Maharashtra Breaking News 7 August 2022 : राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Kolhapur News : करुळ घाटामध्ये संरक्षक भिंत खचल्यामुळे अवजड वाहतूक बंद करण्यात आला आहे. गगनबावडा येथे अवजड वाहतूक थांबवण्यात आली चारचाकी वाहतूक मात्र सुरू आहे
नागपूरः रविवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात दिवसभरात 153 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली. तर 169 जणांना कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात 1788 आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. सध्या जिल्ह्यात 1228 सक्रिय कोरोना बाधित आहेत. बाधितांपैकी 49 बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरु असून 1179 बाधित गृहविलगीकरणात आहेत.
एकनाथ खडसे यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांचा चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याने एकनाथ खडसे यांना धक्का मानला जात आहे. बोदवड तालुक्यातील राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित केला शिंदे गटात प्रवेश केला. मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर विश्वास ठेवत शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकला आहे. जळगाव जिल्हा दूध संघानंतर शिंदे गटाकडून एकनाथ खडसे यांना आपल्या बालेकिल्ल्यातच मोठा धक्का दिला आहे. बोदवड तालुक्यातील साळशिंगी येथील शेकडो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिंदे गटात प्रवेश केल्याने एकनाथ खडसेंना हा मोठा धक्का मानला जात आहे.
गेल्या महिन्यात जोरदार झालेल्या पावसाने हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतातील सर्व पिकांचे पावसाने नुकसान झाले आहेत. तर अनेक गावांमध्ये सुद्धा पुराचे पाणी शिरले होते. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोनवरून उपाययोजना करण्यासंदर्भात सूचना सुद्धा दिल्या होत्या. परंतु उद्या हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यामध्ये शेतकऱ्यांच्या नुकसान पाहणीचा साधा उल्लेख सुद्धा नसल्याचा दिसून आला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा होती की, मुख्यमंत्री जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी नुकसानीची पाहणी करावी. परंतु मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या दौऱ्यामध्ये असा कुठलाही उल्लेख नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्याचा विसर पडला की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे
वर्सोवा पोलिसांनी एका 22 वर्षीय तरुणाला त्याच्या जवळच्या मित्रावर पेव्हर ब्लॉकने हल्ला करून ठार मारल्याप्रकरणी अटक केली आहे. आरोपीनं गांजा पिण्यावरुन झालेल्या वादातून रागाच्या भरात खून केला आहे.
संजय राऊत यांना वैद्यकीय तपासणीसाठी जेजेला घेऊन गेले, ईडी अधिकाऱ्यांसह पोलिसांचा चोख बंदोबस्त
रत्नागिरी-गणपतीपुळे मार्गावरची वाहतूक बंद, भांडरपुळे पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक बंद, मुसळधार पावसामुळे ओढ्याला पूर...
Navi Mumbai Drugs Case : नवी मुंबई पोलिसांकडून (Navi Mumbai Police) गेल्या महिन्यात तब्बल 363 कोटी रूपयांचे हेरॅाईन जप्त (Heroin) करण्यात आलं होतं. दुबई येथून कंटेनरमधून आलेले हेरॅाईन जप्त करत मोठी कारवाई केली होती. यामध्ये पंजाब पोलीसांकडून नवी मुंबई पोलीसांना मदत करण्यात आली होती. हे प्रकरण आता महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथक (ATS) कडे वर्ग करण्यात आले आहे. या प्रकरणाची आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याने आता प्रकरणाचा पुढील तपास महाराष्ट्र एटीएस करणार आहे.
Maharashtra Rains : राज्याच्या विविध भागात पावसाचा (Rain) जोर चांगलाच वाढला आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची रिपरिप सुरु आहे. तसेच मुंबई शहरासह उपनगरात देखील पावसाचा जोर वाढला आहे. काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा (Maharashtra Rain Update ) अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
Vice President Election : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जगदीप धनखड यांनी बाजी मारली आहे. त्यांनी विरोधकांचे उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला आहे. धनकड यांना 528 टक्के मतं तर मार्गारेट अल्वा यांना 182 मतं मिळाली आहेत. जगदीप धनखड 11 ऑगस्टला नवे उपराष्ट्रपती ची शपथ घेतील. देशाचे सध्याचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्टला संपतोय. समाप्त होणार आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोच्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Launch Vehicle (SSLV) असं या नव्या प्रक्षेपकाचे नाव असून कमी वजनाचे उपग्रह, 500 किलोग्रॅमपेक्षा कमी वजनाचे उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्यासाठी या प्रक्षेपकाचा वापर केला जाणार आहे. या रॉकेट प्रक्षेपकाची निर्मिती इस्रोने केली असून याचे पहिले उड्डाण हे आज होणार आहे.
Acasa Air's First Flight : राकेश झुनझुनवाला यांच्या मालकीचे अकासा एअर कंपनीचे (Akasa Air) पहिलं विमान उडणार आहे. पहिले विमान हे 7 ऑगस्ट 2022 पासून मुंबई ते अहमदाबादला (Mumbai To Ahmedabad) उड्डाण करणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई, अहमदाबाद, बंगळुरू, कोची या चार शहरांना जोडले जाणार आहे.
पार्श्वभूमी
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत...
अकासा एअरचं पहिलं विमान उडणार
राकेश झुनझुनवाला यांच्या मालकीचे अकासा एअर कंपनीचे (Akasa Air) पहिलं विमान उडणार आहे. पहिले विमान हे 7 ऑगस्ट 2022 पासून मुंबई ते अहमदाबादला (Mumbai To Ahmedabad) उड्डाण करणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई, अहमदाबाद, बंगळुरू, कोची या चार शहरांना जोडले जाणार आहे.
इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक, आज होणार उड्डाण
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोच्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Launch Vehicle (SSLV) असं या नव्या प्रक्षेपकाचे नाव असून कमी वजनाचे उपग्रह, 500 किलोग्रॅमपेक्षा कमी वजनाचे उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्यासाठी या प्रक्षेपकाचा वापर केला जाणार आहे. या रॉकेट प्रक्षेपकाची निर्मिती इस्रोने केली असून याचे पहिले उड्डाण हे आज होणार आहे.
जयदीप धनखड देशाचे नवे उपराष्ट्रपती
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जगदीप धनखड यांनी बाजी मारली आहे. त्यांनी विरोधकांचे उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला आहे. धनकड यांना 528 टक्के मतं तर मार्गारेट अल्वा यांना 182 मतं मिळाली आहेत. जगदीप धनखड 11 ऑगस्टला नवे उपराष्ट्रपती ची शपथ घेतील. देशाचे सध्याचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्टला संपतोय. समाप्त होणार आहे.
आज इतिहासात
1941 साली नोबल पारितोषिक विजेता भारतीय राष्ट्रगीताचे जनक कवी, संगीतकार, कलाकार आणि भारतीय उपखंडातील आयुर्वेद-संशोधक रवींद्रनाथ टागोर यांचे निधन.
1947 साली मुंबईच्या महानगर पालिकेने बेस्ट कंपनी आपल्या ताब्यात घेतली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -