Maharashtra Breaking News 29 May 2022 : देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
कारंजा शहरातील दहीपुरा भागातील दोन तरुणी फिरण्यासाठी गेले असता म्हसनी गावालगत असलेल्या अडान धरण्यात पाय घसरून मृत्यू झाल्याची घटना संध्याकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास घडली घडली आहे. घटनेत मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव शाफीआ नासिर अली (वय 18 वर्ष रा दहीपुरा) आणि उजमा अनिस अन्सारी (वय 18 ) असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. गावातील नागरिकांच्या लक्षात ही घटना येताच नागरिकांनी तत्काळ बचावाचा प्रयत्न केला. मात्र दोघीचा मृत्यू झाला होता. दरम्यान या घटनेचा तपास कारंजा ग्रामीण पोलीस करत आहे.
हनुमान जन्मस्थळाचा वाद आता पोलीस ठाण्यात पोहोचलाय. कर्नाटकातील किष्किंधाचे दंडास्वामी गोविंदानंद सरस्वतीजी महाराज यांनी नाशिकमधील अंजनेरीच्या हनुमान जन्मस्थळाबाबत चुकीचा प्रचार आणि प्रसार सुरू केला आहे. हा प्रचार तातडीने थांबविण्यात यावा, त्यांची रथयात्रा थांबविण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन अंजनेरीच्या ग्रामस्थ आणि साधू महंतांकडून त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांना देण्यात आले आहे.
राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार टाळणे भाजपच्या हातात आहे, असे मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त आहे.
Maharashtra News : राज्यसभेसाठी भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पियूष गोयल आणि अनिल बोंडेंना उमेदवारी दिली.
Sanjay Raut : कागलमध्ये शिवसंपर्क अभियान राबविण्यात आले होते. या दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात यापुढे भाजपचं सरकार कधीच येणार नाही असं वक्तव्य केलं. तसेच उद्धव ठाकरे यापुढेही महाराष्ट्राचं नेतृत्व करणार असेही ते म्हणाले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे या विषयावर पडदा टाकूया असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले आहे. मी पहिल्यापासून या विषयावर बोलले नाही. परंतु, त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला असेल तर माझं सर्व माध्यमांना आवाहन आहे की, आपण सर्वजण मिळून त्या विषयावर पडदा टाकूया, असे सुप्रिया सुळे यांनी म्हंटले आहे.
शिराळा तालुक्यातील मेणी येथील श्री निनाईदेवी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत मनसे, राष्ट्रवादी आघाडीने उभारलेल्या पॅनेलने बाजी मारली आहे. मनसे, राष्ट्रवादी आघाडी विरुद्ध भाजप अशा लढतीत 13/0 ने मनसे, राष्ट्रवादी आघाडीने बाजी मारली आहे. राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार शिवाजीराव नाईक, मनसे जिल्ह्याध्यक्ष तानाजीराव सावंत यांच्या आघाडीने सर्व 13 जागा जिंकत भाजपच्या सत्यजित देशमुख गटाचा केला पराभव केला आहे.
लडाख येथे लष्कराच्या बसला झालेल्या अपघातात भारताच्या सात जवानांना वीरमरण आले. यातील दोन जवान महाराष्ट्रातील आहेत. यातील एक जवान कोल्हापूर जिल्ह्यातील हिंगलज येथील तर दुसरे जवान साताऱ्यातील विसापूर या गावातील आहेत. साताऱ्यातील विसापूर येथील जवान विजय शिंदे यांच्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अमर रहे अमर रहे, विजय शिंदे अमर रहे अशा जयघोषाने संपूर्ण परिसर दनानून गेला. यावेळी त्यांची पत्नी आणि आई यांचा आक्रोष सर्वांचे मन हेलावणारा होता. विजय यांचे दर्शन घेण्यासाठी आणि आखेरचा निरोप देण्यासाठी विसापूरसह परिसरातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यासह 14 कार्यकर्त्यांवर राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावती येथील शंकर नगर येथील राणा यांच्या घरासमोर रोडवर स्टेज टाकून रस्त्यावर अडथळा निर्माण केले आणि मध्यरात्रीच्या 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावून कार्यक्रम घेतला, त्यामुळे नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्ध्यात होणार आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या आज नागपुरात पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय झाला. काल महामंडळाची स्थळ निवड समिती वर्ध्याला जाऊन आली होती. त्यांनी सुचवल्याप्रमाणे आता हे साहित्य संमेलन वर्ध्यात होणार आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात पेट्रोल पंपावर पेट्रोल-डीझेलची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे पेट्रोल-डीझेल घेण्यासाठी लोकांची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. सिल्लोड तालुक्यातील भराडी गोलेगाव चौकातील अशाच एक पेट्रोल पंपाचा व्हिडिओ समोर आला आहे. शहराला होणारा पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा कमी करण्यात आल्याने टंचाई निर्माण झाली आहे.
