सी रुग्णालयातच हर्नियाचे ऑपरेशन करण्यात आले.  त्यानंतर सिंधुताई यांना पुन्हा एकदा गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात होते. सिंधुताई सपकाळ यांच्यावर उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.


राज्यातील लॉकडाऊनबाबतचा निर्णय आज; आरोग्य विभाग आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक, अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेणार


Maharashtra Coronavirus Lockdown Update : राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आज महाराष्ट्रातील लॉकडाऊनच्या भवितव्याचा निर्णय होणार आहे. राज्यातल्या कोरोनाच्या परिस्थितीवर आणि लावण्यात येणाऱ्या निर्बंधांवर आज सकाळी नऊ वाजता बैठक होणार आहे. या बैठकीतला निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कळवण्यात येईल. त्यानंतरच मुख्यमंत्री राज्यात कठोर निर्बंध जाहीर करण्याची दाट शक्यता आहे. 


राज्यात कोरोनाचे संकट अधिक गडद होत असून मंगळवारी कोरोनाच्या तब्बल 18 हजारांहून अधिक दैनंदिन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्य पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने चाललं आहे की, काय अशी शंका उपस्थित होत आहे. राज्यात सध्या तरी लॉकडाऊन लावण्यात येणार नसून निर्बंध कडक करण्यात येतील, असं आरोग्यमंत्र्यांनी जरी स्पष्ट केलं असलं तरी कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला आहे. याच मुद्द्यावर मंगळवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत मंत्रालयामध्ये एक महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीनंतर अंतिम निर्णयासाठी मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. 


कोविडच्या पार्श्वभूमीवर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मंगळवारी सकाळी नऊ वाजता मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित होणाऱ्या बैठकीला आरोग्य मंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव, आरोग्य विभागाचे अधिकारी, वित्त विभागाचे अधिकारी उपस्थित राहाणार आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.