Maharashtra Breaking News 8 August 2022 : शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळेंना नोटीस, लवासा प्रकरणी सहा आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य काही जणांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. लवासा प्रकरणी सहा आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश या नोटीसीमधून न्यायालायने दिले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला याचिकाकर्ते नानासाहेब जाधव यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
लोणावळा लोकलने म्हशीला धडक दिल्याने पुणे आणि लोणावळा या दोन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. साडेपाचची लोणावळा लोकल पुण्याचे दिशेने येत असताना तळेगाव-देहूरोडच्या दरम्यान रेल्वे रुळावर आलेल्या म्हशीला लोकलने धडक दिली. म्हैस रेल्वेगाडी खाली अडकल्याने प्रवाशांयाना मनस्थाप सहन करावा लागला असून एका तासानंतर म्हशीला लोकल खालून काढण्यात यश आले आहे. या घटनेमुळं दोन्ही मार्गावरील रेल्वेचं वेळापत्रक विस्कळीत झालय.
उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी भाजपकडून फिक्स झालेली नावं,
1) चंद्रकांत दादा पाटील
2) राधा कृष्ण विखे पाटील
3) सुधीर मुनंगटीवार
4) गिरिष महाजन
5) सुरेश खाडे, मिरज
6) अतुल सावे
7) मंगल प्रभात लोढा मुंबई
घरफोड्या करणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आलीय. 17 तोळे सोने आणि 800 ग्रॅम चांदी या टोळीकडून जप्त करण्यात आलीय. सोने, चांदीचे दागिने आणि एका गाडीसह 12 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अक्षयसिंग जुनी (वय, 19), जितसिंग टाक (26) आणि लोकसिंग टाक (19) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. या सर्व आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होणार असल्याचे सूतोवाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. नांदेड येथील गुरू गोविंदसिंगजी विमानतळावर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना याबाबत माहिती दिली आहे.
नांदेड येथील गुरुगोविंद सिंगजी विमानतळ ते एनाथ शिंदे यांच्या सभेचे ठिकाण भक्ती लॉन्स याठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अगमना दरम्यान खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, शेकाप आमदार श्यामसुंदर शिंदे, माजी आमदार सुभाष साबणे यांच्यासर शिंदे संर्थकांनी त्यांचे स्वागत केले.
टीईटी प्रकरणात जर अब्दुल सत्तारांचे नाव येत असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. त्यामध्ये काही चुकीचं झालं असेल तर रितसर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.
उद्या जर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असला तरी त्याची माहिती आम्हाला दिली जाते, तशा आशयाचं अद्याप कोणतेही पत्र सचिवालयाकडून आलेलंन नाही असं राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार म्हणाले.
Putrada Ekadashi : पवित्र श्रावण महिन्यातील एकादशी अर्थात पुत्रदा एकादशीचे वारकरी संप्रदायात फार मोठे महत्त्व असते. आजच्या दिवशी विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी आज देशभरातून हजारोंच्या संख्येने भाविकांनी गर्दी केली असून विठुरायाच्या दर्शनाची रांग गोपाळपूर येथील पत्राशेडपर्यंत पोहोचली आहे. आज श्रावणी सोमवार आणि पुत्रदा एकादशी असा दुहेरी योग्य आला असून जवळपास दोन लाखापेक्षा जास्त भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. चंद्रभागा वाळवंट, श्री विठ्ठल मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेले आहेत. आज भल्या पहाटेपासून चंद्रभागा स्नानासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली असून सध्या चंद्रभागेत भरपूर पाणी असल्याने प्रशासनाने भाविकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
Mumbai Swine Flu Update :
मुंबईत स्वाईन फ्लूची रुग्णसं
मागील 7 दिवसात स्वाईन फ्लूचे
1 जून ते 7 ऑगस्टपर्यंत 189 स्वाईन फ्लूचे रुग्ण, 2021 साली
स्वाईन फ्लू (एच1एन1), गॅस्ट्रो आणि मलेरियाच्या रुग्णसंख्ये
मागील 7 दिवसात गॅस्ट्रोचे 119
मागील 7 दिवसात मलेरियाच्या 218 केसेस
स्वाईन फ्लूमध्ये ताप, सर्दी,
Belgaon News : सीमाभागातील मराठी भाषिकांना सरकारी कागदपत्रे मराठीतून उपलब्ध करुन द्यावीत या मागणीसाठी भर पावसात महाराष्ट्र एकीकरण समितीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन केले. भाषिक अल्पसंख्यांक कायद्यानुसार सीमाभागातील मराठी भाषिकांना मराठीतून कागदपत्रे मिळाली पाहिजेत. उच्च न्यायालयाने देखील तसा आदेश बजावला आहे. या बाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून निवेदने आणि आवश्यक ती कागदपत्रे समितीने दिली आहेत पण अद्याप मराठी भाषिकांना मराठीतून कागदपत्रे मिळाली नाहीत. मराठीतून कागदपत्रे मिळावीत या मागणीसाठी समितीने आता जोरदार आंदोलन छेडून रस्त्यावरची लढाई सुरू करण्याचा निर्धार केला आहे. बिदर येथील जिल्हाधिकाऱ्यांनी तेथील सगळ्या अधिकाऱ्यांना मराठी आणि उर्दू भाषेतून देखील सरकारी कागदपत्रे देण्याचा आदेश बजावला आहे. न्याय मागणीकडे देखील बेळगाव जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करत आहे. बिदरचे जिल्हाधिकारी मराठी बरोबर उर्दूमध्ये कागदपत्रे देऊ शकतात तर बेळगावचे जिल्हाधिकारी का देऊ शकत नाहीत असा सवाल समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी आंदोलन स्थळी मार्गदर्शन करताना केला.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा नाशिक आणि जळगाव येथील दौरा तात्पुरता रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे शिव संवाद यात्रेचा तिसरा टप्पा पुढे ढकलण्यात आला आहे. आदित्य ठाकरे यांच्या 'शिव संवाद' यात्रेचा तिसरा टप्पा 9 आणि 10 ऑगस्ट रोजी जळगाव, मालेगाव, नाशिक आणि भिवंडी ग्रामीण येथे आयोजित करण्यात आला होता . परंतु, हा दौरा रद्द करण्यात आला आहे . आदित्य ठाकरे यांची प्रकृती खराब असल्यामुळे तिसरा टप्पा दौरा पुढे करण्यात येणारं आहे. त्यांची कोव्हिड चाचणी निगेटिव्ह आली आहे. मात्र हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे .
आरे कारशेड आंदोलनातील एका पर्यावरणवाद्याला अटक, 10 दिवसांपूर्वी कारशेड परिसरात आत शिरत काम थांबवण्याचा केला होता प्रयत्न, ट्रेस पासिंगच्या गुन्ह्याची काही जणांविरोधात नोंद होती. तबरेज नावाच्या पर्यावरणवाद्याला अटक, बोरीवली कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची माहिती. 10 दिवस आधी काही पर्यावरणवाद्यांनी झाडं तोडत असल्याचा दावा करत कारशेड परिसरात शिरण्याचा प्रयत्न केला होता, सोबतच रात्रीपर्यंत आंदोलन केले होते
पवित्र श्रावण महिन्यातील एकादशी अर्थात पुत्रदा एकादशी चे वारकरी संप्रदायात फार मोठे महत्व असते . आजच्या दिवशी विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी आज देशभरातून हजारोंच्या संख्येने भाविकांनी गर्दी केली असून विठुरायाच्या दर्शनाची रांग गोपाळपूर येथील पत्राशेड पर्यंत पोचली आहे . आज श्रावणी सोमवार आणि पुत्रदा एकादशी असा दुहेरी योग्य आला असून जवळपास दोन लाखापेक्षा जास्त भाविक पंढरीत दाखल झाले आहेत . चंद्रभागा वाळवंट , श्री विठ्ठल मंदिर परिसर , प्रदक्षिणा मार्ग हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेले आहेत . आज भल्या पहाटेपासून चंद्रभागा स्नानासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली असून सध्या चंद्रभागेत भरपूर पाणी असल्याने प्रशासनाने भाविकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे .
Aaditya Thackeray Tour : आदित्य ठाकरेंचा उत्तर महाराष्ट्र दौरा रद्द, तब्येत ठीक नसल्यानं केला दौरा रद्द
पावसाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला... 10 ते 18 ऑगस्ट दरम्यान विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन
मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्र्यांमध्ये महत्त्वाची बैठक सुरु आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजेपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.
पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्याला वरदायन ठरलेलं उजनी धरण हे 85.79 टक्के भरलं आहे. मागच्या काही दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्याने उजनी धरण हे 12 जुलै रोजी प्लसमध्ये आलं होतं. सध्या उजनी धरणात 109.62 टीएमसी इतके पाणी आहे.. उजनी धरणाची एकूण क्षमता ही 117 टीएमसी इतकी आहे.. मागच्या वर्षी 8 ऑगस्ट 2021रोजी उजनी धरणात 61.79 एवढं पाणी होत. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी उजणीत जास्त पाणीसाठा आहे.
दारू पिताना झालेल्या वादातून एकाने मित्राचा खून केलाय. पुण्यातील हडपसर परिसरातील वैदवाडी येथील कॅनल जवळ हा सर्व प्रकार घडला. हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन ऑगस्ट रोजी हा प्रकार घडला आहे. अनिल राजू सासी (वय 33) असं मयत तरुणाचं नाव आहे. प्रवीण नामदेव नाईक (वय 41) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. मयत तरुणाचा भाऊ अक्षय राजू सासी यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. दोन ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास मयत अनिल आणि आरोपी प्रवीण हे दारू पीत होते. यावेळी त्यांच्यात वाद झाला आणि रागाच्या भरात आरोपीने अनिल याच्या डोळ्याच्या बाजूला आणि कपाळावर दगडाने मारून त्याला गंभीर जखमी केले होते. गंभीर जखमी झालेल्या अनिल याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु उपचार सुरू असताना सात ऑगस्ट रोजी अनिल सासी याचा मृत्यू झाला. हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील बरांज-तांडा येथील आश्रमशाळेच्या अधिक्षकाने केला अत्याचार, खाजगी आश्रमशाळेच्या अधिक्षकाने 8 व्या वर्गातील 13 वर्षीय विद्यार्थिनीवर केला अत्याचार, महिनाभरापूर्वी हिंगणघाट येथून शाळेत शिकायला आली होती मुलगी, प्रकृती बिघडल्याने पालकांनी परत घरी नेल्यावर विद्यार्थिनीने सांगितला घडलेला प्रकार, पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल करताच आरोपी अधीक्षक संजय इटनकर याला घेतले ताब्यात, भद्रावती पोलिस करत आहेत प्रकरणाचा तपास
नागपूरच्या मानेवाडा - बेसा रोड वर घोगली परिसरात एका स्कूल व्हॅनचा अपघात झाला आहे.रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यामध्ये ही व्हॅन उलटली आहे. या अपघातात 2 विद्यार्थी जखमी झाले आहे.. रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या खड्ड्यात साचलेल्या पावसाच्या पाण्यामध्ये ही व्हॅन उलटली आणि व्हॅनमध्ये बसलेले 15 ते 16 विद्यार्थी ही पाण्यामध्ये पडले... परिसरातील तरुणांनी लगेच धाव घेत विद्यार्थ्यांना पाण्यातून बाहेर काढल्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही... मात्र पाण्यात पडल्यामुळे दोन विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती आहे...
व्हॅनची गती जास्त होती आणि रस्त्यावर चिखल आणि खड्डे असल्यामुळे ही व्हॅन रस्त्याशेजारी मोठ्या खड्ड्यात भरलेल्या पाण्यात घुसल्याची माहिती आहे... रोहन उच्च प्राथमिक विद्यालयाची ही व्हॅन होती.....
वसई : वसई पश्चिमेकडील रेल्वे स्टेशन जवळील के. टी चाळ येथील महालक्ष्मी चिवडा आणि फरसाण तसेच त्याच्या बाजूच्या मोबाईल दुकानाला ही भीषण आग लागली. . रात्री 12.30 च्या सुमारास ही आग लागली सध्या वसई विरार शहर महानगरपालिकेचे अग्निशमन विभागाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचा शर्थीने प्रयत्न केले. आग लागलेल्या दुकानाच्या बाजूचे दुकानातील कुलुप तोडून शेजारील दुकानालाही आग लागली नाही ना याची तपासणी केली. आग कशामुळे लागली हे मात्र कळू शकलं नाही. रात्र असल्यामुळे दुकानात कुणी नव्हतं त्यामुळे जीवितहानी झाली नाही. मात्र दुकानातील सर्व सामान जळून खाक झालं आहे.
Monsoon Session of Parliament : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजपासून शेवटचा आठवडा सुरू होणार आहे. मागचे तीन आठवडे महागाई आणि ईडी कारवाई विरोधात दोन्ही सभागृहात झालेल्या गोंधळामुळे कामकाज सुरळीत होऊ शकले नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड आणि हिंगोलीच्या दौऱ्यावर आहेत.
Maharashtra Rain : कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर 7 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट दरम्यान काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबईसाठी 8 ते 10 ऑगस्ट दरम्यान ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तिन्ही दिवस 100 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज आहे. विदर्भात 7 ते 9 ऑगस्ट दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार तर 10 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे.
Sanjay Raut : पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी राऊता ईडीच्या अटकेत आहेत. 31 जुलै रोजी अनेक तासांच्या चौकशीनंतर संजय राऊतांना ईडीने अटक केली. त्यानंतर न्यायलयाने राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. राऊतांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांच्या कोठडीत 8 ऑगस्टपर्यंत वाढ केली. शनिवारी वर्षा राऊत यांचीही जवळपास 10 तास ईडीकडून चौकशी झाली.
Maharashtra Politics : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सुरु असताना शिवसेना कोणाची अशी लढाई निवडणूक आयोगापुढे सुरू होणार आहे. आजपासून केंद्रीय निवडणूक आयोगात ठाकरे आणि शिंदे गटात सामन्याचा नवा अंक रंगणार आहे. शिंदे गटाला आयोगाकडे धाव घेण्याचा हक्क नाही अशी ठाकरे गटाची भूमिका आहे. तर दोन्ही गटांना बाजू मांडण्यासाठी 8 ऑगस्ट दुपारी 1 वाजेपर्यंतची वेळ मिळाली होती.
पार्श्वभूमी
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत...
आजपासून निवडणूक आयोगात ठाकरे विरुद्ध शिंदे
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सुरु असताना शिवसेना कोणाची अशी लढाई निवडणूक आयोगापुढे सुरू होणार आहे. आजपासून केंद्रीय निवडणूक आयोगात ठाकरे आणि शिंदे गटात सामन्याचा नवा अंक रंगणार आहे. शिंदे गटाला आयोगाकडे धाव घेण्याचा हक्क नाही अशी ठाकरे गटाची भूमिका आहे. तर दोन्ही गटांना बाजू मांडण्यासाठी 8 ऑगस्ट दुपारी 1 वाजेपर्यंतची वेळ मिळाली होती.
संजय राऊतांना जेल मिळणार की बेल?
पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी राऊता ईडीच्या अटकेत आहेत. 31 जुलै रोजी अनेक तासांच्या चौकशीनंतर संजय राऊतांना ईडीने अटक केली. त्यानंतर न्यायलयाने राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. राऊतांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांच्या कोठडीत 8 ऑगस्टपर्यंत वाढ केली. शनिवारी वर्षा राऊत यांचीही जवळपास 10 तास ईडीकडून चौकशी झाली.
राज्यात अनेक जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता
कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर 7 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट दरम्यान काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबईसाठी 8 ते 10 ऑगस्ट दरम्यान ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तिन्ही दिवस 100 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज आहे. विदर्भात 7 ते 9 ऑगस्ट दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार तर 10 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे.
मुख्यमंत्री नांदेड आणि हिंगोलीच्या दौऱ्यावर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड आणि हिंगोलीच्या दौऱ्यावर आहेत.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजपासून शेवटचा आठवडा
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजपासून शेवटचा आठवडा सुरू होणार आहे. मागचे तीन आठवडे महागाई आणि ईडी कारवाई विरोधात दोन्ही सभागृहात झालेल्या गोंधळामुळे कामकाज सुरळीत होऊ शकले नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -