Maharashtra Breaking News LIVE Updates : औरंगाबाद येथील नारेगावच्या गोल्डन लॉन्स जवळील पत्र्याच्या शेडला आग

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

abp majha web team Last Updated: 21 Dec 2021 09:24 PM
मालेगावात सराफा व्यावसायिकावर  गोळीबार

मालेगाव इथे सराफा व्यावसायिकावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. अंजनकर ज्वेलर्सचने मालक महेश अंजनकर यांच्यावर अज्ञांताकडून लुटीच्या उद्देशाने गोळीबार झाला आहे. यावेळी त्याच्या दुकानात काम करणारा मजूर रवी वालेकर यांचा मृत्यू झाला असून  अंजनकर जखमी झाले आहेत.

मालेगावात सराफा व्यावसायिकावर  गोळीबार

मालेगाव इथे सराफा व्यावसायिकावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. अंजनकर ज्वेलर्सचने मालक महेश अंजनकर यांच्यावर अज्ञांताकडून लुटीच्या उद्देशाने गोळीबार झाला आहे. यावेळी त्याच्या दुकानात काम करणारा मजूर रवी वालेकर यांचा मृत्यू झाला असून  अंजनकर जखमी झाले आहेत.

कोल्हापूरच्या चंदगड-तिलारी भागात पट्टेरी वाघाचे दर्शन

कोल्हापूरच्या चंदगड-तिलारी काँझर्व्हेशन भागात  पर्यटकांना वाघाचे दर्शन झाले आहे. गोव्याहून कोल्हापूरकडे परत येत असताना चंदगड मधील 6 तरुणांना पट्टेरी वाघ दिसला. रात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास चंदगड मुख्य रस्त्यावर तरुणांना वाघ दिसला. त्यानंतर काही अंतरावर पुढे आल्यानंतर त्यांना भल्या मोठ्या गव्याचेही दर्शन झाले.

औरंगाबाद येथील नारेगावच्या गोल्डन लॉन्स जवळील पत्र्याचे शेडला आग

नारेगावच्या गोल्डन लॉन्स जवळील पत्र्याचे शेडला लागली अचानक आग लागली आहे. दुकानात चिवडा आणि स्कूल बॅग बनवले जात होते. आगीत सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. अग्निशमन दलाने आग पूर्णपणे विझवली असून यामध्ये लाखो रुपयांचा नुकसान झालं आहे. 

चित्रपट निर्माते पराग सांघवी यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक

बॉलीवूडचे प्रोडूसर पराग संघवी यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे.  पराग संघवी हे निर्माते असून ALUMBRA आणि लोटस फिल्म कंपनीचे सीईओ सुद्धा आहेत. तसेच k.sera sera कंपनीचे एमडी पदावर ते आहेत.  भूतनाथ रिटर्न्स, the attack of 26/11 सारख्या सिनेमाची निर्मिती  संघवी  यांनी केली आहे..

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची तातडीची बैठक

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची तातडीची आणि अत्यंत महत्वाची बैठक घेण्यात आली आहे.  उद्या सकाळी 9 वाजता विधानभवनात  बैठक  होणार आहे. अधिवेधनात राज्य सरकारची व्यूहरचना ठरवली जाणार आहे.

राज्यात विधानसभा अधिवेशन सुरू होण्याआधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष दिल्लीत

राज्यात विधानसभा अधिवेशन सुरू होण्याआधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष दिल्लीत पोहोचले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्र प्रभारी एचके पाटील, काँग्रेस संघटन महासचिव केसी वेणुगोपाल यांची आज बैठक होणार आहे.  या बैठकीसाठी नितीन राऊत, सुनील केदार या इतर दोन मंत्र्यांनाही बोलावून घेतल्याची चर्चा आहे. आज संध्याकाळी सहाच्या सुमारास काँग्रेस मुख्यालयात होणार बैठक होणार आहे.  नागपूरमध्ये विधानपरिषद निवडणुकीत जो घोळ झाला त्यासंदर्भात चर्चेची शक्यता आहे. 

मुख्यमंत्री अधिवेशनापूर्वी होणाऱ्या चहापानाच्या कार्यक्रमाला उपस्थित  राहणार नाहीत

मुख्यमंत्री अधिवेशनापूर्वी होणाऱ्या चहापानाच्या कार्यक्रमाला उपस्थित  राहणार नाहीत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला मात्र व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे  उपस्थित राहणार आहे. 

वर्षभरासाठी आमदार निलंबित करणे हे लोकशाहीला फासण्याचे काम; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सरकारवर टीका

विधीमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. वर्षभरासाठी आमदार निलंबित करणे हे लोकशाहीला काळीमा फासण्याचे काम असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 

पुणे: पेपरफुटी प्रकरणी आणखी काही आरोपींवर कारवाई होणार, पुणे पोलिसांची माहिती

पेपरफुटीप्रकरणी आणखी आरोपी ताब्यात घेणार; पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची पत्रकार परिषदेत माहिती

ओबीसींच्या राष्ट्रीय बैठकीसाठी छगन भुजबळ दिल्लीत दाखल

टीईटी पेपरफुटी प्रकरणी पुणे पोलिसांकडून आणखी दोघांना अटक

पार्श्वभूमी

Mhada Paper Leak Scam : पेपरफुटी प्रकरणात भाजयुमोचा नेता संजय सानपला अटक


आरोग्य विभागाच्या परीक्षेत पेपर फुटी झाल्याच्या प्रकरणी यापूर्वीच बीड जिल्ह्यात कारवाई झालेली आहे आता भारतीय जनता युवा मोर्चा पाटोदा माजी अध्यक्ष संजय सानप याला पोलिसांनी अटक केली आहे. संजय सानप यांची पुण्यात सायबर पोलिसांकडून चौकशी चालू होती. त्यावेळी त्याचा या पेपरफुटी प्रकरणांमध्ये सहभाग आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी लगेच ताब्यात घेतले संजय सानपला 23 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या पेपर कुठे प्रकरणात आतापर्यंत 18 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे संजय सानप याचा मूळ गाव असलेल्या वडझरी परिसरातील अनेक मुलांना त्याने नोकरीला लावले असल्याचेही बोलले जात आहे. म्हाडा भरती पेपरफुटी प्रकरणात इतर परीक्षांमधील गैरप्रकार समोर येत आहेत. म्हाडा पेपरफुटीवरून  हा तपास सुरू झाला, त्यातून इतर परीक्षांचे घोटाळे समोर आले त्यामुळे भविष्यात  आणखी घोटाळे बाहेर येऊ शकतात आणि अटकही होऊ शकते. ही फक्त सुरुवात असल्याचे  पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी म्हटले होते.  






राज्यातील नगरपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान; ओबीसी आरक्षणाशिवाय होतेय निवडणूक


राज्यात आज 32 जिल्ह्यातील 105 नगरपंचायत निवडणुकांसाठी आज मतदान होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय ही निवडणूक पार पडत आहे. मागील काही दिवसांपासून निवडणूक प्रचाराचा धुरळा उडाला होता. सोमवारी प्रचार संपल्यानंतर आज मतदान पार पडत आहे. या निवडणुकीत अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. 


या प्रमुख नगरपंचायतीच्या लढतींकडे लक्ष 


मंडणगड, दापोली (रत्नागिरी),  कसई-दोडामार्ग, वाभवे-वैभववाडी, कुडाळ ( सिंधुदुर्ग ), देहू (पुणे-नवनिर्मित नगरपंचायत), लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा, दहिवडी ( सातारा ), कडेगाव, खानापूर, कवठेमहांकाळ (सांगली), तर, सोलापूरमधील माढा, माळशिरस, महाळूंग-श्रीपूर (नवनिर्मित नगरपंचायत), वैराग (नवनिर्मित नगरपंचायत), नातेपुते (नवनिर्मित नगरपंचायत)  या निवडणुकींकडे राज्याचे लक्ष आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.