Maharashtra Breaking News LIVE Updates : शरद पवार यांच्या भेटीला गृहमंत्री दिलीप वळसे
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या तैलचित्राचे अनावरण विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते पार पडते. यावेळी पंडित हृदयनाथ मंगेशकरांसह कुटुंबीय उपस्थित आहे. यावेळी बोलताना विक्रम गोखले म्हणाले आहेत की, ''दिदींच्या तैलचित्राचे अनावरण माझा हस्ते झाले मी ऋणी आहे.''
Pune : पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली संबोधून पुण्यातील धनकवडी परिसरातील दोन तरुणांनी एका तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडलीय, या दोघांविरोधात सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोहेल आणि आरबाज अशी या दोघांची नावे आहेत.याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी ही पुण्यातील धनकवडी येथे राहायला आहे. काल रात्री याच परिसरात ती तरुणी आपल्या घराजवळ थांबली असताना , आरोपी सोहेलने तरुणीला पाहत शिट्टी वाजवायला सुरुवात केली आणि तू पुष्पा चित्रपटातील हीरोइन श्रीवल्ली सारखी दिसतेस, मला तुझ्या सोबत लग्न करायच आहे असे म्हणत सोहेलने पीडीतेला मिठी मारली. या सगळ्याच प्रकारानंतर पीडित तरुणीने आरडाओरड सुरू केली त्यानंतर तिचा सख्खा भाऊ तिथे आला. पण सोहेल आणि अरबाज या दोघांनीही त्याला मारहाण केली आणि तिथुन फरार झाले. याप्रकरणी पीडित तरुणीने सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून अरबाज आणि सोहेल यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हळदीच्या कार्यक्रमात डिजेच्या तालावर नाचत नवरदेव आणि त्याच्या मित्रांनी चक्क पिस्तुलं बाहेर काढून हवेत गोळीबार केला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ उडाली आणि पोलीस प्रशासनाने नवरदेवासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला...अंबाजोगाई शहर पोलिसांनी पो.ना. गोविंद येलमाटे यांच्या फिर्यादीवरून बालाजी चाटे, शेख बाबा (रा. क्रांती नगर, अंबाजोगाई) आणि इतर तिघांवर अवैधरीत्या पिस्टल हातात घेऊन इतरांच्या जीवितास धोका निर्माण केल्या प्रकरणी कलम ३३६ सह शस्त्रास्त्र कायदा कलम ३, २५ अन्वये गुन्हा दाखल केला
Yavatmal News Update : ग्राम पंचायतीच्या मासीक सभेत ग्राम पंचायत सदस्याने अंगावर पेट्रोल ओतून घेऊन पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यामधील लाडखेड येथे ही घटना घडली आहे. आपल्या वार्डमधील पाणी टंचाईची समस्या सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक विलास हेडावू यांना वारंवार सांगूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, असा आरोप करत या सदस्याने पेटवून घेण्याच प्रयत्न केला.
पुण्याच्या बावधनमध्ये पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीने गाडीची तोडफोड केली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. तर संबंधित महिलेने गाडी मालकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही कुटुंब एकमेकांचे नातेवाईक आहेत. एकाच इमारतीत ते राहतात. पोलीस उपनिरीक्षकांच्या सासऱ्यांचा नावे तिथं फ्लॅट आहे. लगत सासऱ्यांच्या मामाचे फ्लॅट आहे. सासऱ्यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले त्यामुळे सध्या पोलीस उपनिरीक्षकाची पत्नी तिथे येत असते. अलीकडेच त्यांनी फ्लॅट समोर थोडं बांधकाम सुरू केलं. त्याला विरोध केल्याने पीएसआयची पत्नी संतापली आणि तिने गाडीची अशी तोडफोड केली. तसेच मारहाण केल्याचा दावा केला आहे, म्हणून हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. तर पीएसआयच्या पत्नीने गाडी मालकाने विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले असून हिंजवडी पोलीस पुढील तपास करत आहेत.
दख्खनचा राजा श्री ज्योतिबाची यात्रा या वर्षी पूर्ण क्षमतेने होणार आहे. यासंदर्भात पालकमंत्री सतेज पाटील यांनी माहिती दिली आहे.
Maharashtra News : शरद पवार यांच्या भेटीस गृहमंत्री दिलीप वळसे पाटील पोहचले आहेत. राज्यातील गृह विभागाच्या संदर्भात चर्चा करणार आहेत. राज्याचे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये हे देखील शरद पवारांच्या भेटीला आले आहेत.
राज्यातील गृह विभागाच्या संदर्भात पवार- वळसे आणि लिमये यांच्यात बैठक होणार आहे.
जितेंद्र आव्हाड शरद पवार यांची भेट घेणार आहे. आमदारांच्या घरांच्या घोषणेसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या घोषणेनंतर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या भेटीनंतर जितेंद्र आव्हाड यांची भूमिका कायम राहणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
Ahmednagar News Update : अहमदनगर येथील लाल बावटा संघटना, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं आहे. 21 हजार रुपये मानधन मिळावे, सेविका आणि मदतनीस यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावं या मागणीसह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं आहे. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेने दिला आहे.
Jalgaon News Update : जळगावातील यावल आगारातील एसटी कर्मचाऱ्याने रेल्वेखाली उडी घेवून आत्महत्या केली आहे. शिवाजी पाटील असे या एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. शहरातील शिवाजीनगर स्मशानभूमीसमोर डाऊन लाईनवर या एसटी चालकाने रेल्वेखाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केली आहे.
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासोबत झालेल्या चर्चेत संपावर तोडगा निघालेला नाही. आधी कामावर हजर राहा त्यानंतर उद्या ऑफलाईन बैठक घेऊ असे, ऊर्जामंत्र्यांनी संघटनांना आवाहान केले आहे. संघटनाकडून खासगीकरणं करणार नसल्याबाबतच्या लेखी आश्वासनाची मागणी केली आहे. ऊर्जामंत्री नितिन राऊत यांच्याकडून मागणी मान्य न झाल्यामुळे कर्मचारी संपावर ठाम आहेत, अशी माहिती एबीपी माझा'ला विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे.
OBC Sammelan In Shegaon : ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने शेगाव येथे ओबीसी समाज अधिकार संमेलन घेण्यात आले. या संमेलनामध्ये ओबीसींचे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित होण्यासाठी केंद्र सरकारने इम्पिरिकल डेटा उपलब्ध करून द्यावा. केंद्र सरकारने देशभरात जातनिहाय जनगणना करावी तसेच देश पातळीवर स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन करण्यात यावे या सर्व विषयावर संमेलनामध्ये चर्चा करण्यात आली .या संमेलनामध्ये छत्तीसगडच्या मुख्यमंत्री भूपेश बघेल, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महिला बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी उपस्थिती लावली. राज्यात ओबीसी प्रश्नावर खूप मोठं वादंग सुरू आहे, राज्यसरकार ओबीसी समाजाच्या पाठीशी खंबीर उभे आहे, ओबीसी राजकीय आरक्षण मिळाल्याशिवाय पुढील निवडणुका होणार नसल्याचे सूतोवाच नाना पटोले यांनी केले,
Pune Shirur Accident : शिरूर तालुक्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला असून अपघातानंतर चालकाने चालवली तब्बल पाच किलोमीटर धोकादायक पद्धतीने कार चालवली.शिरूर तालुक्यातील कोंढापुरी हद्दीमध्ये कार चालकाने टू व्हीलर चालकाला धडक देऊन अपघात केला त्यानंतर अपघात ग्रस्त कारचा टायर फुटला .टायर तुटलेल्या अवस्थेत कार चालकाने तब्बल 5 ते 6 किलोमीटर कार चालवत शिक्रापुर पर्यंत आणली यावेळी धोकादायकरित्या कारच्या चाकाचा डिक्स रस्त्यावर घासुन आगीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या यावेळी मोठ्या अनर्थ टळला असुन हा सर्व थरार मोबाईल मध्ये चित्रित झाला असुन शिक्रापूर पोलीस कार चालकाचा शोध घेत आहेत.
पालघर : सफाळे येथील करवाळे डॅम येथे पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. प्रविण प्रभाकर पाटील असं मृत तरुणाचं नाव आहे. करवाळे डॅम इथे नवघर गावातील काही तरुण रविवारी पोहोण्यासाठी गेले होते. त्यातील प्रविण प्रभाकर पाटील या तरुणाने डॅमवरील पाण्याच्या टाकीवर चढून उंचीवरुन पाण्यात उडी मारली. परंतु उडी मारल्यानंतर पाण्यात गेलेला तरुण पुन्हा बाहेर आलाच नाही. प्रविणचा डॅममध्ये उडी मारतानाचा व्हिडीओ त्याच्या मित्राच्या मोबाईलमध्ये कैद झाला आहे. बुडालेल्या तरुणाचा मृतदेह अद्याप हाती लागला नसून त्यासाठी शोध मोहीम सुरु आहे.
घाटनांदूर रेल्वे स्टेशन येथील ही घटना असून ड्युटीवर असलेल्या स्टेशन मास्तरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. यानंतर पनवेल एक्सप्रेस आणि शिर्डी या दोन रेल्वे स्टेशनवरच थांबून ठेवाव्या लागल्या, कोरोना काळात कर्मचारी कपात केल्यामुळे दुसरा कर्मचारी रेल्वे स्टेशनवर नव्हता अशी माहिती समोर येतेय.
CM Pramod Sawant Oath : डॉ. प्रमोद सावंत यांनी दुसऱ्यांदा घेतली गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, कोकणी भाषेत घेतली शपथ, पंतप्रधान मोदींसह दिग्गज नेत्यांची उपस्थिती
वर्धा : हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथे शेती खरेदीच्या वादातून 40 वर्षीय शेतकऱ्याची निर्घृण हत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. शेतकऱ्याला गाडीवर बसवून शेतात नेऊन त्याच्या डोळ्यात तिखट टाकून नंतर दगडाने ठेवून हत्या करण्यात आली. दिनेश मारोती महाजन असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रमोद भाके याला अटक केल्याची माहिती आहे.
Petrol-Diesel Price Today 28 March 2022 : आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या दरांत (Crude Oil Price) खूपच वाढ झाली आहे. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine War) कच्च्या तेलाच्या आयात-निर्यातीवर परिणाम झाला आहे. ज्याचा परिणाम किमतींवर झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच, भारतीय तेल कंपन्यांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आज म्हणजेच, 28 मार्च 2022 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू करण्यात आले आहेत. ही वाढ गेल्या 7 दिवसांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती (Petrol Diesel Price) 6 वेळा वाढल्या आहेत.
Pravin Darekar Mumbai Bak : मुंबई बँकेत मजूर म्हणून बोगस नोंद करून संचालक मंडळात निवडून गेलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि भाजप प्रवीण दरेकर आज हायकोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. मुंबई सत्र न्यायालयाने दरेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. मात्र, मंगळवारपर्यंत अटकेपासून दिलासा दिला होता.
मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी असताना दरेकर यांनी अनेक घोटाळे केले असल्याचे आरोप करण्यात आले होते. प्रवीण दरेकर हे बँकेच्या संचालक मंडळावर निवडून गेले होते. मात्र, त्यांनी मजूर या प्रवर्गातून अर्ज दाखल केला होता. प्रवीण दरेकर यांनी बोगस पद्धतीने मजूर म्हणून नोंदणी केली असल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी आता चौकशी सुरू आहे.
पार्श्वभूमी
Petrol-Diesel Price Today 28 March 2022 : आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या दरांत (Crude Oil Price) खूपच वाढ झाली आहे. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine War) कच्च्या तेलाच्या आयात-निर्यातीवर परिणाम झाला आहे. ज्याचा परिणाम किमतींवर झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच, भारतीय तेल कंपन्यांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आज म्हणजेच, 28 मार्च 2022 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू करण्यात आले आहेत. ही वाढ गेल्या 7 दिवसांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती (Petrol Diesel Price) 6 वेळा वाढल्या आहेत.
किती रुपयांनी वाढणार पेट्रोल-डिझेल?
सोमवार 28 मार्च रोजी सकाळी 6 वाजता पेट्रोल 30 पैशांनी आणि डिझेल 35 पैशांनी महागलं आहे. 22 मार्चपासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्यास सुरुवात झाली असून, त्यानंतर एक दिवस वगळता दररोज काही ना काही दरांत वाढ होत आहे. 28 मार्चच्या दरवाढीमुळे 7 दिवसांत पेट्रोल 4 रुपयांनी तर डिझेल 4.10 रुपयांनी महागलं आहे.
Pravin Darekar : प्रवीण दरेकर घेणार हायकोर्टात धाव; अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल करणार
Pravin Darekar Mumbai Bak : मुंबई बँकेत मजूर म्हणून बोगस नोंद करून संचालक मंडळात निवडून गेलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि भाजप प्रवीण दरेकर आज हायकोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. मुंबई सत्र न्यायालयाने दरेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. मात्र, मंगळवारपर्यंत अटकेपासून दिलासा दिला होता.
मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी असताना दरेकर यांनी अनेक घोटाळे केले असल्याचे आरोप करण्यात आले होते. प्रवीण दरेकर हे बँकेच्या संचालक मंडळावर निवडून गेले होते. मात्र, त्यांनी मजूर या प्रवर्गातून अर्ज दाखल केला होता. प्रवीण दरेकर यांनी बोगस पद्धतीने मजूर म्हणून नोंदणी केली असल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी आता चौकशी सुरू आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -