Maharashtra Breaking News 31 August 2022 : देशासह राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 31 Aug 2022 04:51 PM
Kokan Rain : तळकोकणात 15 दिवसानंतर पावसाचे जोरदार कमबॅक

Kokan Rain : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सायंकाळी गडगडाटासह सहयाद्री पट्ट्यात मुसळधार पाऊस पडत आहे. गेले 15 दिवसांपासून गेलेला पाऊस दुपारनंतर  जिल्ह्यातील काही ठिकाणी गडगडाटासह जोरदार पाऊस पडला. जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ, कणकवली मध्ये मुसळधार पावसाने कमबॅक केलं आहे. कडक ऊन पडत असल्याने जिल्ह्यातील भातशेती सह नाचणी शेती अडचणीत आली होती. मात्र पावसाने कमबॅक केल्याने बळीराजाची काही प्रमाणात चिंता मिटली आहे.

महामार्गावरील अपघातात दुचाकीस्वार तरूणीचा अपघात, भरधाव टेम्पोने धडक दिल्याने जागीच मृत्यू



मुंबई अहमदाबाद महामार्गावर वरई गावच्या हद्दीतील उड्डाणपुलावर दुचाकीला भरधाव वेगातील टेम्पोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू झाला आहे.मंगळवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास उड्डाणपुलाच्या गुजरात मार्गिकेवर अपघात झाला आहे. प्रिया रवींद्र पवार (वय23)असे मयत तरूणीचे नाव असून महामार्गालगतच्या हालोली गावच्या सातवी पाड्याची रहिवासी होती. मयत प्रिया चालवत असलेल्या दुचाकीला वरई उड्डाणपुलावर भरधाव वेगात गुजरातच्या दिशेने जात असलेल्या टेम्पो चालकाने मागून ठोकर मारल्याने अनियंत्रित होऊन दुचाकी टेम्पोसह फरफटत गेल्याने अपघात झाला होता.अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रियाचा जागीच मृत्यू झाला.अपघातानंतर घटनास्थळावरून टेम्पोसह पळून टेम्पो चालक पळून गेला होता.पोलिसांनी पाठलाग करून टेम्पो चालकाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीसाठी मनोर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.


 

 



 
Palghar News : महामार्गावरील अपघातात दुचाकीस्वार तरूणीचा अपघात; भरधाव टेम्पोने धडक दिल्याने जागीच मृत्यू

Palghar News : मुंबई अहमदाबाद महामार्गावर वरई गावच्या हद्दीतील उड्डाणपुलावर दुचाकीला भरधाव वेगातील टेम्पोनं धडक दिल्यानं झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास उड्डाणपुलाच्या गुजरात मार्गिकेवर अपघात झाला आहे. प्रिया रवींद्र पवार (23) असे मयत तरूणीचं नाव असून महामार्गालगतच्या हालोली गावच्या सातवी पाड्याची रहिवासी होती.


मयत प्रिया चालवत असलेल्या दुचाकीला वरई उड्डाणपुलावर भरधाव वेगात गुजरातच्या दिशेनं जात असलेल्या टेम्पो चालकाने मागून ठोकर मारल्याने अनियंत्रित होऊन दुचाकी टेम्पोसह फरफटत गेल्यानं अपघात झाला होता. अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रियाचा जागीच मृत्यू झाला.अपघातानंतर घटनास्थळा वरून टेम्पोसह पळून टेम्पो चालक पळून गेला होता. पोलिसांनी पाठलाग करून टेम्पो चालकाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीसाठी मनोर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
Mumbai Local Update : हार्बर लाईनवर तांत्रिक बिघाड, लोकल सेवा बाधित, ट्रेन्स उशिरानं धावत असल्याची माहिती

MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाने शहाड रेल्वे स्थानकात धावत्या मालगाडीसमोर उडी घेत आयुष्य संपवलं

Kalyan News : कल्याणजवळील शहाड रेल्वे स्थानकात एका तरुणाने धावत्या मालगाडी खाली आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 17 ऑगस्ट रोजी ही घडली होती. ही दुर्दैवी घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. सनी बैसाने असे या तरुणाचं नाव असून तो एमपीएससी परीक्षेची तयारी करत असल्याची देखील माहिती समोर येत आहे. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात एडीआर नोंद करण्यात आला असून सनीने आत्महत्या का केली याचा तपास कल्याण लोहमार्ग पोलीस करत आहेत.

भंडारा जिल्ह्याच्या मोहाडीत धुक्याची चादर, वातावरणात गारवा

Bhandara News : भंडारा जिल्ह्याच्या मोहाडीत धुक्याची चादर पसरली असून हवेत गारवा निर्माण झाल्याने दवबिंदूही पडले आहेत. यंदा जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. पहाटे दाट धुक्याची चादर पांघरलेल्या निसर्गाचं आणि या निसर्गरम्य वातावरणाचं दर्शन मोहाडीकरांना सतत अनुभवायला मिळत आहे. विशेष म्हणजे सकाळी पडणारं हे धुके लक्षात यंदा हिवाळा लवकर येऊन जोरदार थंडी पडण्याचे संकेत असल्याचं म्हटलं जात आहे.


 
Lalbaugcha Raja 2022 : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रात्रीपासूनच भाविकांची रांग

Lalbaugcha Raja 2022 : लालबागच्या  राजाच्या दर्शनासाठी काल रात्रीपासूनच रांगा लागल्या आहेत. मुंबईतील लालबागच्या राजाच्या ओळख नवसाला पावणारा गणपती अशी आहे. यामुळेच मुंबई आणि मुंबईच्या बाहेरुन देखील लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी लोक येत असतात. आणि राजाच्या दर्शनासाठी  लाखो लोक रांगा लावतात. 

अहमदनगरच्या अमीर मळा इथे जमिनीच्या वादातून एकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

Ahmednagar News : अहमदनगर शहरातील अमीर मळा इथे जमिनीच्या वादातून एकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत बशीर पठाण हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणात भिंगार पोलीस ठाण्यामध्ये उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होतं. सुरुवातीला बशीर पठाण यांच्या  माडीवर तलवारीने हल्ला करण्यात आला. त्यानंतर अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये बशीर पठाण हे 80 टक्के भाजले आहेत. बशीर पठाण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या जमिनीचा वाद सुरु असून या वादातून ही घटना घडल्याची माहिती आहे.

स्विमिंग पूलमध्ये हृदयविकाराचा झटका आल्याने 19 वर्षीय युवकाचा मृत्यू, नाशिकच्या मालेगावमधली घटना




Nashik News : स्विमिंग पूलमध्ये हृदयविकाराचा झटका आल्याने एका 19 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये घडली. 28 ऑगस्टच्या दुपारची ही घटना असून या घटनेचे सीसीटिव्ही फूटेज आता समोर आले आहे. शिवाजी नगर परिसरात असलेल्या अस्पायर क्लबच्या स्विमिंग पूलमध्ये जयेश भावसार हा रविवारी नेहमीप्रमाणे पोहोण्यासाठी आला होता. मात्र याचवेळी पोहत असतानाच त्याला त्रास जाणवला आणि तो स्विमिंग पूलमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करु लागला. हे बघताच तिथे उपस्थित असलेल्या काही तरुणांनी त्याला बाहेर काढून छाती आणि पोट दाबत वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र हे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आणि जयेशचा मृत्यू झाला.

 

 



 


CIDCO Lottery 2022 : गणेशोत्सवानिमित्त सिडकोकडून लॉटरी जाहीर

CIDCO Lottery 2022 : गणेशोत्सवानिमित्त सिडकोकडून लॉटरी (CIDCO  Lottery 2022) जाहीर करण्यात आली आहे. उद्या 4 हजार 158 घरांची आणि 245 व्यापारी गाळ्यांची लॉटरी काढण्यात आली आहे. ॲानलाईन पध्दतीने ही लॅाटरी काढली जाणार आहे. सिडको महागृहनिर्माण योजनेंतर्गत नवी मुंबईतील (Navi Mumbai) द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा आणि खारघर नोडमधील सिडकोच्या गृहसंकुलातील   घरे विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहेत. 


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Hubballi Ganesh Chaturthi Celebrations : बंगळुरूतील ईदगाह मैदानावर गणेशोत्सव होणार साजरा; कर्नाटक उच्च न्यायालयाची अटींसह परवानगी

Hubballi Ganesh Chaturthi Celebrations : कर्नाटक उच्च न्यायालयाने हुबळी येथील ईदगाह (Hubballi Eidgah) मैदानावर गणेशोत्सवाची पूजा करण्यास परवानगी दिली आहे. धारवाड महापालिका आयुक्तांच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका फेटाळत न्यायालयानं काही अटींसह पूजेला परवानगी दिली आहे. उच्च न्यायालयानं (Karnataka High Court) गणेश चतुर्थीला परवानगी देण्याचा अधिकार्‍यांचा निर्णय कायम ठेवला. 


दरम्यान, यापूर्वी या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी झाली होती. ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं ईदगाह मैदानावर गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी नाकारताना हे प्रकरण उच्च न्यायालयात पाठवलं होतं.


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पार्श्वभूमी

Ganesh Chaturthi 2022 : गणपती बाप्पा मोरया... घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन


Ganesh Chaturthi 2022 : गणपती बाप्पा मोरया....मंगलमूर्ती मोरया....अशा जयघोष आज सगळीकडे ऐकायला मिळत आहे. आज 31 ऑगस्ट... आज श्री गणेश चतुर्थी... (Ganesh Chaturthi) ज्या दिवसाची अनेकांनी आतुरतेने वाट पाहिली आणि तो दिवस अखेर उजाडला आहे. आबालवृद्धांच्या लाडक्या गणपती बाप्पाचं आज घरोघरी आगमन होत आहे. सार्वजनिक मंडळांपासून घराघरात आकर्षक देखाव्यात आणि मखरात गणराज आज विराजमान होतील. बाप्पाची आज विधिवत प्राणप्रतिष्ठा करुन दहा दिवसांच्या उत्साहपर्वाला (Ganesh Utsav 2022) प्रारंभ होईल. बाप्पाच्या आगमनाने घराघरात मंगलमय वातावरण आहे. पुढील दहा दिवस बाप्पाची सजावट, आरत्यांचे स्वर, गौराईचे आगमन, गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष ऐकायला मिळणार आहे.


गणेशाच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त 
बाप्पाचं आगमन हा अत्यंत आनंदाचा दिवस असतो. आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. आज प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पा विराजमान होणार आहे. पंचांगाप्रमाणे गणपती प्रतिष्ठापना करण्याचा मुहूर्त पहाटे पावणे पाचपासून मध्यानकाळ संपेपर्यंत म्हणजे दुपारी दोनपर्यंत आहे, असं प्रसिद्ध दाते पंचांगचे प्रमुख मोहन दाते यांनी दिली आहे. "ही स्थापना करताना आपण साधारणतः ब्राह्म मुहूर्तापासून म्हणजे पहाटे पावणे पाचपासून मध्यानकाळ संपेपर्यंत म्हणजे दुपारी दोनपर्यंत आपल्या सोयीने कोणत्याही वेळी करु शकता. त्यासाठी वेगळे विशेष कोणतेही मुहूर्त पाहण्याची गरज नाही. घरातली सकाळची पूजा झाली की, त्यानंतर गणरायची उत्साहात स्थापना करावी. ज्यांच्याकडे जितक्या दिवसचा गणपती आहे त्यांनी त्याप्रमाणे सकाळी पूजा आणि संध्याकाळी आरती करावी," असं मोहन दाते यांनी सांगितलं. 


इतर दिवशीही गजबजलेली मुंबई आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने रोषणाईने आणखी उजळून निघाली आहे. सार्वजनिक गणेशोत्सवात गणपतींच्या दर्शनासाठी रात्रीपासूनच रांगा सुरु होतील. तर गौरी आणि सात दिवसाच्या गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर इतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडाळांतील देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी आणखी वाढेल. 


Hubballi Ganesh Chaturthi Celebrations : कर्नाटक उच्च न्यायालयाने हुबळी येथील ईदगाह (Hubballi Eidgah) मैदानावर गणेशोत्सवाची पूजा करण्यास परवानगी दिली आहे. धारवाड महापालिका आयुक्तांच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका फेटाळत न्यायालयानं काही अटींसह पूजेला परवानगी दिली आहे. उच्च न्यायालयानं (Karnataka High Court) गणेश चतुर्थीला परवानगी देण्याचा अधिकार्‍यांचा निर्णय कायम ठेवला. 


दरम्यान, यापूर्वी या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी झाली होती. ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं ईदगाह मैदानावर गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी नाकारताना हे प्रकरण उच्च न्यायालयात पाठवलं होतं.


राज्य सरकारनं पूजेला परवानगी दिली होती


कर्नाटक उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठानं यापूर्वी मैदानात यथास्थिती ठेवण्याचे आदेश दिले होते. परंतु विभागीय खंडपीठानं सरकारला पूजा करण्याची परवानगी मागणाऱ्या लोकांच्या अर्जांवर विचार करण्यास सांगितलं होतं. यानंतर राज्य सरकारनं 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर रोजी पूजेला परवानगी दिली होती. उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान कर्नाटक वक्फ बोर्डानं (Karnataka Waqf Board) ही जागा आपली संपत्ती म्हणून घोषित केली होती. तसेच, वर्षानुवर्ष या मैदानात ईदची नमाज अदा केली जात असल्याचं कर्नाटक वक्फ बोर्डानं म्हटलं होतं. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.