मुंबई : मुंबईतील तब्बल एक हजार कोटींच्या टोरेस घोटाळा प्रकरणाचा भांडाफोड भाजीपाला विक्रेता आणि व्यापारी प्रदीपकुमार वैश्यच्या सतर्कतेमुळे झाला. वैश्यनं वेळीच पोलिसांना माहिती दिली ज्यामुळं तानिया कसातोवा आणि वॅलेंटिना कुमार या दोघींचा अन्यथा पैसे आणि त्या दोघी पसार झाल्या असत्या. टोरेस कंपनी गैरव्यवहार प्रकरणात ज्या प्रदीपकुमार वैश्यचे 14 कोटी अडकलेत. त्यानेच या गुन्ह्यांला वाचा फोडल्याचे तपासात समोर आले आहे.
प्रदीपकुमार वैश्य याचा टोरेस कंपनीच्या समोरील गल्लीच भाजीचा व्यवसाय आहे. होलसेल दरात तो भाजी विकतो. या गुंतवणूकीत प्रदीपकुमार वैश्यनं स्वत:चे 4 कोटी तर नातेवाईक मित्र परिवार आणि व्यापारी यांचे मिळून 14 कोटी गुंतवलेले आहेत. याच दरम्यान त्याची ओळख कंपनीतील एका कर्मचाऱ्यासोबत झाली होती.
तो प्रदीपला प्रत्येक गुंतवणूक आणि त्यावरील ऑफरची माहिती देत असे.
गुंतवणूकदारांना काही आठवड्यांनी गुंतवणूकीवर मिळणारी रक्कम ही येणं बंद झालं.गुंतवणूकदार वारंवार दादर कार्यालयात चौकशीला येत होते. आज उद्या रक्कम मिळून जाईल नवीन वर्ष आहे. थोडं पुढे मागे होतं अशी थातूरमातूर उत्तर देऊन गुंतवणूकदारांना कर्मचारी परत पाठवायचे.मात्र प्रदीपकुमार वैश्यला संशय आला होता. प्रदीपच्या संपर्कात असलेला टोरेसाचा कर्मचाकी सोमवारी पहाटे दादरच्या टोरेस कंपनीच्या मुख्य कार्यालयात होता.त्याच वेळी घाई गडबडीत पहाटे तानिया कसातोवा आणि वॅलेंटिना कुमार या दोघी त्या ठिकाणी आल्या होत्या.
तानिया कसातोवा आणि वॅलेंटिना कुमार दादरच्या कार्यालयाच्या तिजोरीतील रक्कम एका कर्मचार्याच्या मदतीने बॅगेत भरत होत्या.प्रदीपकमारला त्याच्या संपर्कातील कर्मचाऱ्यानं तातडीनं याची कल्पना दिली. भाजी व्यवसायासाठी पहाटेच दादरला आलेला प्रदीप त्याच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घेऊन टोरेसच्या कार्यालयात पोहोचला.
टोरेसमध्ये काम करणाऱ्या त्या कर्मचाऱ्यानं तोपर्यंत तानिया कसातोवा आणि वॅलेंटिना कुमार या दोघींचा पैसे घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाचा व्हिडिओ बनवला. प्रदीपकुमारनं कार्यालयाच्या गेटवर पोहचेपर्यंत अन्य व्यापारी ज्याचे पैसे टोरेसमध्ये गुंतवले होते त्यांना फोन करून बोलावले होते. थोड्याच वेळात टोरेसं कंपनीबाहेर गोंधळ उडाला. प्रदीपने पोलिसांनाही फोन करून पाचरण केले. त्यावेळी शिवाजी पार्क पोलिस घटनास्थळी दाखल होतं
स्थानिक आमदार महेश सावंतही तोपर्यंत तिथे पोहचले होते. पोलिसांनी तानिया कसातोवा आणि वॅलेंटिना कुमार यांना ताब्यात घेतले. टोरेस कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीने प्रदीपला दिलेली माहिती, प्रदीपने तातडीने कार्यालय गाठल्याने हा भांडाफोड झाला. अन्यथा तानिया कसातोवा आणि वॅलेंटिना कुमार या दोघीही कार्यालयातील उर्वरित रक्कम घेऊन पसार झाल्या असत्या. आर्थिक गुन्हे शाखेने ज्यावेळी दादरच्या टोरेस कार्यालयावर छापेमारी केली त्यावेळी त्यांना अंदाजे ३ कोटीच्या आसपास रोकड सापडली. त्याच बरोबर काही भेटवस्तू, गिफ्ट व्हाऊचरही सापडलेत. प्रदीपच्या सतर्कतेमुळे या टोळीचा भांडाफोड झाल्यानेच पोलिसांनी प्रदीपच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करून पुढे अटकेची कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
इतर बातम्या :