Chandrakant Patil: सुप्रिया सुळे बद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची दिलगिरी, राज्य महिला आयोगाला लिहिले पत्र
उस्मानाबाद : खासदार सुप्रिया सुळे यांच्या दौऱ्यात नाराजी नाट्य,
सुप्रिया सुळेंचा ताफा मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी अडवला
राष्ट्रवादीचे मुस्लिम नगरसेवक व कार्यकर्ते नाराज ,सुप्रिया सुळे यांना भेटले कार्यकर्ते
सुप्रिया सुळे यांनी नाराज कार्यकर्ते यांना स्वतःच्या गाडीत बसविले व त्या स्वतः दुसरी गाडीत बसल्या
मुस्लिम समाजाला उस्मानाबाद दौऱ्यात स्थान न दिल्याने व एक ही कार्यक्रम न घेतल्याने कार्यकर्ते नाराज
सुळे यांनी मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळा ला भेट न दिल्याने कार्यकर्ते नाराज
सुप्रिया सुळे कडून कार्यकर्त्यांनी ची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मराठवाडा दौऱ्याचा आज शेवट असून त्या तुळजाभवानी देवीसह उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध तीर्थक्षेत्र मंदिरे यांत जाऊन दर्शन घेणार आहेत. काही वेळा पूर्वी त्यांनी तेर येथील संत गोरोबा काका यांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी तेरच्या विकासाबाबत त्यांनी भाष्य केलं. तेर येथील संग्रहलय अप्रतिम आहे. जागतिक स्तरावर याची ओळख व्हायला हवी. तसेच संत गोरोबा काका मंदिर आणि के रामलिंग अप्पा लामतुरे शासकीय वस्तू संग्रहालय यांच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत देखील यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केले. पुढील आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन विकासाचा आराखडा तयार करणार असून आगामी 2 वर्षात तेर, संत गोरोबा काका मंदिर आणि संग्रहालय विकासासाठी मास्टर प्लॅन बनवणार असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दोन दिवसांनंतर लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. रुटीन चेकअपसाठी नारायण राणे रुग्णालयात गेले असता ब्लाॅक असल्याचं आढळलं आणि त्यानंतर त्यांच्यावर ॲंजिओप्लास्टी करण्यात आलीय. काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी लिलावती रुग्णालयात जात नारायण राणेंच्या तब्येतीची विचारपूस केली होती.
पूर्व वैमनस्यातून कोल्हापुरात एका घरावर दगडफेक, फुलेवाडी परिसरातील विजय देसाई यांच्या घरावर हल्ला
हल्लेखोरांचा व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद झाला
मध्यरात्रीच्या सुमारास जवळपास पंधरा मिनिटं हल्लेखोरांची दगडफेक
हल्लेखोरांच्या दहशतीमुळे परिसरात भीतीचे वातावरण
पोलिसांनी एका संशयिताला घेतले ताब्यात
आजपासून 'मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'ला सुरूवात होणार आहे. हा महोत्सव 29 मे ते 4 जून या कालावधीत होणार आहे.महोत्सवातील सर्वोत्कृष्ट माहितीपटाला 'सुवर्ण शंख' आणि 10 लाखाचे रोख पारितोषिक मिळणार आहे. तसेच विविध श्रेणीतील विजेत्या चित्रपटांना आकर्षक रोख पारितोषिके, 'रौप्य शंख', ट्रॉफी आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत.या महोत्सवात भारतीय नॉन-फिचर फिल्म विभागातील एका दिग्गज व्यक्तीला प्रतिष्ठित 'व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार' 10 लाख रुपये, ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
चौथे अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलन संतनगरी शेगाव येथे होत आहे. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.राजेश मिरगे हे संत साहित्याचे अभ्यासक साहित्यिक आहेत. या साहित्य संमेलनासाठी राज्यभरातून वऱ्हाडी साहित्यिक शेगावात दाखल झाले आहे. दिवसभर वऱ्हाडी साहित्याची रेलचेल असणार आहे.
भंडारा जिल्ह्याच्या साकोली आणि लाखनी तालुक्यातुन जाणाऱ्या राष्ट्रीय माहामार्ग क्रमांक 6 वर बांधण्यात आलेल्या ओवर ब्रिज तसेच गोंदिया जिल्ह्यात तयार करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता त्यांच्या मासिक रेडिओ कार्यक्रम "मन की बात" द्वारे देशवासियांना संबोधित करतील. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता ऑल इंडिया रेडिओ आणि डीडी चॅनेलवर प्रसारित होणाऱ्या 'मन की बात' कार्यक्रमाचा हा 89 वा भाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 'मन'की बात हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमात देशभरातील बारा सामाजिक कामं करणाऱ्या संस्थांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील जळगाव शहरातील केशव स्मृती संचालित मातोश्री आनंदाश्रम याचा समावेश असणार आहे. मातोश्री संस्था व्यवस्थापनाच्या वतीने देण्यात आली आहे.
भाजपने संभाजीराजेंचा गैरवापर केला, असा आरोप संजय राऊतांनी केला. त्यानंतर आज संजय राऊत शाहू महाराजांच्या भेटीला न्यू पॅलेसवर जाणार आहे.
आयपीएलच्या 15व्या मोसमाची मेगा फायनल रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. समारोपाच्या खास कार्यक्रमानंतर रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल. यंदाच्या मोसमात नव्यानं दाखल झालेला गुजरात टायटन्स आणि 14 वर्षांनी फायनलमध्ये पोहोचलेली राजस्थान रॉयल्स यांच्यात फायनलचा हा थरार पाहायला मिळणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अंतिम सामना पाहणार आहेत.
पार्श्वभूमी
मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
फायनलचा थरार... गुजरातच्या टायटन्सचा जल्लोष...की राजस्थानचा 'रॉयल मार्च?'
आयपीएलच्या 15व्या मोसमाची मेगा फायनल रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. समारोपाच्या खास कार्यक्रमानंतर रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल. यंदाच्या मोसमात नव्यानं दाखल झालेला गुजरात टायटन्स आणि 14 वर्षांनी फायनलमध्ये पोहोचलेली राजस्थान रॉयल्स यांच्यात फायनलचा हा थरार पाहायला मिळणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अंतिम सामना पाहणार आहेत.
संजय राऊत शाहू महाराजांच्या भेटीला
भाजपने संभाजीराजेंचा गैरवापर केला, असा आरोप संजय राऊतांनी केला. त्यानंतर आज संजय राऊत शाहू महाराजांच्या भेटीला न्यू पॅलेसवर जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची "मन की बात"
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता त्यांच्या मासिक रेडिओ कार्यक्रम "मन की बात" द्वारे देशवासियांना संबोधित करतील. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता ऑल इंडिया रेडिओ आणि डीडी चॅनेलवर प्रसारित होणाऱ्या 'मन की बात' कार्यक्रमाचा हा 89 वा भाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 'मन'की बात हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमात देशभरातील बारा सामाजिक कामं करणाऱ्या संस्थांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील जळगाव शहरातील केशव स्मृती संचालित मातोश्री आनंदाश्रम याचा समावेश असणार आहे. मातोश्री संस्था व्यवस्थापनाच्या वतीने देण्यात आली आहे.
राष्ट्रीय महामार्गाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण
भंडारा जिल्ह्याच्या साकोली आणि लाखनी तालुक्यातुन जाणाऱ्या राष्ट्रीय माहामार्ग क्रमांक 6 वर बांधण्यात आलेल्या ओवर ब्रिज तसेच गोंदिया जिल्ह्यात तयार करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.
चौथे अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलन
चौथे अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलन संतनगरी शेगाव येथे होत आहे. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.राजेश मिरगे हे संत साहित्याचे अभ्यासक साहित्यिक आहेत. या साहित्य संमेलनासाठी राज्यभरातून वऱ्हाडी साहित्यिक शेगावात दाखल झाले आहे. दिवसभर वऱ्हाडी साहित्याची रेलचेल असणार आहे.
17 वा 'मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव'
आजपासून 'मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'ला सुरूवात होणार आहे. हा महोत्सव 29 मे ते 4 जून या कालावधीत होणार आहे.महोत्सवातील सर्वोत्कृष्ट माहितीपटाला 'सुवर्ण शंख' आणि 10 लाखाचे रोख पारितोषिक मिळणार आहे. तसेच विविध श्रेणीतील विजेत्या चित्रपटांना आकर्षक रोख पारितोषिके, 'रौप्य शंख', ट्रॉफी आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत.या महोत्सवात भारतीय नॉन-फिचर फिल्म विभागातील एका दिग्गज व्यक्तीला प्रतिष्ठित 'व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार' 10 लाख रुपये, ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
आज इतिहासात
1905 : शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याच्या ख्यातनाम गायिका हिराबाई बडोदेकर यांचा जन्म.
1972 : हिंदी चित्रपटअभिनेते पृथ्वीराज कपूर यांचे निधन.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -