Maharashtra Breaking News LIVE Updates: आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या सुनावणी
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. संतोष परब हल्ल्याप्रकरणी त्यांना अटक करण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
येवला येथून येत असताना मनमाड जवळच्या नागरचौकी जवळ दौंड-पुणे रेल्वे मार्गावर शालिमार या किसान एक्सप्रेसचा एक डबा रुळावरून घसरल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. रुळावरून डबा घसरल्याची माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम सुरू आहे. डबा रुळावर ठेवण्याचे काम सुरू आहे,
पाटाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या तिघा शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. नाशिकच्या मखमलाबाद परिसरातील ही घटना घडलीय. गंगापूर धरणातून सध्या रब्बी हंगामाचे आवर्तन सोडण्यात आलंय. त्यामुळं पाटाला पाणी आल्यानं परिसरातील मुलं पाण्यात पोहण्यासाठी गेले होते पाण्याचा अंदाज न आल्याने तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिकांच्या मदतीने मुलांचा शोध घेतला मात्र मुलाचे प्राण वाचले नाही.
राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. वर्षा गायकवाड काल (सोमवारी) अधिवेशनात उपस्थित होत्या. अनेक मंत्री, आमदार वर्षा गायकवाड यांच्या संपर्कात आल्याची माहिती मिळत आहे. त्यांनी स्वतः ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. वर्षा गायकवाड ट्विटमध्ये म्हणाल्या की, "मला आज कळलं की काल संध्याकाळी प्रथम लक्षणं जाणवल्यानंतर माझी COVID-19 साठी चाचणी सकारात्मक आली आहे. माझी लक्षणे तुलनेने सौम्य आहेत. मी ठीक आहे आणि मी स्वतःला वेगळे केले आहे. गेल्या काही दिवसांपासून जे मला भेटले त्यांना खबरदारी घेण्याची विनंती करते."
सांगली मार्केट यार्डमध्ये गवा रेडा घुसल्याने सर्व प्रशासन मार्केट यार्ड मध्ये अलर्ट आहे. वन विभागाचे सर्व तालुक्यातील 65 हुन अधिक कर्मचारी, अधिकारी मार्केट यार्ड मध्ये दाखल झालेत. तर दुसरीकडे तहसीलदार डी एस कुंभार यांनी मार्केट यार्ड मध्ये जमावबंदीचे आदेश लागू केलेत. तर गवा मार्केट यार्ड मध्ये आल्याने मार्केट मधील गूळ, हळदीचे सौदे, सर्व व्यवहार बंद ठेवावे लागल्याने आज मार्केट यार्ड मधील 10 कोटींची उलाढाल ठप्प होणार आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधींवर आक्षेपार्ह विधान करणाऱ्या कालिचरण महाराजांवर अकोल्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले होते.
पार्श्वभूमी
हिवाळी अधिवेशनाचा अखेचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीची उत्सुकता शिगेला
आजचा दिवस विविध राजकीय घडामोडींनी गाजण्याची शक्यता आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षपद निवडणूक घेण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्धार आहे. अध्यक्षपद निवडणुकीबाबत राज्यपालांना पाठवलेल्या पत्रासंदर्भात सकाळी 11 वाजेपर्यंत उत्तर न आल्यास निवडणूक घेण्यावर सरकार ठाम आहे. दुसरीकडे हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार का याकडं साऱ्यांचं लक्ष लागलंय. तिकडे कोकणात वातावरण तापलंय. शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी भाजप आमदार नितेश राणेंना अटक होण्याची शक्यता आहे.
राज्यपालांनी उत्तर दिलं नाही तर सहमती आहे, असं समजून निवडणूक घेण्याची तयारी सत्ताधारी महाविकास आघाडीनं केली आहे. मात्र, तसं केल्यास पुढचे परिणाम काय होतील याचीही चाचपणी सत्ताधारी करत असल्याचं कळतं. त्यामुळे आज अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधानसभा अध्यक्ष निवडीवरून काय घडामोडी घडत आहेत याची उत्सुकता आहे. तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आम्हालाही मतदानाचा अधिकार द्या, अशी मागणी 12 निलंबित भाजप आमदारांनी राज्यपालांकडे केली आहे. आमचा मतदानाचा हक्का हिरावला जातोय. मतदान करणं संवैधानिक अधिकार आहे. त्यामुळे मतदानाचा अधिकार अबाधित ठेवावा, अशी विनंती राज्यपालांकडे केली आहे.
अटकपूर्व जामीनासाठी नितेश राणेंची न्यायालयात धाव; आज सुनावणी, अटक टळणार?
संतोष परब हल्लाप्रकरणात नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे अटक टाळण्यासाठी नितेश राणे यांनी कोर्टात धाव घेतली आहे. भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या अटकपूर्व जामीन प्रकरणात आज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. आज त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. यासाठी दोन्ही बाजूंनी वकिलांची फौज उभी करण्यात आली आहे. नितेश राणे यांच्यातर्फे बाजू मांडताना अॅड. संग्राम देसाई हे युक्तिवाद करतील. तर अॅड राजेंद्र रावराणे, राजेश परुळेकर, उमेश सावंत ही कायदेतज्ञ टीम सहकार्याला असेल. विशेष सरकारी वकील म्हणून अॅड प्रदीप घरत आणि अॅड भूषण साळवी हे राज्य सरकारतर्फे ते युक्तिवाद करतील. आज दुपारी 2.45 वाजता जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरु होईल. दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आपला नागपूर दौरा अर्धवट सोडून कणकवलीला परतल्यानं चर्चांना आणखी उधाण आलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -