Maharashtra Breaking News LIVE Updates:  एमपीएससी ने हे पत्र मागे घ्यावे- रोहित पवार

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

abp majha web team Last Updated: 30 Dec 2021 07:23 PM
एमपीएससी ने हे पत्र मागे घ्यावे- रोहित पवार

मुलांनी भाषा योग्य वापरावी, यात शंकाच नाही, पण #MPSC नेही अचानक परीक्षा रद्द करणं, निकाल वेळेत न लावणं, मुलांच्या शंकांचं वेळीच निरसन न करणं, हे टाळावं... तसंच भाषेऐवजी भावना आणि शब्दांऐवजी संवेदना समजून घेऊन हे पत्र मागं घ्यावं, ही विद्यार्थ्यांच्यावतीने विनंती! 

नाशकात ओमायक्रॉनचा पहिला रूग्ण

नाशिकमध्ये ओमायक्रॉनचा व्हेरियंटचा पहिला रूग्ण आढळला आहे. या रुग्णामध्ये कोणतीही लक्षणं नसून त्याची प्रकृतीही स्थिर आहे. दरम्यान कोरोना नियमांचं पालन करा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील- राजेश टोपे

राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होऊ लागलीय. याचपार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीनं टास्क फोर्सची बैठक बोलवली होती. या बैठकीत नागरिकांनी गर्दी टाळी पाहिजे, अशी चर्चा करण्यात आली. कोरोनाच्या वाढचत्या पादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आज किंवा उद्या निर्णय घेतील असंही राजेश टोपेंनी म्हटलंय. 


 

राज्यात कोरोना रुग्णांचा स्फोट

राज्यात आज कोरोना रुग्णांचा स्फोट झालाय. राज्यात आज पाच हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले आहेत. 


मुंबई मध्ये आज 3928 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ठाण्यात 864  आणि पुण्यात 520 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आज आढळलेल्या एकूण रुग्णांची संख्या 5368 इतकी आहे.


 

नितेश राणे यांच्या अटक पूर्व जामिनावर वाचन सुरू

नितेश राणे यांच्या अटक पूर्व जामिनावर वाचन सुरू आहे. 

साहित्य अकादमी युवा पुरस्कारांची घोषणा

साहित्य अकादमी युवा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. लेखक प्रणव सखदेव यांना "काळेकरडे स्ट्रोक्स" या कादंबरीसाठी मराठी भाषेसाठीचा वर्ष 2021 चा "साहित्य अकादमी युवा पुरस्कार" आज जाहीर  झाला आहे. 50,000 रुपये आणि ताम्रपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. एकूण 22 प्रादेशिक भाषांसाठी युवा पुरस्कार घोषीत करण्यात आला आहे.

 31 डिसेंबरला मुंबई पोलिसांच्या सुट्या रद्द

मुंबई पोलिसांनी मुंबईच्या सुरक्षेसाठी  31 डिसेंबरला पोलिसांच्या सुट्या रद्द केल्या आहे. मुंबई पोलिसमध्ये काम करणारा प्रत्येक पोलिस उद्या आपली ड्युटी बजावणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुप्तचर यंत्रणांनी मुंबईवर उद्या हल्ला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या उद्या सर्व सुट्या रद्द केल्या आहेत 

आगामी लाटेसाठी राज्यात ऑक्सिजनची परिस्थिती चांगली

आगामी लाटेसाठी राज्यात ऑक्सिजनची परिस्थिती चांगली , ५१०० मेट्रिक टन इतकी राज्याची क्षमता


अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांची माहिती.


राज्यात ऑक्सिजन ची परिस्थिती अतिशय चांगली असून राज्यात PSA प्लँट व औद्योगिक प्लांट यांच्या कडून जवळपास आज राज्याला ५१०० मेट्रिक टन इतका ऑक्सिजन मिळू शकेल , मागच्या कोरोना लाटे दरम्यान १७०० ते १८०० मेट्रिक टन इतक्या ऑक्सिजनची आवश्यकता भासली होती आता केंद्राने संभाव्य लाटेसाठी तीन पट ऑक्सिजनची तयारी करण्यास सांगितली आहे त्यानुसार आमची तयारी पूर्ण असल्याचं अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेन्द्र शिंगणे यांनी आज बुलढान्यात सांगितलं. ज्या जिल्ह्यात कुठे औषधाची कमतरता भासेल त्यांनी मागणी केल्यास तात्काळ पुरवठा करण्यात येईल असही शिंगणे यांनी आश्वासन आज दिलंय.
 


 

महाराष्ट्रातील सर्व निवासी डाॅक्टर उद्यापासून बेमुदत संपावर

महाराष्ट्रातील सर्व निवासी डाॅक्टर उद्यापासून बेमुदत संपावर, रुग्णसेवेला फटका बसण्याची शक्यता 


उद्या सकाळी ११ वाजेपासून महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालये आणि काॅलेजेसमधील ओपीडी, नाॅन इमर्जन्सी वाॅर्ड आणि निवडक सेवा न देण्याचा इशारा 


नीट-पीजी काऊन्सिलिंग प्रक्रिया रखडल्याने नवे विद्यार्थी रुजू झाले नाहीत त्यामुळे निवासी डाॅक्टरांवर ताण वाढला, नव्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार 


जोपर्यंत नीट-पीजी काऊन्सिलिंग प्रक्रियेसंदर्भातली तारीख जाहीर होत नाही तोपर्यंत संप सुरुच ठेवणार असल्याचा सेंट्रल मार्डचा इशारा 


लवकरात लवकर नीट-पीजी काऊन्सिलिंग प्रक्रियेसंदर्भात निर्णय न झाल्यास महाराष्ट्रातील इमर्जन्सी सेवा आणि अतिदक्षता सेवेतील निवासी डाॅक्टर्स देखील संपात सहभागी होणार

भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील कोरोना पाॅझिटिव्ह, विखे पाटील यांची अधिवेशनाला उपस्थिती

भाजपाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील कोरोना पाॅझिटिव्ह...
माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना कोरोनाची लागण...
विखे पाटील विधानसभेच्या अधिवेशनाला होते उपस्थित...
अहमदनगर येथील विखे पाटील रूग्णालयात केली कोविड टेस्ट...
संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, राधाकृष्ण विखे पाटील यांचे आवाहन...

राष्ट्रवादीचा पुणे जिल्हा बँक निवडणूक प्रचार मेळावा


राष्ट्रवादीचा पुणे जिल्हा बँक निवडणूक प्रचार मेळावा


अजित पवार करणार पक्ष पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन 


पुणे PDCC बँक इलेक्शनमध्ये 21 पैकी 14 जागा बिनविरोध, 7 जागांवर लागलीय निवडणूक..

येल्लालिंग मठात दरोडा, महाराजांसह दोघांना मारहाण, उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथील घटना

येल्लालिंग मठात दरोडा, महाराजांसह दोघांना मारहाण, उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथील घटना, मोबाईल व सोन्याच्या अंगठ्या पळवल्या, शेजारील बिरोबा मंदिरातही चोरी, 2 किलोची बिरोबा आणि महालिंग मुर्ती घेवून पसार


 
माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या गाडीतून चक्क रिव्हॉल्वर चोरीला गेली

पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या गाडीतून  रिव्हॉल्वर चोरीला गेली . बनावट चावीने त्यांच्या कारचा दरवाजा उघडून त्यांचे   रिव्हॉल्वर चोरून नेले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. बागवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खडक पोलिस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंज पेठेतील लोहियानगर ते भवानी पेठेतील अरुणकुमार वैद्य स्टेडियम या दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, रमेश बागवे यांनी आपल्या कारच्या ड्रायव्हर शेजारी असणाऱ्या सिटच्या पाठीमागे कप्प्यात ही  रिव्हॉल्वर ठेवले होते. हि चोरी नेमकी कशी झाली हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. अज्ञात चोरट्याने कारचा दरवाजा उघडून किंवा कार ची बनावट चावी तयार करून हे  रिव्हॉल्वर चोरून गेले असावे अशी शक्यता आहे. खडक पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. 

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या उपस्थितीत  आज टास्क फोर्सची बैठक,राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संदर्भात होणार चर्चा

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या उपस्थितीत  आज टास्क फोर्सची बैठक,राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संदर्भात होणार चर्चा, वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नियम कडक करणार का याकडे सर्वांचं लक्ष

वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजाला बेड्या, खजुराहोमधून पहाटे अटक

महात्मा गांधींवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालिचरण महाराजला अटक करण्यात आली आहे. कालीचरण महाराजाविरोधात छत्तीसगड, महाराष्ट्रात गुन्हे दाखल करण्यात आले होते. मध्य प्रदेशमधील खजुराहो येथील बगेश्वरी धाम येथून पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली. छत्तीसगड पोलिसांनी ही कारवाई केली आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये कालीचरण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ही कारवाई झाली.

पार्श्वभूमी

मास्क आणि सॅनिटायझर खाली साडे सात लाखांचा गांजा लपवून कारमधून तस्करी करणाऱ्या दोघांना अटक


मास्क आणि सॅनिटायझर खाली साडे सात लाखांचा गांजा लपवून कारमधून तस्करी करणाऱ्या दोघांना नागपूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. नागपूर चंद्रपूर महामार्गावर बुटीबोरी या ठिकाणी पवन कश्यप आणि दीपक शर्मा हे दोन आरोपी कार मधून गांजा तस्करी करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.. त्या आधारे काल संध्याकाळी पोलिसांनी बुटीबोरी वाय पॉईंटवर नाकाबंदी सुरू केली होती. त्या दरम्यान चंद्रपूर वरून नागपूर कडे येणाऱ्या कारच्या सीटच्या खाली जागा बनवून गांजा लपवल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे त्यावरती मास्क आणि सॅनिटायझर चे एक थर लावून गांजा त्याखाली लपवण्यात आला होता. पोलिसांनी सुमारे 75 किलो गांजा जप्त केला आहे.. नव वर्षाच्या स्वागतासाठी नशेखोरांच्या पार्टीसाठी गांजाची ही खेप आणली जात असल्याची माहिती आहे.


अहमदनगरमध्ये 'योगायोग' शब्दावरून काँग्रेस आणि शिवसेनेच्या मंत्र्यांत कलगीतुरा, नेमकं काय घडलं?


काँग्रेसचे नेते (Congress) महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thackeray) आणि शिवसेनेचे नेते (Shiv Sena) जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांच्या उपस्थितीत आज अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन वास्तूच लोकार्पण सोहळा संपन्न झाला.. यावेळी जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांसह पदाधिकारी व अधिकारी वर्ग उपस्थित होता. यावेळी सोहळ्याच्या भाषणात 'योगायोग' शब्दावरून दोन्ही मंत्र्यांमध्ये कलगीतुरा पाहायला मिळाला. त्याला कारण होतं 2014 ला थोरातांच्या हस्ते ज्या वास्तूचे भूमिपूजन झाले त्याच थोरात यांच्या हस्ते 8 वर्षांनी या वास्तूचे लोकार्पण पार पडले.बाळासाहेब थोरात 2014 ला महसूल मंत्री असताना अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाचे भूमिपूजन झालं होतं आणि आज 8 वर्षांनी त्यांच्या हस्ते महसूल मंत्री असताना या वास्तूचे लोकार्पण पार पडत असल्यानं जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी या योगायोगावरून भाष्य केले आणि त्याला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भाषणातून प्रत्युत्तर देताना हा योगायोग अजून किती वर्षे चालेल माहीत नाही. तुम्ही बरोबर आहात, पुढे गेले तरी त्यालाही शुभेच्छा, असं म्हटल्यानं एकच हशा पिकला.मंत्री शंकरराव गडाख म्हणाले की, 8 वर्षांपूर्वी थोरात साहेबांनी याची पायाभरणी केली. 8 वर्ष तसा मोठा काळ.  आज 8 वर्षांनी थोरातांच्या हस्ते याचं उद्घाटन होत हा एक योगायोग आहे. योगायोगाचं दुसरं नाव बाळासाहेब थोरात हेच आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन राजकारणात काम केलं तर त्यांच्या इतकं नाही मात्र त्यांच्या पाठीमागे जाता येईल अशी मला खात्री वाटते, असं गडाख म्हणाले.


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.