Maharashtra Breaking News 28 August 2022 : देशासह राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
बीड वडवणी रोडवर जीप आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दुचाकीवरून दोघे जण वडवणीहून बीड कडे येत असताना मौज गावाजवळ दुचाकीला एका जीपने समोरून जोराची धडक दिली. या भीषण अपघातामध्ये दुचाकीवरील दोघा जणांचा जागीच मृत्यू झाला
सोलापुरात रेल्वेच्या ओव्हरहेड वायचा शॉक बसल्याने तरुण गंभीर जखमी झालाय. सोलापूर रेल्वे स्टेशन येथे उभ्या असलेल्या मालवाहतूक गाडीवर चढून सेल्फी काढताना अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.
Mumbai : मुंबईतील भायखळा विभागातील हंस रोडवरील इमारतीला आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
पुण्याच्या चांदणी चौक परिसरातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिसराचा दौरा केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांदणी चौकात ज्या रस्त्यांची कामं सुरू आहेत त्यांचा आढावा घेतला. पुणे महानगरपालिका आयुक्त, पिंपरी महानगरपालिका आयुक्त, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आणि पुणे पोलीस आयुक्तांसह इतर सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्प, पालघरमधील मेंढवण घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा, गुजरातकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर तीन ते चार किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा .
मेंढवण घाटात अपघात ग्रस्त झालेला टँकर काढण्यासाठी वाहतूक रोखली .
Nashik Breaking : लाचखोर अधिकारी दिनेश बागुलला तिन दिवसांची पोलिस कोठडी, बँक लॉकर्स, जमिनीच्या काही कागदपत्रांसंदर्भात तपासासाठी एसीबीने कोठडी वाढवून मिळावी अशी केली होती मागणी
अपंग निधीसाठी उपोषणाला बसलेल्या दिव्यांग मुलीचा उपोषणादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार
वैष्णवी रामचंद्र कुरुळे असे मृत दिव्यांग मुलीचं नाव
दिवसभर उन्हात बसल्यामुळे उपोषणकर्त्या मुलीला झाला त्रास, त्यातूनच तिचा मृत्यू झाल्याचा ग्रामस्थांचा दावा
ग्रामपंचायतीच्या निधीपैकी 5 टक्के रक्कम ग्रामपंचायतीकडून अपंगांसाठी खर्ची घालण्याची तरतूद आहे
मात्र चिकर्डे ग्रामपंचायतीने अनेक वर्षापासून हा निधी खर्ची घातला नाही त्याविरोधात सुरु होते उपोषण
18 ऑगस्टपासून निधी मिळावा म्हणून चिकर्डे गावातच उपोषण सुरू करण्यात आले होते
उपोषणाला गावातील दहा ते पंधरा लोक बसले होते
मात्र दिवसभर उन्हात बसल्यामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा स्थानिकांनी केला
आदिवासी विकास विभागातील बांधकाम विभागाचा 28 लाख 80 हजारांची लाच घेणारा आणि महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरलेला लाचखोर कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुलची आज कोठडी संपत असल्याने थोड्याच वेळात त्याला न्यायालयात हजर केले जाणार असून त्याची कोठडी वाढवून देण्याची मागणी एसीबीकडून केली जाणार आहे. गुरुवारी दुपारी नाशिकमधील तिडके कॉलनी परिसरातील राहत्या घरी लाच घेतांना त्याला रंगेहाथ अटक करण्यात आली होती. सेंट्रल किचनच्या वर्कऑर्डरसाठी एका ठेकेदाराकडून 28 लाख 80 हजार रुपयांची मागणी त्याने केली होती. दरम्यान आतापर्यंत बागुलच्या नाशिक आणि पुण्याच्या घरी 1 कोटी 44 लाख 3 हजार पाचशे रुपयांची रोख रक्कम, काही दागिने आणि महत्वाची कागदपत्रे एसीबीच्या हाती लागली आहेत तसेच काल देखिल दिवसभर एसीबीच्या कार्यालयात त्याची चौकशी करण्यात आली होती, त्याचे खाते असलेल्या बँकेसोबत देखिल पत्रव्यवहार करण्यात आला असून लवकरच लॉकर्स देखिल उघडले जाणार आहेत.
चांदशी परिसरातील पिंपळाच्या झाडाची मोठी फांदी दुचाकी समोर कोसळल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद
सुदैवाने दुचाकीचालक थोडक्यात बचावला
रस्त्याच्या कडेला असलेल्या धोकादायक वृक्षांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
सोलापूर शहरात आयकर विभागाची तपासणी संपल्याची शक्यता
आज सकाळपासून आयकर विभागाचे अधिकारी ज्या ठिकाणी तपासणी सुरु होती तिथे नाहीत
पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त देखील तपासणीच्या ठिकाणी नाहीये
गुरुवारी सकाळी 7 वाजता सोलापुरातील 7 ठिकाणी आयकर विभागाने तपासणी सुरु केली होती
सलग तीन दिवस तपास केल्यानंतर आयकर विभागाचे अधिकारी परातल्याची सूत्रांची माहिती
सोलापुरात 5 रुग्णालय, एक बांधकाम व्यावसायिक यांची झाली चौकशी
चौकशीत काय झालं याचे तपशील अद्याप समोर आलेले नाहीत
श्रावण महिना संपल्यानंतर आज पहिला रविवार आहे. त्यामुळे मांसाहार करण्यासाठी नागरिक उतावळे झाले आहेत. त्यामुळेच कोल्हापुरातील मटण आणि फिश मार्केटमध्ये नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. तसं पाहिलं तर रविवार आणि बुधवार हे कोल्हापूरकरांचे मांसाहार करण्याचे दिवस..त्यातच श्रावण संपल्यानंतर आणि गणेशोत्सवाच्या आधी आलेला रविवार कोल्हापूरकर मांसाहार करण्याची संधी सोडणार नाहीत.
देहूरोडमध्ये एक शाळकरी मुलगी गणवेशात गावठी दारू विकतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबाबत पडताळणी केली असता हा व्हिडीओ सामाजिक कार्यकर्ते श्रीजित रमेशन यांच्या टीमनं काढला असल्याचं समोर आलं आहे. अशा गोरखधंद्याना देहूरोड पोलिसांनी उघडपणे परवानगी दिली आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी या व्हिडीओबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. यात तथ्य आढळल्यास संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.
आज सकाळी चार वाजेच्या सुमारास औरंगाबाद - नागपूर महामार्गावर वाशिमच्या शेवती फाट्याजवळ झालेल्या ट्रकच्या समोरासमोर धडकेमध्ये दोन जागीच ठार झाले. अपघातात ठार झालेल्यांची नावं सुखदेव सिंह मंगलसिंह सरदार राहणार भिलाई छत्तीसगड (वय 47) आणि मुजीब वैजाद शेख (वय 26) राहणार शिवगाव ता. वैजापूर अशी आहेत. तर अपघातामध्ये सतपाल रामशीग जरवाल (वय 32) आणि हरपाल सिंह गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आलं आहे.
अपंग निधीसाठी उपोषणाला बसलेल्या दिव्यांग मुलीचा उपोषणादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार, वैष्णवी रामचंद्र कुरुळे असे मृत दिव्यांग मुलीचे नाव, दिवसभर उन्हात बसल्यामुळे उपोषणकर्त्या मुलीला झाला त्रास, त्यातूनच तिचा मृत्यू झाल्याचा ग्रामस्थांचा दावा
ग्रामपंचायतीच्या निधीपैकी 5 टक्के रक्कम ग्रामपंचायतीकडून अपंगांसाठी खर्ची घालण्याची तरतूद आहे
मात्र चिकर्डे ग्रामपंचायतीने अनेक वर्षापासून हा निधी खर्ची घातला नाही त्याविरोधात सुरु होते उपोषण
18 ऑगस्टपासून निधी मिळावा म्हणून चिकर्डे गावातच उपोषण सुरू करण्यात आले होते
उपोषणाला गावातील दहा ते पंधरा लोक बसले होते
मात्र दिवसभर उन्हात बसल्यामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा स्थानिकांनी केला
दरम्यान 3 महिन्यापूर्वी चिकर्डे ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात अपंग मुलांना बसवून आंदोलन केले होते
जिल्हाधिकाऱ्यांनी दोषींवर कारवाई करतो असे आश्वासन दिले मात्र दोषींवर कारवाई झालीच नसल्याने आम्ही उपोषणाला बसल्याचा उपोषणकर्त्यांचा दावा
मात्र या संदर्भात पोलिसात अद्याप कोणतीही नोंद नाही, किंबहुना नातेवाईकांनी पोलिसात कोणतीही तक्रार दिली नसल्याची पोलिसांची माहिती
आदिवासी विकास विभागातील बांधकाम विभागाचा २८ लाख ८० हजारांची लाच घेणारा आणि महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरलेला लाचखोर कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुलची आज कोठडी संपत असल्याने थोड्याच वेळात त्याला न्यायालयात हजर केले जाणार असून त्याची कोठडी वाढवून देण्याची मागणी एसीबी कडून केली जाणार आहे. गुरुवारी दुपारी नाशिकमधील तिडके कॉलनी परिसरातील राहत्या घरी लाच घेतांना त्याला रंगेहाथ अटक करण्यात आली होती. सेंट्रल किचनच्या वर्कऑर्डरसाठी एका ठेकेदाराकडून २८ लाख ८० हजार रुपयांची मागणी त्याने केली होती. दरम्यान आतापर्यंत बागुलच्या नाशिक आणि पुण्याच्या घरी १ कोटी ४४ लाख ३ हजार पाचशे रुपयांची रोख रक्कम, काही दागिने आणि महत्वाची कागदपत्रे एसीबीच्या हाती लागली आहेत तसेच काल देखिल दिवसभर एसीबीच्या कार्यालयात त्याची चौकशी करण्यात आली होती, त्याचे खाते असलेल्या बँकेसोबत देखिल पत्रव्यवहार करण्यात आला असून लवकरच लॉकर्स देखिल उघडले जाणार आहेत.
धूम स्टाईल मोटारसायकल चालविणे आणि स्टंटबाजीचे प्रकार युवकांकडून नित्याचे झाले आहेत. यामुळे अपघाताच्या घटनाही घडल्यात. एक तरुण त्र्यंबक रोडवरील महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी समोरून चक्क झोपून गाडी चालवीत होता, गाडी चालविताना त्याने सिग्नल ही क्रॉस केला सुदैवाने कुठली गाडी आडवी आली नाही नाहीतर इतरांना अपघाताला समोर जाण्याची वेळ आली असती. रस्त्यावर कुठेही पोलिसांनी त्याला अडवलं नाही चारचाकीतून प्रवास करणाऱ्या नी स्टंटबाजीचा हा व्हिडीओ रेकॉर्ड केलाय, मोटारसायकल चालक, महाविद्यालयिन तरुण स्टंटबाजी करतात मात्र पोलीस कारवाई काहीच होत नाही, एरवी हेल्मेट परिधान न करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करणाऱ्यासाठी घोळक्याने उभे राहणारे पोलिस स्टंटबाज करणाऱ्यांवर कारवाई का करत नाही असा सवाल उपस्थित होतोय.
सातारा येथून मुंबईकडे परत येताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दुपारी २.०० वा. पुण्यातील चांदणी चौक येथे थांबणार आहेत, अधिकाऱ्यांशी वाहतूक कोंडीसंदर्भात चर्चा करणार आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत येणार, 5 सप्टेंबर रोजी लालबागचा राजा सिद्धिविनायकाचे दर्शन घेणार, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या गणपतीचे ही अमित शहा दर्शन घेणार आहे, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी अमित शहा मुंबई देत असतात यंदाही ते येणार आहेत
माजी केंद्रीय मंत्री-खासदार अरविंद सावंत आणि आमदार भास्कर जाधव यांची शिवसेना नेते पदावर नियुक्ती. शिवसेना नेते लीलाधर डाके यांचे चिरंजीव पराग लीलाधर डाके यांची शिवसेना सचिव पदी नियुक्ती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नियुक्त्या घोषित.
तुम्ही मुंबईभर गणपती दर्शनाला जाण्याचा विचार करत असाल तर मोबाईल चोरीपासून सावध राहा. गणपतीच्या आगमनाने मुंबईभर मोबाईल चोरीला सुरुवात झाली आहे. शनिवारी चिंतामणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीच्या आगमनावेळी भाविकांचे सुमारे 72 मोबाईल चोरीला गेले. बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी जमली होती आणि गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मोबाईल चोरी केले आहेत. दर्शनानंतर बहुतांश लोक काळाचौकी पोलिस ठाण्याच्या बाहेर रांगेत उभे राहून चोरीची तक्रार नोंदवताना दिसले. काळाचौकी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून सणांच्या काळात काही टोळी कार्यरत असल्याचा संशय आहे.
अतिसंवेदनाशील असलेल्या परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या परिसरात राख माफियांकडून राखेचा उपसा केला जातो आणि याच राखेची चोरी करण्यासाठी वीज निर्मिती केंद्राजवळ स्फोट करण्यासाठी आलेल्या तिघांना सुरक्षा रक्षकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे त्यांच्याकडून 103 जिलेटीनच्या काड्या 150 तोटे बॅटरी यासह स्फोटासाठी लागणारे इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे. यामुळे औष्णिक वीज निर्मिती केंद्रासच धोका निर्माण झालाय.. राख उपसा करणाऱ्या राख माफियांकडून औष्णिक वीज निर्मिती केंद्राजवळच स्फोट करून राख उपसली जात होती.परवा दिवशी सायंकाळी असाच स्फोट करण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना सुरक्षा रक्षकांनी पकडले.
Mumbai-Goa Highway : महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) कालपासून मुंबई-गोवा महामार्गाच्या (Mumbai-Goa Highway) पाहणी दौऱ्यावर आहेत. रायगड (Raigad) पासून सिंधुदुर्गपर्यंतचा (Sindhudurg) मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाचा तपशील घेण्यासाठी मंत्री रवींद्र चव्हाण मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करून आज सिंधुदुर्ग दाखल झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आल्यानंतर कुडाळ मधील एमआयडीसी रेस्ट हाऊसमध्ये त्यांनी बांधकाम अधिकाऱ्यांशी तसेच महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन शिल्लक कामात संदर्भात आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई गोवा महामार्गाचे संपूर्ण काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल अशी आशा व्यक्त केली.
India vs Pakistan Live : भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सामना आज रंगणार आहे. आशिया कप 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली. आता युएईतल्या ट्वेन्टी ट्वेन्टी आशिया चषकात आज रोहित शर्माच्या टीम इंडियाचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी होणार आहे. बाबर आझमच्या पाकिस्तानी फौजेनं टीम इंडियाचं विश्वचषकातलं निर्विवाद वर्चस्व मोडून काढलं, त्याला जेमतेम दहा महिने उलटलेयत. योगायोगाची गोष्ट म्हणजे बाबर आझमच्या फौजेनं तो ऐतिहासिक विजय मिळवला, त्याच मैदानात आज भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमनेसामने येत आहेत.
PM Modi Mann Ki Baat : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) देशाला संबोधित करणार आहेत. मन की बात (Mann Ki Baat) च्या माध्यमातून ते संवाद साधतील. मन की बातचा हा 92 वा एपिसोड आहे. सकाळी 11 वाजता मन की बात कार्यक्रम होणार आहे. आजच्या मन की बातमध्ये पंतप्रधान काय बोलणार? याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.
पार्श्वभूमी
मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.
आज मौका मौका... आशिया चषकात भारत वि. पाकिस्तान लढत
युएईमधील टी-20 आशिया चषकात आज भारत आणि पाकिस्तान हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सामना आज रंगणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होणार आहे.
पंतप्रधान मोदींची 'मन की बात'
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. मन की बातच्या माध्यमातून ते संवाद साधतील. हा मन की बातचा 92 वा एपिसोड आहे. सकाळी 11 वाजता मन की बात कार्यक्रम होणार आहे. आजच्या मन की बातमध्ये पंतप्रधान काय बोलणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.
आज नोयडातील ट्विन टॉवर होणार जमीनदोस्त
अवैध बांधकामामुळे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर नोयडातील ट्विन टॉवर आज पाडण्यात येणार आहेत. 13 वर्षांत उभे राहिलेले हे ट्विन टॉवर्स तब्बल 3700 किलो स्फोटकांच्या साहाय्यानं अवघ्या 12 सेकंदात जमीनदोस्त करण्यात येतील. दोन्ही टॉवरमध्ये मिळून 915 फ्लॅट्स होते जे रिकामे करण्यात आलेत. या टॉवरच्या 500 मीटर अंतरावरील 1396 फ्लॅट्सही आज सकाळपर्यंत रिकामे करण्यात येतील.
पंतप्रधान मोदींच्या गुजरात दौऱ्याचा आज दुसरा दिवस
पंतप्रधान मोदींच्या गुजरात दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. मोदींच्या हस्ते भुज कच्छ येथील स्मृति वन स्मारकाचं उद्घाटन होणार आहे. श्यामजी कृष्ण वर्मा यूनिवर्सिटीत होणाऱ्या कार्यक्रमात मोदी सामील होणार आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर
विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते समर्थ रामदासांचे जन्मस्थान असलेल्या जांब समर्थ येथे भेट देऊन श्रीराम मंदिरातील मूर्ती चोरीच्या घटनेचा आढावा घेणार आहेत. तसेच, ते ग्रामस्थांशी चर्चा करणार आहेत, माजी मंत्री राजेश टोपेही जांब समर्थला भेट देणार आहेत
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -